प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावीत अशी १०० पुस्तके
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
टीम अक्षरनामा
  • खालच्या यादीतल्या काही निवडक पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Thu , 23 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama जागतिक पुस्तक दिन World Book Day

आज जागतिक पुस्तक (आणि स्वामित्व हक्क) दिन. त्यानिमित्तानं ही मराठीतील पुस्तकांची एक यादी. यात चार विभागात एकंदर १०० पुस्तकांचा समावेश आहे. ही यादी तशी एकाच व्यक्तीनं केलेल्या पुस्तकांची आहे. त्यामुळे तिच्यात तिच्या आवडीनिवडी डोकावलेल्या आहेत. कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येक व्यक्तीची आवड ही निदान काही प्रमाणात तरी ‘व्यक्तीसापेक्ष’च राहते. त्यामुळे या यादीत अमूक पुस्तकाचा समावेश का नाही, तमूक पुस्तकाचा समावेश का केला, असे प्रश्न यादी वाचणाऱ्याला पडले तरी ते समजून घेण्यासारखे असतात. कारण वेगवेगळ्या वयोगटातल्या, अनेक प्रकारची रुची असलेल्या, विशिष्ट प्रकारची अभिरुची घडलेल्या वाचकांचं समाधान अशा कुठल्याही एखाद-दुसऱ्या यादीतून होऊ शकत नाही. त्यामुळे ही यादीसुद्धा त्याला अपवाद असणार नाहीच. पण ही यादी विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. तो हेतू प्रत्येक विभागाला दिलेल्या शीर्षकातून स्पष्ट केलेला आहे. काहींना या यादीतील पुस्तकांत भर घालावीशी वाटेल, काहींना यातील काही पुस्तकं वगळाविशी वाटतील, काहींना आपली स्वतंत्र यादीही कराविशी वाटेल किंवा काहींना या यादीतील किती पुस्तकं आपण वाचली आहेत, याचा पडताळा घ्यावासा वाटेल. तसं काहीतरी वाटलं तरी या यादीसाठी केलेली मेहनत कारणी लागली असं म्हणता येईल.

..................................................................................................................................................................

प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावीत अशी पुस्तके

..................................................................................................................................................................

१) तुकारामाची गाथा, साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई

२) चिमणरावाचे चऱ्हाट – चिं. वि. जोशी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

३) ययाती – वि. स. खांडेकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

४) मृत्युजंय – शिवाजी सावंत, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

५) श्यामची आई – साने गुरुजी, पुणे अनाथ विद्यार्थी गृह, पुणे

६)  रणांगण – विश्राम बेडेकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

७) गीता प्रवचने, विनोबा भावे, परंधाम प्रकाशन, वर्धा

८) गीताई – विनोबा भावे, परंधाम प्रकाशन, वर्धा

९)  माणदेशी माणसं – व्यंकटेश माडगूळकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

१०) निवडक ठणठणपाळ - जयवंत दळवी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई

११) शाळा - मिलिंद बोकील, मौज प्रकाशन गृह, मुंबई

१२) पडघवली- गो.  नि. दांडेकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई

१३) गीतरामायण – ग. दि. माडगूळकर, प्रकाशन विभाग, दिल्ली

१४) धग – उद्धव शेळके, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

१५) पानिपत – विश्वास पाटील, राजहंस प्रकाशन, पुणे

१६) एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर, राजहंस प्रकाशन, पुणे

१७) व्यक्ती आणि वल्ली – पु. ल. देशपांडे, मौज प्रकाशन गृह, मुंबई

१८) बटाट्याची चाळ – पु. ल. देशपांडे, मौज प्रकाशन गृह, मुंबई

१९) कोसला – भालचंद्र नेमाडे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२०) स्वामी – रणजित देसाई, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

२१) नटसम्राट – वि. वा. शिरवाडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२२) काजळमाया – जी. ए. कुलकर्णी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२३) रंग माझा वेगळा – सुरेश भट, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर

२४) बलुतं – दया पवार, ग्रंथाली, मुंबई

२५) उपरा – लक्ष्मण माने, ग्रंथाली, मुंबई

२६) गीतारहस्य – बाळ गंगाधर टिळक, केसरी प्रकाशन, पुणे

२७) माझा प्रवास – गोडसे भटजी, व्हीनस प्रकाशन, पुणे

२८) बनगरवाडी – व्यंकेटश माडगूळकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई

२९) बोलगाणी – मंगेश पाडगावकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई

३०) श्रीमान योगी – रणजित देसाई, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

३१) सिंहासन – अरुण साधू, ग्रंथाली, मुंबई

३२ ) सांगते ऐका – हंसा वाडकर, राजहंस प्रकाशन, पुणे

३३) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव, ग्रंथाली, मुंबई

३४) कळ्यांचे नि:श्वास – विभावरी शिरुरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

३५) सखाराम बाइंडर – विजय तेंडुलकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

३६) आहे मनोहर तरी – सुनीता देशपांडे, मौज प्रकाशन गृह, मुंबई

३७) डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मौज प्रकाशन गृह, मुंबई

३८) सत्याचे प्रयोग – म. गांधी, गांधी सर्वोदय सेंटर, मुंबई

३९) आयदान – उर्मिला पवार, ग्रंथाली, मुंबई

४०) पाडस –  मार्जोरी किंनन रोलिंग, अनु. राम पटवर्धन, मौज प्रकाशन गृह, मुंबई

..................................................................................................................................................................

प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावीत अशी उत्कृष्ट पुस्तके

..................................................................................................................................................................

१) भारतीय संविधान (अधिकृत प्रत) – साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई

२) स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे, प्रतिमा प्रकाशन, पुणे

३) स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

४) झेडुंची फुले – केशवकुमार, परचुरे प्रकाशन, मुंबई

५) मर्ढेकरांची कविता, मौज प्रकाशन गृह, मुंबई

६) मुंबईचे वर्णन - गोविंद नारायण माडगावकर, वरदा प्रकाशन, पुणे

७) आगरकर वाङ्मय (खंड १ ते ३) - संपा. दि. य. देशपांडे व नातू – साहित्य संस्कृती मंडळ

८) दिवाकरांच्या नाट्यछटा, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

९) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, लोकवाङ्मय गृह

१०) युगान्त - इरावती कर्वे, देशमुख आणि कंपनी, पुणे

११) मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - पु. ल. देशपांडे, मौज प्रकाशन गृह, मुंबई

१२) गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे, वरदा प्रकाशन मुंबई

१३) साता उत्तराची कहाणी - ग. प्र. प्रधान, मौज प्रकाशन गृह, मुंबई

१४) न्या. रानडे यांचे चरित्र - न. र. फाटक, नीळकंठ प्रकाशन, मुंबई

१५) बहिणाबाईची गाणी, सुचित्रा प्रकाशन, मुंबई 

१६) आधुनिक भारत - आचार्य शं. द. जावडेकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

१७) मी कसा झालो - आचार्य अत्रे, परचुरे प्रकाशन, मुंबई

१८) खरे मास्तर - बाळुताई खरे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

१९) जागर - नरहर कुरुंदकर, देशमुख आणि कंपनी, पुणे

२०) रामनगरी - राम नगरकर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई

२१) नपेक्षा - अशोक शहाणे, लोकवाङ्मय गृह, मुंबई

२२) श्यामकांतची पत्रे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२३) तुकारामदर्शन - डॉ. सदानंद मोरे, सकाळ प्रकाशन, पुणे

२४) शतकांचा संधिकाल - दिलीप पुरुषोत्तम चित्रे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२५) आठवले तसे - दुर्गा भागवत, मौज प्रकाशन गृह, मुंबई

२६) चनिया मनिया बोर - चंद्रकांत खोत, डिंपल प्रकाशन, मुंबई

२७) अरेबियन नाईट्स (खंड १ ते १६) - रीचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे, श्रीगजानन बुक डेपो, मुंबई

२८) विज्ञानबोधाची प्रस्तावना – श्री. म. माटे, व्हिनस प्रकाशन, पुणे

२९) आठवणीतल्या कविता (भाग १ ते ४) – संपा. पद्माकर महाजन व इतर, मौज प्रकाशन गृह, मुंबई

३०) समग्र बालकवी – संपादक : नंदा आपटे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

..................................................................................................................................................................

प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावीत अशी अलीकडची पुस्तके

..................................................................................................................................................................

१) कालाय नम: - इव्हा हॉफमन, अनु. पुरुषोत्तम देशमुख, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

२) वाचू आनंदे (बालगट व कुमारगट) - संपा. माधुरी पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे

३) निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे उत्रादकर, ग्रंथाली, मुंबई

४) विठोबाची आंगी - विनय हर्डीकर, देशमुख आणि कंपनी, पुणे

५) वैचारिक व्यासपीठे - गोविंद तळवलकर, साधना प्रकाशन, पुणे

६) सारांश - अरुण टिकेकर, श्रीविद्या प्रकाशन, पुणे

७) कथा आणि कथेमागची कथा (खंड १ व २) - राजन खान, साधना प्रकाशन, पुणे

८) दगडावरची पेरणी – सय्यदभाई, अक्षर मानव प्रकाशन, पुणे

९) गांधींनंतरचा भारत - रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई

१०) महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ – लुई फिशर, अनुवाद वि. रा. जोगळेकर, साधना प्रकाशन, पुणे

११) नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे, साधना प्रकाशन, मुंबई

१२) प्रेमसाधना – शरद नावरे, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई (एरिक फ्रॉम यांच्या ‘द आर्ट आफ लव्हिंग’ या पुस्तकाचे रूपांतर)

१३) रूपवेध – डॉ. श्रीराम लागू, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

१४) सर्वोत्तम सरवटे – संपा. अवधूत परळकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई

१५) हिंदू – भालचंद्र नेमाडे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

१६) झिम्मा : आठवणींचा गोफ – विजया मेहता, राजहंस प्रकाशन, पुणे

१७) काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? – शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे

१८) चलत् चित्रव्यूह – अरुण खोपकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई

१९) आणि मग एक दिवस – नसीरुद्दीन शहा, अनु. सई परांजपे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२०) गांधीजी आणि त्यांचे टीकाकार - सुरेश द्वादशीवार, साधना प्रकाशन, पुणे

..................................................................................................................................................................

प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावीत अशी अगदी अलीकडची पुस्तके

..................................................................................................................................................................

१) प्रोपगंडा – रवि आमले, मनोविकास प्रकाशन, पुणे

२) लीळा पुस्तकाच्या – नीतीन रिंढे, लोकवाङ्मय गृह, मुंबई

३) रिंगाण – कृष्णात खोत, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई

४) जुगाड – किरण गुरव, दर्या प्रकाशन, पुणे

५) सेपिअन्स - युव्हाल नोआ हरारी, अनु. वासंती फडके, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

६) सातपाटील कुलवृत्तांत – रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, संगमनेर

७) फाळणी : भारतीय भाषांमधल्या कथा (खंड १ व २) – संपा. नरेंद्र मोहन, अनु. वसंत केशव पाटील, सायन पब्लिकेशन्स, पुणे

८) कहाणी माहिती अधिकाराची – अरुणा रॉय, अनु. अवधूत डोंगरे, साधना प्रकाशन, पुणे

९) मंटोच्या निवडक कथा (भाग १ व २) – अनु. वसुधा सहस्त्रबुद्धे, विजय प्रकाशन, नागपूर

१०) हमरस्ता नाकारताना – सरिता आव्हाड, राजहंस प्रकाशन, पुणे

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......