‘ॲन्टेक्वेरियन बुकसेलर्स असोसिएशन ऑफ अमेरिका’चं ६३वं पुस्तक प्रदर्शन पाहताना ग्रंथवेडाला ‘जंटल मॅडनेस’ नव्हे, तर ‘रॉयल मॅडनेस’ म्हटलं पाहिजे, असं तीव्रतेनं वाटलं!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
रवींद्र कुलकर्णी
  • ‘ॲन्टेक्वेरियन बुकसेलर्स असोसिएशन ऑफ अमेरिका’च्या ६३व्या पुस्तक प्रदर्शनाचं एक पोस्टर
  • Fri , 26 May 2023
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो ॲन्टेक्वेरियन बुकसेलर्स असोसिएशन ऑफ अमेरिका the Antiquarian Booksellers' Association of America ॲन्टेक्वेरियन पुस्तक प्रदर्शन Antiquarian Book Fair

‘The God does not play dice’ (‘देव जुगार खेळत नाही’) हे आईन्स्टाईनचं वाक्य. सृष्टीतल्या मूलकणांच्या वागण्याला काही नियम असले पाहिजेत, ही त्याची भूमिका आणि आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने अनेक वर्षं केलेली धडपड... त्या संदर्भात त्याने नील्स भोरबरोबर घातलेला जाहीर वाद, त्यात त्याला आलेलं अपयश याबद्दल पूर्वीच वाचलेलं होतं. तेव्हापासून हे वाक्य एखाद्या ब्रह्मवाक्यासारखे मानत रुतून बसलं होतं. यातून आईन्स्टाईनची भूमिका नेमक्या शब्दांत व्यक्त होते.

या स्वत:च्याच वाक्यावर आईन्स्टाईनचं प्रेम असावं, कारण ते त्याने अनेक प्रकारे वेगवेगळ्या वेळी उच्चारलं आहे, हा शोध मला ‘ॲन्टेक्वेरियन बुकसेलर्स असोसिएशन ऑफ अमेरिका’चं न्यू यॉर्कमध्ये भरलेलं ६३वं पुस्तक प्रदर्शन (२७-३० एप्रिल २०२३) पाहताना लागला. या पत्रात त्याने ते वाक्य परत उच्चारलं आहे. “माझी भूमिका आता इतकी जुनी व आडमुठी आहे की, आजही माझा यावर विश्वास नाही की, देव जुगार खेळतो.”

कुणा रिइचे (Mr Reiche) नावाच्या व्यक्तीला लिहिलेलं हे पत्र आईन्स्टाईनच्याच हस्ताक्षरात आहे. मधल्या काचेला ओलांडून मला त्या पत्राला हात लावण्याची इच्छा होती, पण शक्य झालं नाही. अर्थात हे पत्र कोणीही विकत घेऊ शकतो, किंमत २,८००००$ फक्त!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हे प्रदर्शन पाहताना, मुख्य म्हणजे साधारण गेल्या १२०० वर्षांचा जगाच्या छापील इतिहासात डोकावताना भिरभिरायला होतं. त्यात केवळ दर्शनासाठीच नाही, तर विकण्यासाठी ठेवलेली रेखाटनं, छायाचित्रं, साहित्य, राजकारण, कला या क्षेत्रांतल्या नामवंतांची पत्रं व हस्ताक्षरं, हस्तलिखितं, नकाशे, चित्र-पुस्तकं, सोनेरी वर्खानं सजवलेली पुस्तकं, या साऱ्याचा अर्थपूर्ण मागोवा उपलब्ध चारपाच तासांत घेणं, माझ्यासाठी अक्षरक्ष: आणि शब्दश: दमवणारं होतं.

प्रदर्शनातील १२० स्टॉल्सपैकी बहुतेक इंग्लंड व अमेरिका या देशातल्या दुर्मीळ पुस्तक विक्रेत्यांचे होते. नाही म्हणायला फ्रान्स, स्पेन व इटलीतील काही फर्म्सदेखील आहेत. यातल्या काही पुस्तक विक्रेत्यांची दुकानं पाहण्यासाठी आधी वेळ ठरवावी लागते. या प्रदर्शनात सारे आपणाहून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडच्या दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह एकत्र पाहायला मिळणं ही पर्वणी होती.

सोफिया रेअर बुक्सचे दालन. डेन्मार्कची फर्म. केप्लर, न्यूटन यांची १७व्या-१८व्या शतकातील पुस्तके

माझ्या आवडीच्या विषयांपैकी सांगायचं तर ‘सोफिया रेअर बुक्स’ या डेन्मार्कच्या फर्मच्या संग्रहाचा क्रमांक युरोपातल्या जुन्या पुस्तक विक्रेत्यांच्या पहिल्या काही नावांत घ्यावा लागेल. जोहान्स केप्लरच्या ‘Nova stereometria doliorum vinariorum’ या १६१५ सालच्या पुस्तकाची प्रत त्यांच्याकडे आहे. त्यात केप्लरने वेगवेगळ्या आकाराच्या त्रिमितीय वस्तूंचे आकारमान काढण्याच्या पद्धतीचा विचार करताना, त्या वस्तू अनंत भागांत विभागून त्यांच्या मोजमापाचा विचार केला आहे. या पद्धतीला पुढे न्यूटनने शोधलेल्या ‘कॅल्क्युलस’चा पिता म्हणायला हरकत नाही, असं ‘सोफिया रेअर बुक्स’चं म्हणणं होतं.

त्याच्या जवळ जाणारं व आपल्याला माहीत असलेलं शालेय पातळीवरचं गणित म्हणजे ‘वर्तुळाचे क्षेत्रफळ’. भारतीयांना ही पद्धत माहीत होती. पण खरी गंमत पुढे आहे. हे पुस्तक १६१५ सालच्या फ्रँकफर्टच्या पुस्तक प्रदर्शनात उपलब्ध होते. १७०४ सालचा न्यूटनचा प्रकाशावरील ‘ऑप्टिक्स’ हा ग्रंथही येथे ठेवला आहे. त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तींना याच्या मोजक्या प्रती भेट दिल्या होत्या. त्यातल्या सहा प्रतींपैकी ही एक आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अशा प्रकारच्या प्रदर्शनात केवळ ‘पुस्तक प्रदर्शन’ म्हणून डोकावणे धाडसाचे ठरावे. काळाचे भान व विविध विषयांचे एकमेकाशी असलेले संबंध, याची जाणीव आपल्याला हवी. उदाहरणार्थ प्रवासवर्णने, नकाशे व पशुपक्ष्यांची चित्रे असलेले ‘बर्डस ऑफ अमेरिका’ हे जॉन अदुबओन सर्ख्याचं पुस्तक व स्थलांतरितांचं जीवन उलगडणारी एखादी कादंबरी, यांचं एकमेकांशी असलेलं नातं आपल्या मनात तयार व्हायला लागतं.

‘अमेरिकना’ या शीर्षकाखाली ‘अमेरिकेचा इतिहासा’चा वेगळा विभाग जवळपास सर्व दुर्मीळ पुस्तकं विक्रेत्यांनी ठेवला होता. अमेरिकेचे जुने नकाशे, पेंटिंग्स, रेखाचित्रं यांची त्यात रेलचेल होती. त्यावरून आपल्याला स्थलांतरितांना हा नवीन भूभाग त्या वेळेला कसा दिसला, त्या वेळचं जनजीवन कसं होतं, याचा अंदाज येतो.

बी मार्शल यांच्या स्टॉलवर १६३१ साली डचांनी काढलेला आफ्रिकेचा नकाशा हा बऱ्याच प्रमाणात बरोबर होता, पण त्याच्या अंतर्भागात काही काल्पनिक डोंगर व नद्या दाखवण्यात आल्या आहेत. हा गैरसमज १९व्या शतकापर्यंत कायम होता. एका विषयाने दुसऱ्या विषयाची खुमारी आणखी वाढते, हे यावरून लक्षात येतं.

हे प्रदर्शन पाहताना आपल्याला माहीत असलेल्या महनीय व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्याच पैलूवर प्रकाश पडतो. बेन्जामिन फ्रँक्लीन कुणाला माहीत नाही? त्याने छापखाना मालक, वैज्ञानिक, राज्यकर्ता, राजदूत व गुणी नवरा अशा सामान्य माणसाला परस्परविरोधी वाटणाऱ्या अनेक भूमिका यशस्वीरित्या पार पडल्या. अशा कर्तृत्ववान माणसाला एकेकाळी त्याच्या बायकोने, डेबोरा रीडने रस्त्यातून पाव खात जात असताना पाहिलं होतं. त्याला पोहण्याची आवड होती. त्यावर त्याचं काही लेखनही आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज घेताना एकावेळी दोन्ही पाय वापरू नका, असं त्याने म्हटलं आहे. फ्रँक्लीनच्या पोहण्यावरच्या लिखाणाचा शोध मला या प्रदर्शनात फ्रेंच भाषेतील पुस्तक पाहिल्यावरच लागला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘Swimming’ हे फ्रेंच भाषेतलं पोहण्यावरील १७८२ सालचं पहिलं पुस्तक काचेच्या पेटीत उलगडून ठेवलं होतं. त्याचा उपयोग बेन्जामिन फ्रँकलिनने पोहण्यावरील लिखाणासाठी केला असल्याचा दावा या पुस्तकाबरोबर ठेवण्यात आलेल्या नोटमध्ये करण्यात आला होता. त्यात पोहण्याशी संबंधित ३५ चित्रं होती.

भारतात जे अमेरिकन कवी माहीत आहेत, त्यात व्हॉल्ट व्हिटमनचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. ‘Song of the open Road’ (मुक्त मार्गाचं गीत) लिहिणाऱ्या या कवीने मुक्त मार्गाला- ‘तू माझ्या कवितेहूनही प्रिय आहेस’ असं म्हटलं आहे. मला या प्रदर्शनात त्याचं १८८८ सालचं लहानसेसं पत्र पाहायला मिळालं. त्यात तो त्याच्याकडील ‘Leaves of Grass’ व ‘Two Rivulets’ हे दोन कवितासंग्रह विकण्याचा प्रयत्न करत आहे. पुस्तकं चांगल्या अवस्थेत आहेत व अर्ध कातडी बाईंडिंगची आहेत. किमतीत एक तृतीयांश सूटही दिली आहे, असंही त्याने त्यात नमूद केलं आहे.

दुर्मीळ कागदपत्रं व पुस्तकं विकणाऱ्या फर्म्सना त्यांच्याकडचा संपूर्ण साठा प्रदर्शनात जागेअभावी लावता आला नाही. त्यामुळे त्यांनी मोजकाच खजिना ठेवला होता. पण त्यांच्याकडे अजून काय काय आहे, हे सांगणारे कॅटलॉग्स ठेवले होते. ते मोफत असल्याने आपण कितीही घेऊ शकतो. नंतर ते निवांत पाहता येतात आणि आपल्या आवडीच्या विषयांचा त्यात शोध घेता येतो, ही जाणकार आणि शौकिन यांच्यासाठी मोठीच उपलब्धी होती.

सॉमरसेट मॉमची ‘मून्स अँड सिक्स पेन्स’ ही गाजलेली कादंबरी ज्या पॉल गोगँ या चित्रकारावर बेतलेली आहे. त्याची व्यथा मी उचललेल्या एका कॅटलॉगमध्ये वाचायला मिळाली. त्याचे मूळ पत्र मात्र प्रदर्शनात नव्हते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘Autographs des Siecles’ म्हणजे ‘शतकांच्या स्वाक्षऱ्या’ हे नाव असलेली लिओन येथली फ्रेंच फर्म. तिचा विशेष म्हणजे गेल्या शतकाला ज्यांनी आकार दिला, अशा महनीय व्यक्तींची स्वाक्षऱ्या केलेली लिखित पत्रं, चित्रं व छायाचित्रं गोळा करणं व विकणं. त्यात पॉल गोगँचं लहानसं अस्वस्थ करणारं पत्र आहे. त्यात त्याने आपल्या डॅनियल नावाच्या मित्राला तीन पेंटिंगस पाठवून ती विकण्याची विनंती केली आहे आणि १५०० फ्रँक्स पाठवायला सांगितले आहेत. शेवटी म्हटलंय, “असं म्हणता यावं की, संपूर्ण आयुष्यभर मी अपयशी ठरलो, पडलो, परत उठलो वगैरे, पण आता माझ्या साऱ्या शक्ती मला सोडू जात आहेत.”

१९०३च्या एप्रिल महिन्यातलं पत्र आहे. नेमका दिवस त्यावर नाही. कदाचित पॉल गोगँलाच त्या दिवसाची नेमकी तारीख माहीत नसावी, इतक्या विपन्न अवस्थेला तो पोहचला होता. हे पत्र पाठवल्यानंतर तो थोड्याच दिवसांनी, म्हणजे ८ मे १९०३ रोजी गेला.

कॅटलॉग पाहिल्यावर लक्षात आलं की, ‘Autographs des Siecles’कडच्या एकाही पत्राची किंमत ४०००च्या खाली नव्हती. अशा पत्रांची किंमत खरोखर किती करावी? हा प्रश्न प्रश्न अशी पत्रं गोळा करणारी फर्म्सना भेडसावतो. खूप प्रयत्नाने व पैसे खर्च करून ते ही पत्रं गोळा करतात व गिऱ्हाइकं मिळेपर्यंत सांभाळतात.

मराठीत ह. वि. मोट्यांनी ‘विश्रब्ध शारदा’च्या तीन खंडांत अशा पत्रांचा उपयोग करून महाराष्ट्राचं सांस्कृतिक चित्र उभं करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यात मूळ पत्रांचं नंतर काय झालं? कुणाला पैसे मोजून ती आपल्या जवळ ठेवावीशी वाटली का? आणि स्वत: पैसे मोजल्याशिवाय त्यांची काळजी कोण कशाला घेईल? असो, अशी तुलना कदाचित गैरच मानली जाईल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या प्रदर्शनात शेक्सपिअर नाही, हे कसं शक्य आहे? लंडनच्या ‘पिटर हरिंगटन’ फर्मचा स्टॉल मोजक्या मोठ्या स्टॉलपैकी. शेक्सपिअर सर्व कालासाठी आहे, असं उच्चरवानं सांगत त्यांनी त्यांच्याकडच्या १६२३ साली छापल्या गेलेल्या, पहिल्यावहिल्या संपूर्ण शेक्सपिअरची जाहिरात केली होती.

शेक्सपिअर जिवंत असतानाच त्याची १८ नाटकं छापली गेली होती. १६१६ साली तो गेल्यावर त्याची पहिली १८ नाटकं आणि नंतरची १८ नाटकं एकाच पुस्तकात आली पाहिजेत, अशी धडपड त्याच्या मित्रांनी सुरू केली. त्याच्या सर्व नाटकांचे हक्क किंग्स मेन या नाटक कंपनीकडे होते. त्यांच्याशी बोलणी करून शेक्सपिअरची ३६ नाटकं पहिल्या प्रथम १६२३ साली एकत्र प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे नंतरची १८ नाटकं पहिल्यांदाच छापील स्वरूपात आली होती.

पिटर हरिंगटन फर्मचं म्हणणं होतं की, हा समग्र शेक्सपिअर जर त्याच वेळी छापला गेला नसता, तर त्याची उरलेली १८ नाटकं हरवून गेली असती. त्यात ‘मॅक्बेथ’, ‘ज्युलियस सीझर’ व ‘टेम्पटेस्ट’ ही शेक्सपिअरची तीन महत्त्वाची नाटकं होती. या पुस्तकाच्या अंदाजे ७५० प्रती छापल्या गेल्या असाव्यात. त्यातल्या आज फक्त २३५ प्रती शिल्लक आहेत. त्यातल्या ७ न्यू यॉर्कच्या पब्लिक लायब्ररीत आहेत.

पिटर हरिंगटनने एक प्रत कुठून तरी मिळवली. या वर्षी त्या आवृत्तीला ४०० वर्षं होत असल्यानं त्यांनी त्यावर जोर देत या कातडी बांधणीतल्या संपूर्ण शेक्सपिअरची किंमत ७,५००,०००$ एवढी ठेवली होती.

God does not play dice' आईनस्टाईनचे पत्र. किंमत २८००००$, अडल्स हक्सलेने जे. कृष्णमूर्ती यांना भेट दिलेलं स्वत:चं पुस्तक आणि केप्लरचे ३ मितीय वस्तूंचं त्यांचं विभाजन करून आकारमान काढण्यासंबंधीचं पुस्तक. १६१५. फ्रँकफर्टच्या १६१५ सालच्या पुस्तक प्रदर्शनात हे उपलब्ध होतं

या प्रदर्शनात न्यू यॉर्कच्या पब्लिक लायब्ररीत १८१८ साली छापला गेलेला संपूर्ण शेक्सपिअरही होता. त्याच्या पहिल्या पानावर १५९० ते १६२०च्या दशकापर्यंत ज्या नटांनी त्याच्या नाटकात कामं केली, त्यातल्या २६ नटांची नावं दिलेली मी आदल्या दिवशीच पाहिली होती. ती मात्र या यात नव्हती. पिटर हरिंगटनकडे १६४० साली छापल्या गेलेल्या शेक्स्पिअरच्या कवितांचाही संग्रह होता. शेक्सपिअरशिवाय इथं ऑस्कर वाइल्ड, एव्हलियान वॉ यांसारख्या अनेकांची पुस्तकं आपापली वैशिष्ट्यं घेऊन होती.

पुस्तकप्रेमी लोकांचं पहिल्या आवृत्तीचं वेड लक्षात घेऊन काही विक्रेत्यांनी आपल्याकडच्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या मांडून ठेवल्या होत्या. ही पुस्तकं आज बाजारात ज्या किमतीला मिळतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त किंमत या विक्रेत्यांनी लावलेली होती. पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्यांच्या शोधत फिरणाऱ्या लोकांना जॉर्ज ऑर्वेलने ‘मूर्ख’ म्हटलं आहे. पण त्याच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याही पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या ऑर्वेलप्रेमी जमवतातच.

सर्वांत देखणी पुस्तकं म्हणजे चामड्यावर लिहून नक्षीकाम केलेली. युरोपात कागद पोहचायच्या आधी लिहिली गेलेली आणि प्रत्येक पानावर मजकुराच्या बाजूने सोनेरी वर्खाने नक्षी काढलेली. ही चामड्यावर लिहिली गेलेली पुस्तकं बाळगणं श्रीमंतांचंच काम होतं. नक्षीकामामुळे या पुस्तकांची किंमत खूप असे. त्यात बहुतेकदा धार्मिक मजकूर असे. ‘द बुक ऑफ अवर्स’ हे त्यापैकीच पुस्तक. ते डौलात एका स्टँडवर विराजमान होतं. ७ सप्टेंबर १५०८ रोजी ते लिहून आणि त्यावरचं नक्षीकाम फ्लोरेन्सच्या वर्कशॉपमध्ये पूर्ण करून झालं. काल्कागिनी कुटुंबासाठी ते बनवण्यात आलं होतं. त्यावरच्या नक्षीकामाचं प्रमाण खुद्द ‘Lives of the Artists’ लिहिणाऱ्या जिओर्जिओ वसारीने दिलं आहे. हे १९९ पानांचं पुस्तक ९० मिमी x ५५ मिमि या आकाराचं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कागद व छापण्याचं तंत्र आल्यानंतर आणि युरोपातल्या वैचारिक पुरुत्थानाने वेग घेतल्यानंतर, हे धार्मिक पुस्तकांमधलं नक्षीकाम वगैरे उद्योग मागे पडले आणि मजकुराला महत्त्व आलं. पुस्तकाचं बाइंडिंग ही महत्त्वाची कला होती. हे तंत्र सांगणारी पुस्तकं उदयाला आली. त्यावरील काही विक्रेत्यांकडे गेल्या शतकातील पुस्तकं पहायला मिळाली.

हे सारं प्रदर्शन युरोपकेंद्रित होतं. भारतीय सोडाच, पण एकाही आशियाई देशाचं इथं दालन नव्हतं. भारत आणि इराक या देशांना हस्तलिखितांची समृद्ध परंपरा आहे, हे इथं बहुधा कोणाच्या गावीही नाही. लॅटिन व इतर युरोपियन भाषांबरोबर जगात इतरही भाषा आहेत, याचंही भान दिसलं नाही, निदान मला तरी. मात्र ‘शापेरो रेअर बुक्स’च्या शोकेसमध्ये एक भारतीय नाव दिसलं. अॅल्डस हक्सलेने ‘ग्रे एमिनन्स’ हे आपलं पुस्तक जे. कृष्णमूर्ती यांना भेट दिलं होतं, ते या प्रदर्शनात पाहायला मिळालं.

‘बुक क्रेडल’मध्ये ठेवून पुस्तके दाखवण्याची पद्धत

या प्रदर्शनाचा सारा थाट अगदी राजेशाही होता. पुस्तकं दाखवण्यासाठी ‘बुक क्रेडल्स’ होती. दाखवण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये एक राजेशाही आदब होती. जणू काही हिरे-माणकांची खरेदी चालू आहे. ज्ञानाविषयीचं, पुस्तकांविषयीचं प्रेम त्यातून लखलखीतपणे प्रतिबिंबित होत होतं.

ग्रंथप्रेमींच्या ग्रंथसंग्रह करण्याच्या नादाला निकोलस बॅसबेन्स या पत्रकाराने ‘जंटल मॅडनेस’ म्हटलं आहे. हे प्रदर्शन पाहिल्यावर त्यात थोडा बदल करून या नादाला ‘रॉयल मॅडनेस’ असं म्हटलं पाहिजे, असं वाटलं.

.................................................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......