करोना व्हायरस : तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात, ते आणि तेवढंच ऐका; अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 18 March 2020
  • पडघम देशकारण करोना विषाणू करोना व्हायरस Coronavirus

करोनाच्या महाराष्ट्रातील आणि भारताच्या निरनिराळ्या राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याविषयी लोकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि खासकरून व्हॉटसअ‍ॅपवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ती वाचूनही लोकांमध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होत आहे. कांद्यापासून गोमुत्रापर्यंत उपाय सुचवले जात आहेत, मात्र असे उपाय सुचवणारे लोक डॉक्टर नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे करोना व्हायरसपासून आपला बचाव करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका आणि अफवांना बळी पडू नका. 

करोना व्हायरस नेमका काय आहे? हा व्हायरस कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती? त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती पुढील व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचा हा सर्वाधिक पाहिला जात असलेला, अतिशय महत्त्वाचा आणि करोनाबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ आहे. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस नक्की कसा आला? कोरोनाबद्दल भीती का आहे? हा आजार बरा होतो का? हा आजार कसा पसरतो? या आजारापासून स्वत:ची काळजी कशी घ्यायची, याची माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगितली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ५० हजार लोकांनी पाहिला आहे.

पुण्याच्या प्रसिद्ध बी. जे. मेडिकल कॉलेजचे कार्यकारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी या व्हिडिओमध्ये करोनाची भीती का बाळगायची नाही आणि त्याचबरोबर काय काळजी घ्यायची, याची सविस्तर माहिती दिली आहे. ‘करोना व्हायरस होऊ नये म्हणून काय कराल?’\!what should do to avoid Corona virus?’ या नावाने हा व्हिडिओ उपलब्ध आहे. ५ मार्च २०२० रोजी हा व्हिडिओ यू-ट्युवर प्रकाशित झाला असून तो आतापर्यंत १२ हजार पाचशे जणांनी पाहिला आहे.

श्वसनरोगतज्त्र डॉ. अल्पा दलाल यांनी करोना व्हायरसच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी काय करायला हवं, याविषयी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे हा उपाय या आजाराबाबतची सर्वांत गरजेची आणि महत्त्वाची कृती आहे. लिक्विड सोपने कमीत कमी २० सेकंट हात धुणे, न घाबरणे हाही आपली प्रतिकारशक्ती कायम ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी चिकनमुळे करोना होतो का, याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे. त्यांनी असंही सांगितलं आहे की, चीनमध्येही हा आजार पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना झाल्याचं आत्तापर्यंतच्या माहितीतून समोर आलेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी यांच्यापासून कसलाही धोका नाही.

...............................................................................................................................................................

हेही पाहा, वाचा

साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4103

करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली

https://www.aksharnama.com/client/article_detail/4100

करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4099

फक्त ‘साथीच्या रोगाने येणारे मरण’ आपल्याला एकत्रित आणू शकते?

https://www.aksharnama.com/client/article_detail/4107

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......