या पुस्तकाचा विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडणारा विभाग वाचवत नाही. एखाद्या प्रश्नाचे परिणाम किती भीषण असतात, हे ते प्रकरण वाचताना जाणवत राहते, अस्वस्थता येते. हे पुस्तक वेदनेची सनद आहे. दुःखाचा हुंकार आहे

या पुस्तकात किरण चव्हाण यांनी संकलित केलेल्या आत्महत्या केलेल्या शिक्षकांची यादी वाचली. ती संख्या आणखीही मोठी आहे, पण ती यादी वाचताना, वेदना होताना आश्चर्यही वाटत होते. याचे कारण या आत्महत्यांनी महाराष्ट्राच्या समाजजीवनावर ओरखडासुद्धा उमटवला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता फक्त संख्येत मोजल्या जातात, तशीच स्थिती आज शिक्षकांच्या आत्महत्यांची झाली आहे.......

ते जिथून येतात, तिथे त्यांची खबर नसते आणि जिथे काम करतात, तिथे त्यांना कोणताच पाठिंबा नसतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न आणि जगणे दुर्लक्षित राहते.

भारतात दहा लाखापेक्षा मोठी लोकसंख्या असलेली शहरे वेगाने वाढत आहेत. या शहरांचा विकास केवळ या मजुरांच्या आणि कामगारांच्या खांद्यावर उभा आहे. परंतु शहरे समृद्ध होताना ज्यांच्या खांद्यावर आपण उभे आहोत, त्यांच्याबाबतची कृतज्ञता समाज, सरकार कोणाकडेच नाही. आपण ज्यांच्यामुळे सुखाने जगतो, मजूर\कामगार गावाकडून ‘लॉकडाऊन’ संपल्यावर जर पुन्हा कामाला आलाच नाही, तर आपल्या जगण्याचेच ‘लॉकडाऊन’ होईल अशी स्थिती आहे.......