जितका प्रबळ विरोधी पक्ष, तितकी लोकशाही सुदृढ राहू शकते, हा मुद्दा आपण विसरता कामा नये
पडघम - देशकारण
अरुण खोरे
  • जिग्नेश मेवानी, राहुल गांधी आणि कन्हैयाकुमार
  • Wed , 29 September 2021
  • पडघम देशकारण कन्हैयाकुमार Kanhaiya Kumar जिग्नेश मेवानी Jignesh Mevani भगतसिंग Bhagat Singh काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi

भारताच्या राजकीय इतिहासात काल मंगळवारी शहीद भगतसिंग यांच्या ११४व्या जयंतीदिनी जी घटना नोंदली गेली, ती मला स्वतःला फार महत्त्वाची वाटते. त्याची कारणे दोन. एक म्हणजे विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे नेते असलेले दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले कन्हैयाकुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी या दोघांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या दोघांनी प्रवेश केला आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी वेणूगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह पत्रकार परिषद झाली, त्यातही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. ही एक महत्त्वाची नोंद काल भारताच्या राजकीय इतिहासात झाली, असे मला वाटते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दुसरा महत्त्वाचा पैलू हा प्रतीकात्मक जरी असला तरी आज त्याची फार मोठी गरज भारतातील तरुणाईला आहे आणि त्याचे भान निश्चितपणे राहुल गांधी, कन्हैयाकुमार व जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल या सर्वांना असेल यात शंका नाही. भारतीय राज्यघटना आणि आंबेडकर, गांधी, भगतसिंग यांच्या प्रतिमा असलेले एक छायाचित्र कन्हैयाकुमारने राहुल गांधी यांना भेट दिले. ही गोष्ट प्रतीकात्मक आहे, पण आज आपल्याला ही प्रतीके निश्चितपणे ‘नव्या भारता’चा विचार सांगणारी आहेत आणि आजच्या परिस्थितीत या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी विचारांचे मंथन कोणत्या दिशेने करण्याची गरज आहे, हे अधोरेखित करत आहेत. आणि म्हणून कालच्या या घडामोडींची नोंद आपल्या देशाच्या राजकीय इतिहासात निश्चित झाली आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर विचार प्रवाहांचा अभ्यासक म्हणून मी त्याचे स्वागत करतो.

कन्हैयाकुमारची पत्रकार परिषद अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झाली. तो बोलघेवडा आहे, भाषणबाजी करणारा आहे, अशी अनेक दूषणे त्याला यापूर्वी देऊन झाली आहेत. त्याच्या पलीकडे या देशातील प्रदीर्घ कालखंडातील चिंतन परंपरेकडे हा तरुण नेता खूप गंभीरपणे पाहतो, असे माझे मत बनत चालले आहे. कालच्या त्याच्या बोलण्यातही त्याने हे काही मुद्दे मांडले. कोणाला पटो अथवा न पटो, पण ‘काँग्रेस वाचली तर देश वाचेल’ आणि ‘काँग्रेस नावाचे मोठे जहाज जर तगून राहिले तर मग छोट्या-मोठ्या नावा किंवा होड्या याही जगतील, तगतील’, हा त्याचा एक चांगला मुद्दा होता. देश एकात्म करण्याचा गांधीजींचा विचार, समतेचा बाबासाहेबांचा विचार आणि धैर्य, शौर्याचा भगतसिंगांचा बाणा, या सगळ्यांची आज देशाला गरज आहे, असे कन्हैयाकुमारने सांगितले. भारतीय कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडून तो आता काँग्रेस पक्षात आला आहे. त्याला खासदार होण्याची घाई आहे, अशी टीकाही सुरू झाली आहे. भारताच्या संसदीय लोकशाहीतील काँग्रेसला प्रमुख आणि प्रबळ विरोधी पक्ष बनवण्याच्या दृष्टीने कन्हैयाकुमारने या पक्षात केलेला प्रवेश, ही त्याची कालची भूमिका ठळकपणे अधोरेखित करून गेली.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

त्याने राहुल गांधींना जे छायाचित्र दिले आहे, ते मला खूप महत्त्वाचे वाटले. प्रतीक म्हणून त्याचे निश्चित महत्त्व, वेगळेपण आहे! आता या तिन्ही तरुणांना आगामी काळातील निवडणूक पर्वात अतिशय सजगपणे स्थान देण्याचे, त्यांना अधिकाधिक जनसमूह जोडून देण्याचे, त्यांच्यामागे काँग्रेस पक्षाचे सर्व बळ उभे करून तरुणाईला मजबूत करण्याचे काम आणि जबाबदारी काँग्रेस पक्षाची, त्यातही राहुल गांधींची आणि त्यांच्याबरोबर असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आहे. या दृष्टीने देशातील काँग्रेसजनांनी आणि प्रमुख नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

आता तर प्रा. सुहास पळशीकर यांच्यासारख्या विद्वान विश्लेषकांनीही काँग्रेस मृत्युशय्येवर असल्याची चर्चा सुरू केली आहे. आजच्या ‘लोकसत्ते’त पळशीकर यांनी आपल्या ‘चतु:सूत्र’ या स्तंभात काँग्रेस पक्षाच्या दारुण अवस्थेची चिकित्सा केली आहे. लेखाच्या शेवटी त्यांनी काँग्रेस मृत्यूशय्येवर असल्याची जी टिपणी केली आहे, ती वाचत असताना मला कालच या पक्षात प्रवेश केलेले कन्हैयाकुमारचे निवेदन सतत आठवत राहिले.

महाराष्ट्रासारख्या राज्यात अजूनही काँग्रेसला चांगले दिवस आणि चांगले प्रतिनिधित्व मिळू शकते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल विविध मतमतांतरे असली तरी त्यांनी आता पक्षाला सक्रिय करण्याचा चंग बांधला आहे, हे जाणवते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विशेषत: पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, उल्हास पवार, सुनील केदार, या सर्वांनी नाना पटोले यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले पाहिजे. त्याबरोबरच राज्यातील काँग्रेसमधील तरुण नेत्यांच्या फळीने आमदार आणि मंत्रीपद मिरवत बसण्यापेक्षा राज्यातील तरुणाईला जागे करणे आणि त्यासाठी महाराष्ट्रभर फिरत राहणे असे नियोजन करण्याची गरज आहे. मंत्रीमंडळातील सतेज पाटील, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार प्रणिती शिंदे, धीरज देशमुख, या सर्वांनीच एकजुटीने आणि जिद्दीने काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................

या  आशा-अपेक्षा व्यक्त करत असतानाच काही महिन्यांपूर्वी दिल्लीस्थित ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याची मला पुन्हा आठवण येते. पंतप्रधान मोदी यांच्या विरुद्ध खरोखर लढायचे आहे का? त्यासाठी एकसंध आघाडी करून विरोधी पक्ष तयारीला लागले आहेत का? आणि मोदींना पराभूत व्यूहरचना काही आहे का? असे काही प्रश्न त्यांनी विचारले होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या प्रश्नांची उत्तरे पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर येतीलच, पण काल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून कन्हैयाकुमार-जिग्नेश मेवानी यांनी निश्चितपणे गुजरातमधील निवडणुकीसाठी एक आव्हान उभे केले आहे. जितका प्रबळ विरोधी पक्ष, तितकी लोकशाही सुदृढ राहू शकते, हा मुद्दा आपण विसरता कामा नये. त्याच्या आधारेच काल काँग्रेस पक्षात आलेल्या या तरुण नेत्यांचे स्वागत आपण केले पाहिजे.

..................................................................................................................................................................

लेखक अरुण खोरे हे ज्येष्ठ संपादक असून सध्या ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.  

arunkhore@hotmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा