स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना नक्की कोण बदनाम करतंय?
पडघम - देशकारण
अमित इंदुरकर
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
  • Mon , 23 December 2019
  • पडघम देशकारण विनायक दामोदर सावरकर Vinayak Damodar Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर Swatantryaveer Savarkar वीर सावरकर Veer Savarkar राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress भाजप BJP शिवसेना Shivsena

देश मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना, धार्मिक उन्माद माजलेला असताना, जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत असताना स्वा. सावरकरांचा मुद्दा चर्चिला जात असून त्यावर देशातील अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, हे एक प्रकारे दुर्दैवच म्हणावे लागेल!

सावरकर हे व्यक्तिमत्त्व नेहमीच विवादास्पद राहिले आहे आणि येणाऱ्या काळातदेखील हे विवाद कायम राहणार आहेत. आणि या विवादाला त्यांचेच बहुसंख्य अनुयायी कारणीभूत आहेत. कारण ते अंदमानच्या तुरुंगातून माफी मागून सुटलेल्या सावरकरांकडे अंदमानात प्रवेश करण्यापूर्वीच्या सावरकरांप्रमाणेच पाहतात. त्यांना बहुधा खरे सावरकर समजून घ्यायचेच नाहीत किंवा ते मान्य करायचे नाहीत. त्यामुळे सावरकरांची विरोधकांकडून पुन्हा पुन्हा  बदनामी होते आहे. माफीनामे ही सावरकरांच्या आयुष्यातील वास्तविकता आहे, हे स्वीकारायला सावरकरांचे समर्थक आजही तयार नाहीत.

या वेळेस राहुल गांधींनी देशात वाढत्या बलात्काराच्या घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ या योजनेवर टीका करताना ‘रेप इन इंडिया’ ही उपमा वापरली. राहुल गांधींच्या या टीकेचे पडसाद सर्वत्र उमटले. त्यावर माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर नाही, असे राहुल गांधींनी म्हटल्याने सावरकरांच्या माफीनाम्याची पुन्हा चर्चा सुरू झाली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली ती सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी. परंतु त्यांनी सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली नाही, याचे खंडन न करता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्तेच्या मोहापायी ब्रिटिश राजनिष्ठेची कशी शपथ घेतली, हे सांगण्यातच धन्यता मानली! रणजीत सावरकरांचे हे बोलणे म्हणजे ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ या प्रकारचे होते.

सावरकरांनी अंदमानातून सुटका करण्यासाठी ब्रिटिशांना अनेक पत्रे लिहिलेली होती, हे अनेकदा सिद्ध झालेले असताना सावरकरांचे समर्थक त्याकडे पूर्णतः कानाडोळा करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सावरकरांनी ब्रिटिशांना माफी मागणारी पत्रे लिहिली होती, हे श्रीकांत शेट्ये, शमसुल इस्लाम, निरंजन टकले, मदन पाटील यांसारख्या लेखक, पत्रकारांनी सबळ पुराव्यांच्या आधारे दाखवून दिले आहे. एका माफिनाम्यात तर त्यांनी स्वतःचे आत्मसमर्पण करण्याची भाषादेखील केलेली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल, त्या पद्धतीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडलं तर त्याहीपेक्षा जास्त सरकारचा फायदा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारूपी ब्रिटिश सरकारच्याच दरबारात नाही येणार, तर कुठे जाणार?’’ सावरकरांची ही भाषा त्यांनी ब्रिटिशांसमोर केलेल्या आत्मसमर्पणाची साक्ष देते.

भाजप सरकारने महाराष्ट्राच्या विधानसभा उंबरठ्यावर असताना सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे आव्हान करून निवडणुकीत ‘सावरकर फॅक्टर’ वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात ते काहीसे यशस्वीदेखील झाले. परंतु शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी संसार थाटला आणि भाजपचे तोंड बंद केले. परंतु यातून सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खुजेपण दाखवण्यासाठी भाजपला आयतेच कोलीत मिळाले. त्यातल्या त्यात राहुल गांधींनी केलेले वक्तव्य हे त्यांना महाराष्ट्रातील सत्ताधारी महाआघाडीला धारेवर धरण्यासाठी मिळाल्याने आणखी आनंद झाला. परंतु त्यात सावरकरांच्या माफीनाम्याचे अनेकांना माहीत नसलेले सत्य (जाणूनबुजून दुर्लक्षित केले गेलेले) पुन्हा समोर येईल, याची पर्वा कुणीच करताना दिसले नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राहुल गांधींच्या वक्तव्याने का होईना सावरकर आणि त्यांची माफीनाम्याची पत्रे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या मुद्द्याला मोठे करून देशात घडत असलेल्या प्रमुख मुद्द्यांना बगल देण्याचा सुनियोजित प्रयत्न करण्यात आला. संघ विचारधारा बाळगणाऱ्या काही युवकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘सावरकरांनी कधी माफी मागितली नाही’ असा प्रचार करण्यासदेखील सुरुवात केली. परंतु राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी सावरकरांच्या माफीनामे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या रणनीतीचाच एक भाग मानत त्यांनी सहा माफीनामे लिहिल्याचे मान्य केले. इतकेच नव्हे तर २६ सप्टेंबर २००४च्या ‘ऑर्गनायझर’च्या अंकात वेद राही यांनी या पत्रांना तर्कसंगत मानून हा सावरकरांच्या राजकारणाचा एक डावपेच असल्याचे म्हटले आहे. मात्र यातून सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफीनाम्याची पत्रे लिहिली होती, हे संघसुद्धा मान्य करतो हेच सिद्ध झाले! 

सावरकरांनी माफीनामे लिहिली होते, हे सावरकर भक्त मानायला तयार नाहीत. कारण त्यांना यामुळे सावरकरांची प्रतिमा कालवंडेल याची भीती वाटत असावी. जे सत्य आहे, ते स्वीकारायला ते धजावत नाहीत. कुठल्याही महापुरुषाचे अनुयायी जेव्हा त्याच्या आयुष्यातील सत्य स्वीकारत नाहीत, तेव्हा त्या महापुरुषाची बदनामी पुन्हा पुन्हा होत राहते.

सत्य स्वीकारणे कठीण असते, पण तरी ते स्वीकारलेच पाहिजे. त्यामुळे भविष्यात टीका करणाऱ्यांनासुद्धा दहा वेळा विचार करावा लागतो. याचे एक उदाहरण म्हणजे महात्मा गांधी.  त्यांनी आपल्या आत्मचरित्रात विडी पिण्याची वाईट सवय कशी लागली, त्याकरता त्यांनी कशा चोऱ्या केल्या, एवढेच नव्हे तर वडील मृत्यूच्या दारात असताना आपली कामोत्तेजक भावना बळावली म्हणून ते आपल्या खोलीत जाऊन कस्तूरबा गांधींनाही झोपू देत नाहीत, याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. गांधींनी केलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारल्या.

प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चुका होत असतात. त्या स्वीकारल्या तर विरोधकांना त्याचे भांडवल करता येत नाही. सावरकरांबाबतही त्यांच्या अनुयायांनी हा मार्ग अवलंबला तर विरोधकांकडून होणाऱ्या त्यांच्या बदनामीला अटकाव होईल.

.............................................................................................................................................

लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.

mr.amitindurkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Vividh Vachak

Sat , 28 December 2019

अवधूतजी, सगळे रामायण झाल्यावर रामाची सीता कोण...? आपल्या प्रतिक्रियेवर दुसरी प्रतिक्रिया देण्यामागे रिसर्च पेपर द्यायचा विचार नव्हताच. आपली प्रथम प्रतिक्रिया वाचून असा समज होतो की आपण मूळ लेखाची बाजू घेऊन मूल्यमापनाचे महत्त्व सांगत आहात. म्हणून हे सांगावेसे वाटले की मूळ लेख मूल्यमापन म्हणावे अश्या धाटणीचा नव्हता. दुसरे, आपण संदर्भ मागता आहात ना? मग "माझी जन्मठेप" हा खुद्द सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ आहे की संदर्भ म्हणून. हा असताना अमराठी तज्ज्ञांचे "रिसर्च पेपर" वाचून उद्धृत करणे म्हणजे हातच्या कंकणाला आरसा मागण्यासारखेच आहे, हाच मूळ मुद्दा होता.


Avadhut Raja

Fri , 27 December 2019

मी मांडलेले मुद्दे हे अमराठी इतिहास तज्ञांचे आहेत. इथे वाद घालण्यापेक्षा एखाद दुसरा रिसर्च पेपर आला तर अमराठी इतिहास तज्ञांचे मत बदलण्यास मदत होईल. अशा संदर्भांचा अभाव असलेल्या प्रतिसादातून माझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही.


Vividh Vachak

Fri , 27 December 2019

आणखी एक मुद्दा म्हणजे, सशस्त्र क्रांती करणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकांचे आयुष्य आणि कार्यकाळ हा इतका अल्प होता की त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करायची भाषाच त्यांना अन्यायकारक आहे. याचे कारण म्हणजे केलेल्या हल्ल्यांनंतर भूमिगत झाले, नंतर पकडले गेले, कडक सुरक्षेत तुरुंगात ठेवले, झटपट खटला चालवला आणि फाशी दिली अशी इंग्रज सरकारची पद्धत होती. असे असूनही भगतसिंग राजगुरू आझाद आणि आपले चाफेकर बंधू वगैरे क्रांतिकारकाना आपण आठवतो ते त्यांच्या त्यागासाठी आणि देशप्रेमासाठी. गांधी-नेहरू यांच्या स्वातंत्र्यलढ्याची पद्धत वेगळी होती आणि तिचा हा फायदा जरूर होता की त्यात जास्त काळ कार्यरत राहता येत होते. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमक्या याच कारणासाठी अंदमानसारख्या तुरुंगातून सुटण्याची खटपट केली, आणि त्यासाठी ज्या अर्ज-विनंत्या केवळ दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता म्हणून केल्या, त्यांत दोष का दिसावा बरे?


Vividh Vachak

Fri , 27 December 2019

अवधूतजी, कुणाचेही परखड राजकीय मूल्यमापन करायला काहीही हरकत नाही, परंतु ह्या लेखाचा विषय आणि आत्मा हा राजकीय मूल्यमापनाचा आहे, असे आपल्याला सुचवायचे आहे काय? कारण सावरकर आणि त्यांचा माफीनामा ह्यावरचे अलीकडचे कुठलेही संभाषण हे राजकीय मूल्यमापनाच्या हेतूने झालेले दिसत नाही, ते चारित्र्यहनांच्या हेतूनेच केले आहे हे त्या चर्चेच्या सुरावरून कळते. आपल्या मुद्द्यांबद्दलच बोलायचे झाले तर आपण जे मुद्दे मांडले ती आपली मते होती, वस्तुस्थिती नव्हे. असे असूनही, आपले मुद्दे विश्लेषणाच्या वाटेने गेले, मानहानीच्या आणि चारित्र्यहननाच्या नाही, याबद्दल आपले अभिनंदन. आता आपल्या मुद्द्यांकडे वळू. पहिले म्हणजे hindsight is २०/२०, ही इंग्रजी म्हण आपल्याला माहीत असेल. सर्व घटना घडून गेल्यानंतर कुणाचे धोरण बरोबर होते आणि कुणाचे चूक, आणि कुणामुळे स्वातंत्र्य मिळाले (ह्यावरही मतभेद होऊ शकतात पण असो) -- हे मागे वळून पाहून ठरवणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष त्या काळात जे वीर सशस्त्र क्रांती करून लढले आणि ज्यांनी बलिदान केले, त्यांनी नि:संशय देशप्रेमाने प्रेरित होऊन, आणि स्वातंत्र्य मिळवणे या एकाच उद्देशाने लढा दिला आहे. तेव्हा त्यांच्या पद्धती यशस्वी झाल्या नसल्या तरीही त्यांच्या हेतूबद्दल शंका नसावी. दुसरे, आपण जे मत व्यक्त केले की "अंदमानातल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर माफी मागून रत्नागिरीत फारफार तर नजरकैदेत रहाता येते. "प्लान" चा भाग म्हणून त्याची पाठराखणही करता येते. पण त्यानंतर लोक जागृती, जन संघटन, या कार्यात सक्रीय सहभागी होण्यास मर्यादाच येतात आणि ते स्पष्ट दिसून येते. " --- पण अंदमानात कोलू पिसून कणाकणाने झिजून तसेच मरण्यापेक्षा तर जास्त कार्यरत राहता येते ना? आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य करून सावरकरांनी ते करून दाखवले. तिसरे, घटना घडून गेल्यानंतर मागे वळून पाहून त्यावरून जर माणसाची परीक्षा (कार्याचे मूल्यमापन नव्हे) करायची असेल तर मग पुष्कळ लोकांची परीक्षा करता येईल. उदाहरणार्थ, जवाहरलाल यांनी काश्मीरप्रश्नी UN कडे जाऊन वर्षानुवर्षांची डोकेदुखी बनवून ठेवली, आणि त्यांनीही ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, ह्या घटना अगदी सावरकरांवरच्या आरोपांच्या बेमालूम सारख्या वाटतात आणि त्या मूल्यमापनावरून आणि त्यांच्या शपथेवरून असेच रान उठवता येऊ शकते.


Satish Bendigiri.

Fri , 27 December 2019

विविध वाचक आणि लीपरे यांच्या मताशी तंतोतंत सहमत.


Avadhut Raja

Thu , 26 December 2019

१. एकूणात सशस्त्र क्रांतीकारकांची अखेर एक तर फाशी / जन्मठेप यानेच होणार होती यात काही शंका नव्हती. इतिहासात तरी असा मोठा सशस्त्र उठाव "सातत्याने" झाल्याची नोंद नाही. २. त्यामुळे क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या कार्याचे मूल्यमापन एका "वैयक्तिक योगदाना" व्यतिरिक्त फारसे होत नाही. याउलट लोकसंघटना बनवून बलाढ्य सरकारविरुद्ध असहकाराच्या, निशस्त्र मार्गाने (सिव्हिल डिसओबोडीअन्स) लढा देणे, लोकजागृती करून लोकांचा सहभाग वाढवणे, संघटन कौशल्य इ. काँग्रेसच्या चाली निर्विवाद उजव्या ठरल्या. ३. अंदमानातल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर माफी मागून रत्नागिरीत फारफार तर नजरकैदेत रहाता येते. "प्लान" चा भाग म्हणून त्याची पाठराखणही करता येते. पण त्यानंतर लोक जागृती, जन संघटन, या कार्यात सक्रीय सहभागी होण्यास मर्यादाच येतात आणि ते स्पष्ट दिसून येते. ४. हिंदूराष्ट्र ह्या संदिग्ध, सुस्पष्ट दिशेचा अभाव असलेल्या कल्पनेपेक्षा क्राँग्रेस आणि आंबेडकरांच्या आधुनिक भारत घडवण्यासाठी निवडलेल्या सेक्यूलरिझमचा मार्ग नि:संदिग्ध, सुस्पष्ट, आणि उजवा होता. खास करून दलित, स्त्रिया आणि अल्पसंख्य यांच्यासंदर्भात स्पष्ट विचार होते. ५. वैयक्तिक योगदान (स्वातंत्र्य लढ्यातले, साहित्यातले) कुणीच नाकारत नाही त्यापुढे विनम्रपणे नतमस्तकच आहोत. पण त्यामुळे राजकीय मूल्यमापनातले परखड सत्य स्विकारणे जड जावू नये.


Gamma Pailvan

Tue , 24 December 2019

राजीव लिपारे व विविध वाचक यांच्याशी सहमत.
-गामा पैलवान


Rajiv Lipare

Tue , 24 December 2019

कुणाही दिवंगत व्यक्तीचे मूल्यमापन त्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात काय कार्य केले यावरून करायचे असते. त्या व्यक्तीच्या चरित्रातील एखादा भाग सोईनुसार घेऊन त्यावरून नव्हे. राजकीय माफीनामा हा मुत्सद्देगिरीचा भाग असतो. म्हणूनच शिवरायांनी आदिलशाह, औरंगजेब व अफजलखानाला लिहिलेली बरीच पत्रे हे माफ़ीनामेच आहेत. नेहरू व गांधींनीही इंग्रज सरकारशी एकनिष्ठ राहण्याच्या शपथा घेतल्या आहेत. स्वतः राहुल गांधींनी न्यायालयाची 5 वेळा लेखी माफी मागितली आहे. इ. अनेक उदाहरणे देता येतील.


Rajiv Lipare

Tue , 24 December 2019

कुणाही दिवंगत व्यक्तीचे मूल्यमापन त्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात काय कार्य केले यावरून करायचे असते. त्या व्यक्तीच्या चरित्रातील एखादा भाग सोईनुसार घेऊन त्यावरून नव्हे. राजकीय माफीनामा हा मुत्सद्देगिरीचा भाग असतो. म्हणूनच शिवरायांनी आदिलशाह, औरंगजेब व अफजलखानाला लिहिलेली बरीच पत्रे हे माफ़ीनामेच आहेत. नेहरू व गांधींनीही इंग्रज सरकारशी एकनिष्ठ राहण्याच्या शपथा घेतल्या आहेत. स्वतः राहुल गांधींनी न्यायालयाची 5 वेळा लेखी माफी मागितली आहे. इ. अनेक उदाहरणे देता येतील.


Vividh Vachak

Tue , 24 December 2019

यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असाही आहे, की सावरकरांनी हा "माफीनामा" लिहून दिला कारण त्यावेळी सरकारने तुरुंगातून सुटण्याचा तो केवळ एकाच मार्ग ठेवला होता. ह्या अर्जाचा विचार व्हायचा तर त्याचा एक विशिष्ट मसुदा तोही एका विशिष्ट भाषेत आवश्यक होता. तेव्हा माफीनामा या विषयावर एवढे रान उठवायचे कारण नाही. हा घालून दिलेल्या प्रक्रियेचा भाग झाला. हे सर्व पाहून दुःख एकाच गोष्टीचे होते. ज्या वीरांनी केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, हाल अपेष्टांना हसत हसत सामोरे गेले, त्यांचा गैरवापर आपण त्यांचेच उत्तराधिकारी केवळ शुद्ध पोटार्थी भावनेने, राजकारण म्हणून करतो -- ही गोष्ट आपल्या (सगळ्यांच्याच) तमाम पिढीच्या चारित्र्याबद्दल काय संदेश पाठवते बरे?


Vividh Vachak

Tue , 24 December 2019

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संबंधात जेव्हा मराठी पत्रकार असे लेख लिहितात तेव्हा नवल वाटते. यात मराठी असल्याचा वृथा अभिमान अपेक्षित नाही तर त्यांचे "माझी जन्मठेप" हे शुद्ध मराठीतच लिहिलेले आत्मचरित्र बाजारात उपलब्ध आहे, पण ते न वाचता आणि स्वतःची बुद्धी न चालवता दुसऱ्या अडाण्यांनी लिहिलेले मुद्दे वापरून त्यावर असे लेख लिहिणे हा बौद्धिक आळसाचा कळस म्हणावा लागेल. या पुस्तकात स्वतः सावरकरांनी त्यांची कैद, त्यात वाट्याला आलेली निष्क्रियता आणि माफीनाम्याच्या निर्णयापर्यंत आपण कसे आणि का येऊन पोचलो याचे सविस्तर वर्णन केले आहे. खरे तर, ह्या पुस्तकाच्या आधारे मराठी पत्रकारांनी राहुल गांधी आणि इतर काँग्रेसी मूर्खांचे सावरकर या विषयावर प्रबोधन करायचे, पण ते सोडून अल्पबुद्धी भडभुंज्या विचारवंतांनी कुठल्याही ठोस माहितीच्या आधाराविना काढलेले निष्कर्ष नेते बरळतात आणि त्यांचे समर्थन बुद्धीवर झापडे लावून घेऊन आपल्यासारखे पत्रकार हे, केवळ एका पक्षाची भूमिका मांडायची, या भावनेने करतात. ही पत्रकारितेची शोकांतिका म्हणावी लागेल. कोण हे तरुण विजय? कोण हे वेद राही? ह्यांच्याकडून आपण सावरकर "शिकता" आणि त्यांना मराठी भाषेत लिहिलेल्या लेखात उद्धृत करता, यात आपल्याला विरोधाभास दिसत नाही का? हे म्हणजे गावाकडच्या आजीबाईने पंजाबी बाईकडून पिठल्याची रेसिपी घेण्यासारखे आहे. आता आपल्या इतर मुद्द्यांकडे वळू. रणजित सावरकर यांच्या नेहरूंबद्दल केलेल्या विधानावर आपण टीका केलीत, पण यात टीकास्पद काही नाही. मुळात रणजित सावरकर हे राजकारणी नाहीत, पण राहुल गांधी आणि समस्त खानदान राजकारणी आहे, त्यामुळे ज्या मुद्द्यावर आपण एका दुसऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे चारित्र्यहनन करतो आहोत, त्या मुद्द्यावर आपल्या खानदानाचे चारित्र्य धुतल्या तांदळासारखे नाही, हे राहुल गांधींनी लक्षात घ्यायचे. पण ते घेण्याची त्यांना गरज वाटत नाही, किंबहुना श्री रणजित सावरकरांना माहित आहे त्याच्या एक शतांश इतिहास सुद्धा (भारताचा, जगाचा, कुठलाही) -- राहुल गांधींना आणि त्यांच्या मातोश्रींना माहित असेल असे वाटत नाही. त्याची गरजही नाही म्हणा, कारण पंतप्रधानपदाची गादी आपल्या हक्काची आहे, असेच वर्तन त्यांचे असते -- आणि त्यांच्या भोवतीचे चमचे आणि संधीसाधू ते चालू देतात. खरे तर सावरकरांच्या चपला उचलायची पण लायकी आजच्या एकाही तरुण काँग्रेस नेत्यात नाही. तिसरे, सावरकरांबद्दल असलेल्या विवादाला त्यांचेच अनुयायी जबाबदार आहेत हेही खरे नाही. मुळात, सावरकरांबद्दल कुजकट आणि dismissive भाषा वापरायला सुरुवात ही गेल्या दहा वर्षांत झाली आहे, आणि ती तथाकथित पुरोगामी बुद्धिवादी गटातून सुरु झाली. मला आठवते, फेसबुकवर एक कुठल्याश्या मार्क्सवादी बंगल्याने लिहिलेला लेख फिरत होता, आणि त्यात सावरकरांवर सडकून टीका होती, त्याचा एकमेव आधार होता गांधीजींनी त्यांच्याबाबत केलेले एक विधान हा. ह्या अश्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आणि पुरोगामीपणाचा पिवळा ताप चढलेल्या लोकांच्या हातात माध्यमे गेली आहेत हे दुर्दैव. आणि आपणही ज्या "विद्वानांचे" दाखले सावरकरांच्या बाबतीत दिले, त्यापेक्षा सावरकरांच्या उपलब्ध पत्रांतून किंवा आत्मचरित्रातून दिले असते तर जास्त विश्वसनीय ठरले असते. सावरकरांच्या संपूर्ण विचारधारेशी आपण सहमत असाल किंवा नसाल. त्या विचारधारेतल्या बऱ्याच गोष्टी आता कालबाह्य वाटू शकतात (आणि त्या तश्याच अनेकांच्या विचारधारेतल्या आणि आचारातल्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. उदाहरणच द्यायचे तर पुरोगाम्यांच्या काही आराध्य दैवतांनी अवलंबलेली जीवनशैली आज सामान्याला तुरुंगात जायला भाग पाडेल). आजच्या फिल्मी भाषेत सांगायचे तर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा "ग्राफ" हा अत्यंत विस्तृत आहे. टीका करायची तर त्यांच्या तत्त्वांवर होऊ शकते, पण त्यांच्या देशभक्तीलाच नाकारणे यासारखी बौद्धिक प्रतारणा दुसरी नाही. किमान मराठी माणसाला त्यांचे आत्मचरित्र सहज उपलब्ध असतानासुद्धा जर सावरकर समजत नसतील किंवा समजावून घ्यायचे नसतील तर त्याला कुठलेही समर्थन देता येणार नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......