भारतातल्या, विशेषत: महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या जगण्याचा परिचय करून देणारी काही मराठी पुस्तके
पडघम - साहित्यिक
हेरंब कुलकर्णी
  • लेखात उल्लेख असलेल्या काही पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Fri , 03 February 2023
  • पडघम साहित्यिक भारत विरुद्ध इंडिया Bharat vs India

‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ हा शब्दप्रयोग खूप वेळा वापरला जातो. महाराष्ट्रात आज एकाच वेळी ‘दोन महाराष्ट्र’ आहेत. पुणे- मुंबई- नाशिक आणि विदर्भ-मराठवाडा व आदिवासी तालुके यांचे काही नातेच उरलेले नाही. या त्रिकोणातील प्रश्न हेच आज महाराष्ट्राचे प्रश्न झाले आहेत. अशा काळात जे तरुण आहेत, त्यांचे अनुभवविश्व आणि परिसर चकचकीत असल्याने, तेच जग त्यांना प्रातिनिधिक वाटते. त्यांच्यापर्यंत दलित, आदिवासी, भटके यांचे प्रश्नच पोहोचत नाहीत. शाळा, महाविद्यालये, माध्यमे यातून हे ‘वंचितांचे जग’ तरुणाईपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नव्या पिढीचे सामाजिक भान उंचावत नाही. ते उंचावण्यासाठी साहित्य हे महत्त्वाचे साधन आहे.

मराठी साहित्यातील गरिबांच्या जगण्याचा परिचय करून देणारी पुस्तके, या नव्या पिढीने वाचणे हाच त्यावरील एक प्रभावी मार्ग आहे. सुदैवाने मराठीत असे वास्तव जग दाखवणारी खूप पुस्तके आहेत. त्यातील निवडक पुस्तकांची यादी करण्याचा हा प्रयत्न केला आहे. अर्थात ही यादी परिपूर्ण नाही. अजून खूप खूप पुस्तके आहेत, पण मला समजू न शकल्याने ती या यादीत आली नाहीत. ती नावेही जरूर वाढवावीत. पण एखादे महत्त्वाचे पुस्तक आले नसल्यास गैरसमज करू नये. ती माझी मर्यादा समजावी. 

ही पुस्तके आपण सर्वांनी वाचावीत. तरुण मुलामुलींना वाचायला सांगावीत. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा घडवणे, पुस्तकावर मुलामुलींनी लेखन करणे, असे उपक्रम केले, तर मुलेमुली अधिक वाचन करतील.    

सामाजिक भान जागवण्याचा हा एक प्रयत्न आहे. ही पुस्तके जास्तीत जास्त तरुणांपर्यंत – आणि इतरांपर्यंतही - पोहोचायला हवीत. त्यातून सामाजिक संवेदनशीलता निर्माण व्हायला मदत होईल, असं वाटतं. साहित्य, वैचारिक क्षेत्रातील काही मित्रांनीही नावे सुचवली. त्यांचेही आभार. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गरिबांच्या जगण्याचा परिचय करून देणारी पुस्तके

१) उपेक्षितांचे अंतरंग - श्री.म. माटे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन    

२) महात्मा फुले चरित्र - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन

४) राजश्री शाहू महाराज - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन

५) फकीरा – अण्णा भाऊ साठे, सुरेश एजन्सी

६) वारणेचा वाघ – अण्णा भाऊ साठे, विनिमय पब्लिकेशन

७) दुष्काळ आवडे सर्वांना – पी. साईनाथ, अनु. हेमंत कर्णिक, अक्षर प्रकाशन

८) गोलपिठा - नामदेव ढसाळ, लोकवाङ्मय गृह   

९) अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे, दिलीपराज प्रकाशन

१०) जग बदल घालुनि घाव – एकनाथ आवाड, समकालीन प्रकाशन

११) उठ वेड्या, तोड बेड्या - कुमार शिराळकर, जनपद प्रकाशन

१२) जेव्हा माणूस जागा होतो - गोदुताई परुळेकर, मौज प्रकाशन

१३) बलुतं - दया पवार, ग्रंथाली 

१४) उचल्या - लक्ष्मण गायकवाड, श्रीविद्या प्रकाशन

१५) वडारवेदना - लक्ष्मण गायकवाड, साकेत प्रकाशन

१६) गावकुसाबाहेरची माणसे - लक्ष्मण गायकवाड, साकेत प्रकाशन

१७) उपरा - लक्ष्मण माने, ग्रंथाली

१८) कोल्हाट्याचं पोर - किशोर शांताबाई काळे, ग्रंथाली

१९) झोंबी - आनंद यादव, मेहता पब्लिशिंग हाऊस

२०) इंधन - हमीद दलवाई, मौज प्रकाशन गृह

२१) बेरड - भीमराव गस्ती, राजहंस प्रकाशन

२२) आक्रोश - भीमराव गस्ती, राजहंस प्रकाशन

२३) आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे, चेतना प्रकाशन 

२४) अदृश्य भारत : भाषा सिंग, अनुवाद - शुभांगी थोरात, शब्द पब्लिकेशन

२५) नरक सफाईची गोष्ट - अरुण ठाकूर-महंमद युनुस, सुगावा प्रकाशन

२६) तराळ-अंतराळ - शंकरराव खरात, कॉन्टिनेन्टल प्रकाशन   

२७) जेव्हा मी जात चोरली होती - बाबुराव बागुल, अक्षर प्रकाशन

२८) मरण स्वस्त होत आहे - बाबुराव बागुल, लोकवाङ्मय गृह

२९) पाचोळा – रा. रं. बोराडे, मौज प्रकाशन गृह

३०) धग - उद्धव ज. शेळके, पॉप्युलर प्रकाशन

३१ ) माणूस - मनोहर तल्हार, मौज प्रकाशन गृह

३२) ह्यो तुरुंग फोडायचा आहे गं... - गेल आमवेट, अनुवाद - प्रमोद मुजुमदार, मधुश्री पब्लिकेशन

३३) फेसाटी - नवनाथ गोरे, अक्षरवाङ्मय प्रकाशन 

३४) बारोमास - सदानंद देशमुख, कॉन्टिनेन्टल प्रकाशन    

३५) वाट तुडवताना - उत्तम कांबळे, मनोविकास  प्रकाशन

३६) ढोर - भगवान इंगळे, ग्रंथाली

३७) जहन्नम - प्रतिमा जोशी, लोकवाङ्मय गृह

३८) आमचा बाप आणि आम्ही - नरेंद्र जाधव, ग्रंथाली

३९) गजाआडच्या कविता – संपा. उत्तम कांबळे, साहित्य आणि संस्कृती मंडळ

४०) पारधी - गिरीश प्रभुणे, राजहंस प्रकाशन

४१) झाडाझडती - विश्वास पाटील, राजहंस प्रकाशन

४२) अर्धी मुंबई - युनिक फीचर्स, समकालीन प्रकाशन

४३) विंचवाचे तेल - सुनीता भोसले, रोहन प्रकाशन

४४) पालावरचं जग - लक्ष्मण माने, ग्रंथाली प्रकाशन

४५) आम्ही काय रं चिखुल खावा?- विवेक पंडित, डिंपल प्रकाशन

४६ ) माणूस म्हणून जगण्यासाठी - विवेक पंडित, डिंपल प्रकाशन

४७) भटक्या विमुक्तांची जातपंचायत भाग १ ते ५ - रामनाथ चव्हाण, देशमुख आणि कंपनी

४८) मेधा पाटकर - सोनाली नवांगुळ, मनोविकास प्रकाशन

४९) किरवंत - प्रेमानंद गज्व्वी, मॅजेस्टिक प्रकाशन 

५०) दलित कथा  - संपादक : गंगाधर पानतावणे, चंद्रकुमार नलगे, मेहता पब्लिशिंग हाऊस

५१) जिणं आमचं - बेबीताई कांबळे, सुगावा प्रकाशन

५२) तसनस - आसाराम लोमटे, शब्द पब्लिकेशन

५३) धागे उभेआडवे - अनिल अवचट, मौज प्रकाशन गृह

५४) माणसं - अनिल अवचट, मौज प्रकाशन गृह

५५) कार्यरत - अनिल अवचट, मौज प्रकाशन गृह

५६) गर्द - अनिल अवचट, मौज प्रकाशन गृह

५७) वाघ्यामुरळी - अनिल अवचट, मौज प्रकाशन गृह

५८) संभ्रम - अनिल अवचट, मौज प्रकाशन गृह

५९) स्वतंत्र्य भारतात दलितांची २५ वर्षे - अनिल अवचट, साधना प्रकाशन

६०) पूर्णिया - अनिल अवचट, मौज प्रकाशन गृह

६१) कोरडी शेत ओले डोळे - दीप्ती राउत, लोकवाङ्मय गृह

६२) न पेटलेले दिवे - राजा शिरगुप्पे, साधना प्रकाशन

६३) ३१ ऑगस्ट १९५२ - प्रशांत पवार, साकेत प्रकाशन

६४) बिराड - अशोक पवार, मनोविकास प्रकाशन 

६५) आयदान - उर्मिला पवार, ग्रंथाली

६६) आमचा काय गुन्हा? - रेणू गावस्कर, शब्द पब्लिकेशन

६७) राघववेळ - नामदेव कांबळे, देशमुख आणि कंपनी

६८) ताई मी कलेक्टर व्हायनु - राजेंद्र पाटील, मनोविकास  प्रकाशन

६९) आंदकोळ - किसन चव्हाण, ग्रंथाली प्रकाशन

७०) पडझड - अशोक पवार, मनोविकास प्रकाशन  

७१) पालातील माणसं - विमल मोरे, पद्मगंधा प्रकाशन

७२) बहादूर थापा आणि इतर कविता - संतोष पवार, साधना प्रकाशन   

७३) देशोधडी - नारायण भोसले, मनोविकास प्रकाशन

७४) गावकी - रुस्तुम अचलखांब, श्रीविद्या प्रकाशन 

७५) मेळघाटातील मोहोर - मृणालिनी चितळे, राजहंस प्रकाशन

७६ ) बरडाचं शेत - भास्कर बडे, वावर प्रकाशन 

७७) कोयत्यावरचे कोक - उत्तम कांबळे, लोकवाङ्मय गृह 

७८) एका नक्षलवाद्याचा जन्म - विलास मनोहर, श्रीविद्या प्रकाशन

७९) फुलटायमर - अण्णा सावंत, लोकवाङ्मय गृह

८०) चौदा महिने तेरा दिवस - ज्ञानेश्वर भोसले, परममित्र प्रकाशन 

८१) सेक्स मार्केट - पराग गावकर, लोकवाङ्मय गृह

८२) जाता नाही जात - सिद्धार्थ तांबे, शब्दालय प्रकाशन

८३) पोतराज, वाघ्या मुरळी, देवदासी, जोगते यांचे प्रश्न - खुशाल डवरे, अभिनंदन प्रकाशन

८४) गोधड - वाहरू सोनवणे, सुगावा प्रकाशन

८५) एनकाउनटर - एकनाथ साळवे, फुले-आंबेडकर स्टडी प्रकाशन, चंद्रपूर

८६) उलगुलान - भुजंग मेश्राम, टिंब प्रकाशन

८७) अभुजमाड - भुजंग मेश्राम, टिंब प्रकाशन

८८) डाऊन सिंड्रोम - संजय दोबाडे, मेधा प्रकाशन, अमरावती 

८९) निवडूंगाला आलेली फुले व इथून पुढे (कविता) - प्रभू राजगडकर, प्रनिल प्रकाशन

९०) वाडा - माधव सरकुंडे, देवयानी प्रकाशन

९१) भिलाटी - सुनिल गायकवाड, साहित्य अक्षर प्रकाशन

९२) बाडगिनी धार - सुनिल गायकवाड, यशोदीप पब्लिकेशन

९३) पाड्यावरचा टील्ल्या - तुकाराम चौधरी, मेधा प्रकाशन

९४) उणे अधिक - बाळू धोंडीबा रायमाने, अक्षर प्रकाशन

९५) पहिला नंबरकारी -  अमिता नायडू, मनोविकास प्रकाशन

९६) प्लॅटफॉर्म नंबर झिरो - अमिता नायडू, समकालीन प्रकाशन

९७) वंचितांचे वर्तमान - सुखदेव थोरात, लोकवाङ्मय गृह   

९८) आयाबाया - रवींद्र गोळे, परममित्र प्रकाशन

९९) मी तो हमाल - अप्पा कोरपे, शब्दालय प्रकाशन

१००) भंजनाचे भजन - प्रल्हाद लुलेकर, शब्दालय प्रकाशन

१०१) नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे, साधना प्रकाशन

१०२) मुलांसाठी पथेर पांचाली - विभूतीभूषण बंडोपाध्याय, अनुवाद - विजय पाडळकर, साधना प्रकाशन

१०३) मेळघाट : शोध स्वराज्याचा - मिलिंद बोकील, साधना प्रकाशन

१०४) कहाणी पाचगावची - मिलिंद बोकील, साधना प्रकाशन

१०५) तीन मुलांचे चार दिवस - आदर्श-विकास-श्रीकृष्ण, साधना प्रकाशन

१०६) मिटलेली कवाडे - मुक्ता सर्वगोड, सुगावा प्रकाशन

१०७) तिची भाकरी कोणी चोरली? - संध्या नरे पवार, मनोविकास प्रकाशन

१०८) पालावरचं जिणं - गिरीश प्रभुणे, विवेक प्रकाशन

१०९) बैरागड - मनोहर नरांजे, साकेत प्रकाशन 

११०) विडीची गोष्ट - शंकर बोऱ्हाडे, लोकवाङ्मय गृह 

१११) तंट्या भिल्ल : अनुवाद - विलास वाघ, सुगावा प्रकाशन

११२) छावणी - नामदेव माळी, शब्द पब्लिकेशन

११३) कार्य आणि कार्यकर्ते – संपा. मिलिंद बोकील, मौज प्रकाशन गृह

११४) निळ्या डोळ्यांची मुलगी - शिल्पा कांबळे, शब्द पब्लिकेशन

११५) इडा पिडा टळो - आसाराम लोमटे, शब्द पब्लिकेशन

११६) राखीव सावल्यांचा खेळ - किरण गुरव, शब्द पब्लिकेशन

११७) न सांगितलेल्या गोष्टी - सिद्धार्थ देवधेकर, लोकवाङ्मय प्रकाशन 

११८) ठिबकतं दु:ख - सिद्धार्थ देवधेकर, ललित पब्लिकेशन

११९) बालकांड – ह. मो. मराठे, मॅजेस्टिक प्रकाशन 

१२०) दगडफोड्या - रामचंद्र नलावडे, देशमुख आणि कंपनी

१२१) कथा काटेरी कुंपणाची - भीमराव जाधव, चंद्रकला प्रकाशन

१२२) होरपळ - ल. सि. जाधव, रोहन प्रकाशन

१२३) आमच्या शिक्षणाचं काय? - हेरंब कुलकर्णी, मनोविकास प्रकाशन

१२४) दारिद्र्याची शोधयात्रा - हेरंब कुलकर्णी, समकालीन प्रकाशन

१२५) दलित, निरंतर विषमता आणि दारिद्र्य - सुखदेव थोरात, सुगावा प्रकाशन

१२६) कातकरी विकास की विस्थापन - मिलिंद बोकील, मौज प्रकाशन गृह

१२७) भारतातील गरिबी - नीलकंठ रथ, वि.म. दांडेकर, मनोविकास प्रकाशन

१२८) गरिबीचे अर्थकारण - अभिजित बनर्जी, अनुवाद - अतुल कहाते, मनोविकास प्रकाशन

१२९) महाराष्ट्रातील दुष्काळ - विवेक घोटाळे, अभय कांता, युनिक अकादमी

१३०) जातिभेदाचे अंत:प्रवाह - जयदेव गायकवाड, पद्मगंधा प्रकाशन

१३१) पारधी समाज : लोकजीवन व लोकसंस्कृती - बाळासाहेब बळे, पद्मगंधा प्रकाशन

१३२) बुधन सांगतोय - दक्षिण बजरंगे छारा, अनु. वैशाली चिटणीस, पद्मगंधा प्रकाशन

१३३) पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान - धोंडीराम वाडकर, पद्मगंधा प्रकाशन

१३४) जन्माने गुन्हेगार - दिलीप डिसुझा, पद्मगंधा प्रकाशन

१३५) महाराष्ट्रातील आदिवासी जमाती - डॉ. गोविंद गारे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन    

१३६) डॉ. गोविंद गारे यांची आदिवासीविषयक सर्व पुस्तके

.................................................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......