करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!
सदर - #जेआहेते
सुनील तांबे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 16 March 2020
  • सदर #जेआहेते सुनील तांबे Sunil Tambe करोना विषाणू करोना व्हायरस Coronavirus

राजकीय हत्यांच्या मागे षडयंत्र असतं आणि या षडयंत्रांचा कधीही छडा लागत नाही. त्यामुळे या षडयंत्राचं मनोवेधक आणि पटण्याजोगं चित्र रेखाटणं, हा विसाव्या शतकातील सर्वांत मोठा विरंगुळा बनला. विशेषतः अमेरिकेत. प्रसारमाध्यमांनी हा विरंगुळा कमालीचा लोकप्रिय केला आणि २१ व्या शतकात इतर राष्ट्रांमध्येही हे लोण पोचलं. करोना विषाणूच्या उदभवाबाबतही राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विविध राजकारणी करू लागले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची किनार या वादाला आहे. भारतातील काही प्रसारमाध्यमांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. करोना विषाणूची निर्मिती चीननेच केली, असा आरोप दै. ‘लोकसत्ता’ने केला, तर ‘इकॉनॉमिक टाइम्स’ (ईटी प्राईम) या माध्यमानेही चिनी सरकारने पुरस्कृत केलेल्या फसलेल्या प्रयोगातून करोना हा विषाणू निर्माण झाला आणि त्याचा प्रसार झाला, असं जाहीर केलं.

करोना विषाणूची लागण वाढत गेली आणि व्हॉटसअ‍ॅपवर अनेकांनी मला मॅसेज म्हणजे बातम्यांच्या व व्हिडिओंच्या लिंक्स पाठवून करोना विषाणू हे जैविक युद्धाचं हत्यार म्हणून कसं विकसित करण्यात आलं, यासंबंधातील बातम्या व लेख पाठवले. वुहान शहरातील चीन सरकारच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला, असं एका बातमीत म्हटलं होतं, तर दुसर्‍या बातमीत कॅनाडातील एका प्रयोगशाळेत काही चिनी वैज्ञानिकांनी या विषाणूची गुप्तपणे निर्मिती केली असा दावा केला. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचा संचालक (माहिती, शिक्षण आणि संवाद) काम करत होतो, त्या वेळी महाराष्ट्रातील एका नामवंत पत्रकाराने एड्सचा विषाणू निर्माण करण्यात अमेरिकेने कळीची भूमिका निभावली, असं छातीठोकपणे सांगितलं होतं.

जीवाणू आणि विषाणू यातला फरक न कळणारे पत्रकार निव्वळ काही घटनांच्या आधारे (त्याला ते परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात!) जैविक युद्धासाठी एड्स, इबोला, सार्स आणि आता करोना विषाणूंची निर्मिती करण्यात आली, असा दावा करत असतात.

करोना विषाणूच्या बाबतीत परिस्थिती अधिक चिघळलेली आहे. राजकीय नेते या विषयावर शेरेबाजी करू लागले आहेत. अमेरिकेचे सिनेटर टॉम कॉटन यांनी दावा केला की, करोना विषाणू प्रयोगशाळेत बनवण्यात आला आहे. या विषयावर त्यांनी ट्विटसची मालिकाच चालवली आणि ज्या कोणी जगावर हे संकट लादलं आहे, त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करायला हवं, अशा आशयाची मागणी करणारं ट्विट केलं. ते म्हणाले की, यासंबंधात पारदर्शकता गरजेची आहे. अखेरीस त्यांनी चीनवर आपला रोख असल्याचं स्पष्ट केलं. कॉटन यांच्या दाव्याला उत्तर देताना चीन सरकारने अमेरिकेवर आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजान झाओ यांनी दावा केला की, अमेरिकन लष्करानेच करोना हा विषाणू बनवला आणि चीनमधील वुहान शहरात सोडला. करोना विषाणूचा संसर्ग झालेला अमेरिकेतील पहिला रुग्ण कोणता, केव्हा त्याला बाधा झाली, कोणत्या इस्पितळात त्याच्यावर उपचार झाले, हा सर्व डेटा अमेरिकेने जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रा. फ्रान्सिस बॉईल या कायदेतज्ज्ञाचा लेख इंग्लडमधील ‘एक्सप्रेस’ या टॅब्लॉईडने १२ मार्च रोजी छापला. फ्रान्सिस बॉईल हे कायदेतज्ज्ञ जैविक अस्त्रांसंबंधीच्या विधेयकाचा मसुदा करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी असा आरोप केला की, करोना विषाणू चिनी लष्करानेच निर्माण केला. मात्र ‘एक्सप्रेस’ या टॅब्लॉईडने सदर लेखाला जोडलेल्या दुरुस्तीत असं म्हटलं की, प्रा. बॉईल यांनी ज्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे, त्या निबंधात कुठेही करोना विषाणूशी छेडछाड करण्यात आल्याचा उल्लेख नाही. म्हणजे ही दुरुस्ती जोडून ‘एक्सप्रेस’ने आपली मूठ सोडवून घेतली पण षडयंत्राचं पिल्लू सोडून दिलं. इराणचे माजी अध्यक्ष, अहमदिनेजेनाद यांनी तर संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना पत्र लिहून, करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला, असा थेट आरोप केला. त्यांचा रोख अर्थातच अमेरिकेवर होता.

काँग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार, मनिष तिवारी यांनी कोणतीही शहानिशा न करता ‘लंडनच्या एक्सप्रेस’मधील प्रा. बॉईल यांचा लेख ट्विट करून प्रसारित केला. आपल्या ट्विटमध्ये मनिष तिवारी म्हणतात, करोना विषाणू हे जैविक अस्त्राने हाताबाहेर जाऊन धुमाकूळ घालावा अशीच योजना होती. हे दहशतवादी कृत्य आहे असा निर्वाळाही त्यांनी दिला. जैविक अस्त्रांचा नायनाट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यासंबंधात कसून चौकशी करायला हवी, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

शेखर गुप्ता हे भारतातले नामवंत पत्रकार. ‘द इंडियन एक्सप्रेस’चे ते प्रमुख संपादक होते. सध्या ‘द प्रिंट’ नावाचं वेबपोर्टल ते पाहतात. ते लेख लिहितात, कॅमेर्‍यासमोर उभं राहून बडबड करतात, प्रणव रॉय यांच्यासोबत निवडणूक सर्वेक्षणात सहभागी होतात. मात्र त्यांनी कधीही सार्वजनिक आरोग्य या विषयावर वृत्तांकन केलेलं नाही. परंतु करोना विषाणूच्या वादात पडलो नाही, तर पत्रकार म्हणून कसं मिरवणार असा प्रश्न त्यांना छळत असावा. त्यांनी असा दावा केला की, चिनी लोकांना जंगली पशुंचं मांस खायला आवडतं. त्यातून करोना विषाणूचा फैलाव झाला.

करोना विषाणू जंगली पशूंमधून संक्रमित झाला का, या विषयावर संशोधन सुरू आहे. परंतु हे संशोधन अद्याप अपूर्ण आहे. या संबंधात ‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकात एक लेख आला होता. सदर लेखात खवले मांजर (पँगोलिन) चीनमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याच्या मांसातून या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता तपासली जात आहे असं म्हटलं होतं. माहितीच्या महाजालाच्या नळावर पाणी भरून शेखर गुप्तांनी घरात चुळा मारायला सुरुवात केली! वस्तुतः संशोधन पूर्ण झाल्याशिवाय, निष्कर्ष हाताशी आल्याशिवाय या प्रकारची शेरेबाजी करायची नसते, हा पत्रकारितेचा मूलभूत नियमही शेखर गुप्तांनी पाळला नाही. पत्रकारांची प्रसिद्धीची असोशी राजकारण्यांपेक्षा कमी नसते!

जैविक अस्त्रं नाहीतच का? आहेत. अमेरिका, इराक, रशिया यांनी जैविक अस्त्रं बनवली होती. त्यांचा साठा केला होता, ती वापरलीही होती. या जैविक अस्त्रांना प्रत्युत्तर देणार्‍या संशोधन संस्थाही स्थापन करण्यात आल्या. सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, युएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्विसेस, द नॅशनल बायोडिफेन्स अ‍ॅनालिसिस आणि काऊंटरमेजर्स सेंटर, यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, अशा अनेक अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय संस्था जैविक अस्त्रांचा धोका, त्यावरील उपाययोजना यांवर संशोधन करत असतात. जागतिक आरोग्य संघटनाही त्यावर लक्ष ठेवून असते. यापैकी एकाही जबाबदार व मान्यवर संस्थेनं करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला, या दाव्याला कोणताही आधार दिलेला नाही.

करोना विषाणूच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा काळात या संकटाला कोणीतरी जबाबदार असणारच, त्यामागे षडयंत्र असणारच ही जनभावना आहे. कारण ‘परमेश्वर मेल्याचं’ नित्शेनं जाहीर करून अनेक वर्षं लोटली आहेत. परमेश्वर मेला असेल तर या सर्व उत्पाताला माणूसच जबाबदार असणार, कोणीतरी षडयंत्र रचलेलं असणार, असा विश्वास आपल्याला वाटू लागतो. माणूस सर्वशक्तिमान आहे, या धारणेतून ही भावना आणि घबराट निर्माण होते. राजकारणी आणि पत्रकार ही घबराट फक्त प्रक्षेपित करतात. सामान्य जनांएवढेच तेही अज्ञानी असतात!

.............................................................................................................................................

लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत. 

suniltambe07@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......