‘तत्पूर्वी’ या काव्यसंग्रहातून सुटत चाललेला ‘काल’, छळणारा ‘आज’ आणि अनिश्चित ‘उद्या’ भेटत राहतो…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जीवन तळेगावकर
  • ‘तत्पूर्वी’ या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 09 October 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो दासू वैद्य Dasoo Vaidya तत्पूर्वी Tatpurvi

‘कविता’ हा एकेकाळी मराठी प्रकाशकांनी डोक्यावर घेतलेला साहित्यप्रकार आता अक्षरशः त्यांनी अडगळीत टाकला आहे; कारण तिथेच त्यांना दिसत राहते प्रथितयश कवींच्या देखील प्रकाशित पुस्तकांची न खपलेली, साचलेली थप्पी.

अजून हिंदी कवितांवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत, आपल्या ‘राष्ट्रभाषे’तील (एकदा ही अधिकृत घोषणा झालीच पाहिजे!) नवीन कवींनादेखील प्रकाशक मिळतात; पण १२ कोटी मराठी लोक या जगाच्या पाठीवर असताना, ‘मराठी कविता’ या साहित्यप्रकाराला मात्र प्रकाशकरूपी वाली उरला नाही, हे वास्तव आहे. अशा वातावरणात कदाचित ज्यांच्या कवितांना अजून प्रकाशक आहेत, अशा अगदी निवडक मराठी कवींमध्ये दासू वैद्य हे नाव अग्रस्थान पटकावून आहे, हे निर्विवाद.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कवीला लिहिता येऊन उपयोगाचे नाही, त्याला मंचावरून व्यक्तदेखील होता आले पाहिजे, हा कदाचित या रचनाप्रकाराला वाचकांपर्यंत पोचवण्याचा हिंदी कवींचा ‘राजमार्ग’ मराठीत पुसट झाल्यामुळे ‘कविता’ या रचना प्रकाराला मराठीत ‘हे’ दिवस आले असावेत. याचे दुसरे कारण समाज-माध्यमं हेदेखील आहेच. 

समाज-माध्यमांनी म्हणजे ‘फेसबुक’, ‘व्हाट्सअप’, ‘ब्लॉग्ज’ किंवा ‘यु-ट्यूब’ वगैरेंनी कविता व इतर स्फुटलेखन कागदाच्या भेंडोळ्यातून मुक्त करून रचनाकारांपासून विना-अडसर वाचकांपर्यंत पोचवले. त्यामुळे प्रकाशकांसारख्या ‘मध्यस्थां’ची भूमिकाच संपुष्टात आली. प्रकाशन व्यवसायाच्या नव्या ‘डिजिटल मूल्य शृंखले’त मध्यस्थांना जागा उरली नाही. याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम झाले; सकस साहित्यासोबत हिणकसदेखीलबिनदिक्कत वाचकांपर्यंत पोचू लागलं.

पण व्यक्त होणाऱ्यांचा, रचनाकारांचा मूळ मुद्दा ‘सकस का हिणकस?’ हा कधीच नव्हता; कारण जे काही होते, ती त्यांची अभिव्यक्ती होती; आणि ती त्या त्या रचनाकाराला प्राणप्रिय होती, असते. मुद्दा हा की, काय चांगले किंवा वाईट, हे ठरवणारे अडते कोण? आणि त्यांचं ‘नाही’ ऐकण्यासाठी तीन-तीन वर्षे वाट का पाहायची? त्यामुळे ही नवी प्लॅटफॉर्म्स मिळताच नवोदित लेखकांनी ॲरिस्टॉटलने मांडलेल्या ‘कॅथार्सिस’च्या सिद्धान्ताप्रमाणे आपापल्या भावनात्मक विरेचनाच्या जागा शोधल्या.

मग अशा या नवयुगाला शोभणाऱ्या निर्भयपणातून मराठी कविता घडत गेली. ज्या काही निवडक कवींनी तरुणांची नाडी ओळखली, त्याचा हुंकार आपल्याला दासू वैद्य यांच्या कवितेत आढळतो. ‘घाबरलेला उजेड’ ही पहिलीच कविता निर्भयतेची साक्ष देते. ‘अस्तित्वात नसलेल्या नंबरसाठी’ या कवितेत एका शेतकऱ्याचं जिणं, ‘छटाक साखरेला महाग, शंभर एक्कराचा सम्राट’ एवढ्याच ओळीत सांगून होतं किंवा एखाद्या गजबजलेल्या यात्रेतील वाढत्या संख्येमागील सत्य ‘घरातून हद्दपार मायबापांनी, वाढवली शोभा दिंडीची’ या वाक्यात सामावून जातं.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

‘कविता’ हा रचना प्रकार अगदी कमी शब्दांत भावना पोचवून जातो. होतं काय, कविता अतिशय ‘स्वान्त सुखाय’ लिहिला गेलेला अगदी कवीच्या कातडीला चिकटलेला अनुभव वाटतो वाचकाला. ज्या कवीला हा अनुभव स्वतःच्या कातडीएवढाच वाचकाच्या कातडीला चिकटवता येतो, तेव्हा त्याची कविता आत्मनिष्ठेतून समाजनिष्ठ अशी उत्क्रांत झालेली असते. मला हे दासू वैद्यांचं खरं शक्तीस्थान वाटतं.        

आपल्या भोवतीचे जग आणि प्रेरणा बदलत आहेत, अजून बदलत जातील, कदाचित बदल हेच नवं स्थैर्य आहे, याची जाणीव असलेली त्यांची कविता आहे, बदलातून आत्मभान जागवणारी. सामान्य माणसाचं आजच्या शतकातील मध्यमवर्गी व मध्यममार्गी जगणं उजागर करणारी, वाचकाला आपल्याच जाणिवेचे प्रतिबिंब वाटावे अशी कविता ते लिहितात.       

‘जनहितार्थ’ ही कविता माणसाचे परिस्थितीवशात किंवा परिस्थितीवर स्वार होणारे निलाजरे जगणे उजागर करते. त्यातून केवळ त्याचा टिकण्याचा अट्टाहास दिसतो, टिकवण्याचा नाही. ‘फाटक्या माणसाच्या झोळीत, बुद्धिवंतांच्या चर्चेत’ जिथे कुठे ही टोचणारी जाणीव अजून शिल्लक आहे त्यांनाच तर वाहिला आहे हा काव्यसंग्रह – ‘दगडाखाली ओल शिल्लक ठेवणाऱ्यांसाठी...’

जिजीविषा दर्शवणारी ‘सिताफळी’ ही कविता असली तरी त्यात घरधन्यानं झाड तोडून टाकलं ते, ‘चार फळं गेली ते ठीक, पण झोपडपट्टीतले पोरं, कंपाऊंडवर चढतात म्हणजे काय’ या असहाय्य जाणिवेतून. हा समाजमनात घट्ट रुतलेला ताण अगदी सहज व्यक्त झाला आहे.

‘हे अभागी दिवस’ यात पाण्यापाठी गावागावांतून होणारी लोकांची फरफट अस्वस्थ करते, तेव्हा ‘शिकारी मागं पाळणारा, नंगा माणूसच आवृत्त होतोय, टँकरमागं पाळणाऱ्या माणसाच्या निमित्तानं’ किंवा पुढच्याच कवितेत ‘त्या आहेत पारोशा’, असे शब्द उमटतात. 

माणूस कसा उपभोक्तावादाचा बळी ठरला या आशयाची, ‘शॉपिंग’ आणि ‘मी एक ग्लोबल’, ही कविता.  कशासाठी काय, हे उपहासात्मक शैलीत सांगताना येणारी ‘नवा पाठ’ या कवितेतील ‘आत्महत्येसाठी शेतकरी’ ही ओळ अस्वस्थ करते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

त्यांच्या कवितेत विविध रूपांतील स्त्री भेटते ‘बारव’मध्ये, ‘पण एकाही झऱ्याच्या स्मरणात नाही बाईची गोष्ट’ अशी विस्मृतीत जाणारी बाई होऊन; तर ‘मार्गदर्शक तत्त्वाचे थांबे’ या कवितेत ‘अजून त्यानं पाय चेपल्याशिवाय मला झोप लागत नाही’ म्हणणारी आई होऊन. ‘मात्र कुणालाच दिसत नाही मला शिवलेला मुलगी मोठा झाल्याचा कावळा’, अशा भावना व्यक्त करणाऱ्या बापाच्या अंतःकरणातील मुलगी होऊन; तर कधी गंगाबाईंच्या शब्दांतून ‘त्या पोरीचा जाळभाज सुरू झालाय बाबा’, असे बिनचेहऱ्याचे प्रतिमात्मक सामान्य रूप घेऊन. ‘स्त्रीसूक्त’ तर आजचं वास्तव दाखवतं, ‘पायातली उमेद काढून घेतली आणि त्याने तिला घेऊन दिलं एक चार चाकी वाहन.’        

याच संग्रहात ‘तुकाराम’सारखी अप्रतिम रचनादेखील येते. संत तुकारामांवर चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित जो नवा मराठी चित्रपट आला आणि गाजला, त्याची अप्रतिम गीतं दासू वैद्य यांनी लिहिली. त्यात इंद्रायणीत अभंगाच्या वह्या वाहताना काळजाचा ठाव घेणारी सूरांची लकेर, याच कवितेतील शब्दांतून ऊर्जा घेते, ‘जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम’.   

कधी ‘ढासळलेल्या भिंतीतून’सारखी विकास झाला पण ज्याच्यासाठी तो केला गेला तो ‘सामान्य माणूस’ अजून हलाकीत कसा?, असा प्रश्न उभा करणारी रचना येते. तसेच ‘इतिहासाच्या बेंबीतून उगवलेलं शहर’ यात भारताच्या राजधानीची ठिकाणांसकट वैशिष्ट्यं दिसतात, तेव्हा सर्वसमावेशक भावनांच्या उत्कट प्रकटीकरणाचं आश्चर्य वाटतं. 

प्रकाशाच्या जगतातदेखील काळोखाचा छोटा अंतर्विरोध असू शकतो, हे दर्शवणारी ‘काळोखाची आळी’, ही कविता असो किंवा ‘अंघोळ’ यावर भरपूर लिहावं एवढा अनुभवगर्भ त्यात आहे- ‘असं दिवसेंदिवस कातडीला काय चिकटत जातं, जे निघत नाही साबणानं... पण पुन्हा पारोसं पारोसं…’ हा दाह मागे ठेवणारी. तसेच ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंगणातून’, यातील शब्द क्लेशदायी प्रसंगांतदेखील उपचारमात्र ठरणाऱ्या राजकीय भेटींवर आणि न लपणाऱ्या दंभावर सणसणीत चपराक आहेत.    

मारुती चितमपल्ली या अरण्यरऋषीचा प्रवाहाविरुद्धचा लढा दर्शवणारी ‘अरण्य’ ही चरित्रात्मक कविता, ‘मातीनं माखलेल्या कपाळावर पुन्हा एकदा गुलाल लावता येतो का हो?’, असा प्रश्न विचारते. तसेच, पांडुरंग सांगवीकर ही एक ‘कोसला’ या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा, ती आपल्याला आवडली आहे, हे दाखवणारी ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ ही पाऊल ठशांचा मागोवा घेणारी कविता येते.  

स्वतःच्याच चौकोनी जगात मस्त असता आपण; नातेबंध, लोकबंध सैल होत असलेला हा काळ अनुभवत असतो; तेव्हा अचानक आपल्या नश्वरतेची जाणीव गडद होते, जेव्हा आपला एखादा समवयस्क सरणावर चढून जातो. त्याच्या मागे उरलेल्या उपाधींत आपल्याला आपल्याच मागे उरलेला आपला परिवार दिसू लागतो; अशी हेलावून टाकणारी ‘समवयस्काच्या दारासमोर’ ही रचना ‘आता तरी जागा हो’ सांगत असते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माणसाची व्यवधानं एवढी वाढत चालली आहेत की, एखाद्याला थोडं थांबून आपल्याच छंदाला कुरवाळावं वाटलं तरी; तोपर्यंत काहीतरी हातून सुटून जातंय, आपण मागे पडतोय, याचा छल कुठेतरी त्याच्या अंतर्मनात होत राहतो. परिणामी, त्याच्या जीवाचा विसावा, अशा छंदाला वेळ देणंदेखील जमत नाही, हीच खंत ‘कित्येक दिवसांत, मी लिहिली नाही कविता’, अशा शब्दांतून व्यक्त होते.

दासू वैद्य यांच्या या संग्रहातील कवितांमधून सुटत चाललेला ‘काल’, छळणारा ‘आज’ आणि अनिश्चित ‘उद्या’ भेटत राहतो अन् ते त्याच्याच मानसाचं प्रतिबिंब ठरत जातं.   

‘तत्पूर्वी’ - दासू वैद्य

पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

मूल्य - १७५ रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......