आनंदनगरची बेंजो पार्टी अर्थात शिकणारे बिझनेसमन!
पडघम - बालदिन विशेष
शिल्पा नाईक
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 17 November 2018
  • पडघम बालदिन विशेष बेंजो पार्टी

महानगरपालिका शाळेतील शिक्षिकेची नोकरी म्हणजे अनुभवांची समृद्धता! आणि त्यात बदली म्हणजे नव्या व्यासपीठाची भेट. अशीच बदली होऊन मी सुभाषनगर शाळेत आले. नेहमीप्रमाणे सकाळ अधिवेशन व इयत्ता सातवीची वर्गशिक्षिका. नेहमीप्रमाणे आव्हानं तर होतीच, सर्व शाळेत असणारी काही तीच ती. तर या शाळेतील नवी कोरीही. शाळेत बहुतांश मुलं आनंदनगर वस्तीतून येणारी. काही पटरीच्या पलीकडून तर काही अलीकडून. खूप मोठा पालकवर्ग कचरा गोळा करणाऱ्यांचा. जास्तीत जास्त किमती कचरा वेचता यावा म्हणून पहाटे तीनपासून आई-बाबा दरवाजा लोटून कचरा वेचायला जात. त्यानंतर तो वेचलेला कचरा विकला जावा म्हणून वस्तीतील रद्दीवाल्याकडे लाईन. मुलं शाळेत गेली तर आनंद, नाही गेली तरी आनंदच! सर्व गरजा पोटाभोवती केंद्रित झालेल्या.

अशा नवख्या वातावरणात मी ३२ वर्षांचा माझा शिक्षकी अनुभव घेऊन सातवी एकच्या वर्गात गेले. मुलांशी थोड्या गप्पा मारून हजेरी लावायला घेतली तर अमोल, कृष्णा, अमित, पंढरी, किसन, चंकी अशी जवळ जवळ सहा-सात मुलं गैरहजर होती. तीन-चार मुलीही गैरहजर होत्या. पण त्या गावाहून दोन-तीन दिवसांत येतील अशी माहिती मिळाली. गैरहजर मुलांची चौकशी केली. इतर मुलांबरोबर निरोप पाठवले. मग माझा वर्ग सुरू झाला. पण हे असं कितीतरी दिवस चाललं. मुलांची दररोजची हजेरी घेताना त्या सहा-सात मुलांपुढे ‘गैरहजर’ असं लिहिताना छातीत बारीकशी कळ चमकून जायची. मध्यंतरी मुलांना मी भेटूनही आले. खूप खूप गोड बोलले. ‘उद्यापासून शाळेत या’ म्हणून बजावलेही. पण छे, या मुलांच्या नावापुढचा ‘गैरहजर’ हा शब्द काही जात नव्हता.

मग मुलांच्या मागे माझं सीआयडी खातं लावलं. म्हणजे शाळेतील माझी काही खास मुलं. त्यांच्याकडून कळलं की, सर्व मुलं कुठल्या तरी बेंजो पार्टीत ढोल वाजवायला जातात. गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र अशा सणांत या मुलांना मागणी असते. आणि एका रात्री ढोल वाजवण्याचे २०० ते ३०० रुपये मिळतात. कधी कधी ५०-१०० रुपयांवरही बोळवण केली जाते. पण मुलांच्या मते ‘रोकड हातात मिळते बाई’. मग मजा करतात. ‘१००-२०० रुपयांत मजा ती काय करणार रे?’ असं माझ्या सीआयडी पथकाला विचारलं तर सगळी एकमेकांकडे बघून हसायला लागली. ‘अरे, असे हसता काय? सांगा ना, मजा करतात म्हणजे काय?’

‘बाई, आमचं नाव सांगू नका. रात्री गाडीवर भूर्जी-पाव, चायनीज भेळ, खिमा पाव आणि बाई कधी कधी सिगरेट आणि बियरभी.’

‘बापरे!’ अंगावरून सरकन काटा सरकून गेला. माझी मुलं आणि अशी? हो, आता ती माझीच मुलं होती. ती चाईल्ड लेबर होती, थोडीशी मवाली होती, अधूनमधून एखादं व्यसन करणारी होती, पण ती माझीच मुलं होती. अवेळी आलेल्या प्रौढत्वानं वाकली होती. घर फक्त भोज्या करण्यापुरतं होतं. मोलमजुरीचं छोटं-मोठं काम २०-३० रुपये त्यांना सहज मिळवून देत होतं. पण ती सारीच मायेला पारखी झालेली होती. त्यातील दोघातिघांनी तर दोनदा शाळाही सोडून दिली होती. किशोरावस्था कधीच संपली होती. पौगंडावस्था व प्रौढत्वाकडे त्यांचं वागणं अवेळी झुकू लागलं होतं. ओठावर फुटलेली मिसरुडं त्यांना वर्गात बसू देत नव्हती. पण या साऱ्या निराशेत ती मुलं कष्टाला घाबरत नव्हती. स्वत:च्या जगण्याचा क्रूस स्वत:च्या खांद्यावरून वाहत होती.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

काय करावं? कसं या मुलांच्या जवळ जावं? कसा माझ्याबद्दल विश्वास निर्माण करावा? मायेचा स्पर्श त्यांना कसा जाणवू द्यावा? या विचारानं मी बेचैन होते. वर्गातील रिकामी बाकं मला रोज वाकुल्या दाखवत होती. मी दररोज हरत होते. पण नव्या विचारानं पुन्हा तयारही होत होते. एकदा का वर्गात यायला लागली की, पुढचं माझ्यासाठी सोपं होतं. कारण मला माझी ताकद माहीत होती.

खरंच अशा मुलांसाठी व्यवसाय शिक्षण हवं असा विचार मनात आला आणि तेथून पुढे भराभर विचार धावू लागले. श्रावण महिना नुकताच सुरू होत होता. गणेशोत्सव महिन्यावर आला होता. ‘आपण या मुलांची ‘बेंजो पार्टी’ काढली तर?’ झटकन वीज चमकून गेली. शाळा सुटली आणि मी माझ्या वर्गातील काही मुलांना घेऊन आनंदनगर वस्तीत गेले. अमोल, कृष्णा, अमित मला प्रथम दिसले. मी म्हणाले,

‘अमोल, आपण तुमची एक बेंजो पार्टी काढली तर?’

‘आमची बेंजो पार्टी?’ कृष्णा आश्चर्यानं ओरडलाच.

मी म्हणाले ‘येस, आपली बेंजो पार्टी. तुम्ही सारे जण दुसऱ्याच्या पार्टीत ढोल वाजवायला जाता. त्यांचा जास्त फायदा होतो. तुम्हाला पैसे पण कमी मिळतात. मग आपलीच पार्टी असलीच तर!’

‘हो हो बाई, पण पैसे कोण देणार?’ अमित म्हणाला.

आता आमच्या आजूबाजूला बरीच मुलं जमा झाली होती. मग मी म्हणाले, ‘हे बघा तुम्हाला आयडिया मान्य आहे ना? मग उद्या शाळेत या. आपण वर्गात बोलू. काही प्लॅन तयार करू. उशीर झाला तरी चालेल पण शाळेत या.’

एखादं लॉटरीचं तिकीट हातात यावं तशी सारी फुलली. माझ्यापासून लांब पळणारी मला रिक्षापर्यंत सोडवायला आली. मीही रिक्षात बसले, तीही खूप आनंदूनच.

दुसऱ्या दिवाशी सर्वच्या सर्व आठही जण सकाळी प्रार्थनेला हजर. शाळेतील इतर शिक्षकांच्या नजराही त्यांच्यावर खिळलेल्या. काही म्हणालेही की, ‘नाईकबाई, तुमचे हिरो आज शाळेत हजर.’ खरंच त्या दिवशी कॅटलॉगही हसला. कारण सर्वांच्या नावापुढे ‘हजर’ असे शब्द होते. गैरहजेरीचा शाप आज पुसला गेला होता.

कधी एकदा प्रार्थना परिपाठ होतो असं आम्हा सर्वांना झालं होतं. मग आम्ही प्लॅनिंगला बसलो. मुलं बेंजो पार्टी प्रक्रियेशी परिचित होती. त्यांनी छोटा ढोल, मोठा ढोल, ढोलकी, काठ्या, टीशर्ट, पँट अशा साऱ्या गोष्टींची यादी केली. आम्ही फळ्यावर बजेट बनवलं. सारा खर्च पाच-सहा हजारापर्यंत येत होता. ही सारी साधनं लालबागवरून आणण्याचं ठरलं. मुलांचं व्यवहारज्ञान खूपच चांगलं होतं. कृष्णा सगळ्यात मोठा होता. तो म्हणाला, ‘बाई, आम्ही हार्बर गाडीनं करी रोडला उतरू. तेथून लालबागला चालत जाऊ. दुपारी गाड्यांना गर्दी नसते. तेव्हा आम्ही लोकलनं आमची साधनं आणू.’ ‘ओके. डन.’ मी

‘पण बाई, पैसे?’

‘अरे, पैसे मी देणार. तुमची बेंजो पार्टी चांगली चालली की मला पैसे परत करा. आणि नाही केले तरी चालतील. पण शाळेत मात्र दररोज या.’

मी सहा हजार रुपये काढून पाकिटात घातले. मुलांनी ते पाकिट डोक्याला लावलं व रविवारी लालबागला जाऊन ढोल आणलेसुद्धा. सोमवारी शाळेत हे सर्व साहित्य दाखवायला आणलं. आणि शाळेचे छप्पर उडेपर्यंत वाजवलंसुद्धा.

नंतर पटरीच्या जवळ झाडाच्या सावलीत बेंजो पार्टीची प्रॅक्टिस सुरू झाली. मीही दोनदा वस्तीत जाऊन ती बघून आले. वस्तीमध्ये माझा व माझ्या मुलांचा रुबाब वाढला होता. बघता बघता गणपती आले.

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे वर्गात गेले. माझ्या टेबलवर थोडी फुलं, एक पेढ्याचा बॉक्स व सहा हजार रुपये. माझा विश्वासच बसेना.

‘अरे, तुम्हाला मिळाले का एवढे पैसे? लगेच का परत केलेत?’ मी जरा रागात ओरडलेच.

‘बाई, आम्हाला १० दिवस खूप छोट्या-मोठ्या ऑर्डरी होत्या. आमच्या वस्तीतले गणपतीही आमच्याच बेंजोनं आले. आम्हा सगळ्यांना दोन दोन हजार मिळाले. तुमचे पैसेही आम्ही दिले आणि आम्ही सगळ्यांनी १००० रुपयेही शिल्लक ठेवलेत.’

त्यानंतर मला फुलं देणं, पेढे देणं, वर्गाला पेढे देणं असा सगळा उत्साह होता. मी म्हणाले, ‘१ किलो पेढे तुम्हा सगळे खाणार, त्यापेक्षा हात स्वच्छ धुवा. त्याचे तुकडे करा आणि सगळ्या शाळेला वाटा. आणि सगळ्यांना सांगा, आम्ही शिकणारे बिझनेसमन आहोत!’ ’

तो दिवस सारा आनंदात गेला. ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ किंवा ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ या संतकाव्याची साक्षात प्रचिती मला आली. आणि हो, या एका छोट्या उपक्रमामुळे चाईल्ड लेबर, गैरहजर, मवाली इत्यादी सारी दूषणं पुसली गेली. आणि जीवनाच्या प्रवाहात शिक्षणाची संगत घेऊन माझी मुलं पोहायला शिकू लागली…

.............................................................................................................................................

लेखिका शिल्पा नाईक या माध्यमिक शाळेच्या शिक्षिका आहेत.

bmssmumbai@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 18 November 2018

एकदम सही! -गा.पै.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......