ज्याचे शब्द सोन्यासारखे अमूल्य आहेत, जो माणूस सोनेरी शब्दांचा आहे, तो ‘सुभाष’...
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 04 August 2020
  • पडघम सांस्कृतिक सुभाष Subhash क्रिसोलोगस Chrysologus हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar

शब्दांचे वेध : पुष्प दुसरे

(मला शिकविण्याचे ठरवल्यावर ... व) आमच्या अभ्यासाला सुरुवात झाली.

व्याकरणापासून सुरुवात.

टिळक म्हणाले,  “शब्द म्हणजे काय?”

मला सप्पाटून हसूं लोटलें. हा कसला बाई चमत्कारिक प्रश्न? शब्द म्हणजे शब्द!

“शब्द म्हणजे शब्द.” मी उत्तर केलें.

“पण शब्द म्हणजे काय?”

“शब्द म्हणजे शब्द!”

“पण शब्द म्हणजे काय?”

लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रें’ (भाग एक) मध्ये रंगवलेला हा प्रसंग आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. ‘शब्द म्हणजे काय?’ याचे भाषाशास्त्रीय उत्तर लक्ष्मीबाईंना ठाऊक नव्हते. पण त्यांचे त्यामुळे काहीही बिघडले नाही. शाळेत एखादी भाषा शिकताना आजकाल याचे जुजबी उत्तर शिकवले जाते आणि ते आपल्यासाठी पुरेसे असते.

पण भाषाशास्त्राच्या पलीकडे जाऊन विचार केला तर खरेच, शब्द म्हणजे नक्की काय असते हो?

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

आमच्या वस्तीत एक खुले मैदान आहे. म्हटले तर महानगरपालिकेचे, म्हटले तर बेवारस. त्याला कोणी वाली नाही आणि म्हणून तिथे बरेच वेळा जवळपासच्या झोपडपट्टीतल्या टवाळ मुलांची गर्दी

असते. तिथे ते जुव्वा खेळतात, क्रिकेट खेळतात, दारू ढोसतात, आणि येता-जाता एकमेकांना शिव्या देतात. या शिव्या खास नागपुरी लहेज्याच्या म्हणजेच अत्यंत असभ्य, जालिम, आणि ज्या ऐकता क्षणीच सोज्ज्वळ पुणेकरांच्या अंगावर शहारे येतील इतक्या जहाल असतात! अख्खा जन्म नागपुरात गेल्याने या अशा शिव्या ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. त्यामुळे निदान मला तरी त्यांचे काही वाटत नाही. (एखादे वेळी रागाने आणि दोस्त मंडळींमध्ये प्रेमाने यापैकी काही शिव्या मीदेखील दिल्या आहेत.) 

माझा एक मित्र पुण्यात असतो. कोविडमुळे घरूनच काम करतो आहे. काल-परवाच तो खास परवानगी घेऊन नागपूरला परत आला. आल्या आल्या त्याने मला फोन केला. त्या वेळी आमच्या त्या मैदानात टवाळ मुलांचा शिमगा चालू होता. त्यातल्या कोणी तरी दुसऱ्याला एक खास कचकचीत नागपुरी शिवी दिली. इतक्या जोराने की, ती माझ्या मित्राला फोनवरून ऐकू गेली. लगेच समाधानाचा एक सुस्कारा सोडून तो म्हणाला, ‘आता खरेच नागपुरात आल्यासारखे वाटतेय. ही शिवी ऐकायला कान तरसले होते. पुण्यात बेटे कोणी असे बोलतच नाही.’

फोनवर बोलून झाल्यावरही मला मित्राचे हे शब्द आठवत होते. ‘शब्दांचे वेध’साठी पुढचा लेख कशावर लिहावा, हा विचार मी त्या वेळी करत होतो. अचानक मला वाटले की, आपण या वरचका लिहू नये? नाही, शिव्यांच्या व्युत्पतीवर नाही; निदान आज नाही, तो पुढच्या एखाद्या लेखाचा विषय होऊ शकतो. पण एखादा शब्द चांगला आणि एखादा शब्द अपशब्द का ठरतो आणि तो ऐकून अथवा उच्चारून अनेकांना पवित्र किंवा अपवित्र झाल्यासारखे का वाटते, याबद्दल मला कुतूहल आहे. त्यामुळे आज मला यावरच काहीतरी लिहावेसे वाटते आहे.

शब्द म्हणजे नक्की काय? शब्दाला स्वतःचे असे स्वरूप असते का? तो स्वयंभू, स्वयंसिद्ध, स्वयंप्रेरित असतो की, मानवी शरीरातल्या काही अवयवांच्या हालचालीमुळे तयार झालेला आणि बाहेर पडलेला फक्त एक विशिष्ट ध्वनी असतो? त्याला आकार असतो का? त्याला गुण-दोष असतात का? चांगले वाईट अशी त्याची प्रतवारी करता येते का आणि ती कितपत योग्य असते? आपल्या मनातल्या भाव-भावनांचे प्रकटीकरण आपण शब्दांच्या माध्यमातून करतो. म्हणजे आपल्याच विचारांचे प्रतिबिंब आपण वापरतो, त्या शब्दांत दिसून येते. म्हणजे शब्द आपलाच आरसा आहेत.

मग आपण एखादा शब्द चांगला आणि एखादा वाईट हे कशावरून ठरवतो? आणि का?

माझ्या मते कोणताही शब्द हा मुळात चांगला वाईट असा काहीच नसतो. शब्द हा फक्त शब्द असतो. तो एक रिकामा डबा असतो किंवा एखादा वाहक (कॅरिअर). त्याच्यात तुम्ही जो अर्थ भराल

तेवढा आणि तेवढाच तो वाहून नेतो. त्यामुळे निदान मी तरी कोणत्याच शब्दाने अस्वस्थ होत नाही किंवा मला कोणी शिवी दिली तर मला त्याचे फारसे काही वाटत नाही.

अर्थातच हे सगळ्यांनाच मान्य होईल असे नाही. अपशब्द उच्चारल्याने वाचा-दोष होतो, असे काही लोक मानतात. ठीक आहे, शिवी द्यायलाच पाहिजे असेही काही नाही. शिवी न देतासुद्धा बोलता येते. चांगले बोलावे हा सभ्य संकेत आहे अणि खरे तर आपण सारेच तो बहुतेक वेळी पाळतो. पाळायलाही हवा. मीदेखील हा संकेत पाळतो.

पण तरीही एक शब्दप्रेमी म्हणून मी सगळ्याच शब्दांना आपलेसे मानतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो. तथाकथित वाईट शब्दांवरसुद्धा.

..................................................................................................................................................................

हेही वाचा :  ‘झुकुनरुअ’ (Zugunruhe) पशू-पक्ष्यांना होतो, पण सर्वच स्थलांतरितांना होतो का?

..................................................................................................................................................................

‘शब्द’ या संकल्पनेचे मूळ काय असेल? व्याकरणाच्या बाहेर जाऊन बघू या.

‘Λόγος’ हा शब्द ग्रीक भाषेतला असून येथे ग्रीक लिपीतच लिहिलेला आहे. त्याचा उच्चार ‘logos’ ‘लोगोस’ किंवा ‘लोगॉस’ असा होतो. ‘लोगॉस’ म्हणजे शब्द.

‘बायबल’मधल्या In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God (John 1:1) मधल्या या वचनाचे “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता” असे मराठी भाषांतर केले जाते. यातला शब्द किंवा ‘Word’ हा शब्द या ‘लोगॉस’चे भाषांतर आहे.

इकडे शब्दाची महती सांगताना तुकाराम महाराजही म्हणतात -

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं

शब्द चि आमुच्या जीवांचे जीवन शब्दें वांटूं धन जनलोकां

तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव शब्द चि गौरव पूजा करुं

‘लोगॉस’ या शब्दाला अनेक अर्थच्छटा आहेत. उदाहरणार्थ- thought (विचार), speech (वाणी), meaning (अर्थ), reason (बुद्धी), principle (तत्त्व), standard (परिमाण), logic (तर्क) इत्यादी. धार्मिक क्षेत्रात ‘लोगॉस’ म्हणजे वचन, पवित्र शब्द, शहाणपण, किंवा सत्य असा अर्थ केला जातो. तत्त्वज्ञान,  मानसशास्त्र आणि वक्तृत्वकलेच्या अभ्यासातही या संज्ञेचा वापर केला जातो. या लेखात मी शब्द ‘शब्द’ याच अर्थाने वापरला आहे. इंग्रजीतला ‘Word’.

‘शब्द’ या शब्दाला जगातल्या प्रत्येकच भाषेत प्रतिशब्द आहेत. फ्रेंच भाषेत तो ‘mot’ बनतो, जर्मनमध्ये ‘Wort’, इटलियनमध्ये ‘parola’, रशियनमध्ये ‘slovo’, चिनी भाषेत ‘Zì’, आणि लॅटिनमध्ये ‘sermo’. भारतात ‘शब्द’ किंवा ‘शबद’ हाच शब्द दक्षिणेतर अन्य अनेक प्रांतिक भाषांत वापरला जातो.

‘Logos’ आणि ‘logo’ किंवा ‘log’ या मूळ ग्रीक शब्दांपासून इंग्रजी भाषेत अनेक शब्द तयार झालेले आहेत. त्यात तर्कशास्त्राशी संबंधित ‘logic’, ‘logical’, ‘logician’ हे शब्द येतात. ‘Logistics’ हा लष्करी दळणवळणाशी संबंधित शब्द येतो. बुद्धीनिष्ठ तर्कावर प्रीती करणे म्हणजे ‘Logolatry’. ज्याला बोलण्याचे व्यसन असते, त्याला ‘Logomania’ झाला आहे, असे म्हणतात. शब्दांचाही अतिसार होऊ शकतो. अशा व्यक्तीला ‘लोगोरिया’ (Logorrhoea) झाला आहे असे म्हटले जाते. ‘Logomachy’ म्हणजे ‘शाब्दिक लढाई’. (पु ल देशपांडे आणि माधव मनोहर यांच्यात रंगलेला शब्दिक सामना कोणाला आठवतो? यात पुलंनी एका प्रत्युत्तरात << लेखणीला अतिसार झाल्याप्रमाणे ती कागदावर बसविण्याची गरज या सव्यसाचीला का भासली? >> असे काहीसे लिहिले असल्याचे मला अंधुक आठवते. लेखणीचा अतिसार म्हणजे लोगोरिया आणि या दोघा दिग्गजांतला हा वाद म्हणजे एक प्रकारची ‘शाब्दिक लढाई’ म्हणजेच ‘Logomachy’.)

असे आणखीही बरेच शब्द आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एखाद्या भाषाशास्त्रज्ञासाठी मात्र कोणताच शब्द चांगला अथवा वाईट नसतो. तो असतो फक्त एक शब्द. व्याकरणातले एक एकक. मात्र आपल्यापैकी सगळेच जण भाषाशास्त्रज्ञ नसल्याने आपण असे गुणात्मक वर्गीकरण केले तर ते काही फारसे आक्षेपार्ह नाही.

जो सतत घालून पाडून बोलतो, घाणेरडे बोलतो, कुजके नासके बोलतो, खवचटपणे बोलतो, त्याला आपण तो ‘फाटक्या तोंडाचा’ आहे, ‘शिवराळ’ आहे, त्याच्या तोंडातून ‘गटारगंगा’ वाहते, असे म्हणतो.

आणि जो मधुर वाणी वापरतो, ज्याच्या बोलण्याने, वाणीने मने दुखावत नाहीत तर सुखावतात, ज्याचे शब्द बहुमोलाचे आहेत, नव्हे, सोन्यासारखे अमूल्य आहेत, त्याला आपण ‘सुभाष’ म्हणतो. म्हणजेच ज्याची वाणी, ज्याचे लेखन मधुर, गोड, मोलाच्या शब्दांनी समृद्ध झाले असते, म्हणजेच जो माणूस सोनेरी शब्दांचा आहे, तो ‘सुभाष’. ‘सुभाष’ उर्फ ‘क्रिसोलोगस’.

‘सुभाष’ या संस्कृत/मराठी शब्दाचा ग्रीक भाषेतला पर्याय म्हणजे ‘Chrysologus’ (Greek : Πέτρος ὁ Χρυσολόγος). ग्रीक भाषेत ‘chrysafénios’ म्हणजे ‘गोल्डन, सोनेरी’. याला ‘लोगोस’/‘लोगॉस’ या शब्दाची जोड देऊन ‘क्रिसोलोगस’ किंवा ‘Chrysologus’ हा शब्द बनवलेला आहे.

Petros Chrysologos किंवा Peter the ‘golden-worded’ या नावाचे एक ख्रिस्ती धर्मगुरू इसवी सन सुमारे ३८० ते ४५० या काळात होऊन गेले. ते इटलीतल्या रावेना शहराचे बिशप होते. त्यांची प्रवचने अत्यंत मधुर शब्दांनी भरलेली आणि रसाळ असत. अत्यंत थोडक्या पण सुयोग्य शब्दांत ते धर्मविषयक कठीण तत्त्वज्ञान आपल्या श्रोत्यांना सोपे करून शिकवत असत. म्हणून त्यांना ‘Chrysologos’ (‘सोनेरी शब्दांचा पीटर’) असे ओळखले जाऊ लागले. या ‘Chrysologos’  शब्दाला तंतोतंत मराठी प्रतिशब्द म्हणजे ‘सुभाष’.

(जाता जाता - Petros Chrysologosचे ‘अत्यंत थोडक्या पण सुयोग्य शब्दांत बोलणारा माणूस’ असे वर्णन वाचून किती वाचकांना पी. जी. वुडहाऊसची ‘The Great Sermon Handicap’ ही दीर्घकथा आठवली? त्या कथेतल्या लांबलचक आणि सविस्तर व्याख्यान देणाऱ्या प्रवचनकारांच्या तुलनेत ‘Petros Chrysologos’ बिचारे कुठेच बसत नाहीत!)

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......