‘अच्छे दिन’ला इंग्रजीत ‘हॅल्सिअन डेज’ असं म्हणतात! ही संकल्पना ‘युटोपियन’ असली तरी अनादी काळापासून तिनं लेखकांना व संगीतकारांना भुरळ घातली आहे
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • किंगफिशर पक्ष्याची काही चित्रं
  • Fri , 10 September 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध हॅल्सिअन Halcyon हॅल्सिअन डेज Halcyon Days झॉइलिस्ट Zoilist

शब्दांचे वेध : पुष्प पंचेचाळिसावे

आजचे शब्द : हॅल्सिअन डेज आणि झॉइलिस्ट

‘सुखाचे दिवस, समाधानाचे दिवस, शांततेचे दिवस’ असे शब्द आपण अनेकदा वापरतो किंवा ऐकतो. एखाद्या व्यक्तीच्या अथवा समाजाच्या अथवा राष्ट्राच्या जीवनात येणारा हा असा काळ असतो की, सगळीकडे सगळं काही आलबेल असतं, कोणतीही समस्या, तंटेबखेडे नसतात, सारं काही नीट चाललेलं असतं. कसलीच नाराजी, तक्रार, दुःख, अडचणी नसतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो, आबादी आबाद असते. अर्थात निसर्गनियमाप्रमाणे हाही काळ कधी तरी संपतोच. पुन्हा काही तरी कुरबुरी सुरू होतात. पण जोवर हा तृप्तीचा माहोल अनुभवायला मिळतो, तोवर धन्य, धन्य झाल्यासारखं प्रत्येकाला वाटत असतं.

या प्रकारच्या विलक्षण सुगीच्या दिवसांना इंग्रजीत ‘हॅल्सिअन डेज’ (Halcyon Days) असं म्हणतात. Halcyon चा अर्थ Idyllically calm and peaceful; suggesting happy tranquillity असा होतो.

Halcyon Days म्हणजे Period marked by peace and prosperity. लॅटिन भाषेत या काळाला alcyonei dies, तर ग्रीक भाषेत alkyonides hemerai असं संबोधलं जातं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ‘आनंदवन भुवनी’ या काव्यरचनेत जी भावना व्यक्त केली आहे, ती या अशाच ‘halcyon days’चं प्रतीक आहे. ‘आरोग्‍य जाहाली काया । वैभवें सांडिली सीमा । सार सर्वस्‍व देवाचें । आनंदवनभुवनीं’ या ओळीत या दीर्घ काव्याचं सार आहे. देव आणि रामदास या दोघांनाही नाकारणाऱ्या लोकांनी यातली फक्त तृप्तीची, समाधानाची भावना लक्षात घ्यावी. हे संपूर्ण काव्य वाचण्यासाठी पहा -

https://mr.wikisource.org/wiki

आता प्रश्न असा पडेल की, halcyon हे काय प्रकरण आहे? किंगफिशर (खंड्या किंवा त्याचा भाऊ बंड्या) या पक्ष्याच्या एका प्रजातीचं हे नाव आहे. एका प्राचीन ग्रीक दंतकथेनुसार या नावाच्या एका बाईचं रूपांतर एका पक्ष्यात केलं गेलं. तोच हा किंगफिशर पक्षी.

एका खूप जुन्या शब्दकोशात ‘Halcyon’चं वर्णन पुढील शब्दांत वाचायला मिळतं. चार-साडेचारशे वर्षांपूर्वी इंग्रजी कशी लिहिली जात होती, याचा हा एक नमुना-

“Halcyon (Gr.) a kind of small Bird called by some a Kings-fisher, and breeding on the Sea-shoar about the winter solstice, which time, being about fourteen days, there is no tempest or storm. Hence tis we call peaceable or quiet times, Halcycon or Halcyonian days. Two notable properties are observed in the Nest of this Bird, which she makes with the foam of the Sea; The first is, That the Architecture of it is so strong, so durable, that it cannot be broken, nor cut, even with the violent stroak of iron. The second, That it is so proportioned to the Bird, as if it were sewed to her body, in such manner as no creature can therein be received, but the Architect himself.”

म्हणजेच ‘Halcyon’ हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ ‘किंगफिशर’ या नावानं ओळखला जाणारा एक छोटा पक्षी. दक्षिण अयन बिंदू (winter solstice) असणाऱ्या सुमारे १४ दिवसांच्या काळात हा पक्षी समुद्र किनाऱ्यापाशी अंडी देतो. हा जो १४ दिवसांचा काळ आहे, त्याला आपण शांततेचा काळ म्हणजेच ‘हॅल्सिअन काळ’ म्हणतो. कारण या अवधीत वादळं, सुसाट वारे किंवा तत्सम नैसर्गिक घटना घडत नाहीत. हा पक्षी सागरी फेसापासून आपलं घर बांधतो. हे घरटं इतकं मजबूत, पक्कं असतं की, एखाद्या जाड लोखंडी कांबीचा अतिशय जोरदार वार केला तरी ते मोडत नाही किंवा तुटत नाही. तसंच या घरट्याची रचना अशी असते की, ते जणू काही त्या पक्ष्याच्या शरीराच्या आकारानुसार तंतोतंत शिवलेलं आहे. ते बांधणारा पक्षी सोडून अन्य कोणताही पक्षी त्यात शिरू शकत नाही.

काहींच्या मते मात्र हे वर्णन खऱ्या किंगफिशर पक्ष्याचं नसून ते एका दंतकथेतल्या काल्पनिक पक्ष्याचं आहे. या काल्पनिक पक्ष्यालाच काही लोक ‘किंगफिशर’ समजतात. समुद्रफेसानं बांधलेलं त्याचं घरटं समुद्राच्या शांत पाण्यावर या १४ दिवसांच्या काळात निर्धोकपणे तरंगत असतं.

‘Halcyon’ हा शब्द सुमारे १५४० च्या आसपास इंग्रजीत आला. मध्य-इंग्रजीत alcioun या शब्दानं ज्या काल्पनिक पक्ष्याचा निर्देश होत होता, त्याचंच पुढे ‘Halcyon’ असं रूप झालं.

ग्रीक भाषेत halkyon किंवा alkyon याचा अर्थ kingfisher असा होतो. या शब्दाचं मूळ अज्ञात आहे. पुढे लॅटिनमध्ये त्याचं halcyon किंवा alcyon असं रूपांतर झालं. काहींच्या मते hals म्हणजे समुद्र किंवा सागरी मीठ आणि kyon म्हणजे गर्भवती होणं किंवा फुगणं, या दोन शब्दांच्या संयोगातून हा नवा शब्द बनवला गेला. पण या तर्काला पुरावा सापडत नाही. म्हणून मग अभ्यासक याची मुळं ग्रीक दंतकथांत शोधतात.

एका मिथकानुसार ईअलस(Aeolus)च्या मुलीचं नाव हॅल्सिअनी (Halcyone) असं होतं. तिला वैधव्य आल्यावर पतीवियोगाच्या दुःखानं तिनं समुद्रात उडी मारून जीव दिला आणि तिचा किंगफिशर पक्ष्याच्या रूपात पुनर्जन्म झाला. ईअलस हा वाऱ्याचा देव होता. म्हणजे आपला पवनदेव किंवा मरुत. हॅल्सिअनीचा नवरा सीईक्स (Ceyx). तो Thessalyचा राजा होता. या दोघांनी एकदा जरा मस्करी केली, पण ती त्यांच्याच अंगावर उलटली. देवांपेक्षा आपणही काही कमी नाही, असं लोकांना दाखवायला या दोघांनी देवांच्या राजा-राणीची नावं धारण केली. सीईक्स बनला झ्यूस (Zeus) आणि हॅल्सिअनी झाली हीर (Hera). हा जो झ्यूस म्हणजे ग्रीकांचा इंद्र होता, तो होता खूप रागीट आणि त्याची बायको त्याच्याहीपेक्षा जास्त चिडकी होती. एवढंच नव्हे तर तिला पृथ्वीवरच्या मर्त्य स्त्रियांचीही असूया वाटत असे. आपली नावं सीईक्स आणि हॅल्सिअनी यांनी धारण केली, याचा या दोघांना फार राग आला. त्यांनी सीईक्स आणि हॅल्सिअनी यांना शाप दिला आणि त्या दोघांचंही पक्ष्यांत रूपांतर केलं.

याच कहाणीच्या दुसऱ्या एका आवृत्तीत देव आपल्यावर रागावले आहेत का, हे जाणून घ्यायला समुद्रमार्गे एका ज्योतिष्याकडे जायचं ठरवतो. हा प्रवास धोकादायक आहे, असं हॅल्सिअनीला वाटतं. त्यामुळे ती सीईक्सनं तिकडे जाऊ नये असा हट्ट धरते. पण तिचं न ऐकता तो जातोच आणि वाटेत त्याची नौका एका

वादळात सापडून त्याच्यासकट बुडते. निद्रा आणि स्वप्नांचा देव मॉर्फिअस ही बातमी हॅल्सिअनीच्या स्वप्नात येऊन तिला देतो. काही दिवसांनी सीईक्सचा मृतदेह किनाऱ्यावर वाहून आलेला तिला दिसतो. तिचा शोकविलाप बघून देव ती आणि सीईक्स अशा दोघांचंही किंगफिशर या सागरी पक्ष्यात रूपांतर करतात. त्यानंतर दर हिवाळ्यात तिचे वडील ईअलस सागरावर काही दिवस शांत, सौम्य वारे पाठवतात. यामुळे हॅल्सिअनीला कोणतीही व्यवधानं न येता शांततेत आणि सुखानं आपली अंडी उबवता येतात.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

दुसऱ्या कथेच्याही दोन आवृत्त्या आहेत. पहिली सांगते की, टायटन जातीचा देव अ‌ॅटलस (Atlas) आणि त्याची अप्सरा जातीची बायको प्लिओनी (Pleione) या जोडप्याला सात मुली होत्या. त्या सर्वांना प्लीअडीझ (Pleiades) या नावानं ओळखलं जात असे. या सात बहिणींपैकी एक होती हॅल्सिअनी किंवा अल्सिअनी. (बाकीच्या सहा बहिणींची नावं मेआ-Maia, इलेक्ट्रा-Electra, टेगीटी-Taygete, सीलॅनो-Celaeno, स्टिरोपी-Sterope) आणि मेरोपी-Merope अशी होती.) यातल्या दोन बहिणींच्या मृत्यूमुळे बाकीच्या सगळ्या बहिणी दुःखातिरेकानं आत्महत्या करतात.

या कथेची दुसरी आवृत्ती जास्त लोकप्रिय आहे. त्यानुसार ओरायन (Orion) नावाचा एक अत्यंत भव्य (giant) शिकारी देवता होती. या ओरायनचं सातही प्लीअडीझ बहिणींवर प्रेम जडलं आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी त्यानं सतत सात वर्षं त्यांचा पाठलाग केला. देवांचा राजा झ्यूस याला त्यांची दया आली आणि ओरायनपासून त्यांची सुटका व्हावी म्हणून त्यानं त्या सातही बहिणींचं आकाशात एका शेजारी एक असणाऱ्या सात ताऱ्यांमध्ये परिवर्तन केलं. ओरायन हादेखील चतुर होता. त्यानं स्वतःच स्वतःला ताऱ्यात बदलून घेतलं आणि तोही या सात नक्षत्रांच्या शेजारीच आकाशात ठाण मांडून बसला आणि तिथून तो या बहिणींचा आजही पाठलाग करतो आहे.

या सात बहिणींच्या नक्षत्रसमूहाला आपण भारतीय ‘सप्तर्षी’ या नावानं ओळखतो. त्याचं शास्त्रीय नाव ‘अर्सा मेजर’ (Ursa Major) असं आहे. बोलीभाषेत त्याला ‘ग्रेट बेअर’ (great bear, मोठं अस्वल) असं म्हणतात. त्याचंच दुसरं सामान्य नाम आहे- The Pleiades star cluster किंवा the Seven Sisters. खगोलशास्त्रज्ञांनी त्याला ‘M45’ अशीही ओळख दिली आहे.

सुविख्यात तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांचे मार्गदर्शक आणि गुरू होते अ‍ॅनी बेझंट व सी. डब्ल्यू. लेडबीटर. या दोघांनी कृष्णाजींना (तेव्हा फक्त लहानगा कृष्णा) अल्सिओनी किंवा अल्सिअनी (Alcyone) असं नक्षत्र-नाम बहाल केलं होतं. (The Pleiades star clusterमधला सर्वांत चमकता तारा अल्सिओनी (म्हणजेच हॅल्सिअनी) हाच आहे. याचंच दुसरं नाव ‘Eta Tauri’ असं आहे.) कृष्णाजींच्या प्रारंभिक लिखाणात लेखक म्हणून त्यांनी हेच नाव वापरलं होतं. त्यातलं सर्वांत गाजलेलं पुस्तक म्हणजे ‘At the Feet of the Master’. नंतर मात्र त्यांनी या नावाचा त्याग करून स्वतःचं खरं नाव वापरायला सुरुवात केली.

आणि ओरायन म्हणजे? याला आपण मृग/मृगशीर्ष नक्षत्र या नावानं ओळखतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेल्या एका ग्रंथाचं नाव ‘The Orion, Or, Researches Into the Antiquity of the Vedas’ असं आहे.

‘Halcyon Days’ म्हणजे सुगीचे दिवस किंवा ‘अच्छे दिन’ ही संकल्पना जरी ‘युटोपियन’ वाटली तरी अनादी काळापासून तिनं लेखकांना आणि संगीतकारांना भुरळ घातली आहे. या नावाची काही पुस्तकं आहेत आणि खूप साऱ्या संगीतरचनादेखील उपलब्ध आहेत. इंटरनेटवर शोध घेऊन पहा.

आजचा पस्तुरी (lagniappe) शब्द आहे –

‘झॉइलिस्ट’ (Zoilist). फारच थोड्या शब्दकोशांत तुम्हाला याची नोंद सापडेल. झॉइलिस्ट म्हणजे कोण? वऱ्हाडी लोक ज्याला ‘जळकुकडा’ म्हणतात, तोच हा. दुसऱ्यावर जळणारा, दुसऱ्याची असुया करणारा माणूस. हा शब्द खास करून एखाद्या नामवंत, प्रतिभाशाली, थोर लेखकाचा मत्सर करणाऱ्या, त्याचा अकारण राग करणाऱ्या, त्याला सतत पाण्यात पाहणाऱ्या, त्याच्याबद्दल खासगीत किंवा उघडपणेदेखील कुत्सित, घाणेरडं, खोटं बोलणाऱ्या, ईर्ष्येनं पछाडलेल्या कोणत्याही सामान्य वकुबाच्या ऐऱ्यागैऱ्या लेखकासाठी वापरला जातो. ‘झॉइलस’ (Zoilus) हा प्राचीन ग्रीसमधला असाच एक टुकार लेखक होता. होमर हा प्रख्यात ग्रीक महाकवी त्याला आवडत नसे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

येता-जाता तो होमरला नावं ठेवी, त्याच्या चुका काढी, त्याच्यावर भयंकर टीका करी. होमर हा एक अत्यंत बकवास लेखक आहे, असं त्याचं मत होतं आणि ते तो खुलेआम बोलून दाखवत असे. त्याची टीका अतिशय जहरी आणि विषारी असे.

त्यामुळे त्याला समकालीन लोक ‘Homeromastix’ (scourge of Homer किंवा होमरवरचा आसूड, अरिष्ट) या नावानं हाक मारू लागले. आधुनिक काळात Cervantes या प्रसिद्ध लेखकानं त्याला ‘बदनामी करणारा’ असं म्हटलं आहे.

‘Every poet has his Zoilus’ अशी एक इंग्रजी म्हणदेखील एके काळी प्रचलित होती. त्याचे चेले आजही जगभर पसरले आहेत. या प्रत्येकाचा आपला एक होमर असतो आणि वैयक्तिक द्वेषापोटी ते आपल्या या होमरांची मनसोक्त बदनामी करत असतात. या अशा  लोकांना ‘झॉइलिस्ट’ असं नाव देण्यात आलं आहे. असा कोणी ‘झॉइलिस्ट’ तुमच्या ओळखीचा आहे का?

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......