सुखरूप रहा, जे काही शिकायचं असतं प्रणयातून,  ताटातूटीतून, वेदनेतून, ते शिक
पडघम - महिला दिन विशेष
नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती
  • नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती आणि भारतीय स्त्रीचं एक प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 07 March 2020
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती Nirendranath Chakravarty

नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती (१९ ऑक्टोबर १९२४-२५ डिसेंबर २०१८) हे बंगालीतील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या ‘उलंगा राजा’ (नग्न राजा) या कवितासंग्रहाला १९७४ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोलकाता विद्यापीठाने त्यांना २००७ साली डी. लिट या पदवीनेही सन्मानित केले. त्यांनी काही रहस्यमय कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कवितेचा हा बंगालीतून थेट मराठीमध्ये केलेला अनुवाद.

.............................................................................................................................................

सुखरूप रहा

सुखरूप रहा,

जो कोणी आहे दूरवर-जवळ,

सुखरूप रहा.

हात ठेव

ओळखी-अनोळखी सर्व

हातांवर.

पहा विचार करून,

ज्याची आशा केली नव्हती, ते ही मिळालय

बाहेरही घरातही.

अचानक गोंगाट थांबला की

त्याला हाक मार,

ज्याला घरच्या नावानी हाक मारता येते.

जे काही शिकायचं असतं प्रणयातून,  ताटातूटीतून, वेदनेतून,

ते शिक.

सुखरूप रहा.

.............................................................................................................................................

अनुवाद : रेखा शहाणे

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा