तळीराम, बिब्युलस, वाऊझर यांच्यासह मद्यप्यांच्या दुनियेचा फेरफटका
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 30 November 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध तळीराम Taliram बिब्युलस Bibulous वाऊझर Wowser

शब्दांचे वेध : पुष्प सोळावे

‘व्हॉट्सअ‌ॅप’ युनिवर्सिटीतर्फे रोज नवे नवे, मोलाचे संदेश प्रसारित होत असतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कालच त्यांच्यातर्फे आलेल्या एका संदेशात ‘रम’ या औषधाचे एक दोन घोट गरम पाण्यासोबत रोज घेतले तर प्रकृती चांगली राहते आणि कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होत नाही, असे लिहिले होते. मला हा उपदेश फारच आवडला. म्हणून मी त्यानुसार प्रयोग करून बघायचे ठरवले. बाजारातून रमचा एक बुधला आणला आणि त्यातले थोडेसे औषध गरम पाण्यासोबत घेतले. त्याची चव मला इतकी आवडली की, मी आणखी दोन वेळा हा डोस लगेच रिपीट केला. त्यानंतर काय झाले, त्याचे वर्णन माननीय गुलाम अलीसाहेबांच्या फार जुन्या शब्दांत ऐका : ‘हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पी ली’ वगैरे, वगैरे…

हा हंगामा करणाऱ्या या व्यक्तीचे नाव मी सांगणार नाही, पण तुम्हाला ते सहज लक्षात येईल. मग मी माझ्या बचावासाठी पहिले गुलाम अलींचे नाव घेतले. मग ‘हाय कंबख़्त, तू ने (कभी) पी ही नहीं’, असा डायलॉगदेखील मारून पाहिला. या कशाचाही फायदा झाला नाही, तेव्हा मात्र मला राम गणेश गडकऱ्यांच्या ‘तळीरामकाकां’ना शरण जावे लागले. सुदैवाने माझी स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या गडकरींच्या ‘एकच प्याला’ या नाटकाचे संवाद मला तोंडपाठ होते. मी त्यातल्या अंक पहिला, प्रवेश दुसरा मधला हा मौलिक युक्तिवाद माननीय पत्नीसाहेबांसमोर जसाच्या तसा उदधृत केला. त्यानेही त्यांचे समाधान झाले नाही, आणि माझ्या खाती आणखी एक पातक जोडले गेले, हे जाऊ द्या.

दारू वाईट नाहीच; उलट तिच्या सेवनाने काय काय लाभ होतात, हे सांगताना तळीरामकाका म्हणतात -

“तळीराम : हं, प्रेमात काय जीव आहे? प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुद्धा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुद्धा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वत:लाच मदिराक्ष बनता येतं! मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही! चोरीच्या बाबतीत तर तो बेटा अगदी अजाण असतो! एखादी लहानशी गोष्टसुध्दा त्याला दुसऱ्याजवळून चोरून ठेवता येत नाही- फटदिशी तो ती बोलून टाकतो.”

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

आहे ना तर्कशुद्ध समर्थन?

मी स्वतः बेवडा नाही, पण मला तळीरामसारखे सुसंस्कृत बेवडे मनापासून आवडतात. निदान, मला त्यांचा राग तर मुळीच येत नाही.

तळीराम या व्यक्तीविषयी - खरे म्हणजे त्या पात्राविषयी - आजवर इतके काही लिहून आले आहे, की, मी काही नवीन सांगावे असे काही उरलेले नाही. पण आज मी ‘तळीराम’ या शब्दाविषयी बोलणार आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव जेव्हा भाषेत शब्द म्हणून वापरले जाऊ लागते, तेव्हा त्याला अमरत्व प्राप्त होते. अशा शब्दांना ‘इपॉनिम’ (eponym) म्हणतात. नाम आणि विशेषण अशा दोन्ही प्रकारे तो शब्द वापरात आणला जाऊ शकतो. इंग्रजीत अशा ‘इपॉनिम’ची भरमार आहे. मराठीत त्या मानाने असे शब्द फारसे दिसत नाहीत. पण जे थोडेफार शब्द आहेत, त्यात आपल्या ‘तळीरामकाकां’चा प्रामुख्याने समावेश होतो. ‘तळीराम’ म्हणजे ‘खरा मदिराप्रेमी’!

‘तळीराम’ हे काही नुसतेच एक काल्पनिक पात्र नाही. ते एक समूहनिदर्शक चिन्ह आहे. वास्तव जगात दारू पिणाऱ्यांची संख्या दारू न पिणाऱ्यांपेक्षा जास्त निघेल. काही लोक गंमत म्हणून कधीमधी दारू पितात, काही व्यसन म्हणून रोज पितात. दारू चांगली की वाईट, दारू प्यावी की न प्यावी, हे आणि यासारखे अन्य तात्त्विक प्रश्न बाजूला ठेवा. कोणी काहीही म्हटले तरी लोक दारू पितातच आणि पिणारच. खुलेआम पिऊ देत असाल तर ठीक आहे, नाहीतर चोरून पिऊ, पण पिऊ, असे म्हणणाऱ्यांचा एक फार मोठा वर्ग मानवी समाजात आहे. तळीराम हा यांचे प्रतिनिधित्व करतो. त्याला दारू आवडते. दारूने शरीराची हानी होत असली तरी त्याला त्यामुळे काही फरक पडत नाही. तो दारू एक नित्यकर्म म्हणून, दैनंदिन उपासना केल्यासारखी भक्तीभावाने पितो. तो दारूवर प्रेम करतो. तिची पूजा करतो. तो तिच्याविरुद्ध काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. याउलट दारू किती चांगली हे तो तुम्हाला सप्रमाण पटवून देऊ शकतो. याचा पुरावा म्हणजे आधी उदधृत केलेला तो ‘एकच प्याला’मधला संवाद.

यावरून मला एक वेगळाच किस्सा आठवला. १९६०नंतर स्वयंपाकासाठी कुकिंग गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. साधारणपणे १९६७च्या सुमारास नागपूरला बर्शेन आणि एसो या कंपन्यांचे गॅस सिलेंडर बऱ्यापैकी उपलब्ध होऊ लागले होते. १९७०पर्यंत आमच्या परिचयाच्या जवळपास प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आले होते. आमच्या ओळखीच्या एक बाई मात्र अजूनही स्टोव्ह आणि चुलीवरच स्वयंपाक करायच्या. त्या नोकरी करत असत. त्यांची खूप तडतड व्हायची, घरचे सगळे सांभाळून वेळेवर ऑफिस गाठायची. एकदा न राहवून माझ्या आईने त्यांना विचारले की, तुम्ही गॅस का विकत घेत नाही? तुमचे काम सोपे होईल, वेळ वाचेल. यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘हे तुम्ही आमच्या ‘ह्यांना’ पटवून द्या. (त्यांचे ‘हे’ एक विक्षिप्त वल्ली म्हणून प्रसिद्ध होते!) तुम्ही त्यांना गॅस कसा चांगला असतो, हे सांगायला गेलात तर ते तुम्हाला गॅस कसा वाईट आणि धोकादायक असतो, हे एखाद्या वकिलापेक्षाही प्रभावीपणे पटवून देतील - आणि मग तुम्हीच तुमच्या घरचा गॅस विकून टाकाल.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

धातूच्या नळकांड्यात बंद असलेला इंधनवायू सुरक्षेच्या दृष्टीने वाईट असतो आणि त्यावर शिजवलेले अन्नदेखील स्वास्थ्यासाठी खराब असते, असा या गृहस्थांचा ठाम समज होता. (बऱ्याच काळाने जेव्हा त्यांचा मुलगा कमावता झाला, तेव्हा त्यांच्या घरात गॅस आणला गेला!) माझी आई यावर काही बोलली नाही. पण तिने संध्याकाळी माझ्या वडिलांना हा किस्सा ऐकवला, तर वडील म्हणाले, ‘त्या तळीरामाशी बोलण्यात काही अर्थ नाही.’ आईने विचारले, ‘म्हणजे ते दारू पितात का?’ यावर वडील हसत म्हणाले, ‘नाही, पण तरी ते एक प्रकारचे तळीरामच आहेत.’ तळीरामाला तुम्ही जर दारू किती वाईट हे सांगायला गेलात तर त्याच्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर तो तुम्हाला दारू किती चांगली हे पटवून द्यायचा. त्याच्या शब्दांत एवढी ताकत होती की, त्याने दारूचा भरलेला प्याला तुमच्या हातात ठेवला असता तर तुम्ही तो आनंदाने रिचवला असता. हे गॅसविरोधी गृहस्थ असेच आपल्या वाणीच्या जोरावर लोकांना त्यांच्याकडचे गॅस कनेक्शन काढायला भाग पाडू शकत होते. 

त्या वेळी मी सातवी-आठवीत होतो. ‘तळीराम’ या शब्दाशी झालेला हा माझा पहिला परिचय. हे एका नाटकातले पात्र आहे, एवढेच मला आईकडून समजले होते. काही वर्षांनी कुठल्या तरी प्रकाशनसंस्थेने ‘समग्र गडकरी वाङ्‌मय’ पुनर्प्रकाशित केले. आम्हीही तो पूर्ण संच विकत घेतला. त्यातल्या एक एक पुस्तकाचा फडशा पाडताना नंतर मला ‘एकच प्याला’मध्ये हे पात्र सरते शेवटी सापडले. मी तर तेव्हाच त्याचा फॅन झालो होतो, पण हे घरी उघडपणे सांगायची सोय नव्हती.

त्या काळी दारूबंदीचा प्रचार जोरोंशोरों से व्हायचा. गणपती, दुर्गा, शारदा, किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांत दारूविरोधी प्रचारपट आवर्जून दाखवले जायचे. मी चुकत नसेन तर ‘हा माझा मार्ग एकला’ हा चित्रपटही त्याच प्रचाराचा एक भाग म्हणून दाखवला जाई. त्यामुळे दारू वाईट आणि दारू पिणारेदेखील वाईट अशीच समजूत झाली होती.

ही समजूत दूर व्हायला काही काळ जावा लागला. दारू एक वेळ वाईट असूही शकते, पण दारू पिणारेही वाईट असतात, हा भ्रम पुढे जेव्हा अनेक दारूबाजांच्या सहवासात आलो, तेव्हा गेला.

मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतः मद्यपान नका करू हवे तर, पण जवळपासच्या मद्यपींना एकदम बहिष्कृत करू नका, त्यांना समजून घ्या, त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करा. ती अगदीच ‘गॉन केस’ असेल तर सोडून द्या, पण तरीही त्याचा राग नका करू.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

‘तळीराम’ हा मराठीतला ‘इपॉनिमस’ शब्द जगातल्या इतरही भाषांत मद्यप्रेमींसाठी वापरायला काही हरकत नसावी. तसे पाहिले तर इंग्रजीत या धाटणीचा एक शब्द आहे, पण तो मिळमिळीत आहे. हा शब्द आहे ‘बिब्युलस’ (bibulous). टॉवेल किंवा स्पॉजसारख्या एखाद्या absorbent म्हणजे आर्द्रता-शोषक वस्तू, पदार्थाचे वर्णन करताना हे विशेषण वापरतात. मात्र कालांतराने अट्टल दारूबाजांबद्दलही तो वापरला जाऊ लागला. साधा ‘दारुडा’ आणि ‘तळीराम’ यांच्यातला फरक हा आहे की, तळीराम दारूचा आशिक आहे - प्रेमी आहे, भोक्ता, भक्त आहे. तो नज़ाकतीने मद्य प्राशन करतो. नशा यायला, ग़म विसरायला, काहीतरी व्यसन म्हणून तो दारू पित नाही, तो दारूकडे एक उत्तम पेयपदार्थ म्हणून बघतो, तिची आराधना करतो. इंग्रजीतही साधा ड्रंकर्ड (drunkard) म्हणजे बेवडा आणि ‘बिब्युलस’ (bibulous) यात हा भेद दिसून येतो. असेच इतरही काही शब्द इंग्रजीत आहेत, पण ‘बिब्युलस’ची छटा त्यांच्यात नाही. या शब्दाचे मूळ लॅटिन ‘bibere’ (to drink) या शब्दात सापडते. याच शब्दापासून ‘imbibe’ हाही शब्द तयार झाला आहे.

पी. जी. वुडहाऊसच्या विनोदी पुस्तकांत पाश्चात्य जगतातल्या अट्टल बेवड्यांची एक वेगळीच दुनिया नजरेस पडते. इंग्रज लोक तसेही जास्त दारू पितात. (रशियन लोक पण खूप दारू पितात, पण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे.) सेरा ल्याल (Sarah Lyall) ने आपल्या ‘A Field Guide To The English’ या काहीशा विनोदी आणि माहितीपर पुस्तकात इंग्रजांच्या अतिरेकी मद्यप्राशनावर एक खास प्रकरणच लिहिले आहे.

त्यामुळेच कदाचित इंग्रजी भाषेत दारू, दारुडे, दारूपान, दारूमुळे येणारी नशा आणि तत्सम बाबींवर शेकडो शब्द आहेत. बरेचसे मूळ इंग्लंडमधलेच आहेत. त्यात पुढे अमेरिकेसकट जगातल्या अन्य देशांतल्या भाषांमधल्या अशा काही शब्दांची भर पडली. यातले बरेचसे शब्द स्लॅंग म्हणजे अनौपचारिक किंवा दैनंदिन बोलीभाषेतले आहेत. पी. जी. वुडहाऊसने एकट्याने या दारू-शब्दसंग्रहात शंभरहून अधिक नवीन शब्दांची भर घातली आहे. एखादा चतुर प्रकाशक नुसत्या दारूविषयक या शब्दांचा एक खास शब्दकोश तयार करून पैसा कमाऊ शकतो.

.................................................................................................................................................................

हेही पाहा : प्रत्युत्पन्नमती विरुद्ध पश्चातबुद्धी उर्फ लेस्प्री द लेस्कालिये

..................................................................................................................................................................

दारू - मद्य - मदिरा - वारुणी - सुरा - मय यांना आपल्याकडे सभ्य समाजात ‘अपेय’ मानले जाते. निदान जाहीरपणे तरी कोणी दारूची तारीफ करत नाही. ग़ालिबसारखे काही शायर आणि गडकरींचा तळीराम सोडला तर मी दारू पितो आणि मला दारू आवडते असे खुले आम, छातीठोकपणे सांगणारे महाभाग विरळाच आहेत. खरे तर किमान साठ टक्के लोक दारू पितात, पण ती चोरून, किंवा त्याविषयी एक प्रकारची अपराध-भावना मनात ठेवून. दारूबंदी हा तर आपल्याकडे एक विनोदाचा विषय झाला आहे. देशात दारूबंदी असावी या मागणीसाठी अनेक समाजसेवक जीवाचे रान करत असतात. व्यापक दृष्टीने बघितल्यास त्यांचे हे कार्य समाजहिताचेच आहे, पण ते बहुतांश कागदावरच टिकून राहते. प्रत्यक्षात काय घडते आणि दारूबंदीचा आपलेच लोक कसे फज्जा उडवतात, हेही आपण जाणतो. हा सगळा ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’चा मामला आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी अमेरिकेतही दारूबंदी आली होती. मद्यपी अमेरिकनांनी तिची कशी वाट लावली, हेही सगळ्यांनाच माहीत आहे. पी. जी. वुडहाऊसच्या ‘स्मॉल बॅचलर’ या कादंबरीत याचा फार मजेशीर उल्लेख आहे.

पी. जी. वुडहाऊसच्याच पुस्तकातून मला मिसेस कॅरी नेशन (Carrie Amelia Nation) या अमेरिकन बाईंबद्दल माहिती मिळाली. ही एक धिप्पाड महिला होती. तिला दारूचा अतोनात राग होता. तिने तिच्याचसारख्या दारू-विरोधी महिलांची एक टोळी तयार केली होती. या बायका टोळधाडीप्रमाणे अचानक अवतरत आणि एखाद्या वस्तीतल्या दारूच्या गुत्त्यांवर आणि दुकानांवर हातात कुऱ्हाडी घेऊन हल्ला करून तिथे तोडफोड करत, त्या जागेला पूर्ण उदध्वस्त करत. मिसेस कॅरी नेशनला भले भले लोक घाबरत. आपल्या देशातही अशा काही रणरागिण्या आहेत.

पहा : https://en.wikipedia.org/wiki/Carrie_Nation

मिसेस कॅरी नेशनसारख्या या व्यक्तींना दारू कायमची हद्दपार झाली पाहिजे, ती समूळ नष्ट झाली पाहिजे, असे वाटत असते. हे लोक दारूचा द्वेष करतात. इंग्रजीत ज्याला ‘टेंपरन्स’ (temperance) म्हणतात त्या संतुलित, मित, स्वनियंत्रित आचरणपद्धतीची भलावण हे लोक करत असतात. नैतिक आणि धार्मिक कारणांमुळे दारू प्यायला यांचा नकार असतो. यातलेच काही अतिरेकी लोक (कॅरी नेशनसारखे) दोन पावले पुढे जाऊन इतरांनाही दारू पिऊ देत नाहीत. अत्यंत सोवळी, कर्मठ अशी त्यांची भूमिका असते. या लोकांसाठी इंग्रजीत एक फार छान शब्द आहे – ‘वाऊझर’ (Wowser).

मूळ ऑस्ट्रेलियन इंग्रजीतल्या या शब्दाचा खरा अर्थ आहे, ‘पापद्वेष्टा’. कोणत्याही प्रकारच्या वाईट, अनैतिक, अनुचित कृत्याचा राग करणारा माणूस म्हणजे ‘वाऊझर’. पण बहुतेक वेळी हा शब्द दारूबद्दल वापरला जातो. अल्कोहोल आणि अल्कोहॉलिक लोकांचा अतिरेकी तिरस्कार करणारे कट्टर सनातनी लोक म्हणजे ‘वाऊझर’.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या मंडळींना हे जग एक बंदीशाळा वाटत असते. ते म्हणतात की ,आपण या जगात शिक्षा भोगायला आलो आहोत. त्यामुळे सदाचाराने वागणे हे आपले कर्तव्य आहे. दारू, जुगार, वेश्यावृती, यासारखी पापे नष्ट झाली पाहिजेत. आणि ती नष्ट करण्याची जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर दिली आहे, असे ते समजतात. थोडक्यात हे ‘नैतिक पोलीस’ आहेत. ‘ट्रुथ’ नावाच्या ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राच्या जॉन नॉर्टन या संपादकाने १८९९मध्ये पहिल्यांदा ‘वाऊझर’ हा शब्द वापरला असे मानले जाते. काहींच्या मते ‘We Only Want Social Evils Remedied’ या घोषवाक्यातील शब्दांच्या आद्याक्षरांवरून हा शब्द बनला आहे.

दारू न पिणाऱ्याने प्रत्येक वेळी वाऊझर बनायला पाहिजेच असे नाहे. तो ‘टीटोटलर’ (Teetotaller) असला तरी काम भागू शकते. टीटोटलर म्हणजे चहाबाज नाही, तर म्हणजे अजिबात दारू न पिणारा, पण दारू किंवा दारू पिणाऱ्यांविषयी राग न बाळगणारा. या आणि दारूविषयक आणखी काही शब्दांचा वेध पुढच्या भागात घेऊ या.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......