सय्यदभाई : इस्लाम आणि कुराणावर श्रद्धा कायम राखून मुस्लीम समाजातील अनिष्ट चालीरीतींची धर्मापासून फारकत व्हावी, अशी आग्रहाची मागणी करणारा संघर्षशील कार्यकर्ता

मजबूत बांध्याच्या आणि टोकदार मिशा असलेल्या सय्यदभाईंना पाहिले म्हणजे, ही व्यक्ती पोलीस अथवा सुरक्षा किंवा कायदेव्यवस्था हाताळणाऱ्या एखाद्या खात्यातील अधिकारी असावी, अशी समजूत कोणाचीही व्हायची. अन्यायकारक सामाजिक रूढी आणि कायदेकानून बदलण्याच्या कामाला सय्यदभाई यांनी अनेक वर्षे स्वतःला वाहून घेतले होते. ‘समान नागरी कायद्या’साठी अनेक वर्षं झगडणाऱ्या देशातील मूठभर व्यक्तींपैकी सय्यदभाई एक होते.......

पंडिता रमाबाईंचे जीवन ही सतत संघर्षाशी झुंजणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीशी लढून जीवनमूल्यांशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीची गाथा आहे!

रमाबाईंविषयी मुंबईच्या एका दैनिकात १८७८च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली - “हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे...” या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. विविध प्रश्न विचारले जाऊ लागले.......

आपल्यासारख्या नसणाऱ्या लोकांकडे संशयाने, द्वेषाने पाहण्याच्या वृत्तीत वाढ होत आहे. हिजाबवरून सुरू झालेला वाद हे केवळ एक उदाहरण म्हणता येईल

श्रीरामपुरात आम्ही राहायचो ती चाळ बहुजातीय आणि बहुधर्मीय होती. आमच्या एका भिंतीला लागून एक आणि समोर एक, अशी दोन मुसलमानांची घरं होती. दुसऱ्या भिंतीला लागून मराठा कुटुंबाचं घर, तर समोर माळी कुटुंबांची तीन घरं होती. दुसऱ्या एका टोकाला आणखी एक मुसलमान घर होतं. थोड्या अंतरावर असलेल्या एकमजली इमारतीत इतर जातींतली आणि मारवाडी समाजाची घरं होती, तर चाळीच्या अगदी शेवटच्या टोकाला दगडी बांधकामाची बैठी घरं होती.......

खाद्यसंस्कृतीवरून कुणी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये!

‘समुद्रातील मासे, आकाशात विहार करणारे पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, वनस्पती आणि फळफळावळ हे तुमचे अन्न आहे,’ असे ‘बायबल’मधील ‘उत्पत्ती’ या पहिल्या पुस्तकात देवाने मानवाला म्हटले आणि हे वचन आज्ञाधारकपणे मी पुरेपूर अमलात आणतो, असे मी गमतीने म्हणतो. गंमतीने यासाठीच की, ‘बायबल’मधले हे वचन शब्दशः स्वीकारल्यास हे विश्व मानवकेंद्रीत आहे, असे मान्य करून पर्यावरण किंवा इतर जीवसृष्टी गौण ठरू शकते.......

वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन, विविध धर्माच्या आणि पंथाच्या धर्माधिकाऱ्यांना भेटून जुने पायंडे मोडण्याची पोप जॉन पॉल यांची परंपरा पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली आहे

पाच मार्च २०२१पासून पोप फ्रान्सिस यांनी इराकच्या आपल्या पाच दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्याची सुरुवात केली. याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारताला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात १९८६ला आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ला भेट दिली होती. साधारणतः एखाद्या मोठ्या व्यक्तीला संतपदाचा मान द्यायचा असल्यास पोप स्वतः त्या देशात जाऊन समारंभपूर्वक ही घोषणा करतात.......