कालच्या संसदेवरील मोर्च्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणासारख्या आमूलाग्र मुद्द्यावर प्रथमच देशभरातून उत्स्फूर्तपणे तरुणांचा जमावडा झाला…
हे आंदोलन शिक्षण व नोकरीत आरक्षण हवे की नको, कुणास हवे व कुणास नको, किती हवे व किती नको, या मुद्द्यांवरसुद्धा नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे, या मुद्द्यावर हे आंदोलन उभे राहिले आहे. नेमके बदल काय हवेत, याची कुणाला कल्पना नसेल, पण आपली सध्याची शिक्षण व्यवस्था सडलेली आहे, किडलेली आहे, कुचकामी आहे आणि म्हणून ती बदलायची आहे, ही सार्वत्रिक भावना आहे.......