अतिरेकी देशप्रेमाचं, युद्धखोर भावनांचं वर्णन ‘जिंगोइझम’ या शब्दानं केलं जातं आणि आक्रमक वृत्तीच्या राजकारण्यांना ‘वॉर हॉक’ म्हटलं जातं
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 20 October 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध जिंगोइझम Jingoism वॉर हॉक War hawk

शब्दांचे वेध : पुष्प पन्नासावे

आजचे शब्द : Jingoism आणि War hawk

आपल्यापैकी बहुतेकांनी ‘जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ हे गीत ऐकलं असेलच. मी लहान असताना भारत-चीन युद्ध झालं होतं. त्यानंतर काही वर्षांतच भारत-पाकिस्तान युद्ध झालं. काही वर्षांनी पुन्हा एकदा आपलं पाकिस्तानशी युद्ध झालं. या काळात भारतीय सैनिकांना पाठिंबा म्हणून अनेक कवी, लेखकांनी स्फूर्तीदायी कवनं रचली, लेख लिहिले. याच धर्तीवर नाटकं आणि चित्रपटही निघाले. पाकिस्तानच्या भारत-विरोधी कारवायांवर अगदी आजच्या काळातही नवनवीन चित्रपट निघत असतात. या साऱ्या कलाकृतींमधून देशभक्तीचं दर्शन घडतं. पण ‘जिंकू किंवा मरू’ या गाण्यात जो जोश, उत्स्फूर्त आवेश होता, तो या नवीन कलाकृतींमधून निदान मला तरी जाणवत नाही. कुठे तरी त्या मनोरंजनाकडे जास्त झुकतात, असं वाटतं.

खरं देशप्रेम, देशभक्ती आणि ‘युद्धखोरी’ यात काही अंतर आहे का? आपल्या देशावर प्रेम करणं, देशाला जेव्हा गरज असेल त्या वेळी आपल्याला शक्य असेल त्या प्रकारानं देशसेवा करणं, हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं. शांततेच्या काळात आपण हे करतोच, पण शत्रूशी जेव्हा युद्ध करावं लागतं, तेव्हा तर सारे मतभेद विसरून देशाच्या, सरकारच्या आणि आपल्या शूर सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, हे आपलं आद्य कर्तव्य बनतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

युद्ध करणं सहसा कोणालाच आवडत नाही. भारतासारख्या शांतीप्रिय देशाला तर नाहीच नाही. पण आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, बाह्य शत्रूंनी आपल्याविरुद्ध कारवाया सुरू केल्या, तर नाइलाज म्हणून स्वसंरक्षणासाठी भारतालादेखील युद्ध करावंच लागतं.

या उलट, जगात असेही काही देश आहेत, ज्यांना युद्ध करणं मनापासून आवडतं. स्वतःच्या आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी हे देश परभूमीत आपले सैनिक पाठवून लढाया करतात किंवा तिथल्या स्थानिकांच्या बंडाळ्यांना प्रोत्साहन देतात. तिथं आपलं बस्तान बसवतात. ही झाली युद्धखोरी. आजच्या काळातली अशी बरीच उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. अशा वेळी तिथले जे नागरिक असतात, त्यांच्यात दोन गट पडलेले दिसतात. काही लोक या युद्धखोरीला आपला पाठिंबा देतात आणि काही लोक तिचा विरोध करतात.

आता प्रश्न असा येतो की, या युद्धखोरीला नावं ठेवणारे लोक ‘देशभक्त’ असतात की नाही? पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या वेळी अनेक पाश्चात्य विद्वानांनी आणि समाजधुरिणांनी इंग्लंड अमेरिकेतल्या राजकारण्यांच्या युद्धखोरीला विरोध केला होता. यांना ‘पॅसिफिस्ट’ असं म्हणतात. बर्ट्रंड रसलला तर त्यांच्या पॅसिफिस्ट भूमिकेसाठी तुरुंगातही जावं लागलं होतं. शक्यतो शांततेच्या मार्गानं जाऊन युद्ध टाळण्याचा प्रयत्न करा, स्वसंरक्षण जरूर करा, पण आक्रमण करू नका, अशा विचारांच्या रसलला किंवा अन्य लोकांना देशाचा शत्रू असं मानणं कितपत न्याय्य ठरतं?

अर्थात या झाल्या विसाव्या शतकातल्या घडामोडी. त्यापूर्वीच्या काळात बहुतेक बड्या युरोपिअन देशांनी जगभरात आपापल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. स्थानिकांना गुलाम केलं होतं. एवढंच नव्हे तर जगात आपलाच वरचष्मा राहावा आणि दुसऱ्या कोणी आपली बरोबरी करू नये, यासाठी ते डोळ्यात तेल

घालून सज्ज राहत असत. वेळप्रसंगी यासाठी त्यांना युद्धंही करावी लागत. ब्रिटिश, फ्रेंच… सर्वच साम्राज्यवादी देशांचा इतिहास आपल्याला हेच सांगतो. मुख्य म्हणजे तिथल्या जनतेचा या सरकारी धोरणांना पूर्ण पाठिंबा होता. सरकार कोणाचंही असो - तिथल्या बहुतेक सर्वांनाच साम्राज्यवाद मान्य होता. परदेशी लोकांना लुटून मायदेशामध्ये आणलेल्या अगणित संपत्तीचा मोह होता. पण आपल्या साम्राज्यवादाचं उदात्तीकरण करण्याचा ब्रिटन, स्पेन, पोर्च्युगल, फ्रान्स यांनी कितीही प्रयत्न केला असला तरी मुळातच त्यांची ही साम्राज्यं अनैतिकतेच्या पायावर उभी होती, हेच सत्य आहे. रशियाही तेच करत होता आणि नंतर जर्मनीनं तर अगदी कहरच केला. तेथील राजकीय नेत्यांनी जनतेच्या भोळेपणाचा म्हणा, देशप्रेमाचा म्हणा, फायदा घेऊन त्यांच्यासमोर आर्थिक सुबत्तेच्या प्रलोभनांचा पाऊस पाडला. त्यामुळे या देशांतले नागरिक युद्धज्वरानं पछाडले गेले.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

रशियाच्या तथाकथित विस्तारवादी मनसुब्यांबाबत तर ब्रिटनला आधीपासूनच भयगंड होता. त्यामुळे ‘The Great Game’ या गोंडस नावाखाली ब्रिटननं ‘रशियन अस्वला’ला भारतात येण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न केले. पहिल्या अँग्लो-अफगाण युद्धाची ठिणगी यातूनच पडली. या युद्धात ब्रिटिश सैन्याचा दारुण पराभव झाला. हग्या मार खाऊन त्यांना लज्जास्पद रीतीनं तेथून माघार घ्यावी लागली. (नंतरच्या दोन्ही अफगाण युद्धांतही ब्रिटनला फारसं आणि कायमस्वरूपी यश मिळालं नाही.) विसाव्या शतकात ब्रिटन आणि अन्य युरोपिअन देशांनी जर्मनीला खाजवणं सुरू केलं. वास्तविक जर्मन कैसर हा व्हिक्टोरिया राणीचा सख्खा नातू होता, पण तो ब्रिटिशांसाठी अव्वल शत्रू ठरला. जर्मनांनाही इंग्रज नकोसे झाले होते. या सगळ्या परस्पर द्वेषातून पुढे पहिलं महायुद्ध सुरू झालं. ब्रिटन आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनी या युद्धात जर्मनीला नामोहरम केलं खरं, पण त्यासाठी त्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागली. असं म्हणतात की, ब्रिटनमधल्या घराघरातला एक तरी माणूस पहिल्या महायुद्धात कामी आला होता. बावीसेक वर्षांनी याच इतिहासाची दुसऱ्या महायुद्धाच्या नावाखाली पुनरावृत्ती झाली.

लोकांच्या भावनांना आवाहन करून देशभक्तीच्या नावाखाली त्यांना युद्धासाठी प्रेरित करण्याची एक बाजू कवी, लेखक, वक्ते अशासारख्या बुद्धिजीवी मंडळींनी सांभाळली होती. ब्रिटनमध्ये यात आघाडीवर होता रडयर्ड किपलिंग हा नामांकित लेखक आणि कवी. १९१४ सालची त्याची ही गाजलेली कविता बघा- “For all we have and are, For all our children's fate, Stand up and take the war, The Hun is at the gate.” Hun म्हणजे हुण जमातीचे लोक. (हे आपल्यालाही माहीत आहेत.) थोडक्यात, रानटी, पाशवी, जंगली, हिंस्त्र लोक. या ठिकाणी किपलिंगनं जर्मन लोकांची तुलना हुणांशी केली होती. (पहिल्या महायुद्धात किपलिंगचा एकुलता एक मुलगा मारला गेला, हे पण उल्लेखनीय आहे.)

तिकडे जर्मनीतही जवळपास अशीच परिस्थिती होती. तेही लोक ब्रिटिशांना आपला खराखुरा दुश्मन मानायचे. कोणत्याही प्रकारे इंग्लंडचं अस्तित्व मिटवण्याचा त्यांनी पण केला होता. Ernst Lissauer या जर्मन कवीनं ‘Hymn of Hate’ (द्वेष स्तोत्र) ही कविता याच काळात लिहिली आणि इंग्लंडविरुद्धच्या जनक्षोभाला शब्दरूप दिलं. ‘मार डालेंगे, जड से उखाड देंगे, नामोनिशां मिटा देंगे’ अशा प्रकारच्या प्रक्षोभक भावना या कवितेत होत्या. त्याच्या या कामगिरीवर खुश होऊन कैसरनं ‘Iron Cross’ देऊन त्याचा सन्मान केला. इंग्रजांना मात्र यामुळे जर्मनांविरुद्ध लढण्याचं आणखी स्फुरण मिळालं.

आज आपण जो शब्द बघणार आहोत, तो याच प्रकारच्या युद्धज्वराचं वर्णन करणारा आहे. हा शब्द आहे, ‘जिंगोइझम’ (Jingoism). याचे दोन अर्थ होतात. एक, An appeal intended to arouse patriotic emotions (जनतेत देशभक्ती जागृत व्हावी यासाठी केलेलं भावनात्मक आवाहन), आणि दुसरा, Fanatical patriotism (अतिरेकी देशप्रेम). अशा अतिरेकी देशभक्ताला ‘जिंगो’ किंवा ‘जिंगोइस्ट’ म्हणतात. किपलिंग किंवा Lissauerनं लिहिलेल्या काव्यांना ‘जिंगोइस्टिक रचना’ म्हणतात. ‘Jingoism’ हा एक राजकीय भाव (political attitude) आहे.

आता हा शब्द तयार कसा झाला, याची सुरस कथा आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आधी सांगितल्याप्रमाणे इतर युरोपिअन देशांप्रमाणेच कम्युनिस्ट-क्रांतीपूर्व रशियालाही विस्तारवादाची स्वप्नं पडत होतीच. पण भूमध्य सागरात त्याच्या नौदलला मनमानी करून येता येत नव्हतं, ही त्याची मुख्य अडचण होती. रशियाच्या मोठ्या जहाजांना समजा दक्षिण अफ्रिकेत जायचं असेल, तर पृथ्वीला भला मोठा वळसा घालावा लागायचा, आणि त्यात फार वेळ जात होता. रशियाच्या युरोपातल्या भागाच्या दक्षिणेकडे काळा समुद्र (Black Sea) हे सरोवर आहे. त्याला लागून तुर्कस्तान हा देश आहे. तुर्कस्तानच्या दक्षिणेकडे भूमध्य सागर म्हणजे Mediterranean Sea आहे. आपली सागरी शक्ती वाढवायला रशियाला त्या भागात हातपाय रोवायचे होते. म्हणून मार्गातली अडचण दूर करण्यासाठी रशियानं १८७७-७८मध्ये तुर्कस्तानवर हल्ला करून तिथला भूभाग (विशेषतः भूमध्य सागरावरचं एखादं बंदर) जिंकण्याचे इरादे अगदी जवळपास पक्के केले होते. त्यासाठी त्याला आधी तिथल्या कॉन्स्टॅन्टिनोपल शहरावर कब्जा मिळवायचा होता. त्याची ही योजना पाश्चात्य युरोपिअन देशांना कळताच एकच हल्लकल्लोळ झाला. पाश्चात्यांच्या जागतिक साम्राज्यवादी धोरणांना हे अगदी थेट आव्हान होतं. ब्रिटनला तर हे अजिबातच मंजूर नव्हतं. पण रशियाला नक्की कसं उत्तर द्यावं, हे तिथल्या सरकारला कळत नव्हतं.

ब्रिटिश नौदल त्या काळात फार शक्तीशाली समजलं जात असे. या नौदलाच्या मदतीनं तुर्कस्तानातून भूमध्य सागरात प्रवेश करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांना नक्कीच हाणून पाडता आलं असतं, पण बरेच लोक याला विरोध करत होते. कारण त्या आधी २०-२२ वर्षांपूर्वीच क्रायमिअन युद्ध (Crimean War) झालं होतं आणि त्यात जरी ब्रिटिश आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांच्या संयुक्त फौजांनी रशियाचा पराभव केला असला तरी ब्रिटनला हे युद्ध सर्व दृष्टीनं फार महागात पडलं होतं.

त्यामुळे रशियाशी इतक्या लवकर पुन्हा पंगा घेऊ नये, असं या विरोधकांचं म्हणणं होतं. या उलट अनेक युद्धखोर लोकांच्या मते ब्रिटिश युद्धनौकांना जर Dardanelles (डार्डनेल्स)च्या सामुद्रधुनीत (strait) पाठवलं, तर त्यांच्या माऱ्यासमोर रशियन सैन्याचा टिकाव लागणार नाही. त्यामुळे ब्रिटननं पुढाकार घेऊन वेळीच हस्तक्षेप करणं हेच योग्य ठरलं असतं.

डार्डनेल्सची सामुद्रधुनी यासाठी अगदी मोक्याच्या ठिकाणी होती.

हे नीट कळण्यासाठी आपल्याला आधी तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा थोडा अभ्यास करावा लागेल.

भूमध्य सागराच्या उत्तरेकडे ग्रीस आणि तुर्कस्तान या दोन देशांमधल्या सागरी पट्ट्याला एजिअन सागर (Aegean Sea) असं म्हणतात. त्याला लागून असलेल्या सागरी भागाला Sea of Marmara असं म्हणतात. त्याच्या वरच्या भागाला Black Sea आहे. या त्याच्या दक्षिणेकडे तुर्कस्तानला युरोपशी जोडणारी जमिनीची चिंचोळी पट्टी आहे. (या देशाचा जवळपास ९० टक्के भाग आशिया खंडात असून पश्चिमेकडला उर्वरीत भाग युरोप खंडात आहे.) या जमिनीच्या चिंचोळ्या पट्टीच्या मधोमध एक असाच चिंचोळा जलप्रवाह आहे, ज्याला ‘बॉस्परस’(Bosporus)ची सामुद्रधुनी असं नाव आहे. हा जलप्रवाह Black Seaला Sea of Marmaraशी जोडतो. आणि डार्डनेल्सची सामुद्रधुनी ही Aegean Seaला Sea of Marmaraशी जोडते. म्हणजे थोडक्यात Black Seaमधून या मार्गे थेट भूमध्य सागरात जाता येतं. (सोबतचा नकाशा बघा.) परंतु एक तर हा जलमार्ग फार अरूंद आहे. त्यातून खूप मोठी जहाजं जाऊ शकत नाहीत. शिवाय त्यावर तुर्कस्तानची मालकी आहे.

ही अशी त्या वेळची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती असल्यानं तुर्कस्तानवर आक्रमण करून त्याचं एखादं तरी मोठं बंदर काबीज करावं, असा रशियाचा विचार होता, कारण तेव्हाच त्याला भूमध्य सागरात खुले आम प्रवेश मिळाला असता. आणि हे काम अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या कॉन्स्टॅन्टिनोपल शहरात जम बसवून रशियाला सहज शक्य होणार होतं. ब्रिटनसकट सर्व युरोपिअन महासत्तांसाठी हे एक जंगी आव्हान होतं.

रशियाच्या या ‘नापाक’ मनसुब्यांवर डार्डनेल्सच्या सामुद्रधुनीचं पाणी फेरणं, हा एकच खात्रीचा उपाय ब्रिटिशांपाशी होता. त्या काळात ब्रिटिशांसाठी असं करणं गरजेचंही होतं, कारण भूमध्य सागरात किंवा त्याला लागून असलेल्या जिब्रॉल्टर, सायप्रस, सुवेझ कालवा आणि पॅलेस्टाईन (आजचं इझ्राएल) या सर्व ठिकाणी ब्रिटिशांना आपली सत्ता गाजवायची होती. रशियन जहाजांना जर तिथं प्रवेश मिळाला असता, तर ते ब्रिटिशांना परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे डार्डनेल्सच्या सामुद्रधुनीत ब्रिटिश नौदलाला तैनात करणं हा एक अत्यंत सोयीस्कर पर्याय त्यांच्यापुढे होता. आपल्या नौदलाच्या सामरिक शक्तीवर ब्रिटिशांचा पूर्ण विश्वास होता. पण त्याच वेळी ते थोडे साशंकही होते. त्यामुळे त्यांचा निर्णय होत नव्हता.

अशाच एका दिवशी (खरं तर रात्री) लंडनमध्ये ब्रिटिश संसदेच्या कॉमन्स सभागृहात या विषयावर (पुन्हा एकदा) चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. त्यांच्या या वेळकाढू धोरणाला कंटाळलेल्या काही युद्धखोर लोकांनी त्या वेळी संसदेबाहेर अचानकच सूत्रं आपल्या हातात घेतली. त्यांचा पुढारी होता जी. एच. मक्डर्मट (Gilbert Hastings MacDermott) (खरं नाव John Farrell) नावाचा लोकप्रिय विनोदी नट आणि गायक. व्हिक्टोरिअन लंडनमध्ये (रेडिओ, टीव्ही, चित्रपट येण्याच्या आधीचा काळ) सर्वसामान्य वर्गाच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास रंगमंदिरं असत. यांना music halls असं नाव होतं. वेगवेगळ्या प्रकारची गाणी, नाच, विविध प्रकारची नाटकं (बहुधा विनोदीच) तिथं पेश केली जात असत. हा मक्डर्मट आपल्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध होता. श्रीमंत, घरंदाज, उच्चवर्गीय इंग्रजांची तो हुबेहूब नक्कल करून, त्यांची टवाळी करून सामान्य लोकांना खुश करत असे. त्याला ‘Lion comique’ असं नाव मिळालं होतं. तो खूपच लोकप्रिय नट होता. इंग्लंडनं रशियाशी गरज पडली तर युद्ध करावं, पण त्याला तुर्कस्तानात येऊ देऊ नये, असं त्याला मनापासून वाटत होतं. या विषयाचं घोंगडं संसदेत भिजत पडलेलं पाहू तो इतका कंटाळला की, त्यानं संसदेवर दबाव आणण्यासाठी एक प्लॅन केला.

जी. डब्ल्यू. हंट नावाच्या कवीनं त्याच काळात एक नवीन युद्ध गीत लिहिलं होतं. हे गाणं या मक्डर्मटनं एका गिनीला (म्हणजे एकवीस शिलिंग एवढ्या रकमेला) विकत घेतलं आणि कॉमन्सची मिटिंग सुरू असलेल्या दिवशी ‘लंडन पॅव्हिलिअन’ या थिएटरमध्ये त्यानं ते उपस्थितांसमोर इतक्या जोशात गाऊन दाखवलं की, जमलेले लोक एकदम भारावून गेले. या गाण्याचं ध्रुवपद असं होतं-

‘We don't want to fight,

but by Jingo if we do,

We've got the ships,

we've got the men,

we've got the money too’

आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटी ‘The Russians shall not have Constantinople’ हे शब्द अतिशय उच्च स्वरात गायले जात होते. (‘कॉन्स्टॅन्टिनोपल’ (Constantinople) हे तुर्कस्तानातलं एक अतिशय जुनं शहर असून त्याचं सध्याचं नाव इस्टंबुल असं आहे. हे शहर बॉस्परसच्या सामुद्रधुनीच्या एका काठावर आहे.) मक्डर्मटलाही कल्पना नसेल, इतका जास्त प्रभाव त्याच्या या गाण्यामुळे उपस्थितांवर झाला. गाणं संपल्यावर त्यांनी त्याला ते बारा वेळा, पुन्हा पुन्हा गायला भाग पाडलं. तिथं जमलेला प्रत्येक जण त्यानंतर अतिशय जोरजोरानं हे गाणं गात गातच थिएटरच्या बाहेर पडला आणि रस्त्यांवरून ते तेवढ्याच मोठ्यानं गात गात तो जमाव पांगला. दोन तासांतच साऱ्या लंडनभर हे गाणं एखाद्या साथीच्या रोगासारखं पसरलं. दुसरा दिवस उगवताच युद्धखोर लोकांचे जत्थेच्या जत्थे संसदेसमोर जमा होऊ लागले आणि हे गाणं कोरसमध्ये गाऊ लागले. काही दिवसांतच याचा परिणाम दिसून आला.

अखेर ब्रिटिश संसदेनं या जनआंदोलनापुढे मान तुकवली आणि लगेच आपल्या नौदलाची काही जहाजं डार्डनेल्सच्या सामुद्रधुनीकडे रवाना केली. या पराक्रमी ब्रिटिश नौसेनेशी भांडण्याची शक्ती आणि इच्छा नसल्यामुळे रशियानं तुर्कस्तानच्या सीमेवर पाठवलेलं आपलं लष्कर माघारी बोलावलं आणि तो युद्धप्रसंग टाळला.

या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेत जी. एच. मक्डर्मटचाही फार मोठा वाटा आहे. त्याच्या हातून त्याच्या नकळतच त्याच्या देशाची सेवा घडली. इतिहासाचं एक नवीन पान लिहिण्याचं श्रेय त्याला मिळालं. एवढंच नाही, तर त्याच्याचमुळे ‘जिंगो’ (Jingo) या शब्दाची भर इंग्रजी भाषेत पडली. तसा या शब्दाला काहीही अर्थ नाही, मुळात तो एक निरर्थक उद्गार आहे. पण त्या दिवसानंतर तो युद्धखोरी, अतिरेकी देशप्रेम या अर्थानं वापरला जाऊ लागला. पुढे त्यातूनच ‘जिंगोइझम’, ‘जिंगोइस्टिक’ अशा शब्दांची निर्मिती झाली.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

मात्र एका तर्कानुसार ‘जिंगो’ हा शब्द ‘जीझस’ या शब्दासाठी वापरलेला सौम्य पर्याय आहे. आणखी एका तर्कानुसार या ‘जिंगो’पासून ‘जिंगोइझम’ हा शब्द तयार करण्याची कामगिरी जॉर्ज होल्योक (George Holyoake) या कट्टर ब्रिटिश राजकारण्यानं केली. ‘डेली न्यूज’ नावाच्या वृत्तपत्रात १३ मार्च १८७८ रोजी त्याचं एक पत्र छापून आलं होतं, त्यात त्यानं हा नवा शब्द पहिल्यांदा वापरला होता, असं मानतात.

आज जगात कुठेही अतिरेकी देशप्रेमाचं, युद्धखोर भावनांचं ‘जिंगोइझम’ या शब्दानं वर्णन केलं जातं. एका तशा सामान्य घटनेतून (स्टेजवर गायलेल्या देशभक्तीपर गीतातून) या शब्दाचा जन्म झाला आणि त्याच सोबत रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राला माघार घ्यावी लागली, याला एक ऐतिहासिक चमत्कारच म्हणावा लागेल. ‘Thus out of small beginnings greater things have been produced’ असं म्हणतात, ते उगीचच नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ते काहीही असो, या इंग्रजी गाण्याला आमच्या ‘जिंकू किंवा मरू’ या मराठी गाण्याची सर नाही, हेही तेवढंच खरं आहे.

जिंगोइस्टचे काही समानार्थी शब्द म्हणजे War hawk, hawk, militarist आणि warmonger, इत्यादी; तर विरुद्धार्थी शब्दांत dove, pacifist, peacenik इत्यादी. यातला ‘वॉर हॉक’ हा शब्द अमेरिकेत १८१२पासून प्रचारात आहे. ब्रिटनशी युद्ध करून आपल्यामागची त्याची पीडा कायमची संपवण्याची स्वप्नं अनेक अमेरिकन लोक अनेक वर्षं बघत होते. १८१२मध्ये तर यातल्या बऱ्याच जणांनी ब्रिटनशी ताबडतोब युद्ध करा, अशी मागणी केली होती. या लोकांना ‘War hawk’ असं म्हटलं जाऊ लागलं. हॉक म्हणजे बहिरी ससाणा. त्याच्यासारख्या आक्रमक वृत्तीच्या (आणि शस्त्रसंघर्षासाठी उत्सुक असलेल्या) राजकारण्यांना ‘वॉर हॉक’ ही उपाधी बहाल करण्यात आली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......