शबरीमाला : ज्या दिवशी स्त्रिया देवधानी सोडतील, त्या दिवशी ठेकेदारांचा बाजार उठेल! 
पडघम - देशकारण
नितिन भरत वाघ
  • शबरीमाला मंदिर आणि निदर्शक
  • Mon , 05 November 2018
  • पडघम देशकारण शबरीमाला Sabarimala

शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्या निकालाविरोधात काही जुनाट विचारांच्या संस्था आणि विचारधारा पुढे आल्या. शिवाय झुंडीच्या बळावर तो निकाल जवळपास हाणून पाडल्यासारखाच आहे. हे भारताचं एकविसाव्या शतकातलं डिजिटल युगातलं चित्र आहे. भारतासमोर आजच्या घडीला बेरोजगारी, रुपयाचे ढासळते मूल्य, देशाची होणारी दुरावस्था, महागाई, पेट्रोलच्या जळत्या किमती, लोकशाहीच्या सर्व मूल्यांवर संविधानिक पद्धतीने केले जाणरे हल्ले, या सगळ्या प्रश्नांपेक्षा जास्त महत्त्वाचे प्रश्न कोणते वाटतायत? तर मंदिरांचे प्रश्न!

एका सर्व्हेनुसार भारतात दर सात किलोमीटरच्या परिघात कमीत कमी एक मंदिर आहे. गेल्या चार वर्षांत हा परीघ अजून कमी झाला असेल. कारण अनेक नव्या मंदिरांचं जोरात काम सुरू आहे. तरी अजून मंदिरं हवीच आहेत, असू दे काही म्हणणं नाही, जसे नवनवे मॉल, मल्टिप्लेक्स गावागावात उभी राहतात, त्याचप्रमाणे ‘मंदिरं’ म्हणवली जाणारी मल्टिप्लेक्स नव्यानं, उभी राहिली तरी हरकत नाही, मंदिरं ही भक्तीची ‘बिझनेस हब’च आहेत. असं म्हणताना लोकांच्या भावना आणि श्रद्धा यांचा पूर्ण आदर मनात आहे, फक्त मंदिराच्या अनुषंगानं येणारे व्यवसाय याबद्दल बोलायचं आहे. मात्र त्या मंदिरांच्या आधारे प्रत्येक भारतीय जगण्याची गोष्ट धर्माला जोडून जो वर्चस्ववादाचा अजेंडा राबवला जातो, त्याला विरोध आहे. स्त्रियांना एखाद्या मंदिरात प्रवेश देणं न देणं हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो का आणि असला तर का व कसा असावा?  

ही गोष्ट तर नक्कीच आहे की, भारतात बहुतांशी स्त्रियाच सर्व तऱ्हेच्या बऱ्यावाईट परंपरेच्या मुख्य वाहक आहेत. धर्मव्यवस्था, जातीव्यवस्था, पुरुषसत्ताक पद्धती स्त्रिया रूढी-परंपरांच्या नावानं पिढी दर पिढी जोपासत असतात आणि त्यात अधिकची भर टाकून आपल्या मुलींना, सुनांना वगैरे सोपवत असतात. यात जर काही स्त्रिया सुधारणा करायला, बदल घडवायला निघाल्या, तर पुन्हा स्त्रियाच त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध करतात. हे आताच घडलेल्या शबरीमालाच्या प्रकरणावरून दिसून आलं आहे.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

शबरीमालाच्या इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार ‘शबरीमाला’ मंदिरावर बौद्ध परंपरांचा प्रभाव आहे. ‘अयप्पा’ या स्थानिक देवतेचा प्रभाव लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर पुढे जाऊन त्याचं रूपांतर वैदिक देवतेत केलं गेलं. शबरीमाला मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं दिली जारी शिकवण किंवा ज्ञान. ते आहे ‘त्तत्त्वंमसी’ (तूच आहेस तो) म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वत:च देव (स्वरूप) असतो. आता प्रत्येक व्यक्ती देव असते या धारणेच्या पार्श्वभूमीवर शबरीमालात स्त्रियांना होणारा विरोध बघितला तर त्या मंदिराच्या मूळ ज्ञानालाच नाकारण्याचा विरोधाभास दिसून येतो. स्त्रियांच्या मासिक शरीरधर्मामुळे त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही, असं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे, मग याच कारणावरून भारतातल्या काय जगातल्या सगळ्याच मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाकारला पाहिजे. जेव्हा केवळ स्त्रियांच्या शरीरधर्माचाच (किंवा विज्ञानाच्या भाषेत शरीराचा)  विचार केला जातो, तेव्हा त्यांच्या मनाचा विचार केला जात नाही असाच याचा अर्थ होतो. केवळ मासिक धर्मावरून स्त्रियांवर बंधन लादणं म्हणजे स्त्रियांच्या भक्तीवर, श्रद्धेवर, आस्थेवर अविश्वास दाखवणं आणि त्यांचा अपमान करणं आहे.

ढोबळमानानं वर्गीकरण केल्यास हिंदू समाजात दोन प्रकारच्या स्त्रिया असतात : १) देवभोळ्या पारंपरिक, धार्मिक आणि २) आधुनिक, तर्कवादी, विज्ञानवादी. म्हणजे सत्यवानाच्या सावित्रीला मानणाऱ्या आणि दुसऱ्या ज्योतीराव फुल्यांच्या सावित्रीला मानणाऱ्या, फार सोप्या भाषेत देव मानणाऱ्या आणि देव न मानणाऱ्या. भारतात पहिल्या प्रकारच्या धार्मिक स्त्रिया जवळपास ९५ टक्के (कदाचित जास्त असतील) आहेत असं गृहित धरू, तर आधुनिक विचारांच्या स्त्रिया चार ते पाच टक्के. या दोन्ही प्रकारच्या स्त्रियांचा एखाद्या मंदिर प्रवेशाबाबतचा विचार काय असू शकतो, त्या शक्यतांचा समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या करता येईल.

प्रथम देव मानणाऱ्या स्त्रियांचा विचार करू. ज्या स्त्रिया देव मानणाऱ्या, धार्मिक कर्मकांड, पूजाअर्चा करणाऱ्या असतात; त्या अत्यंत पापभिरू, सोवळं-ओवळं पाळणाऱ्या, पवित्र-अपवित्र मानणाऱ्या असतात. देवधानीबाबतचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळतात. मासिक धर्माच्या काळात मंदिरात जाऊन दर्शन घेणं किंवा पूजा करणं ही अत्यंत दूरची गोष्ट आहे, त्या दिवसांत स्त्रिया स्वत:च्या घरातदेखील अगरबत्ती लावणं वा दिवाबत्तीसुद्धा करत नाहीत. इतकं स्पष्ट वास्तव आहे. यासाठी कोणत्याही देवधानी करणाऱ्या स्त्रीला विचारलं तरी ती साक्ष देऊ शकते. देवाचं करताना श्रद्धा आणि भक्ती हा भाग असतोच त्यात मनात असणाऱ्या प्रचंड भीतीचाही भाग असतो.

मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर ‘देवाचं’ सोवळं बाटवणं हा विचारही बायका मनात आणू शकत नाही, तेव्हा मंदिरात जाणं वगैरे अशक्यच. श्रद्धा आणि भीती या मूलभूत प्रेरणा स्त्रियांना सातत्यानं रोखत असतात. हे सर्व सत्य घराघरात दिसत असताना, स्त्रियांविषयी असा अपविचार का केला जातो की स्त्रिया मासिक धर्माच्या काळात मंदिरात जातील? या उलट जर गोष्ट हिंदू धर्माबद्दल असेल तर याच हिंदू धर्मात असे अनेक तांत्रिक पंथ आणि धार्मिक निष्ठा आहेत त्यात स्त्रियांच्या मासिक धर्मातल्या रक्ताला अत्यंत पवित्र समजलं जातं, त्याचं काय करायचं? (जिज्ञासूंनी ‘चंडमहारोशन तंत्र’ नावाचा ग्रंथ प्राप्त करून खात्री करून घ्यावी).

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/ya2ydx3u

.............................................................................................................................................

आता दुसऱ्या वर्गातल्या पाच टक्के आधुनिक आणि विज्ञानवादी स्त्रियांचा विचार करू. विज्ञानवादी स्त्रिया साधारणपणे देवधर्म न मानणाऱ्या, तर्ककठोर विचार करणाऱ्या आणि कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या असतात असं समजू. तेव्हा त्या मंदिरात जातीलच असं फारसं संभवत नाही. कुतूहलापोटी किंवा कुणाला सोबत म्हणून गेल्या तर गोष्ट वेगळी. कारण काहीही असलं तरी विज्ञानवादी स्त्रियासुद्धा ‘त्या’ काळात मंदिरात जायचं शंभर टक्के टाळतच असतील. त्याचं मुख्य कारण विज्ञानवादी नास्तिकतादेखील बहुतांशी भीतीच्या काठावरच लोंबकळत असते आणि, ‘खरंच देव असला तर?’ ही भीती. दुसरं कारण, त्या स्त्रियांचा नैतिक विवेक, जो त्यांना मासिक धर्माच्या काळात मंदिरात जाण्यासाठी रोखतच असेल. म्हणजे जवळपास शंभर टक्के हिंदू स्त्रिया शबरीमालाच काय, पण कोणत्याही मंदिरात स्वत:हूनच जात नाहीत. हे खरं नाही का? बरं हे जे विरोध करतात त्यांना कळत नसेल का? तर मग स्त्रियांना रोखण्याचं विरोधाचं कारण काय?

खरं तर स्त्रियांनीच आता आधुनिक पद्धतीचा एल्गार केला पाहिजे. जोवर शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही मंदिरात आम्ही जाणारच नाही, अशी प्रतिज्ञा करायला करायला हवी. मग बघू किती दिवस मंदिरात प्रवेश देण्याचं टाळतात. कोणत्याही मंदिरात स्त्रियांना येऊ  न देणं हा सगळ्या भाविक स्त्रियांच्या श्रद्धेचा, त्यांच्या आस्थेचा आणि विश्वासाचा घनघोर अपमान आहे. यासाठी थोड्या वेगळ्या प्रकारची ‘गांधीगीरी’ स्त्रियांनी करायला हवी. अविवेकानं लढण्याचा तोच एक विवेकी मार्ग आहे. एक गोष्ट निश्चित आहे, ज्या दिवशी स्त्रिया देवधानी करायचं सोडून देतील, त्या दिवशी सगळ्या धर्मातील, धार्मिक ठेकेदारांचा बाजार उठेल.  

.............................................................................................................................................

लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.

nitinbharatwagh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Alka Gadgil

Mon , 05 November 2018

उरलेल्या 5 टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या काळात देवळात जाण्याचं टाळतील कारण त्यांच्या मनात भीती असेल हा समज चुकीचा आहे. They will go- because of 'we feeling' - being part of a group and for many other reasons, to appreciate architecture, to understand historical nuances or to get insight into the legends associated with the deity, other women may not enter any temple even during non period days


Alka Gadgil

Mon , 05 November 2018

उरलेल्या 5 टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या काळात देवळात जाण्याचं टाळतील कारण त्यांच्या मनात भीती असेल हा समज चुकीचा आहे. They will go- because of 'we feeling' - being part of a group and for many other reasons, to appreciate architecture, to understand historical nuances or to get insight into the legends associated with the deity, other women may not enter any temple even during non period days


ADITYA KORDE

Mon , 05 November 2018

ह्या विषयावर एकूणच स्त्रिया कमी लिहितात ... पण लेख चांगला आहे


Sanjay Pawar

Mon , 05 November 2018

उत्तम लेख....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......