गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझच्या (आणि त्याच्या पत्नीच्या) अखेरच्या दिवसांतल्या काही ‘गुप्त कप्प्यां’तल्या आठवणींचं पुस्तक…
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
विकास पालवे
  • डावीकडे गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ पत्नी मर्सेडिजसह, उजवीकडे ‘A Farewell to Gabo and Mercedes’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 27 September 2021
  • ग्रंथनामा दखलपात्र गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ Gabriel García Márquez मर्सेडिज गार्सिया Mercedes García अ फेअरवेल टू गाबो अँड मर्सेडिज A Farewell to Gabo and Mercedes रॉड्रिगो गार्सिया Rodrigo Garcia

काही लेखकांची एखादी साहित्यकृती अशी असते की, जिच्या प्रभावाखाली पुढील अनेक पिढ्यांमधले लेखक आपलं लेखन करत राहतात. गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ या लॅटिन अमेरिकेतील लेखकाची ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ ही त्यापैकीच एक कादंबरी. तिच्या सावलीतच पुढे लॅटीन अमेरिकन लेखकांनी अनेक उत्तम कथा-कादंबऱ्या लिहिल्या, असं तिथल्या समीक्षकांचं म्हणणं आहे. या कादंबरीसाठी मार्क्वेझला १९८२ साली नोबेल पारितोषिक मिळालं.

या कादंबरीविषयी आणि त्याच्या आयुष्याविषयी आजवर विविध माध्यमांत भरभरून लिहिलं-बोललं गेलं आहे. त्याची लेखनावरील अविचल निष्ठा, डावीकडे झुकलेली राजकीय भूमिका, एकाच वेळी वर्तमानपत्रांसाठी लिहिणं आणि कथात्म साहित्याच्या निर्मितीतही व्यग्र असणं, यांविषयी बऱ्यापैकी संदर्भ उपलब्ध आहेत. तरीही त्याच्याविषयी आणखी जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांची उत्सुकता कमी होताना दिसत नाही. अशा चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे मार्क्वेझच्या मुलाने - रॉड्रिगो गार्सिया - लिहिलेलं ‘A Farewell to Gabo and Mercedes’ हे छोटेखानी आठवणींचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. रॉड्रिगो सिनेमा-दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्माता म्हणून कार्यरत आहेत आणि अमेरिकेत राहतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या पुस्तकात मार्क्वेझ (मृत्यू - २०१४) आणि त्याची पत्नी मर्सेडिज (मृत्यू - २०२०) यांच्या मृत्यूच्या आधीचा काही काळ विविध प्रसंगांतून उभा केला आहे. खुद्द मुलानेच या आठवणी लिहिलेल्या असल्यामुळे त्या आत्मीय आणि हृद्य झाल्या आहेत. मुख्यतः या आठवणी शेवटच्या दिवसांतील असल्या तरी प्रसंगोपात्त लेखक आधीच्या वर्षांतील काही महत्त्वपूर्ण घटनांची, मार्क्वेझ व मर्सेडिज यांच्याशी झालेल्या संवादांचीही नोंद करतो. पुस्तकाच्या अखेरीस अनेक छायाचित्रं दिलेली आहेत. मार्क्वेझचा जीवनपट आणि त्याच्या साहित्याची सूचीही दिलेली आहे. या पुस्तकाची पाच भागांत विभागणी केली आहे. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला मार्क्वेझच्या कादंबऱ्यांमधील त्या त्या भागातील विवेचनाशी समकक्ष ठरतील, अशी अवतरणं दिलेली आहेत.

मृत्यूच्या काही वर्षं आधी मार्क्वेझ स्मृतिभ्रंशाच्या विळख्यात सापडला. आपल्या जवळच्या व्यक्तीची नावंदेखील त्याला आठवत नसत. त्यामुळे काही वेळा त्याच्याकडून आदळआपट होई. पण घरातील साऱ्या व्यक्ती त्याला सांभाळून घेत. त्याची एखाद्या लहान मुलाप्रमाणे काळजी घेत. ‘सगळे जण माझ्याशी मी लहान मूल असल्याप्रमाणे वागतात आणि त्यांचं तसं वागणं मलाही आवडतंय’ असं तो गमतीनं म्हणत असे. हा त्याचा गमतीशीर स्वभाव शेवटपर्यंत कायम होता. तो कधीही स्वतःची छापील पुस्तकं वाचत नसे. पण या आजारपणाच्या काळात मात्र त्याने स्वतःची पुस्तकं वाचायला घेतली, तर त्याचं त्यालाच आश्चर्य वाटू लागलं. तो म्हणत असे- ‘हे सगळं कुठून आलं?’ काही वेळा तो पुस्तक वाचून मिटायचा आणि मलपृष्ठावरील स्वतःच्याच छायाचित्राकडे अनिश्चित, काहीशा परक्या नजरेनं पाहायचा. आणि मग पुन्हा पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करायचा. ‘आठवणी या माझ्या लेखनासाठी कच्चा माल आहेत, माझी हत्यारं आहेत. मी त्यांच्याशिवाय काम करू शकत नाही. माझी मदत करा’, अशा तो कुटुंबीयांना विनवण्या करायचा.

या पुस्तकातील असे काही प्रसंग फारच करुण आहेत. रॉड्रिगोने मार्क्वेझसोबत एका पटकथेवर काम करायला सुरुवात केली होती. पण मार्क्वेझच्या सततच्या विस्मरणांमुळे प्रत्येक वेळी त्या संवादांचं रूपांतर हताश मनोवस्थेत होत असे.

रॉड्रिगो लहान होता, तेव्हाची एक आठवण आहे. मार्क्वेझ रोज सकाळी ९ ते दुपारी २.३०पर्यंत लेखन करत असे. त्याची खोली सिगारेटच्या धुरांनी भरून जात असे. कधी कधी लहानग्या रॉड्रिगो आणि त्याच्या भावाला काहीतरी निरोप देऊन त्यांची आई मार्क्वेझच्या खोलीत पाठवत असे. ते दोघं निरोप सांगत असत. मार्क्वेझ त्यांच्याकडे तेवढ्यापुरतं पाहत असे, बोलत काहीच नसे आणि पुन्हा आपल्या लेखनात बुडून जात असे. रॉड्रिगोने लिहिलंय की, ‘इतक्या एकाग्रपणे जर कोणी काम करत असेल, तर फारच थोड्या बाबी असतील, ज्या साध्य करता येणार नाहीत.’ मार्क्वेझचं देहभान हरपून लेखन करत असलेलं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

काही प्रसंगांतून मार्क्वेझचा अंधश्रद्धाळू, स्पष्टवक्ता स्वभाव यांचीही प्रचीती येते. त्याच्या मुलाचं लग्न झालं, तेव्हा रिसेप्शननंतर एक छोटंसं वादळ आलं, ते मार्क्वेझला शुभसूचक वाटलं. कारण त्यामुळे जीवनात आनंद निर्माण होतो, असा एक समज त्याच्या संस्कृतीत प्रचलित आहे आणि त्यावर त्याची श्रद्धा होती, असं दिसतं.

त्याचा साठावा वाढदिवस झाला, तेव्हा त्याने फक्त आपल्या समकालीन मित्रांनाच निमंत्रित केलं. त्याचे तरुण मित्र काहीसे नाराज झाले. मार्क्वेझने असं केलं, कारण त्याचं तेव्हाचं घर लहान होतं. त्यामुळे जेवढे लोक घरात मावू शकतील, तेवढ्यांनाच त्याला निमंत्रित करणं भाग होतं. त्याने हेच कारण अतिशय स्पष्ट शब्दांत आपल्या तरुण मित्रांनाही सांगितलं.

मार्क्वेझने १९५५ ते ५७च्या दरम्यान काही काळ पत्रकारितेच्या कामानिमित्तानं पॅरिसमध्ये व्यतीत केला. त्या वेळच्या ओढगस्तीच्या दिवसांच्या रॉड्रिगोने सांगितलेल्या आठवणी आतड्याला पीळ पाडणाऱ्या आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मार्क्वेझला नंतरच्या काळात त्याच्या देशात एखाद्या सेलिब्रेटीसारखा दर्जा प्राप्त झाला. वाचकांचं अपरिमित प्रेम लाभलं. जेव्हा त्याला इस्पितळात भरती केलं होतं, तेव्हा तिथल्या नर्स आणि सहायक कर्मचारी वर्ग निव्वळ त्याला पाहता यावं म्हणून त्याच्या खोलीबाहेर काम नसतानाही चकरा मारत असे. जर त्याच्याशी बोलायची संधी मिळाली, तर आपल्या मित्रमंडळींना बोलावून त्याच्यासोबत छायाचित्रं काढून घेई. जेव्हा त्याला घरी सोडलं, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलमधील बेड भाड्यानं घेतला. हे त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळालं की, तेव्हा त्यांनी ‘मार्क्वेझसाठी बेड देण्याची संधी आम्हाला मिळणं हा आम्ही आमचा सन्मान आहे असं समजतो’ असं म्हणत त्याच्या कुटुंबीयांकडून पैसे घेण्याचं नाकारलं.

लोकांचं हे प्रेम मार्क्वेझच्या मृत्यूनंतरही दिसून आलं. त्याच्या अंत्ययात्रेला विविध क्षेत्रांतील नामवंत जसे हजर होते, तसेच त्याच्या लेखनाचे हजारो चाहतेदेखील उपस्थित होते. मार्क्वेझने एका मुलाखतीत म्हटलंय- ‘माझ्या हातात असतं तर मी स्वतःच्या अंत्ययात्रेला केवळ माझी बायको, मुलं यांनीच उपस्थित राहावं आणि अंतिम संस्कार करून सगळं संपवून टाकावं असं काहीतरी केलं असतं. यापेक्षा अधिक काही नको. पण मला माहीत आहे असं होणार नाही. राष्ट्राध्यक्ष, पोप, न्यायाधीश असे सगळेच लोक येतील आणि मोठी अंत्ययात्रा निघेल.’ आणि प्रत्यक्षात घडलंही असंच. या पुस्तकात त्या घटनेचं सविस्तर वर्णन केलं आहे.

रॉड्रिगोने काही ठिकाणी मार्क्वेझने त्याच्याशी संवाद साधताना केलेली महत्त्वपूर्ण विधानं दिली आहेत. मार्क्वेझने युरोपमध्ये कोणत्या धारणा वा संदर्भांनुसार साहित्यनिर्मिती केली जातेय, याची कधी फिकीर केली नाही. मानवी जीवनातील अनुभव व्यक्त करण्यासाठी लॅटिन अमेरिकेतील एखादा दुर्गम भागसुद्धा तितकाच सक्षम असतो, असं तो म्हणत असे. त्याला मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचंही त्याला फारसं महत्त्व वाटत नसे. टॉलस्टॉय, प्रूस्त, बोर्हेस, वर्जिनिया वुल्फ, ज्युआन रूल्फो, ग्रॅहम ग्रीन यांपैकी कोणालाही नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही, पण म्हणून ते कमी महत्त्वाचे लेखक ठरत नाहीत, हेही त्याने सांगितलं होतं. ‘तुम्ही जर लेखनाशिवाय जगू शकत असाल, तर लिहू नका’ या विधानाचा तो वारंवार उच्चार करत असे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या आठवणींतून मार्क्वेझच्या पत्नीचं, मर्सेडिजचं जे चित्र उभं राहतं, ते त्याच्यावर माया करणारी, त्याचा सांभाळ करणारी असं आहे. मार्क्वेझला स्मृतिभ्रंश झाल्यानंतर त्याच्या विचित्र, अनपेक्षित वागण्याने ती त्रासून जायची, कधीकधी चिडायची, पण थोड्या वेळानं शांत होऊन पुन्हा मार्क्वेझला काही हवं आहे का, याची चौकशी सुरू करायची. त्याच्या मृत्यूनंतर सहाच वर्षांनी ऑगस्ट २०२०मध्ये तिचंही निधन झालं. सततच्या धूम्रपानामुळे तिची फुप्फुसं निकामी झाली होती. पण तरीही मार्क्वेझसारखाच तिचा जगण्यातला आणि इतरांचं जगणं समजून घेण्यातला उत्साह जराही कमी झालेला नव्हता. एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे जर ती रागावलेली असेल, तरी तिची खाजगी दुःखं समजल्यानंतर मर्सेडिजचं तिला माफही करत असे. ‘आपण कोणी प्रतिष्ठित नाही आहोत, सामान्य माणसांसारखेच आहोत’ याची ती मुलांना सतत जाणीव करून देत राहायची. या पुस्तकातून तिचंही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व उभं राहतं.

मार्क्वेझला नेहमी वाटायचं की, प्रत्येकाच्या जीवनाचे तीन कप्पे असतात - सार्वजनिक, खाजगी आणि गुप्त. या पुस्तकातून त्याच्या गुप्त कप्प्यांतील काही गोष्टींवर प्रकाश पडतो आणि त्याच्या खाजगी जीवनातील काही महत्त्वपूर्ण प्रसंग व त्यातील त्याचं वागणं, त्यांवरची त्याची मतं, यांचाही परिचय होतो. थोडक्यात या पुस्तकातून आपल्याही जगण्याला आधार देणारं काही सापडून जातं.

A Farewell to Gabo and Mercedes - Rodrigo Garcia

Publisher ‏ : ‎ HarperVia (15 August 2021)

Hardcover ‏ : ‎ 176 pages

M.R.P.: ₹ 499

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - 

https://www.amazon.in/Farewell-Gabo-Mercedes-Gabriel-Marquez/dp/0008487898/ref=tmm_hrd_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr=

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......