ऑपेरातल्या जाड्या बाईने गायलेली भैरवी आणि नानंद
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 14 September 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध Amusia नानंद Anhedonia

शब्दांचे वेध : पुष्प आठवे

माझे एक दूरच्या नात्यातले मामा होते. सोयीसाठी आपण त्यांना पंत म्हणू. आमच्या घरी त्यांचे बरेच येणे-जाणे होते. ते उत्कृष्ट प्रवचनकार होते. पण त्यांना गाण्या-बजावण्याची अजिबात आवड नव्हती. (म्हणूनच आपण कीर्तनकार झालो नाही, असे ते नेहमी सांगत.) एकदा ते आमच्याच नात्यातल्या एका विख्यात शास्त्रीय गायकाकडे पाहुणे म्हणून गेले. नेमकी त्याच दिवशी आमच्या त्या गायककाकांची गावातच मैफल होती. संध्याकाळी आपल्यासोबत ते आमच्या या पंतमामांनाही सभास्थानी घेऊन गेले. गायक कलाकाराचे पाहुणे म्हणून मोठ्या सन्मानाने पंतांना इतर अतिथींसोबत पहिल्या रांगेत बसवण्यात आले. (पुढचा किस्सा काकांनी सांगितला आहे.)

गाणे सुरू झाले. हळूहळू मैफल रंगू लागली. अचानक माझे लक्ष पहिल्या रांगेत बसलेल्या पंतांकडे गेले आणि मला धक्काच बसला. पंत चक्क डुलक्या देत होते. पहिल्या रांगेत बसून हा बुवा पेंगत होता. आजूबाजूचे लोक मधूनच चमत्कारिक नजरेने त्यांच्याकडे बघत होते. ते बघून मलाच स्टेजवर संकोच वाटायला लागला. मग मी पंतांकडे लक्ष न देता उरलेले गाणे पूर्ण केले. तरीही अधूनमधून तिकडे नजर जातच होती. पंत मस्त झोपले होते. नशीब, घोरत नव्हते. कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी सुरू केली, तेव्हा माझे लक्ष पुन्हा पंतांकडे गेले – पाहतो तर काय, आतापर्यंत पेंगणाऱ्या पंतांचे कान अचानक टवकारले आणि ते झोपेतून खडबडून जागे झाले. घरी परत जाताना मी पंतांना झापले की, त्यांच्यामुळे मला किती ओशाळल्यासारखे झाले स्टेजवर. अगदी लाज आली. त्यावर पंतांनी अगदी शांतपणे उत्तर दिले, “हे बघा पंडितजी, मला गाणे आवडत नाही, हे तुम्हाला माहीत असतानाही तुम्ही मला बळेबळे तिकडे घेऊन गेला. तिथे मला झोप लागली हा तुमचाच दोष आहे.” मग मी विचारले, शेवटी तर तुम्ही अचानक जागे झालात, तुम्हाला उठवावे नाही लागले. पंतांनी खुलासा केला, “मला गाण्यातले काही कळत नसले तरी भैरवीचे सूर माझ्या कानात पक्के ठाण मांडून बसले आहेत. कारण भैरवीने मैफल संपते हे मला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही भैरवी आवळायला सुरू केल्याबरोबर माझे कान आपोआप जागे झाले आणि माझी झोप गेली. (‘आवळायला’ हा त्यांचाच शब्द आहे.)

आमच्या पंतमामांनीच एकदा मला हे सारे रंगवून रंगवून सांगितले होते.

भैरवीने गायनाच्या मैफलीची समाप्ती होते, हा आपल्याकडे संकेत आहे. आता समजा ती हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची सभा नसून स्टेजवर रिचर्ड वॅगनरचा ‘Götterdämmerung’ या नावाचा प्रचंड लांबीचा ऑपेरा सुरू आहे आणि तो बघायला मी आमच्या पंतमामांना जबरदस्तीने घेऊन गेलो आहे. पंत बोअर झाले आहेत, पेंगत आहेत, जांभया देत आहेत, वारंवार घड्याळाकडे बघत आहेत. मला बारीकमध्ये ‘चल, चल’ म्हणून खुणावत आहेत. पण मला मात्र तो शो पूर्ण बघायचा आहे. मी पंतांना काय सांगेन? भैरवीची वाट बघा? भैरवी झाल्याशिवाय ऑपेरा संपत नाही? येस, अगदी बरोबर. फक्त हे मी इंग्रजीत सांगेन – ‘Wait till the end. The show ain't over till the fat lady sings.’ फॅट लेडीचे म्हणजे जाड्या बाईचे भैरवीचे गाणे पूर्ण झाल्याशिवाय हा ऑपेरा संपत नाही.

ऑपेरातल्या जाड्या बाईचे गाणे म्हणजे भैरवी कशी, हे समजून घ्यायला आपल्याला आधी ‘The show ain't over till the fat lady sings’ या वाक्प्रचाराचा अर्थ बघावा लागेल. याचा अगदी साधा सरळ अर्थ आहे. तो म्हणजे, थांबा, घाई करू नका, वाट बघा. एखाद्या गोष्टीचा खरा शेवट तेव्हाच होतो, जेव्हा ती खऱ्या अर्थाने संपते. काही वेळी आपल्याला संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागते. एकानंतर एक काही तरी दुर्घटना होतच राहते.

डोळ्यात प्राण आणून आपण हे सारे कधी संपणार याची वाट बघत असतो. अशा वेळी चुकून एखादा आशेचा किरण दिसला तर लगेच हुरळून जाऊ नका, जरा दमाने घ्या. खात्री करून घ्या. तुम्ही ज्याला आशेचा किरण समजलात, तो तुमचा गैरसमजही असू शकतो. यानंतर पण संकटे येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही तयार असायला हवे, असे ‘The show ain't over till the fat lady sings’ हा वाक्प्रचार सांगतो. म्हणजेच कोणतीही गोष्ट तिला संपायची तेव्हाच संपते, आधीही नाही आणि नंतरही नाही. तिची नियत वेळ जी असेल तोवर तुम्हाला धीर धरावाच लागतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

१९७०च्या दशकाच्या शेवटी चलनात आलेल्या या वाक्प्रचाराच्या व्युत्पत्तीबद्दल दोन-तीन तर्क आहेत. पहिला तर्क असा - रिचर्ड वॅगनर (Richard Wagner)च्या ‘Götterdämmerung’ या अत्यंत लांबलचक ऑपेराच्या शेवटी ब्रुनहिल्डे या नावाची एक बाई सलग दहा मिनिटांचे एक सोलो गाणे गाते. ही बाई चांगली लठ्ठ, जाडजूड असते. तिच्यावरून हा वाक्प्रचार बनला आहे, असे बहुतेक लोक समजतात. वॅगनरला आधीच कंटाळवाणा संगीतकार मानतात. त्यात त्याचा हा प्रदीर्घ ऑपेरा. मुळात वॅगनरची ‘Ring Cycle’ ही एलकुंचवारांच्या नाट्यत्रयीसारखी प्रदीर्घ असलेली एक चार भागांची ऑपेरा मालिका आहे. सलग चौदा तासांहून जास्त काळ ती चालते. तिच्यातला शेवटचा भाग म्हणजे ‘Götterdämmerung’. तो बघताना हे सारे संपणार तरी कधी असे वारंवार प्रेक्षकांच्या मनात येते. अशा वेळी त्यांना स्वतःलाच सांगावे लागते, जेव्हा संपायचे तेव्हाच संपणार, आणि ती वेळ त्या जाड्या बाईचे गाणे झाल्याशिवाय येणार नाही. त्यामुळे उगीचच आधीपासून हुसाटून जाऊ नका. (माझी खात्री आहे की, माझ्या त्या पंतमामांना जर गाणी आवडत असती तर हा ऑपेरा पाहताना ‘सरणार कधी रण प्रभो तरी, कुठवर साहू घाव शिरी’ हे लताबाईंचे गीत त्यांना नक्की आठवले असते. फक्त, त्यांनी ‘शिरी’च्या ऐवजी ‘कर्णी’ असे म्हटले असते.)

या उलट, बेसबॉल या अमेरिकन खेळाशी संबंधित असलेल्या योगी बेरा किंवा डॅन कुक या दोघांपैकी कोणीतरी हा वाक्प्रचार तयार केला, असा दुसरा तर्क आहे. यातला कोणता तर्क खरा, ते महत्त्वाचे नाही. आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यातले ऑपेरा आणि फॅट लेडीचे संदर्भ.

आधी ऑपेरा बघू. ऑपेरा म्हणजे काय हे माहीत नसणाऱ्या अनेकांना मुंबईचे प्रसिद्ध ऑपेरा हाऊस तर नक्कीच आठवत असेल. जिथे ‘ऑपेरा’ होतात ते ऑपेरा हाऊस.

ऑपेरा म्हणजे : Opera is a form of theatre in which music has a leading role and the parts are taken by singers, but is distinct from musical theatre. हा एक अत्यंत वैभवी, विलासी संगीत-नाट्याचा प्रकार आहे. भव्य स्टेज, देखणे गायक कलाकार, उत्तम वादकांचा ऑर्केस्ट्रा, नेत्रदीपक सेट, विलासी वेषभूषा, आणि मनाला भुरळ घालणारी कथा - या साऱ्यांचे सुंदर मिश्रण म्हणजे ऑपेरा. पण ऑपेरा आणि साधी संगीतिका/संगीत नाटक यात फरक आहे. ऑपेरात संगीताला प्राधान्य असते. शिवाय त्यात नृत्याचाही समावेश असू शकतो. संवाद त्या मानाने कमी किंवा नसल्यातच जमा असतात. साध्या संगीत नाटकात संवाद आणि गाणी दोन्ही असतात.

‘ऑपेरा’ या शब्दाचे मूळ लॅटिन भाषेत आहे. तिथे ऑपेरा म्हणजे ‘work, effort’ - काम, प्रयत्न, श्रम. तिथून हा शब्द आधी इटलियन भाषेत गेला आणि त्याला एक नवी छटा प्राप्त झाली - रचना (composition). मग याच अर्थाने तो इंग्रजीतही वापरला जाऊ लागला. सध्या ऑपेरा म्हणजे (नाट्यमय) संगीत रचना असाच अर्थ घेतला जातो. या सांगीतिक ‘opera’चे अनेकवचन ‘operas’ असे होते. पण ‘opera’ हा शब्द स्वतः देखील एक अनेकवचन आहे. तुम्ही ‘magnum opus’ हा शब्दप्रयोग तर नक्कीच ऐकला असेल. एखाद्या कलाकाराच्या सर्वश्रेष्ठ कलाकृतीला ‘magnum opus’ म्हणजे महान कृती असे म्हणतात. या लॅटिन शब्दप्रयोगात ‘magnum’ म्हणजे ग्रेट, महान तर ‘opus’ म्हणजे वर्क, कृती. आता या ‘opus’चे अनेकवचन ‘opera’ असे होते. आपल्याला काम आहे, ते स्टेजवरच्या नाट्यमय ऑपेराशी.

ऑपेराची सुरुवात सोळाव्या शतकाच्या शेवटी इटलीत झाली. त्यानंतर त्याची लोकप्रियता साऱ्या युरोपात पसरली. नंतरच्या दोनशे वर्षांत इटलीत एकाहून एक सरस असे प्रतिभावंत संगीतकार तयार झाले. पाश्चात्य संगीतावर त्यांचा एवढा प्रभाव पडला की, त्याचमुळे पाश्चात्य संगीतातल्या बहुतांश संज्ञा इटालियन भाषेतल्याच आहेत. जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, रशिया या देशांतही थोर संगीतकार होऊन गेले. यापैकी अनेकांनी लहान-मोठे ऑपेरे लिहिले आहेत. इंग्लंडमध्ये मात्र त्या मानाने ही सांगीतिक प्रतिभा कमी होती. पुढे १९व्या शतकाच्या शेवटी ही उणीव भरून काढली गिल्बर्ट आणि सलिवन किंवा ‘Gilbert and Sullivan’ (G&S) या जोडीने. गिल्बर्टचे शब्द आणि सलिवनचे संगीत असलेले बरेच इंग्रजी ऑपेरे तेव्हा स्टेजवर आले. हे सारे विनोदी ऑपेरे होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आपल्याकडे गायक किंवा गायिका स्वतःच्या कुवती आणि तयारीनुसार तीनही सप्तकांत गाऊ शकतात. खालपासून वरपर्यंत भरारी मारायला त्यांना मनाई नाही. पाश्चात्य संगीतात मात्र पुरुष आणि स्त्री गायकांच्या आवाजाच्या जातीनुसार त्यांची स्थाने ठरली असतात आणि त्यांना त्याच पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे सहसा ही मंडळी आपली जागा सोडून इकडे तिकडे जात नाही.

पुरुष गायकांच्या गळ्याच्या तीन जाती आहेत - बेस (bass), टेनर (tenor) आणि बॅरिटोन (baritone). यातला बेस हा साधारणपणे आपल्या खर्जाशी मिळताजुळता असतो, तर टेनर हा पुरुषाचा सर्वांत वरचा आवाज. या दोघांच्या मधला तो बॅरिटोन. पाश्चात्य स्त्री गायकांच्याही तीन जाती आहेत – ऑल्टो (Alto), मेझो सोप्रॅनो (Mezzo-Soprano), आणि सोप्रॅनो (Soprano). या तीनही जागा पुरुषांच्या जागांच्या वरच्या असतात. त्यात ऑल्टो ही पहिली आणि सोप्रॅनो ही सर्वांत वरची. म्हणजे आपण ज्याला अती तार सप्तक म्हणतो, साधारणपणे तशीच. (याशिवाय अजूनही काही अशा जागा आहेत, पण आपल्याला तिकडे जायचे नाही.) पुरुष गायक सोप्रॅनो आवाजात गात नाहीत - ते काम फक्त महिलांचे आहे. बेगम परवीन सुलताना यांचा आवाज चढला की, एखाद वेळी त्या या सोप्रॅनो शैलीत गात आहेत असा भास होतो. ऑपेरामध्ये सोप्रॅनो गायिकांना फार महत्त्व असते. शोची हिरॉईन किंवा prima donna म्हणजे (बहुतेक वेळी) सोप्रॅनो. ती कशी भव्य दिव्य असायला हवी, आणि दिसायलाही. (म्हणूनच त्यांना डीवा (diva) म्हणत असतील का?) या सोप्रॅनो गायिका चांगल्या उंचपुऱ्या, गलेलठ्ठ असतात. धिप्पाड. त्यांचा आवाजही तसाच बुलंद, शक्तीशाली असतो. गाता गाता त्यांचा आवाज इतक्या उंचीवर जातो, इतका वर जातो की, असे वाटते तो छप्पर फाडून आकाशातच पोहचला आहे. आणि सर्वांत वरच्या बिंदूला पोहचल्यावर तो आवाज तिथे मिनिट-दोन मिनिट (कधी जास्त वेळ पण) खिळवून ठेवण्याचे कसबही या सोप्रॅनो बायकांत असते.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : तुमच्या कानात ‘इअरवर्म’ घुसला असेल तर तुम्हाला शेक्सपिअर शिव्या देणार नाही!

..................................................................................................................................................................

पी. जी. वुडहाऊसने आपल्या खास विनोदी शैलीत याचे वर्णन कसे केले आहे, ते बघा -

१) (Referring to Cora Bellinger in Jeeves and the Song of Songs, Bertie noted,) "Bellinger, at Tuppy's request, had sung a few songs before digging in at the trough, and nobody could have denied that her pipes were in great shape.  Plaster was still falling from the ceiling."

२) (From 'Indiscretions of Archie')

Showing off his new song, song-writer Wilson Hymack's voice cracked and he said, “It wants a woman to sing it. A woman who could reach out for that last high note and teach it to take a joke. The whole refrain is working up to that. You need Tetrazzini or someone who would just pick that note off the roof and hold it till the janitor came round to lock up the building for the night.”

(A little later in the conversation Hymack concluded,) “Sooner or later I'll take you hear to that high note sung by someone in a way that'll make your spine tie itself in knots round the back of your neck.”

यात ज्या टेट्राझिनी बाईंचा उल्लेख आलेला आहे, ती एक प्रसिद्ध कलराट्युरा सोप्रॅनो गायिका होती आणि एका खाद्यपदार्थाला तिचे नाव देण्यात आले आहे. कलराट्युरा सोप्रॅनो म्हणजे नाट्यमय पद्धतीने आणि वेगवेगळ्या शैलींनी आपल्या गाण्यात गडद रंग भरणारी गायिका.

https://en.wikipedia.org/wiki/Luisa_Tetrazzini

गलेलठ्ठ, जाडजूड अशी सोप्रॅनो बाई बघायला तुम्ही ही क्लिप बघा - Hergéच्या Tintin या सुप्रसिद्ध कॉमिक मालिकेतले हे पात्र आहे बिअँका कॅस्टॅफिओरी (Madame Bianca Castafiore) या गायिकेचे.

आता तुम्हाला वॅगनरच्या त्या ऑपेरातली जाड बाई कोण ते कळलेच असेल. हे बघा ते दृष्य -

पाश्चात्य संगीतातल्या बहुतेक संज्ञा या इटलियन भाषेतल्या आहेत आणि त्या तशाच इंग्रजीत वापरल्या जातात, हे आपण पाहिले. मात्र या बहुतेक सांगीतिक शब्दांना तंतोतंत मराठी प्रतिशब्द नाहीत. व्याख्या किंवा अर्थ सांगता येतो, पण नेमकी नस त्यात पकडली जात नाही. पण त्याने काय फरक पडतो? शेवटी संगीत हे संगीत आहे. आपले, परके असे त्यात काही नसते. आणि तिथे सुरांची भाषा बोलली जाते, शब्द गौण असतात. त्यामुळे ते मराठी असले काय, इटालियन असले काय, काही बिघडत नाही.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘गारदी’ म्हणजे नक्की कोण, या कोड्याचे उत्तर मला तरी अजून मिळालेले नाही!

..................................................................................................................................................................

‘विश्वकोशा’त ‘संगीत’ या शब्दाची व्युत्पत्ती अशी सांगितली आहे -

‘सं + गीत’ म्हणजे पूर्णत्वास नेलेले गीत अशी संगीताची व्युत्पत्ती दिली जाते. गीतास वाद्ये व नृत्य यांची जोड असल्याशिवाय गीत सिद्ध होत नसल्यामुळे प्राचीन परंपरेने संगीत एक व्यापक आविष्कार मानून त्याप्रमाणे संगीताची व्याख्या केली. समानार्थी प्राचीन संज्ञा ‘तौर्यत्रिक’ अशी दिली असून यास नाट्याचा संदर्भ ठेवला गेला. बौद्ध व जैन समानार्थी संज्ञा ‘गंधव्ववेद’ अशी असून यातही गीत, वादित्र, आख्यान व नाट्य यांना एकत्र आणले गेले. पाश्चात्त्य संज्ञा ‘म्यूझिक’ हीदेखील ‘म्यूजेस’ म्हणजे नऊ कलादेवता यांपासून सिद्ध झाली, हे ध्यानात घेण्यासारखे आहे.

आता म्यूझिक music हा शब्द -

music (n.)

mid-13c., musike, "a pleasing succession of sounds or combinations of sounds; the science of combining sounds in rhythmic, melodic, and (later) harmonic order,"  from Old French musique (12c.) and directly from Latin musica "the art of music," also including poetry (also source of Spanish musica, Italian musica, Old High German mosica, German Musik, Dutch muziek, Danish musik), from Greek mousikē (technē) "(art) of the Muses," from fem. of mousikos "pertaining to the Muses; musical; educated," from Mousa "Muse" (see muse (n.)). Modern spelling from 1630s. In classical Greece, any art in which the Muses presided, but especially music and lyric poetry.

यात ज्या ‘म्यूझ’ म्हणजे कलादेवतांचा उल्लेख आला आहे त्या कोणत्या? आपल्या गणपती किंवा सरस्वतीप्रमाणेच ग्रीक पुराणांतसुद्धा विविध कलांच्या अधिष्टाता देवता होत्या. त्यांची संख्या नऊ. या सर्व बहिणी होत्या आणि त्या झ्यूस (Zeus) आणि निमोसायनी (Mnemosyne)च्या मुली होत्या. त्यांची नावे अशी होती –

कॅलिओपी, Calliope (ही महाकाव्याची देवी होती),

क्लिओ, Clio, (इतिहास),

इरॅटो, Erato (प्रेमकाव्य),

यूटर्पी, Euterpe (संगीत, खास करून बासरीवादन),

मेल्पोमिनी, Melpomene (शोकांतिका),

पॉलीम्निआ, Polymnia (भक्तीगीत),

टर्प्सिकरी, Terpsichore (नृत्य),

थेलिआ, Thalia (हास्यरस),

आणि युरेनिआ, Urania (खगोलशास्त्र).

यातल्या ‘इरॅटो’ आणि ‘यूटर्पी’ या भगिनींच्या स्मरणार्थ ‘म्यूझिक’ हा शब्द तयार झाला असे मानले जाते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

संगीत सार्वत्रिक आहे, या ना त्या रूपात ते सर्वांनाच भावते. असे असले तरी काही महाभाग असेही आहेत की, ज्यांना संगीताची ‘अ‌ॅलर्जी’ आहे. (उदाहरणार्थ माझे ते पंतमामा.) असे लोक ‘amusia’चे शिकार झाले असू शकतात, हे आपण मागच्या लेखात पाहिले. काही लोक असेही असतात ज्यांना जीवनात कशातच रस वाटत नाही. सगळ्या गोष्टी ते करायच्या म्हणून करतात. खेळ, एखादा छंद, खाणेपिणे, वाचन, मित्रमंडळ, अगदी सेक्स - यापैकी कशातूनच त्यांना आनंद मिळत नाही. सुख त्यांना उपभोगताच येत नाही. कारण आहे ‘अ‌ॅनहेडॉनिआ’ (anhedonia). नाही, हे काही एखाद्या मुलीचे नाव नाही. ‘अ‌ॅनहेडॉनिआ’ हा एक रोग असून त्याचा संबंध मेंदूशी आहे. Théodule-Armand Ribot या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने १८९६मध्ये या व्याधीचे सर्वप्रथम निदान केले. पुरातन ग्रीक भाषेतल्या ἀν- (an-) + ἡδονή (hēdonḗ, “pleasure”) अशा दोन शब्दांपासून ही संज्ञा तयार केलेली आहे. (तत्त्वज्ञानात हेडॉनिझमचा विचारप्रवाह आहे. तो शब्दही याच ग्रीक hēdonḗपासून तयार झाला आहे.) याच ‘अ‌ॅनहेडॉनिआ’ रोगाचा एक खास भाग आहे Musical anhedonia. संगीतातून सुख न मिळण्याची बिमारी. Musical anhedonia, also known formally as specific musical anhedonia, is a neurological condition involving an individual's incapacity to enjoy listening to music, अशी त्याची व्याख्या आहे. ‘Anhedonia’चे ‘नसुख’ किंवा ‘नानंद’ असे भाषांतर करता येईल का?

Sir Walter Scott ची एक प्रसिद्ध कविता आहे. तिची सुरुवात अशी होते -

BREATHES there the man with soul so dead

Who never to himself hath said,

This is my own, my native land!

यातल्या तिसऱ्या ओळीत जरा बदल करून मला कधी कधी असे विचारावेसे वाटते की, This is my favourite, my kind of music! असे ज्याला कधीच वाटले नाही अशा व्यक्तीला माणूस म्हणावे काय? पण मग माझे माझ्याच लक्षात येते की, हे सारे ‘amusia’ किंवा ‘anhedonia’चे  रोगी असू शकतात. त्यांचा राग करून चालायचे नाही, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून त्यांच्या जीवनात संगीताचा प्रवेश कसा होईल याचे प्रयत्न करायला हवेत. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीत अनेकांना निराशेने ‘अ‌ॅनहेडॉनिआ’ झाला असण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातले ‘संगीत’ मात्र कदापी हरवू देऊ नये, अशी इच्छा आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......