‘सच कहूँ तो’ : नीना गुप्ताचे आत्मचरित्र प्रामाणिक असल्याचे जाणवते
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सतीश बेंडीगिरी
  • अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांच्या ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ
  • Tue , 27 July 2021
  • ग्रंथनामा दखलपात्र नीना गुप्ता Neena Gupta सच कहूँ तो Sach Kahun Toh

१९९३मध्ये ‘बझार सीताराम’ या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नीना गुप्ताने सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. त्या चित्रपटाचे निर्माते श्याम बेनेगल यांनी तिला त्या वेळी सांगितले होते - “प्रत्येक कथेची स्पष्ट सुरुवात, मध्य आणि शेवट असं सगळं लक्षात ठेवलं, तर कधीही अपयश येत नाही.” हा सल्ला तिने केवळ चित्रपटालाच लागू केला असे नव्हे, तर तिच्या आत्मचरित्रालाही लागू केल्याचे दिसते. ती ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात हेच समीकरण वापरून आपली कहाणी सांगते.

गल्ली क्र.१, रेगर पुरा, करोल बाग, दिल्ली इथपासून या आत्मचरित्राला सुरुवात होते. साठच्या दशकातल्या दिल्लीचे चित्र रंगवतानाच आपले बालपण आणि पौगंडावस्थेतील काळ कसा गेला, हे नीना आडपडदा न ठेवता सांगते. तिचा पहिला प्रियकर, अमलान कुसुम घोष या आयआयटी दिल्लीत शिकणाऱ्या बंगाली विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील खोलीत ती कशी लपून बसायची आणि त्याच्याबरोबर दिल्ली पालथी घालताना काय काय करायची, हे वाचताना ती हातचं काहीच राखून ठेवत नाही हे कळतं. अमलान तिचा पहिला पती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधले तिचे दिवस कसे गेले, हे सांगतानाच तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ यानाटकाच्या वेळची एक रंजक घटना ती सांगते. या नाटकात नीनाने चंपाचे पात्र रंगवले होते. सखाराम चंपाच्या तोंडावर उशी दाबतो, तो प्रसंग तिने सांगितला आहे. उशी चेहऱ्यावर हलके दाबण्याऐवजी नाटकातील सखाराम सर्व शक्ती लावून नीनाच्या तोंडावर दाबत राहतो आणि नीनाचा  जीव गुदमरायला  लागतो. ‘आपले डोळे बाहेर येतायत की काय’ असे वाटत असतानाच ती त्याला ढकलून देऊन उठायचा विचार करते... मग प्रेक्षक काहीही  म्हणोत. ती त्याला ढकलते आणि त्याच वेळी रंगमंचावरचे दिवे जातात. तिला ढकलताना कुणीही पाहत नाही, पण टाळ्या वाजत राहिल्या. नंतर  सखाराम रंगवणाऱ्या पात्राने नीनाचे पाय धरले; ते तिने ‘माफ़ किया’ म्हणेपर्यंत सोडले नाहीत.

अभिनेते, राजकारणी, उद्योगपती किंवा तत्सम व्यक्ती आपापली आत्मचरित्रे लिहितात, तेव्हा खरेच ‘ते अगदी सत्य लिहितात का?’ हा संशोधनाचा विषय आहे. अगदी ‘नथिंग बट ट्रूथ’ किंवा ‘देवाची शपथ’ असे पुस्तकाचे शीर्षक असले, तरीही त्यावर कितपत विश्वास ठेवावा, हे कळत नाही, पण ती व्यक्ती नीना गुप्तासारखी बंडखोर असेल, तर खात्री पटते की, तिने वर्णन केलेले जीवन आणि तिच्या आसपासचे जग नक्कीच सत्य आहे.

नीनाचे चरित्र कदाचित अनेकांना धक्कादायक वाटू शकते, कारण ती सामाजिक चालीरीतींना तिलांजली देत लग्नाशिवाय मूल जन्माला घालते. बालपणापासून तिची सुरू झालेली सफर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून निघाल्यानंतर एक जबरदस्त प्रतिभाशाली अभिनेत्री होण्यापर्यंतचा तिचा प्रवास, अगदी वयाच्या साठाव्या वर्षीही एखादे पात्र ताकदीने उभे करणारी एक मनस्वी कलावंत, परंतु सामान्य स्त्रीप्रमाणेच भय, असुरक्षितता, शंका, महत्त्वाकांक्षा, स्वप्ने, आशा आणि इच्छा व प्रत्येक मानवी भावनांसह ती कशी वावरते, या सर्व गोष्टींविषयी तिने मनमोकळेपणाने लिहिले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कास्टिंग काऊच’ नावाचा प्रकार असतो, हे ती स्पष्टपणे सांगते. तथापि त्या काऊचवर आपण झोपायचे की नाही, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे, असे ती पुढे म्हणते. तिलाही या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांनी या काऊचवर झोपायला सांगितले होते. ज्या लोकांनी या मागण्या केल्या, अशा पुरुषांची नावे तिने पुस्तकात घेतलेली नाहीत, मात्र ज्यांनी तिचे नुकसान केले, अशा असंख्य लोकांचा तिने उल्लेख केला आहे, परंतु त्यांची ओळख ती जाहीर करत नाही. मात्र काही प्रकरणांमध्ये ती त्याबाबत स्पष्ट इशारा देते. उदाहरणार्थ, जेव्हा तिचे लग्न ठरले, पण कधीच झाले नाही, याबद्दल म्हणते- ‘‘I was acquainted with Raghav's maternal grandfather, who was an eminent producer in India.’’

स्वत:च्या क्षमतेबद्दल खात्री बाळगणारी एक खंबीर व्यक्ती आणि अभिनेत्री असून यशाकडे झेप घेताना तिने अनेक अडथळ्यांना न जुमानता हे मोठे यश मिळवले आहे, हे जाणवत राहते. आजदेखील चित्रपट निर्मात्यांकडून तिच्या कलागुणांचे कौतुक होत असूनही नीना सांगते की, यशाकडे जाणारा रस्ता सोपा नव्हता. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर नकार, अपमान आणि फसवणूक यांनी तिची कारकीर्द झाकोळली जात असतानादेखील तिने यशाचा पल्ला गाठला. हे सांगताना ती आपल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे कोठेही दिसत नाही; ती आपल्याशी थेट संवाद साधत आहे, असेच  वाटते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपल्या आयुष्यातील अनेक बाबी सरळ शब्दांत सांगत असतानाच, तिच्या मुलीचे, मसाबाचे वडील, विव्हियन रिचर्ड्सबद्दल ती त्रोटक माहिती देते. या गाजलेल्या वेस्ट इंडियन क्रिकेटरबरोबरच्या नात्याबद्दल सांगताना ‘मसाबाची आई’ म्हणून आपण कमी पडलो, याचे तिला वाईट वाटते. आनंदाची भावना आणि मातृत्वाचा अभिमान केवळ आईच्या अनुभवातूनच येऊ शकते, हे ती कबूल करते. मसाबाची उपस्थिती किंवा तिचे अस्तित्व, तिने अनुभवलेल्या जीवनापेक्षा अधिक आनंदाचे आहे आणि तो आनंद तिला अजूनही वाटत आहे, असेही तिने सांगितलेय.

‘टिपू  सुलतान’च्या  सेटवर आग लागली असताना मसाबा कशी एकटीच ग्रीन रूममध्ये अडकली होती, हे पाहून तिचा थरकाप कसा उडाला आणि तिथे जाण्यासाठी तिने जीव कसा धोक्यात घातला, हा प्रसंग अफलातून अशा पद्धतीने सांगितलाय.

चित्रपट उद्योगाबद्दल बोलताना तिचे विचार स्पष्ट आहेत – ‘No one is your companion. The business is a business’. अशा व्यवहारामुळे तिला बराच त्रासदेखील सहन करावा लागला. हे वाचताना प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, तसेच टीव्ही कलाकार यांचे पडद्यामागे काम कसे चालते, याबद्दलही बरेच कळते. ‘चोली के पीछे’ या कुख्यात की प्रख्यात गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी सुभाष घई काय म्हणाले होते, हे सांगताना ती लिहिते -

“...They put me in a tribal Gujarati outfit and sent me to Subhash Ghai for approval’.

‘No! No! No! No!’ he shouted. ‘Kuch bharo’.

I was so embarrassed. In my opinion, he was referring to my choli and stating that it needed to be filled. It wasn’t anything personal, I knew. He had visualized something… bigger for the rendition.

I didn’t shoot that day. But the next day I was presented to him in a different outfit, with a bra that was heavily padded, and he seemed satisfied.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

एक कसलेली अभिनेत्री म्हणून अलीकडे तिची पुन्हा नव्याने ओळख होते आहे. आयुष्यात ती बऱ्याच गोष्टींबद्दल बेफिकीर राहिल्याबद्दल ती दिलगीर असल्याचे पुस्तकाच्या उपसंहारामध्ये तिने कबूल केले आहे – ‘‘Please don’t think that of me. I am in no sense doodh ki dhuli. I have my reasons for doing this. Moreover, I too have made mistakes and done things I am not proud of. All of us have… And again, Sach Kahun Toh, I have withheld a few of those incidents because I realized my mistakes but did not want them immortalized in ink and paper. I’m sorry about that.’ 

या ओळीवरून तिने एक प्रामाणिक आत्मचरित्र लिहिले असल्याचे जाणवते.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......