मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे
पडघम - राज्यकारण
शरद पवार
  • शरद पवार आणि मराठा आंदोलनाचे एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 13 August 2018
  • पडघम राज्यकारण शरद पवार Sharad Pawar मराठा समाज Maratha Community आरक्षण आंदोलन Maratha Reservation मराठा क्रांती मोर्चा Maratha Kranti Morcha

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी शनिवारी म्हणजे ११ ऑगस्ट रोजी प्रसिद्धीसाठी दिलेले निवेदन.

.............................................................................................................................................

मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने, तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजेत. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा व बहुजनांचा पाठिंबा व सदिच्छा प्राप्त झाल्या. त्याला धक्का लागेल असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे.

येथे हे नमूद करणे आवश्यक आहे की, राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. मराठा समाजाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे. त्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळू पडू नये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून हे आंदोलन केले जात आहे, त्या आदर्शांना धक्का लागेल असे आचरण आपल्या हातून घडणार नाही याचीही खबरदारी आंदोलनकर्त्यांनी पाहिजे. हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे सुरुवातीला शांततामय मार्गाने आंदोलन झाल्याबद्दल निर्माण झालेली समाजातील सदिच्छा गमावणे, हे चांगले लक्षण नाही, हे मी विशेषत्वाने नमूद करू इच्छितो.

गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेने शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात केलेल्या पाहणीत मराठा समाजाबद्दलची विदारक स्थिती मांडण्यात आली आहे. कुटुंबाच्या विस्तारानुसार जमिनीचे लहान लहान तुकडे पडत गेल्याने शेती किफायतशीर राहिली नाही. यातून आलेल्या आर्थिक हलाखीमुळे पुरेसे शिक्षण नाही व नोकऱ्याही नाहीत, अशा दुष्टचक्रात तरुण सापडला आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास दारुण वस्तुस्थितीची माहिती होईल. मराठा समाजातील भूमिहीनांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे २८ टक्के आहे. काठावरचे किंवा अत्यल्पभूधारक (०.१ ते २.५) ५३ टक्के आहेत. त्याचप्रमाणे या साठ टक्के जमिनींना हमखास पाणीपुरवठा नाही. यातून ही समस्या चिघळत गेलेली आहे. आत्महत्यांचे प्रमाण ४६ टक्के आहे, हे पूर्वी समोर आलेलेच आहे. वर्षानुवर्षाच्या या वंचनेमुळे मराठा समाजात व विशेषत: युवकांच्या मनात राग साठणे नैसर्गिक असले तरी जाळपोळ, दगडफेक करणे किंवा आत्महत्या करणे हा मार्ग नक्कीच नाही.

एखादे आंदोलन सुरू केल्यानंतर कोठे थांबावे याचा विचार करायचा असतो. हा विचार केल्याबद्दल अभिनंदन. या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या तीव्र भावना देशासमोर आल्या आहेत. या मागणीच्या पूर्ततेच्या संदर्भात काही वैधानिक प्रक्रियेची आवश्यकता आहे. यासाठी उचित वेळ आवश्यक आहे. त्यापुढे आरक्षणाच्या अमलबजावणी संदर्भात लागणारा वेळ, राज्यशासन आणि विधिमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी शांतता हवी आहे, तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोहचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योग धंद्यातील गुंतवणूक थांबेल व बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल. म्हणूनच मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

.............................................................................................................................................

लेखक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

kamil shaikh kamil shaikh

Wed , 15 August 2018

shaikh


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......