‘पहलगाम’पासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत... ‘एकते’च्या परीक्षेवर भारत कुठे उभा आहे?
पडघम - देशकारण
मिथिला राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sun , 29 June 2025
  • पडघम देशकारण पहलगाम Pahalgam काश्मीर Kashmir ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या भयानक हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ पुरुषांची निर्दयपणे हत्या केली. त्यापैकी एक स्थानिक काश्मिरी मुसलमान होता. या अमानवी घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली. सर्व धर्माचे नागरिक, धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

तथापि, भारतातील काही भागांमध्ये काही स्वयंघोषित हिंदुत्व समर्थकांनी निर्दोष भारतीय मुस्लिमांवर प्रतिहल्ले केले, जे त्या दहशतवाद्यांशी किंवा घटनेशी कुठलाही संबंध ठेवत नव्हते आणि अशा हिंसाचारावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. अशा काही घटना पुढीलप्रमाणे-

१) अलिगढ, उत्तर प्रदेश (२८ एप्रिल २०२५) : तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाली, ज्यांनी एका मुस्लीम विद्यार्थ्याला जबरदस्तीने पाकिस्तानी झेंड्यावर लघवी करण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (कुमार, २०२५)

२) उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील तोडा गाव (२६ एप्रिल) : सरफराज नावाच्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या शेजाऱ्याने (गोविंद) त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. “तुम्ही २६ मारले, आम्ही तुमचे २६ मारू,” असे त्याने मारहाणी दरम्यान म्हटले, असे सरफराजचे म्हणणे आहे. (कुमार, २०२५)

३) मसूरी, उत्तराखंड : शब्बीर अहमद दर हा २० वर्षांपासून पश्मिना शाल विकणारा काश्मिरी व्यापारी आणि त्याचा सहकारी, एका हिंदू उजव्या गटाकडून मारहाणीत सापडले. त्यांच्या दुकानांचीही तोडफोड झाली. (मतीन व जावेद, २०२५)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

४) डेराबस्सी, पंजाब (२३ एप्रिल) : ‘युनिव्हर्सल ग्रुप ऑफ हन्स्टिट्यूट्स’च्या होस्टेलमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यावर हल्ला झाला. (इंडिपेंडंट, २०२५)

५) खरावर गाव, रोहतक, हरियाणा : मुस्लीम कुटुंबांना २ मे पर्यंत गाव सोडण्याचा आदेश देण्यात आला. व्हॉट्सअॅप ग्रुपवर दीपक मलिकसह काहींनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देऊन त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. १५ मुस्लीम कुटुंबे गेली १०-१२ वर्षे तिथे राहत आहेत. त्यांपैकी बहुतेक लोक जवळच्या फॅक्टरीमध्ये मजूर, मेकॅनिक अशी कामे करत आहेत किंवा छोटे भंगार विक्री करणारे आहेत. (सुरा, २०२५)

६) दादर, मुंबई (२४ एप्रिल) : सोफियान शाहिद अली या २१ वर्षीय युवकावर रोहिंग्या मुस्लीम समजून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भाजप माहीम युनिट अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांच्यासह ९ जणांविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. अक्षताने नंतर फेसबुकवर आपल्यावरचे आरोप नाकारले. तक्रार करणारा सौरभ मिश्र दादर मार्किटमध्ये टॉवेल विकण्याचा स्टॉल चालवतो आणि त्याच्याकडे उत्तर प्रदेशच्या सोफियानसह ६ लोक काम करतात. (चिटणीस. २०२५)

७) वाकोला, सांताक्रूझ, मुंबई (२६ एप्रिल) : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाईनचे झेंडे रस्त्यावर लावून निषेध केला. पॅलेस्टाईनच्या झेंड्याचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ मुस्लीम युवकांनी आक्षेप घेतल्याने संघर्ष झाला. काही लोक जखमी झाले. जेव्हा ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सेक्युलरिझम’ची टीम या घटनेची सत्यता तपासण्यासाठी गेली, तेव्हा त्यांना कळले की, या वाकोलाच्या गोळीबार वस्तीत गेली कित्येक वर्षे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहत होते, एक दुसऱ्यांच्या सणसमारंभात सहभागी होत होते, पण गेल्या दोन वर्षांपासून हथे धार्मिक भेदभाव पसरवायला सुरुवात झाली. या संघर्षात एक तरुण अबरार शेख फक्त असीम त्याच्या भावाचे नाव, या नावाचा टी-शर्ट घालून असल्याने मारहाणीला सामोरे गेला.

या बहुसंख्याकवादी राजकीय गटांची ही कृत्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना न्याय मिळवून देण्यासाठी नसून मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवण्याचे साधन ठरत आहेत. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेल्या अमानवी कृतींसाठी भारतीय मुस्लिमांवर, जे त्यांचे प्रतिनिधीही नाहीत आणि त्यांच्या प्रभावाखालीही नाहीत, त्यांच्यावर सूड उगवणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि कायदेशीरदृष्ट्याही अन्यायकारक आहे.

भारत सरकारच्या मते, २२ एप्रिलचा पहलगाम हल्ला हा सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा कट होता. ७ मे रोजी रात्री १:४४ वाजता भारताने या हल्ल्याला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. ८ मे रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “या हल्ल्याचे उद्दिष्ट जम्मू-कश्मीर आणि देशात साम्प्रदायिक तणाव निर्माण करणे होते. सरकार व जनतेच्या दक्षतेमुळे हा कट उधळून लावण्यात आला.” (हाय कमिशन ऑफ इंडिया, २०२५) या कटाविरोधात भारतीय मुस्लिमांसह प्रत्येक भारतीयाने एकतेने उभे राहत भूमिका बजावली.

जर अशा घटना घडल्यावर प्रत्येक वेळी भारतीय मुस्लिमांना हिंसा व धमक्यांचा सामना करावा लागला, तर पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांचे भारतात सांप्रदायिकतेचे विष पसरवण्याचे उद्दिष्टच पूर्ण होते. इतिहास सांगतो की, सामाजिक स्थैर्य डळमळल्यावर आर्थिक स्थैर्यही संकटात येते, आणि त्यात सर्वाधिक नुकसान सामान्य व गरीब लोकांचेच होते. निर्दोष भारतीय मुस्लिमांवर राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली हल्ले करणे हे देशभक्ती नसून राष्ट्रीय एकतेवर घाव आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पण या सगळ्यात एक आशेचा किरण आहे.

अनेक इस्लामी विद्वानांनी इस्लामच्या नावावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर निषेध केला आहे. त्यांनी कुराणाच्या पाचव्या अध्यायातील ३२व्या चरणाचा दाखला दिला आहे : “जो कोणी एका निरपराध व्यक्तीचा जीव घेतो, तो जणू संपूर्ण मानवतेचा जीव घेतो; आणि जो कोणी एखाद्याचे प्राण वाचवतो, तो जणू संपूर्ण मानवतेचे प्राण वाचवतो.”

भारताची खरी ओळख म्हणजे ‘विविधतेत एकता’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ३० मार्च २०२५ रोजी ‘मन की बात’मध्ये देशातील विविध सण व नववर्ष साजरे केल्याने एकतेची भावना दृढ होते, असे सांगितले. त्यांनी ईदसह इतर सणांच्या शुभेच्छा दिल्या आणि एकतेस बळकटी देण्याचे आवाहन केले. (द हिंदू, २०२५)

भारतीयांनी वारंवार दाखवून दिले आहे की ते दहशतवादाविरोधात एकदिलाने उभे आहेत. मुस्लीम समुदायानेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध केला आहे. जम्मू-कश्मीर, दिल्ली, महाराष्ट्र. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम आणि कर्नाटकमध्ये मुस्लिमांनी शांततामय निषेध केला. जमीयत उलेमा- ए-हिंद, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमात-ए-इस्लामी हिंद यांसारख्या प्रमुख मुस्लीम संघटनांनी दहशतीचा निषेध केला व कडक कारवाईची मागणी केली. ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’ या मुस्लीम प्रमुख धार्मिक संस्थेने दहशतवादाला ‘कॅन्सर’ असे संबोधले व हस्लामच्या शांततेच्या तत्वांविरुद्ध असल्याचे सांगितले.

.................................................................................................................................................................

‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ मासिकाच्या जून २०२५च्या अंकातून साभार

‘Secular Perspective ग्रुप’च्या फेसबुक पेजवरील लेखाचा अनुवाद - मीनल उत्तुरकर

meenalutturkar16@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......