‘इस्त्रो’ची कामगिरी ही आपल्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. आता हिंदू, मुस्लीम आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन शिक्षण आणि रोजगार पुढच्या स्तरावर नेण्याची वेळ आली आहे
पडघम - देशकारण
अभय वैद्य
  • भारताच्या चांद्रयान-३ अंतराळ यानाने चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ केले
  • Wed , 30 August 2023
  • पडघम देशकारण चांद्रयान-३ Chandrayaan-3 इस्त्रो ISRO दलित Dalit मुस्लीम Muslim शिक्षण Education

२३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी अब्जावधी भारतीयांची हृदये अभिमानाने फुलून गेली. भारताच्या चांद्रयान-३ अंतराळ यानाने चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ केले, तेव्हा भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला.

२०१९मध्ये चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या क्षणी अपयशी ठरल्यामुळे या मोहिमेच्या भवितव्याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. पण या वेळी ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांमध्ये मोहीम यशस्वी होईल, याविषयी प्रचंड आत्मविश्वास होता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी टीव्हीवरील थेट प्रक्षेपण बघता यावे, म्हणून संध्याकाळी सगळ्यांनी घराकडे धाव घेतली. त्यामध्ये पुण्यातील एक ऑटोरिक्षा चालकदेखील होता, त्याने आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या फेरीला बाहेर जाण्याचे टाळले.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांनी सकाळी सकाळी राष्ट्राचा उत्साह वाढवला. तो अगदी साहजिकही होता. चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारे भारत हे जगातील चौथे राष्ट्र ठरले आहे, इतकेच नव्हे तर दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान उतरवणारे पहिले राष्ट्र ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केल्याप्रमाणे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) ही नेत्रदीपक कामगिरी, चंद्र आणि त्याचा भूभाग समजून घेण्यासाठी मानवतेला एक पाऊल पुढे नेण्यात महत्त्वाचे योगदान देणारी आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या चांद्रयान-३च्या यशामध्ये भारतीयांसाठी कोणता संदेश दडला आहे? भारतातील गरीब  लोकसंख्येचा मोठा भाग असलेल्या दलित आणि मुस्लीम जनतेसाठी हा संकेत आहे की, त्यांनी स्वत:ला निरक्षरता आणि गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देणे भारतात आणि परदेशात राहणाऱ्या आपल्यासारख्या सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे.

समाजात ‘मंदिर-मस्जिद’ यांसारख्या तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रयत्नांना बळी न पडता, दलित व मुस्लीम समाजाने या समाजातील नेते, शिक्षक मंडळींनी मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळात हेच केले. फातिमा शेख, सावित्रीबाई फुले आणि सगुणाबाई क्षीरसागर यांनी १७५ वर्षांपूर्वी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली बिगर मिशनरी शाळा स्थापन केली, तेव्हा हेच केले.

या समाजसुधारकांना १९व्या शतकामध्ये पुण्यातील पुराणमतवादी ब्राह्मणांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला, परंतु काही ब्राह्मण आणि ब्रिटिशांसह इतर लोक होते, ज्यांनी त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला. लेखक आणि संशोधक रीता राममूर्ती गुप्ता यांच्या मते शिक्षकांच्या या धाडसी गटात फातिमा शेख - ज्या बहुधा भारतातील पहिल्या मुस्लीम महिला शिक्षिका होत्या - यांचा समावेश होता. यातून मुस्लीम समुदायाने मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्याची प्रेरणा घेण्याची गरज आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माजी खासदार आणि भारतीय रिझर्व्ह बँकचे (आरबीआय) कार्यकारी संचालक डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपल्या यशाचे श्रेय बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये रेल्वे कामगार असलेल्या अशिक्षित वडिलांना दिले. अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पीएच.डी. मिळवलेल्या डॉ. जाधव यांनी लिहिले आहे की, बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या दलितांसाठीच्या संदेशाने प्रेरित होऊन त्यांच्या वडिलांनी मुलांसाठी मोठी स्वप्न बघितली आणि त्यांना शिक्षित केले. ‘अस्पृश्य’ महार समाजातून आलेल्या आंबेडकरांना शिक्षणाने भरारी मिळाली आणि त्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले. पुढे त्यांनी शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले, दलितांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली.

सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. जॉन कुरियन यांनी अलीकडील एका लेखात असे नमूद केले आहे की, शाळा आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये भारतीय मुस्लिमांची संख्या सर्वांत कमी आहे, अगदी दलितांपेक्षाही कमी. या निराशाजनक परिस्थितीत आशेचा किरण म्हणजे उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक टप्प्यांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीत शिकणाऱ्यांमध्ये मुस्लीम मुलांपेक्षा मुस्लीम मुलींची संख्या जास्त आहे.

त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्ये मुस्लीम पुरुषांपेक्षा मुस्लीम स्त्रियांची संख्या जास्त आहे. त्यांच्या मते गरीब, निम्न मध्यमवर्गीय आणि वंचित मुस्लीम यांना १२ वर्षांपर्यंत दर्जेदार शालेय शिक्षण आवश्यक आहे. हे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’चेदेखील एक उद्दिष्ट आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आज भारतातील गरिबांसाठी सरकारी मदत आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे. दानशूर व्यक्ती, कॉर्पोरेट्स किंवा अनिवासी भारतीयांकडूनसुद्धा अशी मदत पुरवली जाते. मिलिंद कांबळे यांनी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’(DICCI)ची स्थापना केली आणि दलित तरुणांना व त्यांच्या पालकांना आरक्षणाच्या मागे लागून नोकरी करण्याऐवजी उद्योजक बनण्याचे आवाहन केले.

पत्रकार सय्यद रिजवानउल्ला यांनी पुण्यातील हाजी नजीर तांबोळी यांचे प्रेरणादायी उदाहरण दिले. तांबोळी यांना गरिबीमुळे सातवीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही, पण आज ते एक यशस्वी उद्योजक आहे. ते आपल्या ‘तांबोली इंडस्ट्रीज’द्वारे DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था), L&T, भारत फोर्ज आणि अल्फा लावल या नामांकित कंपन्यांसाठी उत्पादने पुरवतात.

दुसरे उदाहरण आहे आयएएस अधिकारी अन्सार शेख यांचे. मागासलेल्या मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील एका ऑटोरिक्षा चालकाचा हा मुलगा. गरिबीमुळे त्याच्या वडिलांना त्याला शाळेतून काढायचे होते, पण शिक्षकांनी त्याला तसे न करण्याचा आग्रह केला. अन्सार पुण्यात शिकायला गेला आणि पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गरीब भारतीयांना जे शिक्षण आवश्यक आहे, ते कौशल्यावर आधारित असले पाहिजे. त्याचा फायदा त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी दिशादर्शक म्हणून होऊ शकेल. सुदैवाने हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित आहे. पुण्यातील शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने विकसित केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या धर्तीवर घटनात्मक मूल्ये शिकवणे, हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असावा.

टाटा ट्रस्टद्वारे आणि हजारो सरकारी शाळांमध्ये महाराष्ट्र शिक्षण विभागाद्वारे राबवण्यात येणारा हा कार्यक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम २००५ आणि शिक्षण हक्क कायदा २००९च्या कलम २९शी संलग्न आहे. आपल्या लोकशाहीचा पाया न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानाच्या प्रस्तावनेत समाविष्ट असलेल्या मूल्यांवर आधारित आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये ही मूल्ये कार्य-आधारित शिक्षणाद्वारे शिकवली जातात.

वाढते उत्पन्न, वाढती विदेशी गुंतवणूक, डिजिटल पेमेंटचा वापर, मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास आणि आर्थिक वाढ, यांसह भारत आज प्रगतीच्या मार्गावर आहे. इस्त्रोची कामगिरी ही आपल्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. आता हिंदू, मुस्लीम आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन शिक्षण आणि रोजगार पुढच्या स्तरावर नेण्याची वेळ आली आहे.

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद - भाग्यश्री कुलथे-दोडमनी

..................................................................................................................................................................

लेखक अभय वैद्य ‘हिंदुस्थान टाईम्स’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या पुणे आवृत्तीचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.

abhaypvaidya@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारताच्या पंतप्रधानपदाचा हा ऱ्हास खरे देशभक्त, खरे राष्ट्रप्रेमी, खरे राष्ट्रवादी व लोकशाहीची चिंता वाहणारे नागरिक यांचा आत्मविश्वास डळमळीत करणारा आहे

आपल्या देशात राष्ट्रपती देशाचा प्रमुख असतो, लोकसभा-राज्यसभा यांच्या अध्यक्षांना विशेष मान असतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाही वेगळे महत्त्व असते आणि मुख्य निवडणूक आयुक्ताला खास असे स्थान असते. मात्र देशाचा पंतप्रधान जेव्हा कार्यक्षम असतो, सुसंस्कृत, दूरदृष्टी असलेला, मूल्ये जपणारा असतो, तेव्हा वरील सर्वांना विशेष इज्जत असते. त्यामुळे मोदी यांनी स्वतःचे व पंतप्रधान या पदाचेच नाही, तर वरील पदांचेही अ.......