भाकरी आणि कला यांच्यातील हे विचित्र नाते मंटोने मोठ्या खुबीने संभाळले. त्याने ‘रोज एक कथा’ लिहिण्यातील विवशता कलाकार म्हणून निभावली. प्रामाणिकपणे आणि खरेपणाने.
ग्रंथनामा - आगामी
नरेंद्र मोहन
  • सआदत हसन मंटो आणि त्यांच्या ‘रोज एक कहानी’ या कथासंग्रहाच्या हिंदी अनुवादाचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 February 2021
  • ग्रंथनामा आगामी सआदत हसन मंटो Saadat Hasan Manto रोज एक कहानी Roj ek Kahani

नरेंद्र मोहन हे हिंदीतील ज्येष्ठ  लेखक, कवी, नाटककार आणि संपादक आहेत. त्यांनी सआदत हसन मंटोच्या कथा आणि नाटके संपादित केली आहेत. मंटोने आयुष्याच्या शेवटच्या काळात ‘रोज एक कथा’ लिहिली. पण त्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. नरेंद्र मोहन यांनी त्या कथा एकत्र करून ‘रोज एक कहानी’ या नावाने त्यांचा संग्रह प्रकाशित केला. त्याचा मराठी अनुवाद संधीकाल प्रकाशन, मुंबई यांच्या तर्फे प्रकाशित होणार आहे. या संग्रहाचा अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी केला आहे. मूळ पुस्तकाला नरेंद्र मोहन यांनी लिहिलेली ही भूमिका...

..................................................................................................................................................................

सृजनात्मक लेखनात प्रतिभा ही मोठी आणि मूलभूत गोष्ट नक्कीच आहे, पण कमी क्षमता असलेल्या लेखकांच्या हातात ती मृतवत होऊन जाते. प्रतिभेशिवाय फक्त अभ्यास फार काळ साथ देत नाही. आणि ज्याला अभ्यास म्हणतात ते केवळ रचना कौशल्य असते. उर्दूमध्ये याला ‘मुश्के-सुखन’ असे म्हणतात. याचा अर्थ कथनाचे कौशल्य. याला शायरी किंवा कथाकथनातील निपुणता असेही म्हणता येईल. खरे म्हणजे प्रतिभा आणि अभ्यास यांचे एकत्र येणे सृजनाला वरच्या पातळीवर घेऊन जाऊ शकते.

एखाद्या मोठ्या साहित्याच्या संदर्भात प्रतिभेची भूमिका कुठे संपली आणि रचना कौशल्य कुठे सुरू झाले हे सांगणे अवघड असते. दोन्ही बाबी एकमेकांत मिसळूनच साहित्यकृतीला आकार देतात. हा एक असा खेळ आहे, ज्यात एक नाही तर अनेक रंग आहेत. एक नाही तर कित्येक ध्वनी आहेत. एक नाही तर कित्येक मिती आहेत. प्रतिभा आणि रचना कौशल्याचा हा खेळ प्रत्येक लेखक आपल्या पद्धतीने कधी स्वत:ला तर कधी साहित्यकृतीला केंद्रस्थानी ठेवून खेळतो. कोणत्याही लेखकाच्या लेखनप्रक्रियेचे रहस्य या सगळ्यामधूनच समजून घ्यावे लागते. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे.

सआदत हसन मंटोसारख्या लेखकाने प्रतिभा आणि रचनाकौशल्याचा हा खेळ आपल्या अटीवर आणि आपल्या पद्धतीने खेळला. एका ठिकाणी मंटोने लिहिले आहे की, दारूप्रमाणेच त्यांना कथा लिहिण्याचे व्यसन आहे. ज्या वेळी त्यांना कथा लिहिता येत नाही, तेव्हा त्यांना आपण कपडे घातलेले नाहीत किंवा दात घासलेले नाहीत किंवा दारू प्यालेली नाही असे वाटते.

मंटोने काळावर ठसा उमटवलेल्या ज्या कथा लिहिल्या आहेत, त्या पाहिल्यावर त्यांचे म्हणणे काय आहे, हे पाहिले पाहिजे. ते म्हणतात की, “मी कथा लिहीत नाही तर कथाच मला लिहिते.”  इथे मंटो आणि कथा एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. महत्त्व कथेचेच आहे, पण मंटोचेही महत्त्व तितकेच आहे. त्यांनी लिहिताना आपली प्रतिभा आणि रचनाकौशल्य यांचा सुंदर मेळ घातला. काही कथांमध्ये ते सृजनशीलतेच्या शिखरावर पोहोचले, तर साधारण वाटणाऱ्या कथांमधून ते आयुष्यातील सत्य गुंफत राहिले.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

१९९० मध्ये मी ‘सआदत हसन मंटो की कहानियाँ’ आणि १९९१ मध्ये ‘सआदत हसन मंटो के नाटक’ या सारखी दोन मोठी पुस्तके संपादित केली होती. त्या पुस्तकांची हिंदी आणि उर्दू साहित्यविश्वात खूप चर्चा झाली. वाचकांचा एक मोठा गट या कथांमुळे आणि नाटकांमुळे विचलित झाला. प्रेरणा घेत राहिला आहे. भारतीय भाषांमधील आणि जगातील कित्येक भाषेतील लेखकांपर्यंत जेव्हा या कथा अनुवादित होऊन पोहोचल्या, तेव्हा ते मंटोच्या कथांमुळे खूप भारावले.

मी यांच्या कथांशी रचनात्मक स्तरावर कधी ‘एक आग्निकांड जगहे बदलता’ या सारखी दीर्घ कविता लिहिताना, तर कधी ‘टोबा टेकसिंह’ने प्रेरित होऊन ‘नो मॅन्स लँड’ या सारखे नाटक लिहिताना जोडला गेलेलो आहे. हेही आहेच की, विसाव्या शतकातील एक मोठे लेखक म्हणून मंटो आपल्या बरोबरच आहेत असे आपल्याला वाटते. येणाऱ्या पिढ्यादेखील आपल्या काळात आणि त्या वेळच्या परिस्थितीत त्यांच्या कथा नवीन पद्धतीने वाचतील यात मला तरी शंका वाटत नाही.

जगाच्या संदर्भात आणि भारताच्या संदर्भात देखील एक कथाकार म्हणून त्यांचा शोध घ्यायचा असेल तर केवळ त्यांच्या ‘शिखर’कथांच्या बरोबरच अतिशय सामान्य समजल्या जाणाऱ्या कथा आणि त्या कथा लिहिल्या गेला तो काळ (ज्या काळात त्यांच्यावर सर्वाधिक दबाव होता)  देखील ध्यानात घ्यायला हवा. अशा काही कथा आणि काळ माझ्या नजरेसमोरून गेला, तेव्हा मला त्या मार्फत मंटो आणि त्यांच्या कथा, त्या काळातील त्यांची मन:स्थिती आणि त्यांचा कल एकसाथ समजण्यासाठी मदत मिळाली.

मंटो यांच्या लेखन-प्रक्रियेसंबंधी खूप कमी लिहिले गेले आहे. ते जेव्हा रोज एक कथा लिहीत होते, त्या कथांवर तर अजिबातच लिहिले गेलेले नाही. रोज लिहिल्या जाणाऱ्या त्या कथा अजिबातच बहुचर्चित नाहीत. पण त्यातील कथा दररोज एक याप्रमाणे लिहिली जात होती. त्यामुळे त्या कथांकडे लक्ष आकार्षित होणे स्वाभाविक आहे. माझ्या मते मंटोचे लेखक मन समजण्यासाठी अन्य गोष्टींबरोबरच या कथांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यांचा ‘रोज एक कथा’ लिहिण्याचा कालावधी दोन टप्प्यात आहे. पहिला टप्पा २३ जुलै १९५० ते ३१ जुलै १९५० आणि दुसरा टप्पा ११ मे १९५४ ते १ जून १९५४ असा आहे. आता प्रश्न असा आहे की, ‘रोज एक कथा’ लिहिण्यासाठी असा कोणता दबाव त्यांच्यावर होता? कथा लिहिण्याचा आंतरिक दबाव तर त्यांना रोज एक कथा लिहायला भाग पाडत नसेल ना? की, नियतकालिकांचा दबाव त्यांना रोज एक कथा लिहायला भाग पाडत होता? की, बायकोच्या, मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा संध्याकाळी दारू पिण्याची तलफ भागवण्यासाठी ते रोज एक कथा लिहीत होते? रोज पिण्यासाठी त्यांना रोज विहीर खोदावी लागत होती? इतकी त्यांची आर्थिक अवस्था वाईट होती? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर असू शकत नाही. कथा लिहिण्यासाठी आंतरिक दबाव आणि संपादकांचा तगादा या दोन्हीमुळे त्यांना रोज एक कथा लिहावी लागत असावी. घाईघाईत कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी मंटोंचे या बाबतीत काय म्हणणे होते हे जाणून घेणे आवश्यक आहे.

‘मी कथा का लिहितो’ या लेखात आपल्या रचना प्रक्रियेबद्दल ते एके ठिकाणी लिहितात- “न लिहिलेल्या कथांचे मानधन आगावू वसूल केलेले असते. त्यामुळे मला कथा सुचत नसेल तर मी दु:खी होतो. मी कुस्बडळात रहातो. उठून चिमण्यांना दाणे टाकतो. मुलाला पाळण्यात झोपवून त्याला झोके देत रहातो. घरातील कचरा साफ करतो. घरात इकडे तिकडे पसरलेले जोडे उचलून एका जागी ठेवतो. पण जी कथा माझ्या खिशात पडलेली असते, ती कागदावर उतरत नाही. त्यामुळे मी तळमळत राहतो.”

मंटोच्या या वक्तव्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक, तर त्यांना कथा लिहायचीच आहे. कारण न लिहिलेल्या कथांचे मानधन त्यांनी आधीच वसूल केलेले  आहे. त्यामुळे त्यांना कथा लिहावीच लागणार आहे. पण कथा सुचत नाहीये. त्यामुळे ते तळमळत आहेत. बाहेरील दाबावामुळे एक नैतिक संकट त्यांना कथा लिहिण्यासाठी विवश करते. लक्षात घ्या इथे भाकरी आणि कला एकमेकात गुंतलेली आहे.

‘मी कथा का लिहितो?’ या लेखात ते एके ठिकाणी लिहितात- ‘भाकरी आणि कला यांचा संबंध विचित्र असतो. पण खुदाला तोच मंजूर आहे, त्याला काय करणार? खुदा स्वतःला निरपेक्ष म्हणवतो. पण हे चूक आहे. तो निरपेक्ष, निर्लेप अजिबातच नाही. खुदाला त्याची आराधना केलेली हवी आहे. पण आराधना ही खूपच मऊ आणि नाजूक भाकरी आहे. त्याने तो आपले पोट भरतो.’

भाकरी आणि कला यांच्यातील हे विचित्र नाते मंटोने मोठ्या खुबीने संभाळले. त्याने ‘रोज एक कथा’ लिहिण्यातील विवशता कलाकार म्हणून निभावली. प्रामाणिकपणे आणि खरेपणाने. कोणतीही तडजोड न करता.

एकदा एका मित्राने मंटोला विचारले, “मंटोसाहेब, तुम्ही कादंबरी का लिहीत नाही?” मंटोचे उत्तर होते, “इथे रोज पिण्यासाठी पैसे पाहिजेत. म्हणून मी रोज कथा लिहितो. त्याचे मला रोज मानधन मिळते. मग कादंबरी कोण लिहिणार?”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हा एक अजब विरोधाभास आहे. जो मंटो पैशासाठी कथा लिहीत होता, त्याला पैशाची अजिबातच किंमत नव्हती. रोजच्या गरजा भागवण्यासाठी त्याला पैसे हवे होते. पण आत्मसन्मानाची किंमत देऊन नाही. एकदा मंटोने अमेरिकेच्या धोरणावर टीका करत ‘अंकल सॅम’च्या नावाने अनेक पत्र लिहिली होती. त्यावर त्या काळी वाद निर्माण झाला होता. तेव्हा पाकिस्तानमधील अमेरिकेचे हाय कमिशनर यांनी मंटोला निरोप पाठवला- “जर तुम्ही आमच्या नियतकालिकासाठी लेख लिहिलात तर एका लेखाला ५०० रुपये मानधन दिले जाईल.” हा आपल्याला खरेदी करण्याचा डाव आहे, ते आपल्या तोंडाला कुलूप लावू इच्छितात, हे लक्षात यायला मंटोला वेळ लागला नाही. आर्थिक अडचणींनी घेरले असतानाही मंटोने त्यांची ऑफर नाकारली. ‘मंटो विकाऊ नाही’  असे उत्तर मंटोने दिले.

मंटोच्या वर्तनातील विसंगतीला आणि अंतर विरोधाला तसेच त्यांचे आयुष्य आणि साहित्य यातील नात्याला समजून न घेता मंटो आयुष्यभर पीत राहिले असे म्हणणे बरोबर ठरणार नाही. त्यांचे पिणे, जगणे आणि लिहिणे याकडे फक्त वरवर पाहून चालणार नाही. त्यांच्या आयुष्याकडे  दुरून जरी पाहिले तरी आयुष्य आणि मरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या हे आपल्याला जाणवेल. फैज अहमद फैजने एलीसच्या नावाने लिहिलेल्या एका पत्रात याकडे लक्ष वेधलेले आहे - “गोष्ट अशी की, जेव्हा आर्थिक परिस्थितीमुळे कला आणि जीवन एकमेकांना भिडत  असेल तर कलावंताला दोन्हीपैकी एकाचा त्याग करावा लागतो.”

२६ कथांचे जे दोन टप्पे इथे दिले आहेत, तो मंटो यांच्या कथा लेखनातला आणि आयुष्यातलाही शेवटचा काळ होता. दुसऱ्या टप्प्याच्या नंतर सहा महिन्यातच त्यांचा अंत झाला होता. (१८ जानेवारी १९५५) ही तोच काळ आहे ज्या काळात मंटो खूप पीत होते. त्यांच्या काळजाची चाळणी झाली होती, तरी त्याची त्यांना पर्वा नव्हती. लक्षात घ्या त्याच काळात ते रोज एक कथा लिहित होते. ते आयुष्यभर जीवनाला कथेमध्ये आणि कथेला जीवनात शोधात राहिले.

मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......