आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे दोन विरुद्ध प्रकारच्या नजरांनी बघता येतं. पहिली, तटस्थपणे कार्यकारण भाव शोधून; आणि दुसरी, व्यक्तीसापेक्ष विचारांतून

तुमच्याआमच्या आयुष्यात ‘frequency bias’ सततच डोकावणार आहे. त्यानं काही बिघडत नाही. फक्त, त्याच्या प्रभावाखाली येऊ नका. तो येतो, काही काळ थांबतो, आणि निघून जातो. मग पुन्हा येतो... हे चालूच राहणार. तुम्ही ठाम रहा. सिन्क्रोनिसिटीच्या अनुभवांनीही आपलं आयुष्य सुखद होतं. जीवनातली ही मजा कायम घेत रहा. आयुष्याच्या महावस्त्रावर विविध खऱ्या आणि आभासी आकृतीबंधांची वेलबुट्टी काढत रहा, आपली कथा आपणच रंगवत रहा. हसत रहा.......

लोपॅडो टेमॅको सिलॅझो गॅलिओ क्रॅनिओ लेइप्सॅनो ड्रिम हायपो ट्रिमॅटो सिल्फिओ पॅरॅओ मेलिटो कॅटॅकेझी मेनो किच्ल एपि कोसिफो फॅटो पेरिस्टर अलेकट्रायन ऑपटे केफॅलिओ किगक्लो पेलेइओ लॅगॉइओ सिराइओ बॅफे ट्रॅगॅनो टेरायगॉन

हे एका ग्रीक खाद्यपदार्थाचं इंग्रजी नाव आहे. ‘एक्लेझिआझाऊझाई’ या ग्रीक नाटकात या डिशचा उल्लेख आहे. आता हा पदार्थ काल्पनिक होता की, त्या काळी खरंच ग्रीसमधल्या बायका हा पदार्थ शिजवून आपल्या नवऱ्यांना खाऊ घालत होत्या का, हे नक्की माहीत नाही. पण रेसिपीच्या वर्णनावरून तरी यात असंभव असं काही वाटत नाही. इतर कोणताही इंग्रजी शब्द या लांबीचा नाही, असं ‘गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’वाल्यांनी १९९० साली सांगितलेलं आहे.......

‘ब्लांडिग्ज’ हा शब्द ‘वुडहाऊसिया’ या स्वप्नभूमीतल्या देशाशी संबंधित आहे. या काल्पनिक देशात अनेक प्रांत आहेत. त्यातल्या एका प्रांताचं हे नाव आहे!

एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेणं हे एखाद्या शेरलॉक होम्स, अर्क्युल प्वारो, मिस मार्पल किंवा गेला बाजार आपल्या एसीपी प्रद्युम्न यांच्यासारख्या विख्यात डिटेक्टिव्ह लोकांच्या कामगिरीपेक्षा कमी नसतं. वेगवेगळे सुगावे लागतात, पुरावे हाती येतात, अजीबोगरीब अनुमान काढले जातात, आणि मग या सगळ्या उपलब्ध सामग्रीवरून निष्कर्ष निघतात. बहुतेक वेळा तर्कशुद्ध निष्कर्षांवरून हाती आलेला निकाल खरा आणि अंतिम ठरतो.......

पोर्नोग्राफी हे मुळात समस्त स्त्रीवर्गाला घृणास्पद रीतीनं अवमानित करण्याचं, पुरुषी वर्चस्वाच्या भावनेतून आणि अतृप्त वासनेतून जन्मलेलं एक हत्यार आहे आणि याला बऱ्याच अंशी लॅरी फ्लिंट जबाबदार आहे!

पोर्नोग्राफी ‘लाइलाज’ आहे. ती कधीच मरणार नाही. पण स्त्रियांकडे बघण्याची आपली मानसिकता तर आपण नक्कीच बदलू शकतो. शोषणविरहित मानवी समाज ही युटोपियन फँटसी आहे, पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हे एक साधं पाऊल तर आपण नक्कीच उचलू शकतो. आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. सर्व स्त्रियांना आदर, सन्मानानं वागवणं, त्यांचा मान राखणं, त्यांचं शोषण होऊ न देणं, एवढी जाणीव जरी झाली, तरी ते सध्यापुरतं पुरेसं आहे.......

‘डुलाली टॅप’, ‘डेली बेली’ आणि ‘बंगलोर्ड’ : देवळाली, दिल्ली, बंगलोर ही गावं खूप चांगली आहेत. पण तरीही त्यांच्या नावांना कुत्सित, निंदाव्यंजक अर्थ प्राप्त झालाय

देवळाली, दिल्ली आणि बंगलोर या तीन गावांमध्ये काय साम्य आहे? तसं पाहिलं तर काहीच नाही. पहिलं एक छोटेखानी टुमदार गाव आहे, बाकीची दोन महानगरं आहेत. एक उत्तरेला आहे, एक पश्चिमेला आणि एक दक्षिणेकडे आहे. या तिन्ही ठिकाणी भारतीय लष्कराचे महत्त्वाचे तळ आहेत हे एकच साम्य दिसतं बुवा. नाही, अजून एक साम्य आहे. या तीनही ठिकाणांच्या नावांवरून इंग्रजी भाषेत शब्द बनलेले आहेत. आणि हे तीनही शब्द नापसंती-दर्शक आहेत, हे विशेष.......