हर्ष मंदेर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं
सदर - #जेआहेते
सुनील तांबे
  • भाजपचे नेते संबित पात्रा यांचं ट्विट आणि हर्ष मंदर
  • Mon , 09 March 2020
  • सदर #जेआहेते सुनील तांबे Sunil Tambe हर्ष मंदेर Harsh Mander संबित पात्रा Sambit Patra दिल्लीतील हिंसाचार Violence in Delhi Delhi Riots सीेएए CAA मोदी सरकार Modi government भाजप BJP संघ RSS

“सुप्रिम कोर्ट मानवता, समानता और Secularism की रक्षा नहीं करती... इसलिए न Supreme Court में, न संसद में फ़ैसला होगा.. फ़ैसला सड़क पर होगा”
सोनिया गांधी के
 NAC के सदस्य और UrbanNaxal हर्ष मंदर का कहना है।
ये है असल दंगाई जो लोगों को उसका रहें है सड़क पर उतर के हिंसा करने के लिए।

भाजपचे नेते संबित पात्रा यांचं हे ट्विट आहे. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हर्ष मंदेर यांनी जाहीर भाषणात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. या संबंधात हर्ष मंदेर यांनी १५ एप्रिलपर्यंत जबाब द्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. १६ डिसेंबर २०१९ रोजी हर्ष मंदेर यांनी जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणाची चित्रफीत दिल्ली पोलिसांनी सादर केली आहे. सदर चित्रफितीत संपूर्ण भाषण नाही. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार सदर भाषणात हर्ष मंदेर असं म्हणाले की, हा लढा (सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील) आपल्या राज्यघटनेच्या आत्म्यासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयात या लढ्याला यश मिळणार नाही, कारण नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन, काश्मीर आणि अयोध्या या प्रकरणांत आपण हे पाहिलं आहे. मानवता, समता आणि सेक्युलॅरिझमचं रक्षण सर्वोच्च न्यायालयाने केलेलं नाही. पुढे ते असं म्हणाले की, तरीही आपण सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ कारण ते आपलं आहे, पण हा प्रश्न संसदेत वा सर्वोच्च न्यायालयात सुटणारा नाही.

हे भाषण दंगलीला चिथावणी देणारं आहे असा भाजपचा दावा आहे, असं संबित पात्रा यांच्या ट्विटवरून दिसतं. भाजपविरोधक संबित पात्रा यांना किंमत देत नाहीत, त्यांची खिल्ली उडवतात. परंतु संबित पात्रा यांचं ट्विट भाजप व संघ परिवारातील लोकांसाठीच आहे. त्यांनी कोणती भूमिका घ्यावी याचं मार्गदर्शन संबित पात्रा आणि भाजपचे अन्य नेते व कार्यकर्ते यांच्यामार्फत सुरू असतं. संघाच्या आकडेवारीनुसार देशभरात त्यांच्या ५७,००० दैनंदिन शाखा आहेत. त्याशिवाय १४ हजार साप्ताहिक शाखा आणि ७ हजार मासिक शाखा आहेत. देशातील ३६ हजार २९३ ठिकाणी या शाखा भरतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ६,००० पूर्णवेळ प्रचारक आहेत. त्यापैकी निम्मे संघाच्या दैनंदिन कारभारात गुंतलेले असतात तर निम्मे प्रचारक संघाने विविध संस्था व संघटना चालवण्यासाठी नेमलेले आहेत. म्हणजे संघाशी संबंधित सुमारे १० ते १५ लाख लोकांकडे संबित पात्रा आणि अन्य भाजप नेत्यांची ट्विटस् थेट पोचत असतात.

त्याशिवाय बजरंग दल व अन्य संघटना, त्यांचे कार्यकर्ते यांची संख्या खूपच अधिक असावी. नोकरशाही, पोलीस आणि न्यायालयातील भाजप समर्थकांची संख्या याला जोडली तर भाजप-संघ परिवाराची कोणत्याही मुद्द्यावरची वा प्रश्नावरची भूमिका दररोज एक कोटी लोकांपर्यंत थेट पोचत असते. त्यासाठी ते कोणत्याही वर्तमानपत्रावर वा वृत्तवाहिनीवर अवलंबून नाहीत.

व्हॉटसअॅप विद्यापीठातून आजच माझ्याकडे एक संदेश आला. कोईम्बतूर येथील एका मुसलमानाच्या हॉटेलात हिंदू आणि मुसलमान यांच्यासाठी वेगवेगळी बिर्यानी शिजवण्यात येते. हिंदू तरुणांच्या बिर्याणीत नपुंसकत्व येण्याचं औषध टाकलेलं असतं, अशा प्रकारे जिहादी हिंदूंना वेढा घालत आहेत, असंही सदर संदेशात म्हटलं होतं. सदर बातमीत कोईम्बतूरच नाही तर अन्यत्रही दंगे करण्यासाठी चिथावणी देण्याची ताकद आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी तर न्यायपालिकेच्या असमर्थतेची जाहीर कबुली दिली आहे आणि ही बातमी काही कोटी लोकांपर्यंत पोचते. किंबहुना अशा खोट्या बातम्यांचा ओघ सतत सुरू असतो.  

मात्र देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या शक्तीबुद्धीनुसार प्रयत्न करायचे असतात. हर्ष मंदेर यांनी त्यासाठीच ‘कारवां-ए-मोहब्बत’ या अभिनव यात्रेचं आयोजन केलं. पंजाब आणि बंगाल या दोन प्रांतांची फाळणी करून देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या वेळी सुमारे १० लाख लोकांची कत्तल झाली होती. लाखो लोक निर्वासित झाले. अशा काळात गांधीजी प्रेमाचा संदेश घेऊन कोलकता, नोआखालीमध्ये गेले. नोआखालीमध्ये हिंदूवर हल्ले झाले होते. तिथे गावागावातून हिंडताना गांधीजी म्हणत, मी इथे तुमच्या सांत्वनाला आलेलो नाही, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे.

गांधीजींच्या या पदयात्रेपासून स्फूर्ती घेऊन हर्ष मंदेर यांनी ‘कारवां-ए-मोहब्बत’ अर्थात ‘प्रेमाच्या वारी’चं आयोजन केलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हिंदुराष्ट्रवाद्यांचे गोरक्षक धुमाकूळ घालू लागले. द्वेषाने पेटलेला जमाव एकट्या दुकट्या मुसलमानावर हल्ले करू लागला. या देशातील मुसलमान, दलित आणि आदिवासी भयाच्या दडपणाखाली राहत असतात. त्यांना धीर देणं, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असा विश्वास त्यांना देणं, यासाठी मानवता आणि मानवी हक्क यांचा मिलाफ करण्याची गरज आहे.

त्यातूनच समाजातील सद्सद्विवेकाला साद घालता येईल, सामाजिक न्यायाची मागणी करण्याचं धैर्य शोषितांना लाभेल या विश्वासाने ‘कारवां-ए-मोहब्बत’चं आयोजन करण्यात हर्ष मंदेर यांनी पुढाकार घेतला. द्वेषाच्या चिथावणीतून उसळलेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ही वारी निघाली. सप्टेंबर २०१७ मध्ये एकूण आठ राज्यांमध्ये ही वारी गेली. जिल्हा पातळीवर अमन इन्सानिय समितीची स्थापना आणि राज्य पातळीवर मानवी हक्कांसाठी लढणार्‍या संस्था-संघटनांचा समन्वय करण्याचं कार्य या यात्रेने पार पाडलं. या यात्रेचा खर्च कोणत्याही परदेशी संस्थेकडून नाही तर लोकवर्गणीतून उभा करण्यात आला.

हर्ष मंदेर हे पूर्वी भारतीय प्रशासन सेवेत होते. त्यानंतर त्यांनी स्वयंसेवी संघटनांच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. त्याशिवाय विविध सरकारी व बिगर-सरकारी संस्था, समित्या यावर त्यांनी कार्य केलं. वर्तमानपत्रांतून लेखन केलं. ‘द हिंदू’, ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘दैनिक भास्कर’ या वर्तमानपत्रांसोबतच संशोधक-अभ्यासकांच्या नियतकालिकांमधूनही ते नियमित लेखन करतात. त्यांच्या लेखनात असलेल्या कथांवर श्याम बेनेगल यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी सिनेमे काढले आहेत.

‘बिटविन मेमरी अँण्ड फरगेटिंग : मॅसाकर आणि द मोदी इअर्स इन गुजरात’, ‘पार्टीशन्स ऑफ हार्ट : अनमेकिंग ऑफ आयडिया ऑफ इंडिया’, ‘द राईट टू फूड डिबेटस : सोशल प्रोटेक्शन फॉर फूड सिक्युरिटी इन इंडिया’, ‘रिकन्सिलेशन : कारवाँ ए मोहब्बत’, ‘जर्नी ऑफ सॉलिडॅरिटी थ्रू वुंडेड इंडिया’, ‘फॅटल एक्सीडंटस् ऑफ बर्थ : स्टोरीज ऑफ सफरिंग’, ‘ऑप्रेशन अँण्ड रेझिस्टन्स’, ‘लुकिंग अवे : इन्किलीटी, प्रेज्युडिस अँण्ड इन्डिफरन्स इन न्यू दिल्ली’, ‘एश इन द बेली : इंडियाज् अनफिनिश्ड बॅटल अगेन्स्ट हंगर’, ‘फीअर अँण्ड फर्गिवननेस’, ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

अशा गृहस्थाने दिल्ली दंगलीला चिथावणी दिली, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. हर्ष मंदेर स्पष्टीकरण देतीलच. परंतु न्यायालयात न्याय मिळत नाही, तर जे मिळतं त्याला ‘न्याय’ म्हणतात!

.............................................................................................................................................

हेही पाहा, वाचा

दिल्लीतील हिंसाचार, मोदी सरकार आणि मराठी वर्तमानपत्रे - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/4052

असा हा २००२ पासून १८ वर्षांनंतरचा ‘माझा भारत’. आजच्या या भारतात राजधर्म पोरका आहे आणि बदमाशी उदंड आहे! - आर. एस. खनके

https://www.aksharnama.com/client/article_detail/4055

नगाऱ्यासारखी गाजत असलेली कविता - सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा - आमीर अझीज

https://www.aksharnama.com/client/article_detail/4056

दिल्ली दंगल : चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असावीत - सुनील तांबे

https://www.aksharnama.com/client/article_detail/4060

दिल्लीत मुस्लीम समुदायावर धर्मांध शक्तींनी केलेला हल्ला, पूर्वनियोजितच म्हणावा लागेल! - कॉ. भीमराव बनसोड

https://www.aksharnama.com/client/article_detail/4067

भगतसिंगांनी ९२ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख - ‘धर्मांध दंगली व त्यावरील उपाय’ - शहीद भगतसिंग

https://www.aksharnama.com/client/article_detail/4065

.............................................................................................................................................

लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत. 

suniltambe07@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......