अभिनयाची पार्श्वभूमी नाही, प्रशिक्षण नाही, उच्चशिक्षितही नाही, तरीही दिलीपकुमारने अभिनयाची स्वतःची चौकट तयार केली. ‘नैसर्गिक अभिनया’चा ‘वस्तुपाठ’ घालून दिला...

दिलीपकुमारने आपल्या अभिनयशैलीचे ट्रॅक सहजपणे बदलले. त्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्या कारकीर्दीचे सरळसरळ तीन टप्पे पडतात. ५०च्या दशकातला ‘ट्रॅजडी किंग’, ६०-७०च्या दशकातले हलकेफुलके व ड्रॅमॅटिक सिनेमे आणि ८०च्या दशकातला सुडाने पेटलेला म्हातारा. नंतर त्याच्या या दुसर्‍या इनिंगला ब्रेक लागला. परंतु, दिलीपकुमार संपला असं वाटत असतानाच त्याने नखं काढली. सुरुवात मनोजकुमारच्या ‘क्रांती’ने झाली.......