मीडिया काय आणि मोदी काय, दोघांनीही जशोदाबेनकडे पाठ फिरवली आहे!
पडघम - देशकारण
कुमार केतकर
  • जशोदाबेन
  • Mon , 19 February 2018
  • पडघम देशकारण जशोदाबेन Jashodaben नरेंद्र मोदी Narendra Modi

अलीकडच्या काळात जिथं वैयक्तिक ते सगळंच राजकीय बनलं आहे आणि जे जे खासगी ते सारं काही सार्वजनिक बनत चाललं आहे, तिथं प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षिलेली किंवा फार गाजावाजा न केलेली एक गोष्ट चर्चेसाठी समोर मांडणं अनाठायी ठरू नये. ती गोष्ट म्हणजे एरवी नेहरू-गांधी घराण्याशी संबंधित कुठच्याही बातमीला, अगदी अफवांनाही घेऊन भयंकर गहजब माजवणारा इथला अतिउत्साही सोशल मीडिया आपले सर्वशक्तीमान, तारणहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्याबाबत मात्र संपूर्ण मौन बाळगून आहे.

गेल्याच आठवड्यात जशोदाबेन एका जीवघेण्या अपघातातून बचावल्या. पण वर्तमानपत्रांत इथंतिथं छापून आलेल्या चार-दोन ओळी वगळता या घटनेची फारशी दखल घ्यावी असं प्रसिद्धीमाध्यमांना वाटलं नाही. खरं तर यांचं लग्न झालेलं आहे, हेच बहुतेक लोकांना माहीत नाही. मोदी हे संघाचे पूर्णवेळ, अविवाहित स्वयंसेवक आहेत असंच मिथक स्वत: मोदी आणि त्यांचे ब्रह्मचर्य पाळणारे आरएसएसमधले सहकारी यांनी राखलं. २०१२ सालापर्यंत अगदी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांतही मोदींनी आपला वैवाहिक दर्जा कधीही जाहीर केला नाही. २०१२ सालानंतर पंतप्रधानपद मिळण्याची आशा त्यांच्या मनी आकार घेऊ तेव्हाही 'विवाहित' या एका शब्दापलीकडे आपल्या वैवाहिक आयुष्याचे तपशील त्यांनी कधीच जाहीर होऊ दिले नाहीत.

मोदींच्या पत्नी कोण याचा छडा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांना बळेबळे दूर हाकललं गेलं. एका दिल्लीस्थित साप्ताहिकानं त्या जिथं शिक्षिकेचं काम करतात असं म्हटलं जात होतं, त्या गावाचा माग काढत जशोदाबेनचा ठावठिकाणा शोधला होता. पण या साप्ताहिकाच्या प्रतिनिधी त्या गावातून बाहेर पडत असताना त्यांच्याजवळचा कॅमेरा काढून घेण्यात आला आणि गावात पुन्हा पाऊल न टाकण्याची धमकीही देण्यात आली. तेव्हापासून कुणीही जशोदाबेनची मुलाखत घेण्याचं किंवा त्यांची छायाचित्रं घेण्याचं, किंवा कोणत्याही प्रकारे या महिलेचं व्यक्तिचित्रण प्रसिद्ध करण्याचं धाडस केलेलं नाही.

जशोदाबेन तीन वर्षांपूर्वी मुंबईत आल्या होत्या. इथल्या सुप्रसिद्ध आझाद मैदानावर त्यांनी धरणं धरलं होतं. पंतप्रधानांची पत्नी असूनही आपण असुरक्षित आहोत असं गाऱ्हाणं सांगणारा प्रसिद्धीफलक त्यांच्या हातात होता. पण काही तासांतच पोलिसांनी त्यांना मैदानातून हुसकावून लावलं, जसं काही त्या एखादा प्रचंड मोर्चाच घेऊन आल्या होत्या.

हे घडत असताना तिथं काही वार्ताहर हजर होते, एका चॅनलची कॅमेरा टीमही होती. पण एकाही चॅनलनं त्यांच्या निदर्शनांची क्षणचित्रं दाखवली नाहीत, साक्षात पंतप्रधानांची पत्नी आपल्या असुरक्षित जगण्याच्या विरोधात तक्रार करत आहे, या गोष्टीचा साधा स्क्रोलही कोणत्याही चॅनलवर दिसला नाही. एका वृत्तपत्रानं थोडंसं धाडस दाखवलं आणि त्यांच्या मुंबईभेटीची व निदर्शनाची बातमी अगदी आतल्या पानांत तळाशी छापली. पण त्यातही पोलिसांना त्यांना आझाद मैदानातून हुसकावून लावलं याचा एका शब्दानंही उल्लेख नव्हता. का नव्हता? कसली भीती वाटत होती चॅनेल्स आणि वर्तमानपत्रांना? आपल्यावर बंडखोरी, राजद्रोह नाहीतर हेरगिरीचा आरोप होईल याची? स्वत:ला स्वातंत्र्याचा कैवार घेऊन भांडणारे लढवय्ये समजणारी मंडळी, अर्णब गोस्मावी (हे तेव्हा ‘टाइम्स नाऊ’मध्ये होते!) आणि त्यांच्यासारखेच कंठशोष करत सत्याची बाजू मांडणारे वृत्तनिवेदक तेव्हा कुठे गेले होते? आणि कुठे होते सगळे धाडसी पत्रकार?

त्याच सुमारास एका गुजराती वृत्तपत्रानं जशोदाबेनची एक मुलाखत छापण्याची हिंमत दाखवली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, कुणीतरी 'सुरक्षा रक्षक' सतत आपल्या मागून येत असतात, पण त्यांना आपल्या सुरक्षेची कोणती काळजी असल्याचं दिसत नाही. या मुलाखतीत त्यांनी असंही म्हटलं होतं की, शारीरिक इजा पोहोचवली जाण्याची भीती आपल्याला वाटते. (त्यांना झालेला अपघात खरोखरच 'नैसर्गिक दुर्घटना' होती का?) त्यांना पासपोर्टही नाकारून त्यांचं अस्तित्वच अमान्य केलं जातंय आणि तेही त्यांच्याकडे लग्ननोंदणीचं प्रमाणपत्र नाही या कारणावरून! त्या घटस्फोटिता नाहीत. (हिंदू पद्धतीनंही नाही) त्या अपंग नाहीत, अंथरुणाला खिळलेल्या नाहीत तरीही मोदींच्या शपथग्रहण सोहळ्यालासुद्धा त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही. त्यांचे पती कैकवेळा गुजरात भेटीवर येतात, पण ते त्यांना कधीच भेटत नाहीत की इतर कुणाला त्यांना भेटण्याची 'परवानगी' नाही.

आता या जागी काही विरोधी शक्यतांचा विचार करून पाहू आणि मीडियानं या गोष्टींना कसं हाताळलं असतं याची कल्पना करून बघू. समजा राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना सोनिया यांना सोडून दिलं असतं किंवा सोनियांचं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालं असतं, किंवा रॉबर्ट वड्रा यांनी प्रियांका यांना घराबाहेर काढलं असतं किंवा प्रियांका त्यांच्या लग्नातून बाहेर पडल्या असत्या. राहुल अविवाहित आहेत (हे एक नशिबच!) पण ते झालेलं असतं आणि त्यांनी आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष झालं असतं किंवा हिंदूचं मानचिन्ह बनून बसलेल्या आपल्या विद्यमान पंतप्रधानांप्रमाणांप्रमाणे तिला सोडूनच दिलं असतं! मग वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांनी कित्येक दिवस या बातमीचा पाठपुरावा केला असता. नेहरू-गांधी घराण्याला थोर आणि दिव्य हिंदू परंपरेची माहिती नाही का? लग्नगाठी कशा पवित्र आणि स्वर्गातच बांधलेल्या असतात, कितीही झालं तरी एका ख्रिश्चन आईला आमचे उच्च हिंदू संस्कार आत्मसात करता करणं कसं अशक्यच आहे, यावर कित्येक दिवस चर्चा रंगल्या असत्या. मूळात नेहरूच कसे स्त्रीलंपट होते आणि त्यांची मुलगी कशी स्वैराचारी होती यावरही वाद झडले असते.

नेहरू-गांधी कुटुंबातल्या व्यक्तींना, अगदी आज हयात नसलेल्या व्यक्तींनाही दूषणं देत राहणं योग्य आहे, पण नरेंद्र मोदींबद्दलच्या ढळढळीत सत्यांबाबत मात्र कसलेही सवाल करू नका. नेहरू, इंदिरा, राजीव हे सतत पत्रकार परिषदा घ्यायचे. मोदी 'फिक्स्ड' मुलाखती देतात नाहीतर, दर महिन्याला 'मन की बात' करतात, पण ते एकदाही प्रसिद्धीमाध्यमांना सामोरे गेलेले नाहीत. पूर्वनियोजित जाहीर सभांमध्ये ते भाषणं जरूर देतात, पण त्यावेळी अगदी आपल्या मंत्रीमंडळातीलही कुणा व्यक्तीला ते मंचावर असू देत नाहीत. भारतात किंवा परदेशात कुठेही, मिळेल, त्या मंचावरून ते कंठाळी सूरांत बोलत, अथक वल्गना करत राहतात, दामटून खोटं बोलत राहतात. खोटे ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भ पेरत राहतात, पण त्यांच्या या अज्ञानीपणाला कुणी प्रश्न विचारणार नाही, सत्याचा अपलाप करणाऱ्या त्यांच्या विधानांचा प्रतिवाद करणार नाही आणि ते मात्र बेधडकपणे आपले मुद्दे तुमच्या माथी मारत राहणार. काहीही झालं तरीही ते मीडिया आणि लोकांना सतत निवडणुकीच्याच पवित्र्यात ठेवतील. कारण मीडियानं आपलं धाडस गमावलं आहे आणि लोकांनी आपला उत्साह, हे त्यांना पक्कं कळून चुकलं आहे.

जशोदाबेन यांचा दुर्दैवी भोग खरं तर सारा देशच भोगत आहे. कुणी त्यांची दखल घेत नाही, कुणी त्यांच्याशी बोलत नाही, कुणी त्यांची काळजी करत नाही आणि त्या सतत असुरक्षिततेमध्ये जगत आहेत. ‘इंदिरा म्हणजे इंडिया’ असं समीकरण नव्हतंच कधी, पण जशोदा म्हणजे ‘इंडिया’ हे मात्र आजघडीचं सत्य आहे!

मराठी अनुवाद - चैताली भोगले

.............................................................................................................................................

केतकरांचा हा मूळ इंग्रजी लेख hwnews.in या पोर्टलवर १२ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ इंग्रजी लेखाची लिंक -

.............................................................................................................................................

लेखक कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत.

tusharmhatre1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Girrish K

Mon , 19 February 2018

अरे कुम्मार !! तू पण पत्रकारांचं आहेस ना ? म्हणजे मिडियाच ...मग तू जाऊन घेना त्यांची मुलाखत आणि यूट्यूबवर टाक...की तू पण घाबरतोस रे ? तुझा मायबाप RAGA तुला आर्थिक मदत करेल गुजरातला जायची.जा आणि घे मुलाखत...उगाच बाकिच्या मिडीयाला दोष नको देउ.... आणि हो 'आपण तेवढे सज्जन आणि बाकीचे ते बदमाश' हि केज्रूची स्ट्रॅटेजी तू वापरू नको. तू संपादक वगैरे होतास तेव्हा तुझ्या पेपरात खांग्रेसविरूद्धच्या बातम्या तू दडपून टाकायचास असे म्हणले जाते रे....मग आता का आरडाओरडा करतो तू इतरांविरूद्ध......


Alka Gadgil

Mon , 19 February 2018

Nehrunchya aslelya naslelya prakanabaddal shindalki hot rahate, pan parityakta Jasoda ben baddal shabdahi kadhyacha nahi ashi dahashat ahe


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......