ही मराठी वृत्तवाहिन्यांची आत्ताची ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि वर्तमानपत्रांची उद्याची ‘हेडलाईन’ असायला हवी!
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि १७व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 04 February 2023
  • पडघम साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan विद्रोही मराठी साहित्य संमेलन Vidrohi Marathi Sahitya Sammelan

३ फेब्रुवारीपासून वर्ध्यात ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले, तर आज, ४ फेब्रुवारीपासून वर्ध्यातच १७वे विद्रोही साहित्य संमेलन सुरू झाले. आणि आज वर्ध्यात एक ‘ऐतिहासिक’, रोमहर्षक आणि अदभुत गोष्ट घडली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेन्द्र चपळगावकर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्यासह १७व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावून संमेलनाध्यक्ष प्रख्यात लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांची भेट घेतली. (छायाचित्र सौजन्य - भक्ती चपळगावकर)

चपळगावकरांनी एक नवीन पायंडा पाडला. तो अतिशय स्तुत्य, स्वागतशील आणि स्पृहणीय आहे. ही घडामोड अशाच प्रकारे दरवर्षी घडो. किंबहुना दोन्ही संमेलनाध्यक्षांनी दोन्ही संमेलनामध्ये आदान-प्रदान वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत. (छायाचित्र सौजन्य - भक्ती चपळगावकर)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा