चीनने भारताची खोडी का काढली? भारताचं परराष्ट्र धोरण चुकलं का?
पडघम - देशकारण
परिमल माया सुधाकर
  • परिमल माया सुधाकर
  • Thu , 25 June 2020
  • पडघम देशकारण भारत India चीन China परराष्ट्र धोरण Foreign Affairs परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar

गेल्या काही दिवसांपासून चीनने भारताच्या गलवान खोऱ्यात केलेल्या घुसखोरीबद्दल देशात जोरदार चर्चा चालू आहे. प्रसारमाध्यमे त्याविषयी बोलताहेत, सर्वसामान्य भारतीयांच्या भावनाही तीव्र झालेल्या आहेत. ‘चायन बॅन’चा नारे दिले जात आहेत. मात्र केंद्र सरकारकडून पुरेसं आणि नेमकं स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. चीनने भारताचे २० जवान क्रूरपणे मारलेत. काही जवानांना पकडलंही होतं. त्यांची नंतर सुटका करण्यात आली. नेमकी आणि अचूक माहिती ना प्रसारमाध्यमांकडे आणि ना केंद्र सरकारने त्याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. उलट गलवान खोऱ्यात काहीही हालचाली झालेल्या नाहीत, असा खुलासा केल्यामुळे चीनच्या आगळिकीविषयी वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. देशाचे जनमानस नेहमीच परकीय आक्रमणांबाबत आक्रमक असते. पण सीमाप्रश्न वा त्यावरील हालचाली शांतपणे समजून घेणे गरजेचे असते.

या पार्श्वभूमीवर ‘अक्षरनामा’चे लेखक आणि चीनचे एक अभ्यासक परिमल माया सुधाकर यांनी केलेली चर्चा दोन भागात.

..................................................................................................................................................................

पहिला भाग - चीनने भारताची खोडी का काढली? त्यामागे चीनचा नेमका काय हेतू आहे?

दुसरा भाग - भारताचं परराष्ट्र धोरण चुकलं का? त्यामागची नेमकी कारणं काय?

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......