सरसंघचालक मोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्याची कला!
पडघम - देशकारण
अमित इंदुरकर
  • जे.के. बजाज व एन. डी. श्रीनिवास यांच्या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत
  • Wed , 06 January 2021
  • पडघम देशकारण सरसंघचालक Sarsanghchalak मोहन भागवत Mohan Bhagwat राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS हिंदू Hindu हिंदूराष्ट्र Hindu Rashtra भारतविरोधी देशद्रोही Deshadrohi

नुकतेच जे.के. बजाज व एन. डी. श्रीनिवास यांनी लिहिलेल्या ‘Making of a HINDU PATRIOT : Background of Gandhiji's Hind Swaraj’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ससंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा गांधीच्या एका वक्तव्याचा आधार घेत ‘कुठलाही हिंदू हा देशभक्त असणारच, कारण हिंदू व्यक्ती ही कधीही ‘भारतविरोधी’ होऊ शकत नाही. आणि मुळात एखादी व्यक्ती देशावर प्रेम करते म्हणजे ती फक्त भूमीवर प्रेम करते असे नव्हे. येथील माणसे, नद्या, संस्कृती, परंपरा व सर्वच गोष्टींवर प्रेम करणे म्हणजे ‘देशभक्ती’ ’, असे वक्तव्य केले.

या वक्तव्यात त्यांनी ‘देशभक्ती’ म्हणजे काय आणि या देशात खरे ‘देशभक्त’ कोण आहेत, याच्या एक प्रकारे व्याख्याच सांगितल्या. म. गांधींच्या वक्तव्याचा किंवा त्यांचा आधार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे, हे न कळण्याइतपत आता जनता (अंधभक्त सोडून) दुधखुळी राहिलेली नाही!

यापूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारी २०२० रोजी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भागवत यांनी ‘गांधीजी हे कट्टर आणि सनातनी हिंदू होते आणि येत्या २० वर्षांनंतर गांधीजींच्या स्वप्नातील भारत नक्कीच साकारला जाईल’, असे वक्तव्य केले होते.

त्यांनी नुकतेच केलेले वक्तव्य भारतासारख्या लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष देशात अल्पसंख्य असणाऱ्या लोकांच्या मनात भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण करणारे आहे. त्यांच्या मते हिंदू लोक हे ‘भारतविरोधी’ असूच शकत नाहीत. याचा अर्थ भारतात हिंदू सोडून असणारे इतर धर्मीय लोक हे ‘भारतविरोधी’ असू शकतात असाच आहे. म्हणजे मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध या भारतात अल्पसंख्य असणाऱ्या धर्माचे लोक हे ‘भारतविरोधी’ म्हणजेच ‘देशद्रोही’ असू शकतात, असा त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ आहे.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

‘खरा हिंदू’ कोण असावा याकडे बारकाईने लक्ष दिल्यास भागवत कात्रीत सापडतात. कारण ते एकीकडे हिंदूधर्मीय लोकांना ‘देशभक्त’ मानतात, तर दुसरीकडे या देशातील १३० कोटी जनतेला ‘हिंदू’ म्हणून संबोधत असतात.

२५ ऑक्टोबर २०२० रोजी विजयादशमी निमित्त केलेल्या आपल्या भाषणात ते म्हणतात- ‘हिंदुत्व हा शब्द आपल्या देशाच्या अस्मितेचा, अध्यात्म आधारित परंपरेचे सनातन सातत्य आणि समस्त मूल्य संपदेसह अभिव्यक्ती देणारा शब्द आहे. म्हणूनच संघाचा असा विश्वास आहे की, हा शब्द भारतवर्षाला आपले मानणाऱ्या त्याच्या संस्कृतीच्या वैश्विक आणि सर्वकालीन मूल्यांना आचरणात आणू इच्छिणारे, तसेच यशस्वीपणे असे करून दाखवणाऱ्या पूर्वज परंपरेचा गौरव मनात ठेवणाऱ्या सर्व १३० कोटी समाज बांधवांना लागू आहे.’

या देशातील १३० कोटी जनता जर हिंदू आहे, तर मग या देशातील हिंदूच ‘खरा देशभक्त’ हे सांगण्याची वेळ का येते? या प्रश्नांचा खोलवर विचार केल्यास आपल्याला गोळवलकर यांना अपेक्षित असलेली ‘हिंदूराष्ट्र’ ही संकल्पना बारकाईने अभ्यासावी लागेल. गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकानुसार मुस्लीम, कमुनिस्ट आणि ख्रिश्चन हे लोक या देशाचे ‘खरे शत्रू’ आहेत. त्यामुळे भागवत यांचे वक्तव्य म्हणजे गोळवलकर यांच्या पुस्तकातील विचार अमलात आणण्याचे संकेत देणारी मांडणी आहे, असे म्हणावे लागते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गांधीहत्येमध्ये हात असल्याचे नेहमीच बोलले जाते. गांधी आणि संघ यांचे विचार पूर्णतः परस्परविरोधी आहेत. गांधींच्या धार्मिक दृष्टिकोनाचा फायदा आपले सुप्त अजेंडे राबवण्यासाठी कसा करता येईल आणि आपला विचार गांधीविचारांना कसा पोषक आहे, हे दाखवण्यासाठी संघाने हा सर्व खटाटोप सुरू केलेला आहे. पण संघाने एक गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे गांधी जरी धार्मिक वृत्तीचे असले तरी ते सत्यालाच आपला धर्म मानत होते. मग गांधींच्या विचारांचा आधार घेऊन संघाला देश घडवायचा असेल तर या देशातील जातीव्यवस्था नष्ट करण्यास संघाने पुढाकार घ्यावा. कारण गांधींनी या देशातील जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आपल्या स्तरावर प्रयत्न सुरू केला होता.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

म. गांधींचे आपल्याला सोयीचे असणारे विचार सांगून लोकांना मूर्ख बनवणे हा संघाचा अजेंडा राहिलेला आहे. भागवतांच्या मतानुसार जर प्रत्येक हिंदू ‘देशभक्त’ असेल तर या देशात भ्रष्टाचार करणारे, दरोडे टाकणारे, चोऱ्या करणारे लोक आणि त्यांच्या टोळ्या या फक्त हिंदूव्यतिरिक्त इतर अल्पसंख्याक असणाऱ्या धर्मातील आहेत का?

११ ऑक्टोंबर २००७ रोजी अजमेर शरीफ दर्ग्यात बॉम्बस्फोट झाला. त्यातील आरोपी म्हणून शिक्षा झालेले देवेंद्र गुप्ता, भावेश पटेल, सुनील जोशी व इतर संशयित आरोपी (स्वामी असिमानंद, इंद्रेश कुमार, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर) यांचा धर्म कोणता आहे?

देशाला अब्जावधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून जाणारे विजय माल्या, निरव मोदी, चौकसी हे नेमके कोण आहेत?

आसाराम बापू, गुरमित राम रहीम यांसारखे बलात्कारी नराधम कोण आहेत?

मोहन भागवत यांच्या मते जर या देशातील माणसे, नद्या यावर प्रेम करणे ही जर देशभक्ती आहे आणि हिंदूच खरे देशभक्त आहेत, तर मग अखलाक, जुनैद यांना मारणारे लोक नेमके कोण आहेत?

हाथरस, दिल्ली, उन्नाव येथे घडलेल्या बलत्काराच्या घटनेचे आरोपी कोण आहेत?

देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीला नुकसान पोहोचवून विकासाच्या नावाची जपमाळ ओढणारे, प्रसंगी आरे जंगल नष्ट करणारे नेते कोण आहेत?

जमावहल्ला, गोहत्या संशयावरून लोकांना मारणारे गुंड नेमके कोण आहेत?

पण हे प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना विचारले तर त्यांची एकच प्रतिक्रिया असते- ‘तुम्ही हिंदू लोकांना ‘देशद्रोही’ आणि आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहात. हिंदूना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आता प्रश्न उरतो की, संघ ज्या गांधींच्या वक्तव्याचा आधार घेत आहे, त्यांचा मारेकरी असणाऱ्या नथुराम गोडसेला संघ काय म्हणतो - देशद्रोही की देशभक्त? म. गांधी या देशात हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकून राहावे असे स्वप्न पाहात होते. त्यांच्या रोजच्या प्रार्थनेत रामाबरोबर अल्लाहचेदेखील नाव असायचे. या म. गांधींबद्दल संघाचे नेमके काय मत आहे? याबद्दल ही मंडळी अवाक्षरही काढणार नाहीत.

थोडक्यात भागवत यांचे वक्तव्य असत्य असले तरी त्याला विरोध करणाऱ्या व्यक्तींना ‘तुम्ही हिंदूविरोधी आहात’ हे सांगण्यासाठी रस्ता तयार करणारे आहे.

.............................................................................................................................................

लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.

mr.amitindurkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......