प्रेम करणं आपला आनंद, मतदान करणं आपलं कर्तव्य... मतदान म्हणजे मतदान म्हणजे मतदान असतं...
पडघम - राज्यकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 12 February 2022
  • पडघम राज्यकारण निवडणूक आयोग Election Commission मतदान Voting मत Vote व्हॅलेंटाइन डे Valentine's Day मतदान म्हणजे मतदान म्हणजे मतदान असतं

जवळपास जगभर १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीविषयीचं प्रेम या निमित्तानं तरुणाई व्यक्त करते. ‘प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं’ अशी एक कुसुमाग्रजांची कविताही आहे. आपल्या प्रेमाच्या व्यक्ती, संस्था, उपक्रम, विषय अनेक असतात. प्रसंगानुरूप ते बदलतातही. पण लोकशाही ही शासनप्रणाली आणि जीवनप्रणाली म्हणून आपल्या निरंतर प्रेमाचा विषय असायला हवी. ती आपणा सर्व भारतीयांसाठी नितांत निकडीची गोष्ट आहे. त्यामुळेच येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने तरुणांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मतदान म्हणजे मतदान म्हणजे मतदान असतं’ ही कविता व्हिडिओ माध्यमातून सादर केली आहे.

मराठीतील प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या लोकप्रिय कवितेवरून साधना गोरे यांनी हे रूपांतर तयार केलं आहे. रेडिओ जॉकी प्रणय जयश्री कैलास चव्हाण यांनी ही कविता सादर केली आहे. समाजातील सर्व घटक, वास्तवाशी संबंधित प्रतीकं यांचा आधार घेत ही कविता मतदानाचं महत्त्व अधोरेखित करते.

तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आधी आठवड्यातील प्रत्येक दिवस विशिष्ट कारणांसाठी साजरा करते. लोकशाहीवरही प्रेम करता येतं, करावं, हा संदेश महाराष्ट्रातील सर्व तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक कार्यालय विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग असलेली ही कविता...

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा