‘होमोजिनायझेशन’ : दोन किंवा जास्त मतांचं एकत्रीकरण करून, त्यांच्यात समन्वय साधून सर्वसमावेशक आणि जास्तीत जास्त लोकांना मान्य होईल, अशा एखाद्या नव्या विचारधारेला जन्म देण्याचा एक उपक्रम
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 17 December 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध Homogenization होमोजिनायझेशन Syncretism सिन्क्रेटिझम Eclecticism सम्यक चयन

शब्दांचे वेध : पुष्प एक्कावनावे

आजचे शब्द : Homogenization, होमोजिनायझेशन, Syncretism, सिन्क्रेटिझम आणि Eclecticism, सम्यक चयन

मोगल बादशहा अकबर यानं इसवी सन १५८२मध्ये ‘दीन-ए-इलाही’ (दैवी धर्म, Divine Faith) या नावाच्या एका नव्या, सर्वसमावेशक धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला होता, हे आपण इतिहासात शिकलो होतो. यालाच ‘तौहिद-ए-इलाही’ (दैवी एकेश्वरपंथ, Divine Monotheism) असंही म्हटलं जाई.

अकबराच्या साम्राज्यात असलेल्या हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मियांची आपसातली धार्मिक तेढ कमी व्हावी, या दोन्ही समाजांनी एकत्र, गुण्यागोविंदानं, एकोप्यानं रहावं, यासाठी या दोघांच्याही धर्मांतल्या काही ठळक तरतुदींचा संयोग करून दोघांनाही मान्य होईल अशी दैनंदिन आचार-विचारांची एक नवी संहिता तयार करावी, हा या मागचा त्याचा उद्देश होता, असं म्हटलं जातं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

जैन, बुद्ध, ख्रिस्ती आणि पारसी धर्मातलीसुद्धा काही तत्त्वं त्यानं या नव्या धर्मसंहितेत मांडली होती. वैश्विक शांतता किंवा ‘सुलह-इ-कुल’ हा ‘दीन-ए-इलाही’चा स्थायीभाव होता. (अर्थातच, त्याच्या या कल्पनेला कोणी फारसं गांभीर्यानं घेतलं नाही आणि फक्त अठरा अनुयायांचा समावेश असलेला हा ‘धर्म’ त्याचा एक वैयक्तिक उपासना पंथ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि यापेक्षा जास्त लोक त्यात कधीच सामील झाले नाहीत. पुढे शाहजहांच्या मोठ्या मुलानं, दारा शिकोहनं, या धर्म/पंथाचा प्रसार करण्याच्या प्रयत्न केला, पण त्याचाच भाऊ औरंगजेबानं या प्रयत्नांना इस्लाम-धर्मविरोधी ठरवून दाराची हत्या केली.)

दोन किंवा जास्त विभिन्न मतांचं, विचारांचं, कल्पनांचं, पंथांचं (काही प्रमाणात का होईना) एकत्रीकरण करून त्यांच्यात समन्वय साधण्याचा, त्यांच्यातलं अंतर दूर करून सर्वसमावेशक आणि जास्तीत जास्त लोकांना मान्य होईल, अशा एखाद्या नव्या विचारधारेला जन्म देण्याचा हा एक उपक्रम होता. या अशा प्रकारच्या कार्याला ‘होमोजिनायझेशन’ (homogenization) किंवा ‘समरूपीभवन’ असं नाव आहे. यालाच ‘सिन्क्रेटिझम’ (syncretism) असंही म्हटलं जातं.

(भाषाविज्ञानातही ही संकल्पना आहे. त्या वेळी तिला ‘विकार-समरूपीभवन’ असं म्हटलं जातं.) हाच ‘समन्वयवाद’ आहे. एकाच वेळी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असताना त्यातलं नेमकं काय निवडावं, असा वैचारिक गोंधळ होऊ शकतो. याला उपाय म्हणून (माझ्यासह) अनेक लोक वेगवेगळ्या विचारधारा किंवा शैलींमधलं आपल्या मनाला जे जे भावतं, रुचतं, योग्य वाटतं, त्या सर्वांची निवड करून आपला एक खास नजरिया तयार करतात. याला ‘एक्लेक्टिक’ (eclectic) निवड पद्धत म्हटलं जातं.

कोणत्याही एका ‘इझम’'ची, शैलीची, विचारधारेची, (धर्म)कल्पनांची झापडं डोळ्यांना बांधून न घेता, इतरही विचारांचा अभ्यास करायचा, वेळप्रसंगी त्यांचं अनुकरण करायचं, त्यामुळे आत्मोन्नती करायची, स्वतःचा विकास करायचा, हे तत्त्व यामागे आहे. (काही प्रमाणात हेच सूत्र बहाई आणि थिऑसॉफी या पंथांत तसंच महात्मा गांधी/आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनदृष्टीतही दिसून येतं.)

आपल्या प्रत्यक्ष जीवनात ही समन्वयवादी भूमिका अंगिकारायची की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ही सोयीची, फक्त व्यवहारासाठी केलेली तडजोड नसून ते विश्वशांतीसाठी (‘सुलह-इ-कुल’साठी) उचललेलं एक पाऊल ठरतं. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी जे अनेक प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सतत केले जातात, त्याचाच हाही एक प्रकार आहे. यालाच ‘inclusive approach’ असं म्हणतात. त्यात तत्त्वतः तरी काही गैर आहे, असं मला वाटत नाही. आपले राजकारणातले नेते लोक तर असं वारंवार करत असतात.

असो! हा मुद्दा आपण राजकारणी, धर्मकारणी, आणि समाजसुधारकांच्या चर्चेसाठी सोडून देऊ आणि वर पाहिलेल्या तीन शब्दांच्या व्युत्पत्तींकडे वळू.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘Syncretism’ हा शब्द इंग्रजी भाषेत सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून वापरात येऊ लागला. आधुनिक लॅटिन भाषेतल्या ‘syncretismus’ या शब्दापासून तो तयार झाला. आणि हा लॅटिन शब्द ग्रीक भाषेतल्या ‘συγκρητισμός’ (synkretismos) या शब्दावर आधारित आहे. ‘Cretan federation’ म्हणजे क्रेटन लोकांचा महासंघ असा याचा मूळ अर्थ आहे, असं बरेच लोक अजूनही मानतात. प्लुटार्क नावाच्या लेखकानं पहिल्या शतकात ‘Fraternal Love’ (Peri Philadelphias) यावर एक निबंध लिहिला होता. त्यात त्यानं ‘क्रीट’ (Crete) बेटावरच्या ग्रीक जनतेचं (म्हणजेच क्रेटन लोकांचं) उदाहरण देऊन असं सांगितलं होतं की, बाह्य संकटाच्या काळी आपसातले सर्व मतभेद विसरून तिथली जनता एकजूट होते आणि एकदिलानं शत्रूला सामोरं जाते. यालाच त्यानं ‘Syncretism’ (Union of Cretans) अशी संज्ञा दिली होती. त्यावरूनच हा शब्द बनला, असं अनेकांना वाटतं. परंतु तज्ज्ञ लोक मात्र ते मान्य करत नाहीत.

त्यांच्या मते sun- (‘with’सोबत) आणि kerannumi (‘mix’) किंवा ‘krasis’ (‘mixture’, मिसळणं) या दोन ग्रीक शब्दांच्या संयोगानं ‘Syncretism’ हा शब्द तयार झाला. लॅटिन भाषेत हा शब्द आणण्याचं श्रेय Erasmus of Rotterdam (१४६६ - १५३६) या डच (धार्मिक) तत्त्वज्ञाला दिलं जातं. धार्मिक मुद्द्यांबाबत परस्परांचे विरोधक असलेले लोक अनेक प्रसंगी दिलजमाई करतात आणि एक होतात, हे त्याला माहीत होतं. त्यांच्या या एकजुटीसाठी त्यानं हा शब्द वापरला. ‘सुसंवाद हा एक अभेद्य, बळकट असा तट किंवा भिंत आहे’ (Concord is a mighty rampart) हे आपलं मत अधोरेखित करण्यासाठी त्यानं ‘Syncretism’ ही संकल्पना आपल्या ‘Adagia’ (‘Adages’) या ग्रंथात मांडली.

कोणत्याही देशात धार्मिक सुसंवादाखेरिज सामाजिक आणि राजकीय सुसंवाददेखील असला तर तिथे शांतता असते, हे निर्विवाद. प्राचीन ग्रीस आणि प्राचीन इजिप्ट या देशांमध्ये याची अनेक ऐतिहासिक उदाहरणं सापडतात.

धार्मिक आणि भाषिक syncretism चा आधुनिक नमुना म्हणून ब्राझिल देशातल्या Umbanda, Candomblé, आणि Quimbanda या तीन अ‌ॅफ्रो-ब्राझिलिअन धार्मिक पंथांचा उल्लेख करता येईल. ब्राझिलमध्ये पोर्च्युगिझ भाषा बोलणारे (मूळ) अफ्रिकी वंशाचे अनेक लोक राहतात. ते या पंथांचे उपासक आहेत. या पंथियांच्या महिला धर्मगुरूंना ‘Mãe-de-santo’ किंवा ‘म्ये दी सॅंटो’ असं नाव आहे. याचा अर्थ ‘संताची किंवा सर्व संतांची जननी’. पश्चिम अफ्रिकेत बोलल्या जाणाऱ्या ‘योरुबा’ भाषेतल्या ‘iyalorishá’ या शब्दाचं हे भ्रष्ट रूप आहे. ‘Iyá’ म्हणजे आई आणि ‘l'Orishá’ म्हणजे ऑरिशांची. आणि ऑरिशा म्हणजे पवित्र पितर. पश्चिम अफ्रिकेतून दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझिलला स्थलांतरित झालेले लोक आपल्यासोबत आपले हे धार्मिक पंथही घेऊन आले. आणि भाषादेखील.

पुढे त्यांचा तिथल्या पोर्च्युगिझ लोकांशी संबंध आला आणि भाषिक syncretismच्या प्रभावाखाली त्या पोर्च्युगिझ लोकांनी Orishá  हा शब्द आपल्या भाषेत प्रचारात आणला. मात्र त्यांनी याचं रूपांतर ‘saint’ किंवा ‘संत’ असं केलं. (पुरुष धर्मगुरूंना ते लोक pais-de-santo असं म्हणतात. या धर्मांत महिला धर्मगुरूंना जास्त मान आहे.)

भारतात, त्यातही विशेषतः महाराष्ट्रात, रोमन कॅथलिक चर्चनं याच प्रकारचं पण जरा वेगळं असं एक पाऊल उचललं आहे. त्याला Inculturation (इनकल्चरेशन) असं म्हणतात. पण त्याची सुरुवात रेव्ह. ना. वा. टिळक यांनी केली. (टिळक ख्रिस्ती होते पण कॅथलिक नव्हते.) गैरख्रिस्ती समाजातून जे लोक ख्रिस्ती धर्मात येतात, त्यांना आपल्या पूर्वजांच्या प्राचीन परंपरा, चालीरीती, संस्कृती अगदी सहजतेनं आणि लगेच विसरता येत नाहीत. त्यांच्यावर आधी जे संस्कार झाले असतात, त्यांचा पगडा भारी असतो. अशा, खास करून ग्रामिण भागातून आलेल्या, लोकांवर पाश्चात्य पद्धती, चालीरीती लादणं हे टिळकांना योग्य वाटत नव्हतं. मी फक्त धर्म बदलला आहे, पण मी मनानं, शरीरानं अजूनही भारतीयच आहे आणि राहीन, असं ते म्हणत. एखाद्याचा धर्म आणि त्याचं भारतियत्व या वेगळ्या बाबी आहेत, असं ते मानत. ‘धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे’, असं ते ठासून सांगत. टिळकांचाच कित्ता कॅथलिक चर्चनंही गिरवला.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

याबाबत पत्रकार कामिल पारखे यांचा ‘अक्षरनामा’मध्ये ७ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झालेला हा लेख जरूर वाचावा- इतर धर्मांतील, संस्कृतींतील जे मंगल, अनुकरणीय आहे, ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारले आहे! 

दोन धर्म, संस्कृती यांच्यातल्या या हृद्य संगमाला इनकल्चरेशन या नावानं ओळखतात. पण मुळात हा सिन्क्रेटिझमचाच भाग आहे. (पारखे यांच्या उपरोक्त लेखात ‘इन्क्लरेशन’ असं लिहिलं गेलं आहे, पण हा मुद्रणदोष आहे.)

‘इनकल्चरेशन’ म्हणजे ‘सांस्कृतिकीकरण’. पारखे म्हणतात- “खरे पाहिले तर साडेचारशे वर्षांची पोर्तुगीजांची राजवट असलेल्या गोव्याचा काही बाबतींतला म्हणजे पेहेराव आणि खाद्यसंस्कृती यांचा अपवाद वगळता भारतातील सर्वच प्रदेशांतील ख्रिस्ती समाजाने धर्मांतरानंतरही आपला मूळचा ऐतिहासिक सांकृतिक ठेवा कायम राखला आहे. ‘धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे’ असे मराठी पंचकवींतले एक असलेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी असे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ठासून सांगितले होते. त्याच्याही तीन शतके आधीच रॉबर्टे डी नोबिली आणि इतर परदेशी मिशनरींनी हे तत्त्व केरळ आणि तामिळनाडूमध्ये अंमलात आणले होते.

१९६०च्या दरम्यान भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेमुळे यात बदल झाला आणि रोमन कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणावादी वारे वाहू लागले. या परिषदेमुळे सांस्कृतिकीकरणाच्या प्रकियेस आणि आंतरधर्मीय सुसंवादास चालना मिळाली.

महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांत काम करणाऱ्या जर्मन, फ्रेंच, अमेरिकन आणि इतर परदेशी मिशनरींनी मात्र दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेआधी कितीतरी दशके आधीच येथील नवख्रिस्ती समाजात सांस्कृतिकीकरणाचे (इन्क्लरेशन, Sic) धोरण राबवले होते. त्यामुळेच धोतर, सदरा आणि पागोटे घालणारा धोंडीबा यमाजी आढाव आणि नऊवारी पातळ, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे असणारी आणि नाकात जड अशी नथ घालणारी त्याची बायको धुरपदाबाई ख्रिस्ती म्हणून विनासंकोच वावरू लागले. रेव्ह. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक ही नावे बदलली नाही. त्यांच्या पेहरावात, नावांत वा आडनावांत बदल करण्याची गरज ना त्यांना वाटली ना त्यांना बाप्तिस्मा देणाऱ्या त्या जर्मन, अमेरिकन व स्कॉटिश मिशनरींना.”

माल्कम नाझरेथ हे माझे ज्येष्ठ ख्रिस्ती मित्र आहेत. पारखे यांचा लेख वाचल्यावर मी त्यांच्याशी या बाबत चर्चा केली. ते केरळी कॅथलिक असूनही उत्तम मराठी बोलतात आणि त्यांनी रेव्ह. ना. वा. टिळक यांच्यावर विशेष अभ्यास केला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

इनकल्चरेशन म्हणजेच सांस्कृतिकीकरण याबद्दल त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितलं. (आधी त्यांचा इंग्रजीतला संदेश आणि मग मी केलेला त्याचा मराठी अनुवाद.) –

Inculturation is the word that is commonly used in Indian Catholic theological circles for ‘sanskrutikikaran’. (‘इनकल्चरेशन'' या शब्दाचा उपयोग भारतातील कॅथलिक ख्रिश्चनांच्या धर्मशास्त्रविषयक तज्ज्ञांतर्फे ‘सांस्कृतिकीकरण’ या अर्थानं सरसकट केला जातो.)

What Na. Va. (Tilak) was doing with his composition of bhajans, kirtans, puran, abhang, ovi, padas, his son Dattu's wedding ritual, teaching at the Theological Seminary, life at Ferguson Gate residence, Khristasadan, and Khristayanashram, for example, was inculturation of  Christian worship, teaching, theology, and life, in the Maharashtrian social, religious, cultural, and literary milieu of his time.

(रेव्ह. ना. वा. टिळकांनीही वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रसंगी ख्रिस्ती उपासनापद्धती, ख्रिस्ती शिकवण, ख्रिस्ती धर्मशास्त्र, आणि ख्रिस्ती जीवन यांचं मोठ्या खुबीनं असंच ‘सांस्कृतिकीकरण’ करून या सर्वांचा समकालीन मराठी/महाराष्ट्रीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आणि वाङ‌्मयीन अंगांमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी मराठी समाजमनाला ज्यांचं पटकन आकलन होईल अशा पारंपारिक कीर्तन, पुराण, अभंग, ओवी, पद, अशा लोकप्रिय जनसंवाद पद्धतींचा अवलंब केला. आपला मुलगा दत्तू याच्या लग्नासाठी त्यांनी याच धर्तीवर एक नवीन धार्मिक विधी तयार केला. धर्मशास्त्र विद्यालय, तसंच फरग‌्सन गेट, ख्रिस्तसदन, आणि ख्रिस्तायनाश्रम या ठिकाणच्या त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी हे प्रयोग सातत्यानं केले.)

He was giving the teaching and practice of Jesus, as lived in the American Marathi Mission, in particular, and in Maharashtrian life, in general, an authentic regional Indian expression and flavo(u)r. (ख्रिस्ताची शिकवण, उपदेश, आणि त्याचा मार्ग यांचं ज्या प्रकारे (खास करून) अमेरिकन मराठी मिशनमध्ये आणि (एकंदरीतच) मराठी ख्रिस्ती जीवनात अनुसरण, अनुपालन, आणि अनुकरण केलं जात होतं, त्या सर्व बाबींना खऱ्याखुऱ्या भारतीय साजात आणि वेषात आणण्याचं, त्यांना प्रादेशिकत्व देण्याचं काम टिळक करत होते.)

To inculturate is to give to a global form of human life an authentic local or regional expression. (जीवनाच्या एखाद्या वैश्विक पैलूला निर्विवाद स्थानिक आणि प्रादेशिक आयाम देणं म्हणजे इनकल्चरेट करणं किंवा त्याचं सांस्कृतिकीकरण करणं.)

Simply put, "inculturation" is bringing Jesus' teachings  aunthentically to diverse cultures. (ख्रिस्ताची शिकवण वेगवेगळ्या प्रकारच्या समाजांना आणि समुदायांना त्यांच्या परिचित भाषेत, शैलीत, पद्धतीत सहजतेने समजेल, भावेल, रुचेल, अशा तऱ्हेने सांगणं, अशी सांस्कृतिकीकरणाची साधी व्याख्या केली जाऊ शकते.)

Thus, St. Paul inculturated Jesus' message in the non Jewish communities where he travelled as a recent convert. (संत पॉलनं ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर तो जिथे जिथे गेला तिथे त्यानं गैर-यहुदी (ज्यू) समुदायांसाठी ख्रिस्ताच्या संदेशाचं सांस्कृतिकीकरण केलं.)

He established new churches wherever he went in Asia Minor and Greece, for example. (आशिया मायनर आणि ग्रीस देशांत अनेक ठिकाणी त्यानं नवीन चर्चची स्थापना केली.)

These churches were outside Palestine. (या सर्व चर्च पॅलेस्टाईनच्या सीमेबाहेर होत्या.)

In Palestine, the first followers of Jesus were Jewish Christians. (पॅलेस्टाईनमधले ख्रिस्ताचे पहिले अनुयायी म्हणजे ख्रिस्ती धर्म स्वीकारणारे मूळचे यहुदी लोक.)

Paul made daring changes when he took the Good News outside Palestine to the Gentiles. (ख्रिस्ताचं शुभ वर्तमान पॅलेस्टाईनमधून गैर-यहुदी समुदायापर्यंत पोहचवताना पॉलनं त्यात अनेक क्रांतीकारक बदल केले.)

He did not impose Jewish customs and practices on Gentile communities and cultures. (अशा गैर-यहुदी लोकांवर त्यानं यहुदी संस्कृती किंवा यहुद्यांचे रीतीरिवाज लादले नाहीत.)

In other words, he was respecting the local non Jewish customs and practices. (थोडक्यात तो गैर-यहुदी लोकांच्या स्थानिक परंपरांचा आदर करीत होता.)

Paul was inculturating the Gospel. (पॉलनं गॉस्पेल म्हणजे ख्रिस्ती सुवार्तेचं सांस्कृतिकीकरण केलं.)

By bringing the essential teachings of Jesus minus the non essential Jewish religious customs, such as circumcision, he was reinterpreting the Good News for a different (non Jewish) people. (त्यानं आवश्यक आणि अनावश्यक किंवा बिन महत्वाच्या बाबींमध्ये फरक करून गैर-यहुदी लोकांना ख्रिस्ताची फक्त शिकवण सांगितली. ज्यू लोकांच्या बऱ्याच धार्मिक चालीरीती अथवा परंपरा (उदाहरणार्थ, सुंता) यांना त्यानं गैर-यहुदी लोकांपासून दूरच ठेवले. यातून सुवार्तेचा त्याने लावलेला एक वेगळाच अर्थ दिसून येतो.)

In so doing, Paul was creatively setting a pattern in early Church teaching and practice outside Palestine both in the Jewish diaspora as well as in Gentile communities and regions around the Eastern Mediterranean. (यातून पॉलची सृजनशीलताच दिसून येते. पॅलेस्टाईनच्या बाहेर पूर्व भूमध्य सागराच्या आसपास असणाऱ्या यहुदी आणि गैर यहुदी प्रदेशांमध्ये ख्रिस्ताची शिकवण पोहचविण्याचा त्याचा हा रचनात्मक अभिनव प्रयत्न होता. ख्रिस्ती धर्माची प्रारंभिक तत्वे या लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहचावीत यासाठी त्याने त्याच्या उत्तराधिकाऱ्यांसाठी तयार केलेली ही एक प्रकारची आदर्श आचार संहिताच होती जणू.)

Na. Va. saw himself as a blend of St. Paul and Sant Tukaram. (ना. वा. टिळक हे तर स्वतःला संत पॉल आणि संत तुकाराम या दोघांचा वारसदार समजत असत.)

What does this mean? (याचा अर्थ काय?)

Na. Va. was communicating Jesus' teachings in forms of life that were appreciated by Maharashtrians for centuries thanks to Sants Dnyaneshwar, Namdev, Eknath, Tukaram, and Ramdas. (गेली शेकडो वर्षे संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, आणि रामदास प्रभृती संतांनी दाखवलेल्या आदर्शांचं पालन करून आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालता चालता मराठी लोकांच्या अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे हे जे आदर्श त्यांना प्रिय होते, अगदी त्याच धर्तीवर ना. वां. नी ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे सुलभ मराठीकरण केले.)

The missionaries from the west had brought the Good News clothed in western garb. (याउलट पाश्चात्य मिशनरी लोकांनी ख्रिस्ताची सुवार्ता पाश्चिमात्य पोशाखात, अभिनिवेशात, आणि ढंगात भारतीयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला.)

This garb was alien, foreign, and alienating. (अस्सल भारतियांना हा पश्चिमी पेहराव, या पश्चिमी छटा परक्या, अनोळखी, आणि अप्रिय वाटणे अगदी स्वाभाविक होते.)

Na. Va. offered new and creative ways of being and carrying the Good News that would be considered authentically ‘Marathmola’. (ना. वां. नी अभिनव आणि सृजनात्मक मार्गांचा अवलंब करून ख्रिस्ताच्या सुवार्तेला आणि मराठी लोकांच्या ख्रिस्ती असण्याला अस्सल मराठमोळा चेहरा दिला.)

धार्मिक/सांस्कृतिक Syncretismचं याहून जास्त चांगलं उदाहरण आणखी काही असू शकेल का?

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

‘होमोजिनायझेशन’ (Homogenization) किंवा समरूपीभवन याचा अर्थ सोपा आहे. (सध्या हा शब्द विशेषतः दुधाच्या संदर्भात वापरला जातो.) हा शब्द इंग्रजी भाषेत १७४२पासून वापरात आणला गेला आहे. प्रोटो इंडो युरोपिअन या रचित भाषेतल्या gene (जन्म देणं) या धातूपासून तयार झालेल्या genos (प्रकार, वंश, कुळ) या शब्दाला homos ‘सम, सारखा’ हा ग्रीक शब्द जोडून मध्यकालिन लॅटिनमध्ये homogeneus हा शब्द तयार झाला. तिथून तो इंग्रजीत आला. त्याला -ize हा प्रत्यय लावून ‘Homogenization’ हा इंग्रजी शब्द तयार करण्यात आला.

आता ‘एक्लेक्टिक’ (Eclectic). हे विशेषण आहे. याचं नामरूप ‘eclecticism’ असं आहे. एक्लेक्टिसिझमची सुरुवात प्राचीन ग्रीक आणि नंतर रोमन तत्वज्ञांनी केली असं मानतात. अनेक मतमतांतराचा अभ्यास करून त्यातलं त्यांना जे योग्य आणि उदात्त वाटलं अशा गोष्टींचं एकत्रीकरण करून त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी तत्वप्रणाली तयार केली होती. तिलाच एक्लेक्टिसिझम असं नाव आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

याही शब्दाची काही मुळं प्रोटो इंडो युरोपिअन या रचित भाषेत आहेत. तिथे leg- या धातूचा अर्थ गोळा करणं, जमा करणं असा होतो. त्यापासून ग्रीक भाषेत याच अर्थाचा legein हा शब्द तयार झाला. त्याला ek (out of, च्यापासून) हा उपसर्ग लागून eklegein (निवड करणं) हा शब्द बनला. त्याच्यापासून eklektos (निवडलेला) आणि पुढे eklektikos (निवडक) असे शब्द बनले. नंतर यापासून फ्रेंच भाषेत eclectique हा शब्द आला, जो पुढे इंग्रजीत १८४७च्या आसपास eclectic बनला.

Eclecticism हा शब्द १८१७ साली पहिल्यांदा उपयोगात आणला गेला. धर्मशास्त्र, राजकारण, नीतीशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, स्थापत्यकला, वाङ्मयविद्या, आणि अगदी युद्धकला (martial arts) या प्रकारच्या अनेक कला-विज्ञानशास्त्रांमध्ये eclecticismचा वापर समभिग्राहकता अथवा सम्यक चयन या दृष्टीनं केला जातो. Pastiche (विडंबक लेखनकथा) या वाङ्मयप्रकारात कलांच्या प्रांगणातला eclecticism दिसतो.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......