जिथे गांधीप्रेम व द्वेष फक्त राजकारणासाठी केला जातो, तिथे ‘गांधी नावाची प्रेरणा’ जिवंत ठेवणे, हे आपले कर्तव्य होते!
सदर - गांधी @ १५०
राकेश परब
  • म. गांधी
  • Tue , 06 February 2018
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi आंबेडकर Ambedkar नेहरू Nehru

३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधी यांची हत्या झाली. त्याला कालच्या ३० जानेवारीला  ७० वर्षे पूर्ण झाली. आपल्या देशात गांधीप्रेम आणि गांधीद्वेष हे दोन्ही फक्त राजकारणासाठी वापरले जातात, त्यामुळे ‘गांधी नावाची प्रेरणा’ जिवंत ठेवणे, हे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे कर्तव्य होऊन जाते. त्या संदर्भातला एका तरुणाचा हा उदबोधक लेख...

.............................................................................................................................................

ज्येष्ठ विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, “इतिहास हा व्यक्तींचा, घटनांचा किंवा सणावल्यांचा अभ्यास नसतो. इतिहास हा विचार प्रवाहांचा अभ्यास असतो.” गांधी या व्यक्तीपेक्षा विचारप्रवाह म्हणून त्यांच्याकडे पाहिले तर कदाचित ते आपल्याला जास्त चांगले समजतील.

महात्मा गांधी हे नाव अहिंसा या तत्त्वाशी कायमचे जोडले गेले. मुळात हिंसा न करणे म्हणजे अहिंसा असा अहिंसेचा नकारात्मक अर्थ काढण्यात काही हशील नाही. हिंसा वाईट असते हे मान्य, परंतु गुलामीही त्यापेक्षाही जास्त वाईट असते. त्यामुळे जिथे हिंसा किंवा गुलामी हा संघर्ष उभा राहिला तिथे गांधींना हिंसा वर्ज्य नव्हती. १९४२ मध्ये हिटलरच्या विरुद्ध ब्रिटनच्या बाजूने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उतरण्यास गांधींची तयारी होती. १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर गांधी नेहरूंच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. अहिंसा हे गांधींचे साधन होते, साध्य नाही.

लाखो करोडो लोकांच्या हाती बंदुका देऊन सशस्त्र लढा उभा करणे हे भारतासारख्या देशात जवळ-जवळ अशक्य होते. सरकारला मायबाप समजणारा हा समाज सरकारविरुद्ध शस्त्र घेऊन उठाव करेल, अशी कोणतीही शक्यता नव्हती. गांधींचे सगळ्यात मोठे यश हे भारतीयांना निर्भय बनवण्यात होते. ज्याला मृत्यूची भीती वाटत नाही आणि आपण केलेल्या कृत्याचे सर्व परिणाम भोगण्यासाठी जो तयार होतो असा कार्यकर्ता तयार करणे, हे गांधींचे फार मोठे यश होते. त्यामुळे पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्यासारखे आपले सर्वस्व उधळून साथ देणारे सहकारी त्यांना भेटले, तसेच बाबू गेनूसारखे मरणाला हसत हसत सामोरे जाणारे कार्यकर्ते त्यांना लाखोंच्या संख्येने भेटले. ही लोकमान्यता हीच गांधींची सर्वांत मोठी जमेची बाजू होती.

गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे सरसेनापती (हा त्यांचा आवडता शब्द) होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी झालेल्या आंदोलनांनी जी जागृती घडवून आणली तीच या लढ्याचे सर्वांत मोठे फलित होते. संपूर्ण भारत एका धाग्यात गुंफण्यात गांधी यशस्वी झाले होते आणि हाच आधुनिक भारतीय राष्ट्र-राज्याचा पाया होता. शेकडो भाषा, हजारो जाती आणि पंथ यांच्यात विभागल्या गेलेल्या या समाजाला एक सामायिक कार्यक्रम देणे आणि त्यांच्यामध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना तयार करणे हे अत्यंत अवघड काम होते. प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि त्याच्यातील माणसाला सन्मान देणे, हे भारतासारख्या जाती आधारित समाज असलेल्या देशात नवीन होते.

धार्मिक हिंदू असलेल्या महात्मा गांधींचा राजकीय वारसदार हा एक फॅबिअन समाजवादी, अधार्मिक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गांधींचे अर्थशास्त्र अमान्य असलेला का असतो, हा मला भेडसावणारा प्रश्न आहे. गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये असे काय साम्य होते की, गांधींनी नेहरूंना आपले राजकीय वारसदार म्हणून नेमले? एकदा एका पत्रकाराने गांधींना प्रश्न विचारला की, “तुमच्या आणि नेहरूंच्या मध्ये असलेल्या मतभेदांचे स्वरूप कसे आहे?” गांधींनी यावर फार मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, “जवाहरच्या मते ब्रिटिश गेले पाहिजे आणि ब्रिटिश व्यवस्था राहिली पाहिजे. परंतु मला वाटते ब्रिटिश राहिले तरी चालतील, पण ब्रिटिश व्यवस्था मात्र गेली पाहिजे.”

प्रबळ केंद्राचा पुरस्कार करणारे नेहरू आणि विकेंद्रीकरण हाच विकासाचा पाया मानणारे गांधी हे इतकी वर्षे एकत्र आणि एकदिलाने काम करतात. ब्रिटनमधील उदारमतवादी लोकशाही जवळून बघितलेल्या या दोन नेत्यांनी तोच उदारमतवाद भारतात रुजवायचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळेच आपल्याला प्रचंड विरोध करणाऱ्या लोकांना सुद्धा बरोबर घेणे त्यांना शक्य झाले. ज्याला आज आपण ‘काँग्रेस व्यवस्था’ म्हणतो, ज्यात अतिडाव्यांपासून अतिउजव्यांपर्यंत सर्वांना सामावून घेतले गेले होते, ती व्यवस्था याच उदारमतवादाचे प्रतीक होते. त्यामुळेच कदाचित जागतिक इतिहासाचे आणि राजकारणाचे प्रचंड भान असलेला आणि औद्योगिकीकरणाचा पुरस्कार करणारे नेहरू हे गांधींचे वारसदार झाले.

हीच परंपरा नेहरूंनी पुढे चालू ठेवली. श्यामाप्रसाद मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकर, चिंतामणराव देशमुख अशा आपल्या राजकीय आणि वैचारिक विरोधक असलेल्या नेत्यांना नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले. १९५६ मध्ये चिंतामणराव देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरून अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देताना नेहरूंवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतरसुद्धा नेहरूंनी देशमुखांना विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष केले. आज आपल्या विरोधकाचे चारित्र्यहनन करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या आणि ‘विरोधकमुक्त भारत’ निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाला गांधी आणि नेहरूंचे वावडे असणार यात काही शंका नाही.

गांधी आणि नेहरू संबंध हा जेवढ्या गुंतागुंतीचा विषय आहे, तेवढ्याच गुंतागुंतीचा विषय म्हणजे गांधी आणि आंबेडकर यांचे संबंध. ‘खेड्यांकडे चला’ असा संदेश देणारे गांधी आणि ‘शहरांकडे चला’ असे सांगणारे आंबेडकर यांच्या विचारांमध्ये वर वर पाहता प्रचंड विरोधाभास वाटतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, दोघांचेही म्हणणे आपापल्या परीने बरोबर होते. ‘खेड्यांकडे चला’ याचा अर्थ समजावून सांगताना यशवंतराव चव्हाण म्हणतात, “खेड्यांकडे चला याचा खरा अर्थ खेड्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणारे विचार आणि साधने घेऊन खेड्यांकडे जा असा आहे.” गांधींनासुद्धा हाच अर्थ अभिप्रेत असावा. बहुसंख्य लोकांना दुर्लक्षित करून आपण स्वराज्य आणि सुराज्य निर्माण नाही करू शकत याची पूर्ण जाणीव गांधींना होती.

याउलट लहानपणापासून जातीचे चटके सहन केलेल्या आंबेडकरांना गाव म्हणजे भारतातील मागासलेपणाचे मूर्तीमंत उदाहरण वाटत होते. दलित जोपर्यंत गावाच्या दलदलीतून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही, हे त्यांचे प्रामाणिक मत होते. बाबासाहेबांची हिंदू धर्मातील समाजसुधारक ते हिंदू धर्म विरोधक असा भूमिका बदल होताना एक गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारत हा लोकशाही, प्रजासत्ताक, सेक्युलर, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असेल हेच प्रत्येक नेत्याचे स्वप्न होते. शेवटी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्व नेते हे इंग्लंड आणि अमेरिकेत शिकलेले आणि तेथील उदारमतवादी लोकशाही जवळून पाहिलेले लोक होते. व्यक्तीला समान वागणूक देणारी, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण मदत करणारी समाजव्यवस्था भारतात निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते.

लोकशाहीची व्याख्या करताना आंबेडकर एके ठिकाणी लिहितात, “लोकांच्या आयुष्यात रक्तविहीन मार्गाने क्रांती घडवणारी समाजव्यवस्था आणि शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही!” अहिंसा हे तत्त्व म्हणून सांगणारे गांधी एकटेच नव्हते. गौतम बुद्धाचा मार्ग अनुसरणारे आंबेडकर हेसुद्धा अहिंसेचाच पुरस्कार करणारे होते. आपल्या सामाजिक कारकीर्दीच्या सुरुवातीला गांधी हे आंबेडकरांचे नायक होते. त्यामुळेच कदाचित चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी आंबेडकरांनी एकट्या गांधींचा फोटो तिथे ठेवला होता. पुणे कराराच्या वेळी शीख, मुस्लीम यांच्याप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ मागणाऱ्या आंबेडकरांना गांधींनी विचारले होते, “शीख हे पुढे पण शीखच राहणार आहेत, मुसलमान हे पुढेही मुसलमानच राहणार आहेत, पण दलित हे पुढेसुद्धा दलितच राहणारे आहेत का?”

‘पुणे करारा’तील दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ देण्याच्या गांधींच्या भूमिकेचे समर्थन करताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर लिहितात, “स्वतंत्र मतदारसंघाबाबत आंबेडकरांना शेवटपर्यंत भूमिका घेता आली नाही... जर आंबेडकरांना खरेच स्वतंत्र मतदारसंघ महत्त्वाचे वाटत होते, तर मग एका व्यक्तीच्या उपोषणाला एवढे महत्त्व द्यायची गरज नव्हती... जे दलित कार्यकर्ते आज गांधींना विरोध करतात त्यांची भूमिका ही अज्ञानातून आलेली आहे. स्वतंत्र मतदारसंघाच्याऐवजी दुपटीपेक्षा जास्त राखीव जागा दलितांना मिळाल्या.” आंबेडकर ‘पुणे करारा’ला आपला विजय मानत असत हे जरी लक्षात घेतले तरी या करारात गांधींची भूमिका योग्यच होती असे म्हटले पाहिजे.

महात्मा गांधींचे नातू आणि प्रसिद्ध लेखक राजमोहन गांधी यांनी ‘Why Gandhi Still Matters’ या त्यांच्या पुस्तकात आणखी एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला आहे. महात्मा गांधींनी लिहिलेली पुस्तके आणि त्यातून या महात्म्यातील एका प्रामाणिक व्यक्तीचा आपल्याला बोध होतो. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे गांधींचे गाजलेले आत्मचरित्र प्रामाणिकपणाचा अस्सल नमुना आहे. आपण केलेल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करणे हे आजच्या ‘सत्योत्तरी जगात’ (Post-Truth World) कालबाह्य झाल्यासारखे वाटेल. खासकरून स्वतःला गांधींचे वारसदार म्हणवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे आपले प्रधानमंत्री जेव्हा दिवसाढवळ्या खोटं बोलतात, तेव्हा तर याची जाणीव प्रकर्षाने होते. आज ‘स्वच्छ भारत अभियाना’चे प्रतीक झालेला गांधींचा चष्मा, हे खरे तर त्यांच्या विचारांच्या स्वच्छतेचे प्रतीक आहे.

आधुनिक भारत समजून घ्यायचा असेल तर गांधी, नेहरू आणि आंबेडकर वाचावेच लागतात. वरवर प्रचंड विरोधाभासी वाटणाऱ्या या नेत्यांच्या विचारांमध्ये प्रचंड मोठी सुसंगती होती. भारत स्वतंत्र करणे एवढेच त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट नव्हते. मागासलेल्या, प्रचंड अन्याय सहन केलेल्या आणि आत्मसन्मान गमावलेल्या प्रचंड मोठ्या जनसमूहाला त्यांना एक नवी दिशा द्यायची होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित नवसमाज त्यांना निर्माण करायचा होता. त्यामुळेच एका बाजूला ब्रिटिश सरकार विरुद्ध लढणारे हे नेते दुसऱ्या बाजूने आपल्याच समाजाविरुद्ध लढत होते.

सध्याच्या, आपले सगळे हक्क सरकारला स्वाधीन करायच्या, काळात गांधींची सरकारची संकल्पना काय होती हेही बघितले पाहिजे. गांधी म्हणतात, “खऱ्या अर्थाने जे सरकार सर्वांत कमी राज्य करते, तेच आदर्श सरकार होय. जे सरकार लोकांना काहीच करू देत नाही, ते स्वराज्य नाही.” (In truth, a government that is ideal governs the least. It is no self-government that leaves nothing for the people.) गांधी पुढे असेही म्हणतात, “मूठभर लोकांच्या हातात सत्ता केंद्रित झाल्याने खरे स्वराज्य येणार नाही, तर अधिकारांचा गैरवापर झाल्यावर त्याला विरोध करण्याची क्षमता प्रत्येकाने मिळवली तरच खरे स्वराज्य येणार आहे.” (Real Swaraj will come not by the acquisition of authority by a few but by the acquisition of the capacity by all to resist authority when it is abused.) गांधींचे खरे स्वप्न हे एक नवीन माणूस घडवण्याचे होते. राज्याने माणसाच्या प्रगतीतला अडथळा बनले नाही पाहिजे, तर त्या प्रगतीला पूरक झाले पाहिजे. त्यांचे खरे उद्दिष्ट माणूस सुधारण्यावर होते. म्हणून तर गांधी म्हणतात, “जेथे माणसे शुद्ध चारित्र्याची असतात, तेथे कायद्याची गरज नसते. आणि जेथे माणसे भ्रष्ट असतात, तेथे कायदा निरुपयोगी ठरतो.” (Where men are pure, the law is not required and where men are corrupt, the law is useless.)

या वर्षी महात्मा गांधींच्या हत्येला ७० वर्षे पूर्ण झाली. जिथे गांधीप्रेम आणि गांधीद्वेष हे दोन्ही फक्त राजकारणासाठी वापरले जातात, तिथे गांधी नावाची प्रेरणा जिवंत ठेवणे, हे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे कर्तव्य होऊन जाते.

.............................................................................................................................................

लेखक राकेश परब नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत.

rakeshparab700@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 23 February 2018

चुकीची दुरुस्ती : खाली रामानंद तीर्थांचा खुनी रशीद असा उल्लेख केला आहे. तो स्वामी श्रद्धानंदांचा खुनी रशीद असा असायला हवा होता. चुकीबद्दल क्षमा असावी. -गामा पैलवान


Gamma Pailvan

Wed , 21 February 2018

राकेश परब, तुमची एकेक विधानं बघूया. १. >> सामान्य माणसाची चळवळ करायची शक्ती अमर्याद नसते. एका ठराविक काळानंतर चळवळी मधील जोम संपत चालल्यावर ती मागे घेणे हाच चांगला मार्ग असतो. << चौरीचौरा इथे झालेल्या जाळपोळीचं दायित्व इंग्रज सरकारवर आहे. काहीतरी फालतू कारण देऊन चळवळ मागे घेणारा गांधी हा इंग्रजधार्जिणाच आहे. २. >> चौरीचारा हे फक्त निमित्त होतं. उद्या 10 पावलं पुढे जाण्यासाठी आज 2 पावलं मागं येणे हे काही चुकीचे नव्हते. << अशी काय मोठी ८ पावलं टाकली चौरीचौरा नंतर गांधींनी? ३. >> गांधींची अहिंसा आणि बुद्धाची अहिंसा यात काय फरक होता? << बुद्धाची अहिंसा यज्ञयागांत पशुबळी देण्याच्या विरोधात होती. तिला युद्धातल्या हिंसेचं वावडं नव्हतं. खरंतर गौतम बुद्धाने ज्ञानप्राप्तीनंतर आपल्या शक वर्गात परत येऊन मार्गदर्शन केलं. म्हणूनंच त्यास शाक्यमुनी म्हणतात. शक ही क्षत्रियांची जात होती. याउलट गांधींची अहिंसा भोंगळ आहे. ४. >> गांधींनी अहिंसेचा एक शस्त्र म्हणून वापर केला. << कसल्याशा आतल्या आवाजाचा हवाला देऊन उपासाला बसणारा गांधी विश्वासार्ह नाही. हे कसलं डोंबल्याचं शस्त्र! म्हणे उपासाला बसायचं. ५. >> भारताने करार पाळण्याची गरज नाही? का बरं? आणि हो पाकिस्तानचे आक्रमण त्याच्या आधी झालं होतं. १९४७ च्या ऑक्टोबर मध्ये. << तुमचा प्रश्न आणि उत्तर एकत्र आहे. पाकिस्तानने अगोदर आक्रमण केलेलं असल्याने त्याच्यासोबत केलेले करार पाळायची अजिबात गरज नाही. ६. >> गांधी दिल्ली मधील दंगली थांबविण्यासाठी देखील उपोषणाला बसले होते. << हे मणिभवन च्या संकेतस्थळावर आहे. ते कशाला गांधींच्या विरोधात लिहीतील! त्यावेळी प्रचलित समजूत बघायला पाहिजे. त्याण्य्सार गांधी ५५ कोटी रुपये पाकला द्यायला उपासास बसला. ७. >> कधी पेटवला??????? मित्रा इतिहास नाकारल्याने तो बदलत नाही.<< नको बदलू दे. गांधींनी भारत केंव्हा पेटवला? तारीख मिळेल काय? नसेल तर ही केवळ बाजारगप्प आहे. ८. >> विभक्त मतदारसंघ चुकीचे आहेत हे टिळकांचे शिष्य मान्य करतील का? << न मान्य करण्यासारखं काय आहे? लखनौ करारात मवाळदेखील सामील होते. तिरंगी लढती टाळाव्यात म्हणून टिळकांनी वेगळ्या मुस्लीम मतदारसंघांना मान्यता दिली. ९. >> जर भारतात लोकसंख्येची आदलाबदल झाली असती, तर उरलेला भारत हा सेक्युलर राहिला असता का? << का नाही? हिंदू मुळातून आपला धर्म कोणावर लादायला जात नाही. १०. >> नेताजी, भगतसिंग ह्या लोकांनी हि लोकसंख्येची आदलाबदल मान्य केली असती का << या दोघांनी फाळणीच मुळातून मान्य केली नसती. तदनंतर होणाऱ्या लोकसंख्येच्या अदलाबदलीचं जाऊद्या. ११. >> त्यावेळी जर मीडिया ला ताकद होती , तर मग मीडियाचा वापर करणे चुकीचे आहे का? << माध्यमांचा वापर करणं चुकीचं कोण म्हणतोय. फक्त माध्यमांनी डोक्यावर घेतलं म्हणून कोणी महात्मा होत नसतो. गांधी असा फुकटचा डोक्यावर चढवून ठेवलेला महात्मा होता. तो कुठेही गेला की मोठमोठे मथळे छापून येत. व्हॉईसरॉय नम्रपणे भेट घेण्याचं नाटक करीत असे. याची रसभरीत वर्णने छापवून येत. एकंदरीत गाजावाजा जास्त आणि काम शून्य असला प्रकार होता. १२. >> त्यांची फलनिष्पत्ती शून्य होती हे सांगण्यासाठी तरी किमान लढे उभारले गेले हे मान्य करावे लागते कि! << असले फुकाचे लढे काय कामाचे! १३. >> इंग्रजांचे एक दोन अधिकारी मारल्यानंतर इंग्रज काही देश सोडून जाणार नव्हते. << हो का! मग भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला का नेली? एकदोन इंग्रज अधिकारी मेले म्हणून घाबरून तर नाही? १४. >> भगतसिंग यांना वाचवण्यासाठी गांधींनी सर्व प्रयत्न केले. viceroy ने त्यांचे म्हणणे मान्य केले नाही. << अजिबात नाही. भगतसिंगाच्या फाशीची रदबदलीचा समावेश आयर्विनसमोर मांडायच्या मागण्यांत गांधींनी केला नाही. केला असता तर झक मारंत आयर्विनला रद्द करावी लागली असती. १५. >> १९०५ ते १९११ ह्या काळात ज्या काही लोक चळवळी झाल्या त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे बंगालची फाळणी रद्द होणे. << या सगळ्या हिंसक चळवळी होत्या. अहिंसेचं थोतांड मांडून चळवळी यशस्वी होत नसतात. १२. >> मग भारतीय सैन्य इंग्रजांच्या मागे का उभं राहिलं? आणि त्याच शूर भारतीयांचा इंग्रजांनी नंतर पराभव कसा केला? << आपसांतली भांडणं ! १३. >>भारतीय सैन्य होते यात काही शंकाच नाही. ते ब्रिटिशांचे सामर्थ्य होते हे तरी मान्य आहे की नाही? << अजिबात मान्य नाही. हे भारतीयांचं सामर्थ्य आहे. इंग्रजांचं नाही. भारतीय जेव्हा एक झाले तेव्हा आक्रमकांना भारी पडले आहेत. १४. >> शेवटी नेताजी हे सुद्धा गांधींच्या चळवळी तील एक नेते होते हे नको विसरू म्हणजे झालं!!!! << नेताजी कधीच गांधींच्या चळवळीत नव्हते. फार काय गांधींच्या काँग्रेसमधील सततच्या हस्तक्षेपास कंटाळून त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा अंतर्गत गट चालवला. १५. >> आणि हे नक्षलवादी किंवा माओवादी कोण आहेत? ते भारतीय नाहीत का? << ते भारतीय नाहीत. केवळ भारतात जन्म घेतल्याने कोणी भारतीय होत नसतो. त्यासाठी घटनेस प्रमाण मानावं लागतं. माओवाद्यांना व नक्षल्यांना भारताची राज्यघटना मान्य नाही. म्हणून मी त्यांना भारतीय मानत नाही. १५. >> माओवाद्यांकडे एवढी शस्त्रे आहेत. तरी पण त्यांना भारतपासून फुटून निघता आलेले नाही. त्यांचा सुद्धा शस्त्रांवर विश्वास आहे. जर शस्त्रांमुळे क्रांती होत असती तर मग आतापर्यंत ते यशस्वी झाले पाहिजेत. हो कि नाही? << पाकिस्तान दंगली करून वेगळा काढण्यात आला. तेव्हा अहिंसेचा काय उपयोग झाला? मग निरपराध्यांना ठार मारणाऱ्या नक्षल्यांना दया दाखवायचं कारणंच काय? १६. >> गांधींना मारणं हा पराक्रम नव्हता हे मान्य आहे. मग ते नथुराम ने का केलं? << कारण गांधी टेररिस्ट फायनान्सिंग करू लागला म्हणून. १७. >> इंग्रजांना मारण्यासाठी नथुराम चा हात का नाही उचलला गेला? << कारण १९४८ साली इंग्रज भारतातून निघून गेले होते. पण त्यांचा चमचा टेररिस्ट फायनान्सिंग करीत होता. इंग्रजांना मारण्याऐवजी इंग्रजांच्या चमच्याला उडवावं लागलं. १८. >> आणि हो जर त्यांनी ह्याला परवानगी दिली होती तर मग ते तुझे हिरो व्हायला पाहिजे. villain नाही. बरोबर ना? << नेल्सन मंडेला टेररिस्ट माफिया आहे. ज्याप्रमाणे आजचे माफिया तुरुंगात राहून आपलं गुन्हेगारी साम्राज्य सांभाळतात तशाच प्रकारे नेल्सन मंडेलाने त्याची संघटना चालवली. मी त्याला कशाला हिरो बनवू? १९. >> नेहरू, पटेल, राजाजी, विनोबा भावे, साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवन राम, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, बाबू गेनू, आणि असंख्य कार्यकर्ते!!!!!<< एव्हढे सगळे लोकं गांधींमुळे प्रभावित आहेत हे मान्य. यांना कोणाला गांधीवाद म्हणजे काय हे विचारलं तर सुसंगत उत्तरं देता येतील काय? (अवांतर : रामानंद तीर्थांच्या खुन्याला गांधींनी भाई रशीद म्हणून संबोधलं. हे गांधींच्या कुठल्या तत्त्वांत बसतं?) यांतली बरीचशी लोकं टिळकांचीही चाहती होती. मग टिळकांचादेखील प्रभाव धरायचा का त्यांच्यावर? २०. >> AIMC ची स्थापना 1983 ची आहे. मुळात काँग्रेस ची स्थापना 1885 ची आहे. मग राणी चेन्नमा, सावित्रीबाई फुले यांचा काँग्रेस बरोबर संबंध असण्याचा प्रश्न येतोच कुठे? << मूळ मुद्दा असा होता की सामाजिक व राजकीय क्षेत्रांत स्त्रिया गांधींच्या आधीपासून सक्रीय होत्या. २१. >> एका अखिल भारतीय लढ्याचे नाव सांगितलं तर बरं होईल!!! << बंगालच्या फाळणीच्या विरोधी लढा. २२. >> सदिछचांची वाट लावली?? म्हणजे काय केलं रे मित्रा???? << असहकार चळवळ ऐन वेळी मागे घेऊन अवसानघात केला. २३. >> गांधी आणि नेहरूंना या देशात काय आणायचं होतं? हुकूमशाही कि लोकशाही? << अर्थात हुकूमशाही. २४. >> गांधींना अस वाटलं होतं की जर आपण हा मुद्दा उचलून धरला तर आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य करता येईल. त्यांना त्यांची चूक कळली. त्यांनी त्याची जाहीर माफी मागितली होती. << नसता चोंबडेपणा करायला सांगितलेला कुणी! शिवाय त्यासंदर्भात गांधींनी माफी मागितल्याचं मी तरी ऐकलं नाहीये. कृपया संदर्भ मिळेल काय? २५. >> गांधींचे बहुसंख्य अनुयायी हे सुद्धा हिंदूच होते की!!आणि हो ते बंगाल आनि पंजाब मधील हिंदू पण होते. << नथुराम गोडश्यांचे बंधू गोपाळ गोडसे यांना पंजाबातल्या तुरुंगांतून हलवून महाराष्ट्रांतल्या तुरुंगात ठेवण्यात आलं. कारण की पंजाबात फाळणीमुळे गांधींच्या विरोधात वातावरण तापलं होतं. त्यामुळे गोपाळ गोडश्यांना सहानुभूती मिळंत असे. पंजाबी हिंदूंना गांधी नकोसा झाला होता. गांधींच्या आवाहनाला नाकारून पूर्व पंजाबातले (आजचा पंजाब + हरियाणा + हिमाचल प्रदेश) सर्वच्या सर्व मुसलमान साफ करण्यात आले. त्यामुळे आजही या तीन राज्यांत मुस्लिम प्रश्न नाही. २६. >>फक्त काही लोकांचं वय झालं म्हणून कधी कोणी फाळणी स्वीकारत नाही मित्रा. फाळणी का झाली हे जर समजून घ्यायचं असेल तर शेषराव मोरे यांचे "गांधीजींनी आणि काँग्रेस ने अखंड भारत का नाकारला" हे पुस्तक वाच. << तुम्ही वाचलंय ना, मग तुम्हीच युक्तिवाद तुमच्याच शब्दांत सादर करा. मी काही वाचायच्या भानगडीत पडणार नाही. बाकी, 'थेरड्यांनी वय झाल्यामुळे फाळणी स्वीकारली' हे नेहरूंनी स्वच्छ शब्दांत लिहिलेलं नाकारण्यात काही अर्थ नाही. २७. >> जे सावरकरांनी रत्नागिरी मध्ये करायचा प्रयत्न केला, तेच गांधींनी पूर्ण भारत भर करण्याचा प्रयत्न केला. << नक्की कसले प्रयत्न भारतभर केले? त्यांची फलनिष्पत्ती काय आहे? २८. >> कर्मवीर भाऊराव पाटील यांना विसरायची गरज नाही मित्रा. << भले कर्मवीर स्वत:स गांधींचे अनुयायी म्हणवून घेत असले, तरी गांधींचं या शिक्षण संस्थेत कसलंही योगदान नाही. ज्याप्रमाणे आझाद हिंद सेनेची प्रेरणा व कल्पना सावरकरांची असली तरी ती उभारायचं कार्य नेताजींचं आहे. त्याप्रमाणे गांधी हे केवळ प्रेरणास्थान आहे. गांधींचा तेव्हढा प्रभाव मान्य. असो. आजून येऊ द्या. आपला नम्र, -गामा पैलवान


Rakesh Parab

Tue , 20 February 2018

१८) आता गांधींच्या मागे कोण गेलं होतं हे जर तुला माहित नसेल तर तो माझा दोष नाही. तुला थोडी नावं सांगतो. नेहरू, पटेल, राजाजी, विनोबा भावे, साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवन राम, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, बाबू गेनू, आणि असंख्य कार्यकर्ते!!!!!! १९) मित्रा, ते विकिपीडिया चं पण जरा नीट वाच ना. AIMC ची स्थापना 1983 ची आहे. मुळात काँग्रेस ची स्थापना 1885 ची आहे. मग राणी चेन्नमा, सावित्रीबाई फुले यांचा काँग्रेस बरोबर संबंध असण्याचा प्रश्न येतोच कुठे? 1920 पासून पुढे बघ की. 1885 ते 1920 यात फक्त 2 आहेत. भिकाजी कामाँ आणि बेजन्ट. सरोजिनी नायडू तर पुढे गांधीजींच्या कार्यकर्त्या झाल्या. आणि हि तर फक्त नेत्यांची नावे आहेत. राष्ट्रीय पातळीवरच्या. जे तुरुंगात गेले त्यांची नावे आहेत कुठे? त्यांची संख्या लाखात मोजावी लागेल. त्याचं काय? २०) एका अखिल भारतीय लढ्याचे नाव सांगितलं तर बरं होईल!!! २१) सदिछचांची वाट लावली?? म्हणजे काय केलं रे मित्रा???? २२) गांधी आणि नेहरूंना या देशात काय आणायचं होतं? हुकूमशाही कि लोकशाही? आणि केमाल पाशा ने लोकशाही आणली?? त्यांनी भाषिक अल्पसंख्यांकांवर केलेले अन्याय बघ मित्रा. या उलट आपण प्रत्येक भाषेला सामावून घेतले. राहता गोष्ट राहिली खिलाफत ची. गांधींना अस वाटलं होतं की जर आपण हा मुद्दा उचलून धरला तर आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य करता येईल. त्यांना त्यांची चूक कळली. त्यांनी त्याची जाहीर माफी मागितली होती. २३) तुझ्या ह्या मुद्द्यावर मी काय बोलू? ज्यांना फाळणीच्या झळा सोसाव्या लागल्या त्यांच्या मनात तरी गांधींबद्दल एवढा द्वेष आहे का??? गांधींचे बहुसंख्य अनुयायी हे सुद्धा हिंदूच होते की!!आणि हो ते बंगाल आनि पंजाब मधील हिंदू पण होते. २४) फक्त काही लोकांचं वय झालं म्हणून कधी कोणी फाळणी स्वीकारत नाही मित्रा. फाळणी का झाली हे जर समजून घ्यायचं असेल तर शेषराव मोरे यांचे "गांधीजींनी आणि काँग्रेस ने अखंड भारत का नाकारला" हे पुस्तक वाच. २५) नेताजी आणि पटेल हे कधी गांधींच्या सोबत गेले नाहीत?????????? विनोद भारी करतो रे मित्रा तू. २६) रत्नागिरी मध्ये अस्पृश्यता नाही असं तुझं म्हणणं आहे का?? जे सावरकरांनी रत्नागिरी मध्ये करायचा प्रयत्न केला, तेच गांधींनी पूर्ण भारत भर करण्याचा प्रयत्न केला. हजारो वर्षांचे दोष दूर करण्यासाठी कितीतरी पिढ्यांनी प्रयत्न करावे लागतात. 20 किंवा 30 वर्षे हा फार कमी काळ आहे. शिक्षण प्रसाराचे म्हणशील तर गांधींच्या अनुयायांनी प्रचंड मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांना विसरायची गरज नाही मित्रा. गांधींनी स्वतः लग्नात जाण्यासाठी असा नियम केला होता की त्या लग्नात किमान एक दलित असावा. त्यांनी आंतरजातीय लग्नाला पाठिंबा दिला. त्यासाठी प्रयत्न केले. तोंड पाटीलकी करणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. शेवटी ते गीतेच्या निष्काम कर्मयोगावर विश्वास ठेवणार होते. अखंड काम करत राहणे हाच त्यांचा स्वभाव होता. तू सुज्ञ आहे. तुला वेगळं सांगायची गरज नाही. हो कि नाही? राकेश परब


Rakesh Parab

Tue , 20 February 2018

प्रिय गामा पैलवान, १) सामान्य माणसाची चळवळ करायची शक्ती अमर्याद नसते. एका ठराविक काळानंतर चळवळी मधील जोम संपत चालल्यावर ती मागे घेणे हाच चांगला मार्ग असतो. चौरीचारा हे फक्त निमित्त होतं. उद्या 10 पावलं पुढे जाण्यासाठी आज 2 पावलं मागं येणे हे काही चुकीचे नव्हते. २) गांधीवादी आवृत्ती म्हणजे काय? गांधींची अहिंसा आणि बुद्धाची अहिंसा यात काय फरक होता? उलट बुद्धाची अहिंसा ही व्यक्तिगत होती. गांधींनी अहिंसेचा एक शस्त्र म्हणून वापर केला. आणि हो, मी बुद्ध , महावीर यांचं नाव घेतल्यावर तू म्हणतोस कि गांधीवादी आवृत्ती भंपक होती. महावीर किती टोकाचे अहिंसा सांगायचे माहित आहे का? गांधींची अहिंसा हि निर्भय बनवणारी अहिंसा होती. जी गोष्ट आपल्याला चुकीची वाटते त्याला विरोध करून त्याचे सर्व परिणाम सहन करायला लावणारी होती. ३) भारताने करार पाळण्याची गरज नाही? का बरं? आणि हो पाकिस्तानचे आक्रमण त्याच्या आधी झालं होतं. १९४७ च्या ऑक्टोबर मध्ये. ४) गांधी दिल्ली मधील दंगली थांबविण्यासाठी देखील उपोषणाला बसले होते. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वाच ५) कधी पेटवला??????? मित्रा इतिहास नाकारल्याने तो बदलत नाही. ६) ते विषयांतर नव्हते, ते एक उदाहरण होते. बहुसंख्य लोक विश्वास ठेवतात म्हणून एखादी खोटी गोष्ट खरी ठरत नाही. ७) विभक्त मतदारसंघ कुणी दिले? काँग्रेस तर्फे कुणी सही केली? आणि हो ज्या हिंदू आणि मुस्लिम ऐक्यासाठी टिळकांनी लखनौ करार केला त्याच साठी गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. ती त्यांची चूक त्यांनी मोकळेपणाने मान्य केली. विभक्त मतदारसंघ चुकीचे आहेत हे टिळकांचे शिष्य मान्य करतील का? ८) आंबेडकरांच्या त्या मुद्द्याचा प्रतिवाद करताना प्रा नरहर कुरुंदकर म्हणतात, " जर भारतात लोकसंख्येची आदलाबदल झाली असती, तर उरलेला भारत हा सेक्युलर राहिला असता का?" विचार करून बघ. ज्यांना हा देश हिंदू राष्ट्र करायचा आहे त्यांचं सोड. पण नेताजी, भगतसिंग ह्या लोकांनी हि लोकसंख्येची आदलाबदल मान्य केली असती का? ९) त्यावेळी साक्षरता काय होती ? किती लोक वर्तमान पत्र वाचू शकत होते? गांधींच्या चळवळीत अडाणी लोक नव्हते का? आणि हो, त्यावेळी जर मीडिया ला ताकद होती , तर मग मीडियाचा वापर करणे चुकीचे आहे का? अगदी टिळकांपासून सर्व नेते आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्तमानपत्र सुरु करायचे. त्यात चुकीचं असं काही नाही. १०) हा मुद्दा तू स्वतःच खोडून काढतो आहेस. लढे उभारले नाहीत का? त्यांची फलनिष्पत्ती शून्य होती हे सांगण्यासाठी तरी किमान लढे उभारले गेले हे मान्य करावे लागते कि!!!!! ११) भारताला 1930-31 मध्ये क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होतं? आणि इंग्रजांनी ते दिलं असतं नाही का!!! कि गांधी त्यांना म्हणाले होते आम्हाला स्वातंत्र्य देऊ नका? सविनय कायदे भंग सुरु केल्याने स्वातंत्र्य मिळाले नाही असं म्हणायचं आहे का तुला? आणि इथे श्रेय घ्यायचा प्रश्न येताच नाही. गांधींनी कोणतंच आंदोलन श्रेय घेण्यासाठी केलं नव्हतं. त्यांना तशी गरज पण नव्हती. इंग्रजांचे एक दोन अधिकारी मारल्यानंतर इंग्रज काही देश सोडून जाणार नव्हते. आणि मित्रा भगतसिंग यांचा काटा काढला??????? अरे मित्रा भगतसिंग यांना वाचवण्यासाठी गांधींनी सर्व प्रयत्न केले. viceroy ने त्यांचे म्हणणे मान्य केले नाही. १२) १९०५ ते १९११ ह्या काळात ज्या काही लोक चळवळी झाल्या त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे बंगालची फाळणी रद्द होणे. १३) मित्रा, मग भारतीय सैन्य इंग्रजांच्या मागे का उभं राहिलं? आणि त्याच शूर भारतीयांचा इंग्रजांनी नंतर पराभव कसा केला? भारतीय सैन्य होते यात काही शंकाच नाही. ते ब्रिटिशांचे सामर्थ्य होते हे तरी मान्य आहे की नाही? १४) ह्याच श्रेय तू जर नेताजींना देत असेल तर माझी काही हरकत नाही. शेवटी नेताजी हे सुद्धा गांधींच्या चळवळी तील एक नेते होते हे नको विसरू म्हणजे झालं!!!! १५) आणि हे नक्षलवादी किंवा माओवादी कोण आहेत? ते भारतीय नाहीत का? आता तूच बघ माओवाद्यांकडे एवढी शस्त्रे आहेत. तरी पण त्यांना भारतपासून फुटून निघता आलेले नाही. त्यांचा सुद्धा शस्त्रांवर विश्वास आहे. जर शस्त्रांमुळे क्रांती होत असती तर मग आतापर्यंत ते यशस्वी झाले पाहिजेत. हो कि नाही? १६) मित्रा, तू नेताजी आणि नथुराम गोडसे यांचं नाव एकत्र घेतलं होतंस. गांधींना मारणं हा पराक्रम नव्हता हे मान्य आहे. मग ते नथुराम ने का केलं? इंग्रजांना मारण्यासाठी नथुराम चा हात का नाही उचलला गेला? १७) हल्ल्यासाठी मंडेला यांनी परवानगी दिली होती? माझ्या माहिती नुसार तरी नाही. ते तेव्हा तुरुंगात होते. आणि हो जर त्यांनी ह्याला परवानगी दिली होती तर मग ते तुझे हिरो व्हायला पाहिजे. villain नाही. बरोबर ना?


Rakesh Parab

Tue , 20 February 2018

प्रिय गामा पैलवान, १) सामान्य माणसाची चळवळ करायची शक्ती अमर्याद नसते. एका ठराविक काळानंतर चळवळी मधील जोम संपत चालल्यावर ती मागे घेणे हाच चांगला मार्ग असतो. चौरीचारा हे फक्त निमित्त होतं. उद्या 10 पावलं पुढे जाण्यासाठी आज 2 पावलं मागं येणे हे काही चुकीचे नव्हते. २) गांधीवादी आवृत्ती म्हणजे काय? गांधींची अहिंसा आणि बुद्धाची अहिंसा यात काय फरक होता? उलट बुद्धाची अहिंसा ही व्यक्तिगत होती. गांधींनी अहिंसेचा एक शस्त्र म्हणून वापर केला. आणि हो, मी बुद्ध , महावीर यांचं नाव घेतल्यावर तू म्हणतोस कि गांधीवादी आवृत्ती भंपक होती. महावीर किती टोकाचे अहिंसा सांगायचे माहित आहे का? गांधींची अहिंसा हि निर्भय बनवणारी अहिंसा होती. जी गोष्ट आपल्याला चुकीची वाटते त्याला विरोध करून त्याचे सर्व परिणाम सहन करायला लावणारी होती. ३) भारताने करार पाळण्याची गरज नाही? का बरं? आणि हो पाकिस्तानचे आक्रमण त्याच्या आधी झालं होतं. १९४७ च्या ऑक्टोबर मध्ये. ४) गांधी दिल्ली मधील दंगली थांबविण्यासाठी देखील उपोषणाला बसले होते. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वाच ५) कधी पेटवला??????? मित्रा इतिहास नाकारल्याने तो बदलत नाही. ६) ते विषयांतर नव्हते, ते एक उदाहरण होते. बहुसंख्य लोक विश्वास ठेवतात म्हणून एखादी खोटी गोष्ट खरी ठरत नाही. ७) विभक्त मतदारसंघ कुणी दिले? काँग्रेस तर्फे कुणी सही केली? आणि हो ज्या हिंदू आणि मुस्लिम ऐक्यासाठी टिळकांनी लखनौ करार केला त्याच साठी गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. ती त्यांची चूक त्यांनी मोकळेपणाने मान्य केली. विभक्त मतदारसंघ चुकीचे आहेत हे टिळकांचे शिष्य मान्य करतील का? ८) आंबेडकरांच्या त्या मुद्द्याचा प्रतिवाद करताना प्रा नरहर कुरुंदकर म्हणतात, " जर भारतात लोकसंख्येची आदलाबदल झाली असती, तर उरलेला भारत हा सेक्युलर राहिला असता का?" विचार करून बघ. ज्यांना हा देश हिंदू राष्ट्र करायचा आहे त्यांचं सोड. पण नेताजी, भगतसिंग ह्या लोकांनी हि लोकसंख्येची आदलाबदल मान्य केली असती का? ९) त्यावेळी साक्षरता काय होती ? किती लोक वर्तमान पत्र वाचू शकत होते? गांधींच्या चळवळीत अडाणी लोक नव्हते का? आणि हो, त्यावेळी जर मीडिया ला ताकद होती , तर मग मीडियाचा वापर करणे चुकीचे आहे का? अगदी टिळकांपासून सर्व नेते आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्तमानपत्र सुरु करायचे. त्यात चुकीचं असं काही नाही. १०) हा मुद्दा तू स्वतःच खोडून काढतो आहेस. लढे उभारले नाहीत का? त्यांची फलनिष्पत्ती शून्य होती हे सांगण्यासाठी तरी किमान लढे उभारले गेले हे मान्य करावे लागते कि!!!!! ११) भारताला 1930-31 मध्ये क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होतं? आणि इंग्रजांनी ते दिलं असतं नाही का!!! कि गांधी त्यांना म्हणाले होते आम्हाला स्वातंत्र्य देऊ नका? सविनय कायदे भंग सुरु केल्याने स्वातंत्र्य मिळाले नाही असं म्हणायचं आहे का तुला? आणि इथे श्रेय घ्यायचा प्रश्न येताच नाही. गांधींनी कोणतंच आंदोलन श्रेय घेण्यासाठी केलं नव्हतं. त्यांना तशी गरज पण नव्हती. इंग्रजांचे एक दोन अधिकारी मारल्यानंतर इंग्रज काही देश सोडून जाणार नव्हते. आणि मित्रा भगतसिंग यांचा काटा काढला??????? अरे मित्रा भगतसिंग यांना वाचवण्यासाठी गांधींनी सर्व प्रयत्न केले. viceroy ने त्यांचे म्हणणे मान्य केले नाही. १२) १९०५ ते १९११ ह्या काळात ज्या काही लोक चळवळी झाल्या त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे बंगालची फाळणी रद्द होणे. १३) मित्रा, मग भारतीय सैन्य इंग्रजांच्या मागे का उभं राहिलं? आणि त्याच शूर भारतीयांचा इंग्रजांनी नंतर पराभव कसा केला? भारतीय सैन्य होते यात काही शंकाच नाही. ते ब्रिटिशांचे सामर्थ्य होते हे तरी मान्य आहे की नाही? १४) ह्याच श्रेय तू जर नेताजींना देत असेल तर माझी काही हरकत नाही. शेवटी नेताजी हे सुद्धा गांधींच्या चळवळी तील एक नेते होते हे नको विसरू म्हणजे झालं!!!! १५) आणि हे नक्षलवादी किंवा माओवादी कोण आहेत? ते भारतीय नाहीत का? आता तूच बघ माओवाद्यांकडे एवढी शस्त्रे आहेत. तरी पण त्यांना भारतपासून फुटून निघता आलेले नाही. त्यांचा सुद्धा शस्त्रांवर विश्वास आहे. जर शस्त्रांमुळे क्रांती होत असती तर मग आतापर्यंत ते यशस्वी झाले पाहिजेत. हो कि नाही? १६) मित्रा, तू नेताजी आणि नथुराम गोडसे यांचं नाव एकत्र घेतलं होतंस. गांधींना मारणं हा पराक्रम नव्हता हे मान्य आहे. मग ते नथुराम ने का केलं? इंग्रजांना मारण्यासाठी नथुराम चा हात का नाही उचलला गेला? १७) हल्ल्यासाठी मंडेला यांनी परवानगी दिली होती? माझ्या माहिती नुसार तरी नाही. ते तेव्हा तुरुंगात होते. आणि हो जर त्यांनी ह्याला परवानगी दिली होती तर मग ते तुझे हिरो व्हायला पाहिजे. villain नाही. बरोबर ना?


Gamma Pailvan

Tue , 20 February 2018

राकेश परब, तुमची एकेक विधानं घेऊन त्यावर माझी मतं सांगतो. १. >> त्या दंगलींमुळे त्यांनी त्यांनी चळवळ मागे घेतली नाही. << हाच तर माझा आक्षेप आहे. इतर वेळेस चळवळी मागे घेतल्या नाहीत. मग चौरीचौरा घटनेने असं काय आभाळ कोसळून पडणारं होतं? २. >> अहिंसा भंपक असेल तर मग बुद्ध , महावीर, नानक, कबीर हे सगळेच भंपक ठरतात. आणि हो आंबेडकर सुद्धा! << अहिंसा भंपक नसून तिची गांधीवादी आवृत्ती भंपक आहे. ३. >> हा प्रश्न करार पाळण्याचा होता. << भारताने करार पाळण्याची गरज नाही. कारण की तो पाळल्याने शत्रूराष्ट्रास आक्रमण करायला मिळतं. शिवाजीमहाराजांनी असे अनेक करार धाब्यावर वसवले आहेत. ४. >> आणखीन एक गांधींनी ते उपोषण दिल्ली मधील दंगली थांबव्यात यासाठी सुद्धा केले होते. << हे धादांत असत्य आहे. भारत व पाकिस्तानान्त्ला व्यवहार रिझर्व्ह बँक बघंत होती. तिच्या अधिकाऱ्यांना बारीकसारीक घडामोडींची माहिती होती. तिच्या अहवालानुसार गांधीं ५५ कोटी रुपयांसाठीच उपासास बसले होते. ५. >> जो माणूस एका हाकेने पूर्ण देश पेटवू शकतो, त्या माणसाची ताकद काय असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. << कधी पेटवलेला देश? ०८ ऑगस्ट १९४२ ला चलेजाव चळवळीची घोषणा केल्यावर दुसऱ्याच दिवशी सगळे काँग्रेसी नेते तुरुंगात होते. ही कसली डोंबल्याची चळवळ! ६. >> पृथ्वी स्थिर आहे ह्यावर लोक विश्वास ठेवायचे! << विषयांतर. ७. >> ओ महाशय ह्या वर्षी गांधी कुठे होते हे तरी माहित आहे का? ह्या वर्षी लखनौ करारामध्ये मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ कुणी दिले?<< काँग्रेसने दिले. १८५७ साली जसे हिंदू मुस्लीम एकदिलाने लढले तसेच १९१६ नंतर लढतील असा विश्वास होता त्या काळी म्हणून. बंगालची फाळणी रद्द करवून क्रांतिकारकांनी सामर्थ्य दाखवलं होतं. गांधींनी या ऐक्यास तडा दिला. खिलाफत चळवळीची नसती धोंड हिंदूंच्या गळ्यान बांधली. तरीपण असहकार चळवळ धडधडून पेटली तेव्हा अचानक मागे घेऊन अवसानघात केला. १९२१ साली मोपल्यांनी बंड करून केरळात हिंदूंवर नृशंस अत्याचार व कत्तली केल्या तेव्हा हाच गांधी मोपल्यांना धर्मप्रेमाचं प्रमाणपत्र देत होता. ८. >> आंबेडकरांचा शब्दच जर प्रमाण मानायचा ठरवला तर मग भारताची फाळणी मान्य करावी लागते. शेवटी आंबेडकर हे फाळणीचे कट्टर पुरस्कर्ते होते. वाचा "Thoughts on Pakistan".<< त्याच पुस्तकात लोकसंख्येच्या आदलाबदलीची मागणी केली होती. नुसती फाळणी नको. असं म्हणून आंबेडकरांनी हिंदूंना धोक्याची सूचना दिली होती. गांधींनी काय केलं हिंदूंसाठी? ९. >> आणि हो त्यावेळी मीडियाची ताकद आजच्या सारखी होती का? << हो. १०. >> त्यावेळी twitter, फेसबुक नसून सुद्धा गांधींनी प्रचंड मोठे लढे उभारले होते. एका मीडिया महात्म्याला हे करणे शक्यच नव्हते << कसले डोंबल्याचे लढे उभारले! फलनिष्पत्ती तर शून्य होती. ११. >> मग ह्याच तर्काने भारताला 1930-31 मध्येच स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आझाद हे महान क्रांतिकारक तेव्हा सक्रिय होते. << हे बरोबर बोललात. हो, भारताला १९३०-३१ मध्येच स्वातंत्र्य मिळायला हवं होतं. इंग्रजी सत्तेचं डोकं फोडण्याऐवजी या महात्म्याला सविनय कायदेभंगाची खाज सुटली. कारण की जर तेव्हा भारत स्वतंत्र झाला असता तर श्रेय भगतसिंगांना मिळालं असतं ना! त्याचा काटा काढल्यावर हा महात्मा साळसूदपणे गोलमेज परिषदेस रवाना झाला. मांजराने डोळे मिटून दूध प्यायलं तरी लोकं बघंत असतात म्हंटलं. १२. >> आणि बंगालची फाळणी हि काही शास्त्रांना घाबरून रद्द केलेली नव्हती. त्याच्या आधी सुद्धा क्रांतिकारी चळवळ होतीच कि! << मग कशामुळे बंगालची फाळणी रद्द केली? १३. >> लष्करी सामर्थ्य जर दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाले असेल तर किमान त्या आधी तरी इंग्लंड कडे सामर्थ्य होते हे तरी मान्य केले पाहिजे. << जे काही होतं ते भारतीय सैनिकांचं बळ होतं. आशिया प्रशांत विभागांतून इंग्रज अधिकाऱ्यांनी जपान्यांसमोर पळ काढल्यामुळे भारतीय सैनिक युद्धबंदी झाले. त्यांतून नेताजींनी आझाद हिंद सेना उभी केली. इंग्रजांनी स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला. १४. >> इंग्रज का सोडून गेले? ह्या देशातील सैन्य आणि प्रशासन आता आपल्या अधिकारात नाही आणि ह्या पुढे आपण ह्या देशावर राज्य करू शकत नाही ह्याची जाणीव झाल्याने इंग्रजांनी देश सोडला. << अगदी बरोबर. हे गांधींमुळे झालं नसून नेताजींमुळे झालं आहे. भले नेताजी गांधींचा आदरपूर्वक उल्लेख करीत असले तरीही. १५. >> माओवादी आणि नक्षलवादी हे परके आहेत असे मानायचे? का ? ते काही सात समुद्रापालिकडून आले नाहीत. त्यांना परके का मानायचे? << कारण त्यांना निरपराध्यांना ठार मारून भारताचे तुकडे तुकडे करायचे आहेत. १६. >> निशस्त्र गांधींवर गोळ्या घालणे हा काही पराक्रम नाही!!!!! << कोण म्हणतोय पराक्रम आहे? नथुरामसुद्धा त्या हत्येस पराक्रम म्हणंत नाही. १७. >> यांनी शास्त्र टाकून द्यायच्या आधीची आहे. शस्त्रावरचा त्यांचा विश्वास उडाला म्हणून ते जन आंदोलांनाकडे वळले. हाच तर माझा मुद्दा आहे. << सौ चूहे खाके बिल्ली चाली हाज. चर्च स्ट्रीट स्फोट १९८३ साली झाला. त्यावेळेस मंडेलाने तुरुंगातून या स्फोटास परवानगी दिली होती. कुठे गेली अहिंसा? कसलं जन-आंदोलन? १८. >> लोक सावरकरांच्या ऐवजी गांधींच्या मागे का गेले? << कोण गेलंय गांधींच्या मागे? मी कोणाचंही नाव ऐकलेलं नाहीये. हां, राजकीय फायद्यासाठी अनेकांनी गांधींचं नाव घेतलंय. १९. >> गांधींच्या आधी स्त्रियांचे लढ्यातले प्रमाण किती होते हे जरी बघितले तरी कळून येईल. << स्त्रिया सुद्धा भरपूर प्रमाणावर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत्या. इथे एक प्रातिनिधीक यादी आहे : https://en.wikipedia.org/wiki/All_India_Mahila_Congress#Pre-independence शिवाय गांधी जवळच्या स्त्रियांना कशा प्रकारे वागवायचे ते मी सांगंत बसंत नाही. २०. >> पण अखिल भारतीय पातळीवर पहिला लढा हा गांधींनी सुरु केला. << चूक. अखिल भारतीय पातळीवर लढा गांधींच्या खूप आधीपासून चालू झाला होता. २१. >> आणि खुद्द टिळक हेच गांधींचे समर्थक होते. जन आंदोलनाचा आणि त्याआधारे सरकारवर दडपण आणण्याचा मार्ग हा टिळकांचा होता. टिळकांनी गांधींना पूर्ण समर्थन दिले होते. << नेमक्या याच सदिच्छांची गांधींनी वाट लावली. २२. >> ज्या कमाल पाशाला भारताबद्दल आणि गांधींबद्दल काही माहित नव्हते, त्याचे मत प्रमाण मानायचे का?<< हो. कारण ते मत भारताबद्दल नसून गांधींबद्दल आहे. कमाल पाशास लोकशाही आणायची होती, तर याउलट गांधींना खिलाफत चालू ठेवायची होती. नको तिकडे नाक खुपसायची नसती हौस. दुसरं काय! वा रे गांधी! २३. >> आइनस्टाइन गांधींबद्दल काय म्हणाला होता? << आइनस्टाइनच्या बापाचं काय जातंय गांधींचा उदोउदो करायला. फाळणीची झळा सोसाव्या लागलेल्या का त्याला? २४. >> आणि पटेलांचं वय झालं होतं? मित्रा, पटेल हे 1917 पासून गांधींबरोबर होते. तेव्हा त्यांचे वय काय होते? ४१ वर्षे. आणि नेताजी? त्यांचे वय काय होते? << पटेलांचं १९४७ साली वय झालं होतं. नेहरूंचंही झालं होतं. सगळ्यांचीच वयं झाली होती. द लास्ट डेज ऑफ ब्रिटीश राज या पुस्तकात नेहरूंच्याच शब्दांत : 'The truth is that we were tired men and we were getting on in years too. Few of us could stand the prospect of going to prison again. And if we had stood for united India ... prison obviously awaited us. ....... The plan for partition offered a way out ...' २५. >> तुला असे वाटते की पटेल आणि नेताजी यांना स्वतःचे डोके नव्हते. ते वय झाले म्हणून गांधी नेहरूंबरोबर गेले असे म्हणणे हा त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. ते प्रचंड बुद्धिमान होते आणि लोकशाही वादी होते म्हणून ते गांधी नेहरूंबरोबर होते. << नेताजी आणि पटेल गांधीच्या सोबत कधीच गेले नव्हते. २६. >> गांधींची कोणतीच चळवळ रचनात्मक नव्हती असं का वाटतं? अस्पृश्यता निवारण, खादी, शिक्षण प्रसार, स्वदेशी ग्रामोद्योग ह्यातली एकही चळवळ रचनात्मक नव्हती की काय? << सावरकरांनी रत्नागिरीतली अस्पृश्यता संपवली तशी गांधींनी एकतरी कामगिरी केलीये का? उगीच बोलाची कढी आणि बोलाचाच भात ! मुंबईच्या स्वदेशी मिल मध्ये टिळकांचा फोटो आहे. शिक्षण प्रसाराचं म्हणाल तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळक-आगरकरांनी उभारली, तसं गांधींनी काय केलं? रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत सावरकरांनी अस्पृश्यता निवारण केलं, तसं गांधींनी काय केलं? करून करून काय केलं तर तोंडपाटीलकी. म्हणे चरखा चलाके चलाके लेंगे स्वराज्य लेंगे. नाही म्हणायला खादीचा प्रसार केला. पण त्याचा भराच्या स्वातंत्र्याशी काडीमात्र संबंध नाही. असो. पुढील विचारप्रक्रियेस शुभेच्छा. आपला नम्र, -गामा पैलवान


Rakesh Parab

Fri , 16 February 2018

प्रिय गामा पैलवान, १) चौरीचौराच्या आधी सुद्धा असहकार चळवळी मध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता. तेव्हा गांधींनी ती चळवळ मागे घेतली नव्हती. चौरीचौरा हे निमित्त होते. अगदी जालियनवाला बाग हत्याकांडानंतर झालेल्या दंगली सुद्धा गांधींनी दुर्लक्षित केल्या होत्या. त्या दंगलींमुळे त्यांनी त्यांनी चळवळ मागे घेतली नाही. अहिंसा भंपक असेल तर मग बुद्ध , महावीर, नानक, कबीर हे सगळेच भंपक ठरतात. आणि हो आंबेडकर सुद्धा! २) ५५ कोटींचा प्रश्न आता काढलात हे फार बरे झाले. पटेल ह्यांच्या दृष्टीने पैसे लगेच द्यायची गरज नव्हती. याउलट नेहरू, माऊंटबॅटन ह्यांना मात्र भारताने कायद्याचे पालन करावे असे वाटत होते. हा प्रश्न करार पाळण्याचा होता. आणखीन एक गांधींनी ते उपोषण दिल्ली मधील दंगली थांबव्यात यासाठी सुद्धा केले होते. आज ना उद्या ते पैसे पाकिस्तानला द्यावे लागणार होते. हे टेररीस्ट financing नव्हते. राहता गोष्ट राहिली ती गांधींच्या शक्तीची. त्यावेळचा viceroy म्हणाला होता "Gandhi is one man army". जो माणूस एका हाकेने पूर्ण देश पेटवू शकतो, त्या माणसाची ताकद काय असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ३) किती लोक विश्वास ठेवतात ह्यामुळे सत्य बदलत नाही. एक काळ असा होता की पृथ्वी स्थिर आहे ह्यावर लोक विश्वास ठेवायचे! ४) १९१६? ओ महाशय ह्या वर्षी गांधी कुठे होते हे तरी माहित आहे का? ह्या वर्षी लखनौ करारामध्ये मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ कुणी दिले? ह्या वर्षी काँग्रेस चे अध्यक्ष कोण होते? तेव्हा टिळक ते देशाचे नेते होते गांधी नव्हे. गांधींनी वसाहतींचे स्वराज्य नाकारायचा प्रश्नच येत नाही. पुढे तर गांधींनी पूर्ण स्वराज्य मागितले, वसाहतीचे नाही. गांधींना भारताच्या करोडो लोकांनी सेनापती बनवले होते. आंबेडकरांचा शब्दच जर प्रमाण मानायचा ठरवला तर मग भारताची फाळणी मान्य करावी लागते. शेवटी आंबेडकर हे फाळणीचे कट्टर पुरस्कर्ते होते. वाचा "Thoughts on Pakistan". आणि हो त्यावेळी मीडियाची ताकद आजच्या सारखी होती का? त्यावेळी twitter, फेसबुक नसून सुद्धा गांधींनी प्रचंड मोठे लढे उभारले होते. एका मीडिया महात्म्याला हे करणे शक्यच नव्हते. ५) मग ह्याच तर्काने भारताला 1930-31 मध्येच स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आझाद हे महान क्रांतिकारक तेव्हा सक्रिय होते. आणि बंगालची फाळणी हि काही शास्त्रांना घाबरून रद्द केलेली नव्हती. त्याच्या आधी सुद्धा क्रांतिकारी चळवळ होतीच कि! ६) हा मुद्दा तर तूच खोडून काढतो आहेस. लष्करी सामर्थ्य जर दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाले असेल तर किमान त्या आधी तरी इंग्लंड कडे सामर्थ्य होते हे तरी मान्य केले पाहिजे. हिटलर सारखा हुकूमशहा एवढी तयारी करून युद्ध सुरू करतो कारण त्याला इंग्लंड च्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना असते. भारत हा लष्करी ताकदीवर ताब्यात ठेवला नाही असं तू कशावरून सांगतोय तेच कळत नाही. 1857 च्या उठावात हेच लष्करी बळ वापरून तो उठाव मोडला होता. भारताच्या स्वातंत्र्यसाठी जागतिक परिस्थिती काही अंशी जबाबदार आहे ह्यात काही शंका नाही. ७) इंग्रज का सोडून गेले? ह्या देशातील सैन्य आणि प्रशासन आता आपल्या अधिकारात नाही आणि ह्या पुढे आपण ह्या देशावर राज्य करू शकत नाही ह्याची जाणीव झाल्याने इंग्रजांनी देश सोडला. ८) माओवादी आणि नक्षलवादी हे परके आहेत असे मानायचे? का ? ते काही सात समुद्रापालिकडून आले नाहीत. त्यांना परके का मानायचे? ९) नथुराम गोडसे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची तुलना?????????? चांगला विनोद आहे. नथुरामची गोळी कधी ब्रिटिशांविरुद्ध किंवा जिनांविरुद्ध चालली नाही. निशस्त्र गांधींवर गोळ्या घालणे हा काही पराक्रम नाही!!!!! १०) नेल्सन मंडेलांबद्दल नवीन माहिती संगीतली हे छान. पण ती कधीची आहे ते तरी बघ कि मित्रा. त्यांनी शास्त्र टाकून द्यायच्या आधीची आहे. शस्त्रावरचा त्यांचा विश्वास उडाला म्हणून ते जन आंदोलांनाकडे वळले. हाच तर माझा मुद्दा आहे. ११) तू कुणाच्या मागे जातोस ह्याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.आणि हो तू हिंदुत्ववादी आहेस हे सांगितलं ते बरं झालं. १२) गांधींनी निर्भयतेच्या नावाखाली मूर्ख बनवले म्हणजे काय केले? आंदोलन उभे केले. लढा उभारला. हे सगळं करण्यापासून हिंदुत्ववाद्यांना कुणी रोखले होते? त्यांना लोकांना आपल्या बाजूने का वळवता आले नाही? लोक सावरकरांच्या ऐवजी गांधींच्या मागे का गेले? जरा विचार कर. १३) हा मुद्दा निखालस खोटा आहे. गांधींच्या आधी स्त्रियांचे लढ्यातले प्रमाण किती होते हे जरी बघितले तरी कळून येईल. लोकांची जागृती टिळकांनी वाढवली ह्यात काही शंका नाही. पण अखिल भारतीय पातळीवर पहिला लढा हा गांधींनी सुरु केला. आणि खुद्द टिळक हेच गांधींचे समर्थक होते. जन आंदोलनाचा आणि त्याआधारे सरकारवर दडपण आणण्याचा मार्ग हा टिळकांचा होता. टिळकांनी गांधींना पूर्ण समर्थन दिले होते. १४) ज्या कमाल पाशाला भारताबद्दल आणि गांधींबद्दल काही माहित नव्हते, त्याचे मत प्रमाण मानायचे का? आइनस्टाइन गांधींबद्दल काय म्हणाला होता? माऊंटबॅटन काय म्हणाले? आणि पटेलांचं वय झालं होतं? मित्रा, पटेल हे 1917 पासून गांधींबरोबर होते. तेव्हा त्यांचे वय काय होते? ४१ वर्षे. आणि नेताजी? त्यांचे वय काय होते? तुला असे वाटते की पटेल आणि नेताजी यांना स्वतःचे डोके नव्हते. ते वय झाले म्हणून गांधी नेहरूंबरोबर गेले असे म्हणणे हा त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. ते प्रचंड बुद्धिमान होते आणि लोकशाही वादी होते म्हणून ते गांधी नेहरूंबरोबर होते. १५) काँग्रेस का विरोध करत आहे हे सांगायला मी काही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. तू हा प्रश्न राहुल गांधींना विचार की मित्रा!!! गांधी किंवा RSS खोटं आहे हे मी म्हटले नाही. इथे मुद्दा संघाचा नव्हताच. गांधींची कोणतीच चळवळ रचनात्मक नव्हती असं का वाटतं? अस्पृश्यता निवारण, खादी, शिक्षण प्रसार, स्वदेशी ग्रामोद्योग ह्यातली एकही चळवळ रचनात्मक नव्हती की काय? बाकी माझ्या सारखी अडाणी लोकं तुला काय सांगणार. तू सुज्ञ आहे . कळावे, राकेश परब


Gamma Pailvan

Fri , 16 February 2018

राकेश परब, लैच प्येटलं की राव तुमी. पण आमास्नी ऐसी प्येटलेली मान्साच आवडत्यात. थेट मुद्द्याचं बोलूया. १. >> चौरीचौराचे निमित्त करून गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. पण तेच गांधी 1942 च्या आंदोलनात प्रचंड हिंसाचार होऊन सुद्धा ते मागे घेत नाही. << ही अक्कल यायला २५ वर्षं खर्ची घालायची काय गरज होती? याचाच दुसरा अर्थ असा की अहिंसा ही भंपक कल्पना आहे. २. >> जेव्हा पाकिस्तानचे सैन्य भारतावर हल्ला करते तेव्हा गांधी आपली पूर्ण ताकद नेहरूंच्या मागे उभी करतात. << काहीही हं रा.प. हाच गांधी टेररिस्ट फायनान्सिंग करीत होता. नेहरूंच्या मागे उभी करायला अशी काय शक्ती होती या गांधीकडे? मात्र पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत म्हणून उपासाला बसायचा निर्लज्जपणा पुरेपूर ठासून भरला होता याच्या अंगात. ३. >> आंदोलनाला ओहोटी लागल्यावर सन्मान पूर्वक माघार घेण्यासाठी गांधींनी चौरीचौराचा वापर केला. << शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का यावर! ४. >> युद्ध कधी सुरु करायचे याच्या एवढेच ते कधी थांबवायचे हे ओळ्खणाराच खरा सेनापती असतो. << मग १९१६ साली इंग्रज वसाहतींचं स्वराज्य द्यायला तयार होते तर गांधीने ते का नाकारलं? हा कसला डोंबल्याचा सेनापती! कोणी केलं याला सेनापती? आंबेडकर याला 'मीडिया महात्मा' म्हणायचे ते उगीच नाही. ५. >> बंदुकानी जर स्वातंत्र्य मिळाले असते तरी ते मूठभर लोकांमुळे मिळाले असते. त्याला व्यापक जनाधार लाभला नसता. << हे धडधडीत असत्य आहे. बंगालच्या फाळणीच्या वेळेस व्यापक जनाधाराची काय किंमत केली इंग्रजांनी? शेवटी क्रांतिकारकांनी शस्त्र उचललं तेंव्हाच फाळणी रद्द झाली. ( क्रांतिकारक म्हणजे गांधीच्या भाषेत वाट चुकलेले मूठभर लोकं बरंका !) ६. >> आपला शत्रू हा इंग्लंड होता त्याच्यापाशी प्रचंड लष्करी ताकद होती << अजिबात नाही. भारत कधीही लष्करी ताकदीवर ताब्यात ठेवला गेलेला नाहीये. हे इंग्रजी सत्तेला पक्कं ठाऊक होतं / आहे. हे लष्करी समय दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालं. म्हणूनंच भारताला स्वातंत्र्य मिळालं. ७. >> नेताजी सुभाषचंद्र ह्यांना जपान सारख्या प्रबळ राष्ट्राची मदत मिळून सुद्धा त्यांना इंग्लंडला पराभूत करता आले नव्हते.<< नेताजी जर अयशस्वी ठरले असं मानलं तर मग इंग्रज भारत सोडून का गेले? ८. >> आणि एकदा का शस्त्रांचा मार्ग बरोबर आहे असे मानले तर मग नक्षलवाद आणि माओवाद क्षम्य मानावा लागतो. << हे बंधन का म्हणून? जसे इंग्रज परके तसेच माओवादी /नक्षलवादी परके मानायचे असतात. ९. >> शेवटी नेताजींनी सुद्धा गांधींचा आशीर्वाद का मागितला आणि त्यांनी सुद्धा 1942 च्या आंदोलनाला पाठिंबा का दिला हे सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे. << बरोबर आहे. असे प्रश्न विचारलेच पाहिजेत. नथुरामने देखील गांधींची हत्या करण्याआधी त्यांना चांगल्या कामासाठी वंदन केलं होतं. १०. >> नेल्सन मंडेला ह्यांनी शस्त्रांचा मार्ग सोडून जन आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला हा सुद्धा प्रश्न विचार. << नेल्सन मंडेला गेला खड्ड्यात. याच्यावर दक्षिण आफ्रिकेत बॉंबस्फोट करून निरपराधी लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. अधिक माहिती : https://www.nbcnews.com/news/other/us-government-considered-nelson-mandela-terrorist-until-2008-f2D11708787 आजूनेक लेख : http://www.heraldsun.com.au/news/opinion/the-dark-side-of-nelson-mandela/news-story/68f4acdbf2b0b4e6c799e458a55e6cb2?nk=d426e769997786b794f4277580360f2f-1518769832 ११. >> आणि सर्वात महत्वाचे मूठभर लोकांना बरोबर घेऊन क्रांती करणाऱ्या लेनिन च्या रशिया ची काय अवस्था झाली हे पण नीट बघ. << मी हिंदुत्ववादी असल्याने मी कम्युनिस्ट विचारसरणीच्या विरोधात आहेच. पण म्हणून मी गांधीच्या मागे जावं हे मला मान्य नाही. १२. >> "लोक निर्भय बनून सरकारला आव्हान देऊ लागले " असे तूच सांगतोस आणि तरी पण गांधींनी लोकांना निर्भय बनवले नाहीस असे तुला वाटते हा विरोधाभास नाही का? << गांधीने निर्भयतेच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवलं. बस इतकंच. १३. >> लोकांमध्ये जागृती घडली. स्त्रियांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग वाढला. लोक सरकारची हुकूमशाही अमान्य करू लागले हे आंदोलनाचे यश नाही का? << फलनिष्पत्ती शून्य होती. स्त्रियांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग गांधींच्या आधीपासून होताच. शांती दत्त, सुनीती चौधरी, शांती घोष, प्रीतीलता वड्डेदार ही नावं ऐकलेली असतीलंच तुम्ही. लोकांची जागृती टिळकांनी वाढवली. हिंदवी असंतोषाचे जनक हे टिळक होते, गांधी नाही. लोकं सरकारची हुकूमशाही अमान्य करू लागले ते गांधींच्या आधीपासून. गांधींनी नवं काय केलं? १४. >>गांधी आणि नेहरू हे ब्रिटिशांचे चमचे होते. छान! मग ह्या चमच्यांच्या मागे नेताजी , सरदार पटेल ह्यांच्यासारखे बुद्धिमान नेते का गेले हे सांगितलं तर माझ्यावर फार उपकार होतील. << गांधी हा ब्रिटीशांचा चमचा आहे हे ओटोमन साम्राज्य खालसा करून तुर्कस्थानात लोकशाही रुजवणाऱ्या कमाल पाशा अतातुर्क याचं मत आहे. पटेलांचं वय झालं होतं म्हणून त्यांना गांधीनेहरूंच्या मागे जावं लागलं (असावं असा माझा तर्क आहे). १५. >>साने गुरुजी, विनोबा भावे, स्वामी रामानंद तीर्थ ह्यांच्या सारख्या सत्तेपासून दूर राहणे पसंत करणारे लाखो कार्यकर्ते त्यांनी तयार केले. ह्यातच सर्व काही आले. << मग आज हेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो आहे तर काँग्रेसचा त्याला विरोध कशासाठी? एकतर गांधी खोटा आहे किंवा आरेसेस खोटे आहेत. गांधींजी लोकांवर पकड होती हे मान्य. पण त्यातनं कुठलीही रचनात्मक चळवळ उभी राहू शकली नाही. मग काय उपयोग या लोकप्रियतेचा? आपला नम्र, -गामा पैलवान


Sourabh suryawanshi

Wed , 14 February 2018

Rakesh parab सर तुम्ही पैलवानांना अस्मान दाखवले...


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

१०) गांधी आंबेडकर ह्यांच्या बद्दल मी खरे लिहिले आहे ह्याचे प्रमाणपत्र दिल्याबद्दल धन्यवाद!


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

९) मोदींच्या विरोधकांना चारित्र्य नाही? छान. काँग्रेस सोडून देऊ आपण. सीताराम येचुरी, माणिक सरकार ह्यांना चारित्र्य नाही का?


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

८) नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळात आंबेडकर, श्याम प्रसाद मुखर्जी ह्यांच्या सारख्या नेत्यांना स्थान दिले होते. आपल्या विरोधकांना नेहरूंनी फार सन्मान पूर्वक वागवले. संपूर्ण काँग्रेस छान होती असे मला म्हणायचे नाही. तेव्हा सुद्धा भ्रष्टाचार होताच. त्यामुळे गांधी उद्विग्न झाले होते. राहता गोष्ट राहिली सत्तातुर असण्याची. गांधींनी कोणतेही पद स्वीकारले नाही. साने गुरुजी, विनोबा भावे, स्वामी रामानंद तीर्थ ह्यांच्या सारख्या सत्तेपासून दूर राहणे पसंत करणारे लाखो कार्यकर्ते त्यांनी तयार केले. ह्यातच सर्व काही आले.


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

७) गांधी आणि नेहरू हे ब्रिटिशांचे चमचे होते. छान! मग ह्या चमच्यांच्या मागे नेताजी , सरदार पटेल ह्यांच्यासारखे बुद्धिमान नेते का गेले हे सांगितलं तर माझ्यावर फार उपकार होतील.


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

६) नेताजींच्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे काही झाले त्याची कारण मीमांसा खुद्द प्रा. नरहर कुरुंदकर ह्यांनी केली आहे. जर ती वाचालीस तर कदाचित तुझा गैरसमज दूर होईल. सुभाषबाबू त्याच्या आधी सुद्धा काँग्रेस अध्यक्ष झाले होते!


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

४) आणि ५) यशस्वी आंदोलन म्हणजे काय हे जरा एकदा नीट सांगितलं तर फार बरं होईल. लोकांमध्ये जागृती घडली. स्त्रियांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग वाढला. लोक सरकारची हुकूमशाही अमान्य करू लागले हे आंदोलनाचे यश नाही का?


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

३) तुझा तिसरा मुद्दा तूच खोटा पडतोस. "लोक निर्भय बनून सरकारला आव्हान देऊ लागले " असे तूच सांगतोस आणि तरी पण गांधींनी लोकांना निर्भय बनवले नाहीस असे तुला वाटते हा विरोधाभास नाही का?


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

२)बंदुकानी जर स्वातंत्र्य मिळाले असते तरी ते मूठभर लोकांमुळे मिळाले असते. त्याला व्यापक जनाधार लाभला नसता. आणि सर्वात महत्वाचे आपला शत्रू हा इंग्लंड होता त्याच्यापाशी प्रचंड लष्करी ताकद होती। नेताजी सुभाषचंद्र ह्यांना जपान सारख्या प्रबळ राष्ट्राची मदत मिळून सुद्धा त्यांना इंग्लंडला पराभूत करता आले नव्हते. नेताजींच्या सैन्यात राष्ट्रनिष्ठा नव्हती असे तुला म्हणायचं आहे का? आणि एकदा का शस्त्रांचा मार्ग बरोबर आहे असे मानले तर मग नक्षलवाद आणि माओवाद क्षम्य मानावा लागतो. शेवटी नेताजींनी सुद्धा गांधींचा आशीर्वाद का मागितला आणि त्यांनी सुद्धा 1942 च्या आंदोलनाला पाठिंबा का दिला हे सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे. नेल्सन मंडेला ह्यांनी शस्त्रांचा मार्ग सोडून जन आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला हा सुद्धा प्रश्न विचार. आणि सर्वात महत्वाचे मूठभर लोकांना बरोबर घेऊन क्रांती करणाऱ्या लेनिन च्या रशिया ची काय अवस्था झाली हे पण नीट बघ.


Rakesh Parab

Fri , 09 February 2018

प्रिय गामा पैलवान, स्पर्धा परीक्षेत गांधींबद्दल किती प्रश्न असतात हे जरी बघितले स्पर्धा परीक्षा आणि गांधी यांचा काय संबंध असतो हे कळेल. मी गांधी वाचले ते माझी आवड म्हणून वाचले, परीक्षेसाठी नाही. गांधींना मी डोक्यावर चढवून ठेवायचा प्रश्नच नाही. पूर्ण जग त्यांना डोक्यावर घेते आहे. आईन्स्टाईन पासून नेल्सन मंडेला यांच्या पर्यंत आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या पासून दलाई लामांपर्यंत सर्व जणांचे आदर्श गांधी होते. एवढ्या मोठ्या लोकांनी गांधींना 'डोक्यावर चढवून' ठेवले आहे. आपण म्हणजे किस झाड कि पत्ती! आता तुझे मुद्दे बघू. १) चौरीचौराचे निमित्त करून गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. पण तेच गांधी 1942 च्या आंदोलनात प्रचंड हिंसाचार होऊन सुद्धा ते मागे घेत नाही. तेच गांधी हिटलर विरुद्ध इंग्लंडला पाठिंबा देतात. जेव्हा पाकिस्तानचे सैन्य भारतावर हल्ला करते तेव्हा गांधी आपली पूर्ण ताकद नेहरूंच्या मागे उभी करतात. हा योगायोग नाही. गांधींच्या आंदोलनाचे ते टप्पे होते. चौरीचौराच्या आधीसुद्धा हिंसाचार झालाच होता. तेव्हा आंदोलन मागे घ्यायची गरज गांधींना वाटली नव्हती. आंदोलनाला ओहोटी लागल्यावर सन्मान पूर्वक माघार घेण्यासाठी गांधींनी चौरीचौराचा वापर केला. त्यांचा लढा हा गुलामी विरुद्ध होता. अहिंसा हे केवळ एक साधन होते. युद्ध कधी सुरु करायचे याच्या एवढेच ते कधी थांबवायचे हे ओळ्खणाराच खरा सेनापती असतो.


Gokul Navale

Thu , 08 February 2018

उल्लेखनीय...!!!!


Gamma Pailvan

Thu , 08 February 2018

राकेश परब, च्यायला, स्पर्धा परीक्षांत गांधी आजून चांगलाच खपतो ! गांधीला फुकट डोक्यावर चढवून ठेवू नका. लेखातली एकेक विधानं तपासून बघूया. १. >> अहिंसा हे गांधींचे साधन होते, साध्य नाही.<< मग या साधनाची परिणामकारकता कधी गांधींनी तपासून बघितलीये का? माझ्या माहितीप्रमाणे कधीच नाही. चौरीचौरा इथे आंदोलकांनी पोलीस चौकी जाळल्याचं निमित्त पुढे करून असहकार आंदोलन मागे का घेतलं गांधींनी? २. >> लाखो करोडो लोकांच्या हाती बंदुका देऊन सशस्त्र लढा उभा करणे हे भारतासारख्या देशात जवळ-जवळ अशक्य होते. << साफ चूक. बाघा जतीन वगैरे क्रांतिकारकांनी व्यवस्थित लढा उभारला होता. त्यासाठी लाखो करोड लोकांच्या हातात शस्त्र द्यायची गरज नसते. मोजकेच लढाऊ देशप्रेमी लोकं पुरतात. या लढ्यामुळेच भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवावी लागली. शिवाय बंगालची फाळणी रद्द झाली ती वेगळीच. ३. >> गांधींचे सगळ्यात मोठे यश हे भारतीयांना निर्भय बनवण्यात होते. << आजिबात नाही. उलट लोकं निर्भय बनून सरकारला आव्हान देऊ लागले तेव्हा गांधीने कसलसं खुसपट काढून असहकार चळवळ मागे घेतली. ४. >> ही लोकमान्यता हीच गांधींची सर्वांत मोठी जमेची बाजू होती.<< हां, गांधी लोकप्रिय होता हे मात्र खरंय. पण ही लोकप्रियता यशस्वी आंदोलनात कधीच रुपांतरीत झाली नाही. ५. >> गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे सरसेनापती (हा त्यांचा आवडता शब्द) होते. << ही अत्यंत चुकीची धारणा आहे. गांधींनी एकही आंदोलन यशस्वीपणे चालवलं नाही. ६. >> प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि त्याच्यातील माणसाला सन्मान देणे, हे भारतासारख्या जाती आधारित समाज असलेल्या देशात नवीन होते.<< लोकशाही पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या सुभाषबाबूंना गांधींनी काय लायकीने वागवलं ते आम्हाला माहितीये. मोठे आलेत समान हक्क आणि सन्मानाची भाषा करणारे. ७. >> गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये असे काय साम्य होते की, गांधींनी नेहरूंना आपले राजकीय वारसदार म्हणून नेमले? << दोघेही ब्रिटीशांचे चमचे होते. बोनस माहिती म्हणून सांगतो की जिना सुद्धा चमचाच होता. ८. >> ज्याला आज आपण ‘काँग्रेस व्यवस्था’ म्हणतो, ज्यात अतिडाव्यांपासून अतिउजव्यांपर्यंत सर्वांना सामावून घेतले गेले होते, ती व्यवस्था याच उदारमतवादाचे प्रतीक होते. << घंटा तिच्यायला उदारमतवाद! सत्तातूर गिधाडांचा मेळावा होता तो. 'सत्तेची चटक लागल्यावर काय होतं त्याचं विदारक दर्शन मला घडलं आहे' असं खुद्द गांधींच १९४६ साली निवडणुकांनंतर म्हणाले. म्हणूनंच त्यांना काँग्रेस विसर्जित व्हायला हवी होती. ९. >> आज आपल्या विरोधकाचे चारित्र्यहनन करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या आणि ‘विरोधकमुक्त भारत’ निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाला गांधी आणि नेहरूंचे वावडे असणार यात काही शंका नाही.<< मोदींच्या विरोधकांना चारित्र्य आहे का? नसल्यास त्याचं हनन करायचा प्रश्नंच उद्भवंत नाही. १०. एव्हडं सगळं विरोधी हिलील्यावर हे सांगायला हरकत नाही की गांधी व आंबेडकर यांच्या संबंधांपासून पुढील लेख बऱ्यापैकी वस्तुस्थितीस धरून आहे. कीप इट अप. बाकी, गांधी बद्दल खरी मतं लिहिलीत तर परीक्षेत गुण मिळणार नाहीत. तेव्हा हा प्रतिसाद सांभाळून वापरणे. आपला नम्र, -गामा पैलवान


vishal pawar

Wed , 07 February 2018

सुंदर...।


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......