‘बॉलीवुड’मधल्या संगीतकारांवर नेहमी ‘उचलेगिरी’चा आरोप केला जातो, पण शोधायला गेलं तर दिसतं की, बहुतेक सगळ्याच संगीतकारांनी ती केलेली आहे!
दिवाळी २०२५ - लेख
कौस्तुभ मुद्गल
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 17 October 2025
  • दिवाळी २०२५ लेख हिंदी चित्रपट Hindi Cinema

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

फक्त पाश्चात्य संगीतावरूनच हिंदी चित्रपटातली गाणी बनली असं नाही, काही संगीतकारांनी आपल्याच चाली पुन्हा पुन्हा वापरल्या आहेत. वर ‘थंडी हवाए’चं उदाहरण आलंच आहे. ‘सुजाता’ चित्रपटाचं ‘टायटल साँग’ जरूर ऐका. सचिनदांनी बनवलेलं या ‘टायटल साँग’ची चाल आरडींनी ‘आपके कमरे में कोई रहता हैं’ या गाण्यासाठी वापरली आहे. आरडीची एक मुलाखत आहे. त्यात आरडी ‘बाप का माल’ असं सचिनदांच्या संगीताबद्दल म्हणतात.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

क्रिकेट, राजकारण आणि चित्रपटसृष्टी, या तीन गोष्टींविषयी आपण भारतीय माणसं अतिशय हळवे - त्यातही बॉलिवुडबद्दल - असतो. विसाव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेली ही चित्रपटसृष्टी आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आली आहे.

भारतीय चित्रपटांचं वेगळेपण कशात असेल, तर ते त्यातल्या गाण्यात. किंबहुना जगभर तयार होणार्‍या चित्रपटांमध्ये काही अपवाद वगळता चित्रपटगीते असलेली ही एकमेवाद्वितीय अशी चित्रपटसृष्टी आहे. चित्रपटांमध्ये गाणी हे आपण पहिल्यापासूनच स्वीकारलं आहे. कथानकाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा मध्ये थोड्याशा विसाव्यासाठी ही गाणी येतात. मग चित्रपटातला नायक अथवा नायिका दोन वेगवेगळ्या आवाजात गायले, तरी ते आपल्याला खटकत नाही.

या हिंदी चित्रपट-संगीताशी आपण घट्टपणे जोडले गेलो आहोत. त्यासाठी ‘विविधभारती’चं योगदानही मोलाचं आहे. ‘भुले बिसरे गीत’, ‘बेला के फुल’, ‘आपकी फर्माईश’ (यातील भाटिपाडा हे गाव मला एकदा तरी प्रत्यक्ष बघायचं आहे!) यावर कित्येक पिढ्या जगल्या आहेत. त्याचबरोबर सिलोन रेडिओवर लागणारं ‘बिनाका गीतमाला’ संगीतप्रेमींमध्ये अतिशय लोकप्रिय होतं. हिंदी चित्रपटांच्या गीतकार आणि संगीतकारांनी जी गाणी दिली आहेत, त्यामुळे आपलं जीवन समृद्धही झालं आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

काही संगीतकारांवर उचलेगिरीचा आरोप नेहमी केला जातो, पण शोधायला गेलं तर दिसतं की, बहुतेक सगळ्याच संगीतकारांनी ती केलेली आहे. मला व्यक्तिशः मात्र याला उचलेगिरी किंवा चोरी असं म्हणावंसं वाटत नाही. त्याला आपण फार तर प्रेरणा किंवा बेतलेलं म्हणू शकतो. कारण या संगीतकारांनी त्यांचं इतकं ‘भारतीयकरण’ केलेलं आहे की, त्या चाली मूळच्या ‘भारतीय’च वाटतात. काही वेळा केवळ मुखड्याला या चाली वापरल्या आहेत आणि पुढील कडवी वेगळ्याच चालीत आहेत, तर कधी गाण्यामध्ये संगीताचा एखादा तुकडा तेवढा घेतलेला आहे.

वुल्फगांग मोझार्ट हा अतिशय सृजनशील संगीतकार होता. त्याने ३५ वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८००हून अधिक सिंफनीज बनवल्या. वयाच्या १४व्या वर्षापासूनच त्याने संगीतरचना करण्यास सुरुवात केली. आज पाश्चात्य संगीतामध्ये मोझार्टचं स्थान अढळ आहे. त्याच्या एका सिंफनीपासून आपण सुरुवात करू.

मोझार्टची ४० नंबरची एक शिंफनी आहे. सलील चौधरींनी त्यापासून एक सुंदर गाणं आपल्याला दिलं आहे. ‘इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा’ हे ते गाणं. त्यांनी गाण्याचा मुखडा जसाच्या तसा उचलला आहे, पण पुढे येणार्‍या कडव्यांची चाल मात्र अस्सल सलीलदांचीच आहे.

रॉन गुडवीन नावाचा एक महान संगीतकार होऊन गेला. त्याचा ‘अरेबियन नाइट्स’ नावाचा एक अल्बम आहे. या संपूर्ण अल्बममध्ये सात ते आठ गाणी आहेत. सचिनदांचं ‘इन्सान जाग उठा’मधलं ‘ये चंदा रुस का’ या गाण्याचा मुखडा या ‘अरेबियन नाइट्स’मधल्या ‘Barefoot Girl’ या गाण्यावरून घेतलेला आहे. ‘छलिया’मधलं कल्याणजी-आनंदजी यांच्या ‘बाजे पायल छून छून’ याही गाण्याचा मुखडा याच अल्बममधील ‘Desert Hero’वरून घेतलेला आहे. मूळ रॉनची ‘Desert Hero’ ही धून अतिशय श्रवणीय आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

१८९८ साली झालेल्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात ‘When Johney comes Marching Home’ हे ‘वॉर साँग’ म्हटल गेलं. राजेश रोशन यांनी ‘बातो बातों में’ या चित्रपटातल्या ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहा’ हे गाणं त्यावर आधारीत आहे. एखाद्या गाण्याची चाल १२५ वर्षांपूर्वी झालेल्या युद्धापर्यंत मागे जाते, हे धक्कादायकच. ‘When johney’वर असंच आणखी एक बनवलेलं गाणं म्हणजे ‘Riders in the Sky’.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘जब प्यार किसीसे होता है’मधल्या शंकर-जयकिशन यांच्या ‘बिन देखे और बिन पहेचाने’ या गाण्याचा मुखडाही ‘अरेबियन नाइट्स’मधल्या ‘Dancing Eyes’वरून घेतलेला आहे.

‘ममता’ या चित्रपटातल्या ‘रहे ना रहे हम’ या गाण्याची कथा गंमतीशीर आहे. सचिनदांचं ‘थंडी हवाए’ हे गाणं त्या काळी अतिशय गाजलं होतं. ‘थंडी हवाए’ या गाण्याची चाल पुढे आर. डी. बर्मननी ‘नरम गरम’मधील ‘हमे रास्तों की जरुरत नहीं हैं’ आणि ‘सागर’मधील ‘सागर किनारे’ या गाण्यांनाही वापरली आहे.

रोशनसाहेबांना त्या गाण्याची चाल अतिशय आवडली. त्यांनी सचिनदांना फोन करून या गाण्याची चाल वापरण्याची परवानगी मागितली. सचिनदांनीही उदारपणे ती दिली. ‘रहे ना रहे हम’ या गाण्याच्या सुरुवातीला एक संगीताचा तुकडा वाजतो, तो रॉनच्या ‘Return of Paradise’वरून घेतला आहे. याच ‘Return of Paradise’ची अगदी छोटीशी झलक ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटातील ‘अखेरचा हा तुला दंडवत’ या गाण्यात पाहायला मिळते. कडव्यांच्या मध्ये हा छोटासा तुकडा वाजतो.

‘हम सब उस्ताद हैं’मध्ये किशोरकुमार यांचं ‘प्यार बाटते चलो’ हे गाणं आहे. त्यामधला संगीताचा एक तुकडा लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘Ms Marple’ या मालिकेच्या रॉननी बनवलेल्या टायटल ट्रॅकवरून घेतलेला आहे. तो मूळ ट्रॅकवरून जसाचा तसा उचलला आहे.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

‘आर पार’ चित्रपटातल्या ‘बाबुजी धिरे चलना’ या अत्यंत गाजलेलं गाण्याच्या मुखड्याची चाल Dorris Dayच्या ‘Perhaps Perhaps Perhaps’ या गाण्यावरून घेतलेली आहे. मूळ गाण्याची चाल संथ आहे, पण ‘बाबुजी धिरे चलना’ हे ‘क्लब साँग’ असल्याने त्याचा टेम्पो जास्त आहे. यामध्ये अ‍ॅकॉर्डियनचा फार सुरेख वापर केला आहे.

‘सीआयडी’ या चित्रपटातल्या ओ. पी. नय्यर यांच्या ‘ए दिल हैं मुश्किल’ या गाण्याचा मुखडा एका अमेरिकन लोकसंगीतावरून घेतलेला आहे. मुळात अमेरिका हा देश बाहेरून आलेल्या लोकांचा आहे. त्यामुळे अमेरिकन संगीत हे मूळचं युरोपमधून आणि आफ्रिकेतून आलेल्या गुलामांनी बनवलेलं आहे. ‘My Darling’ या अमेरिकन गाण्यावरून ‘ए दिल हैं मुश्किल’चा मुखडा घेतलेला आहे. मूळ गाणं जरा संथ आहे.

‘The Gay Lords’ नावाचा एक अमेरिकन ग्रुप होता. त्यांचं ‘Little Shoe Maker’ या नावाचं एक गाणं आहे. याची चाल ओपीजींनी एका गाण्याच्या मुखड्याला वापरली आहे. ‘श्रीमती ४२०’ या चित्रपटातलं ‘यहाँ हम वहाँ तूम’ हे गीता दत्त-रफी यांच्या आवाजातलं गाणं ‘Shoe maker’वरून घेतलं आहे.

‘Szla Dzieweczka’ हे एक पोलीश लोकगीत आहे. याची चाल सलील चौधरी यांनी ‘मधुमती’मधल्या ‘दिल तडप तडप के’ या गाण्याला वापरली आहे. पुन्हा मूळ गाण्याचा टेम्पो संथ आहे. सलिलदांच्या या प्रसिद्ध गाण्याचा टेम्पो थोडा जास्त आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘एक मुसाफिर एक हसिना’मधल्या ‘मुझे देखकर’ या गाण्यावरून अनू मलिक (यांनी बनवलेल्या गाण्यांपैकी ९० टक्के गाणी ही कुठल्या तरी पाश्चात्य गाण्यांवर आधारलेली आहेत. त्याबद्दल न लिहिलेलंच बरं!) यांनी ‘मुझे रात दिन’ हे गाणं बनवलं.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘जानवर’ या शम्मी कपूरच्या चित्रपटात ‘देखो अब तो’ हे शंकर-जयकिशनचं गाणं आहे. बिटल्सचं ‘I wanna hold your hand’ या गाण्याची ही भ्रष्ट नक्कल आहे. भ्रष्ट या कारणासाठी की, या गाण्यात शम्मीला बिटल्सच्या केसांसारखाच टोप घातला आहे आणि त्या अवतारात शम्मी अतिशय अच्चाराबिच्चारा दिसतो. बाकी हिंदी गाण्याचा टेम्पो वेगवान आहे.

एखाद्या गाण्याची चाल मुखड्याला वापरायची आणि गाण्याच्या कडव्यांची चाल मात्र वेगळी, असं अनेकदा घडलेलं आहे. संपूर्ण गाण्याची चाल त्याच्या कडव्यासकट जशीच्या तशी वापरायची, हे घडलं आहे ‘दिल दे के देखो’ या चित्रपटातल्या ‘कौन ये आया मेहफिल में’ या गाण्याच्या बाबतीत. उषा खन्ना यांनी Paul Ankaच्या ‘Diana’ या संपूर्ण गाण्यावर शब्द बसवून घेतले आहेत. रफीसाहेबांच्या आवाजातलं हे गाणं तितकंच श्रवणीय आहे. याच गाण्याची आणखी एक टुकार नक्कल केली आहे, १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हॉटेल’ या चित्रपटात उषा खन्ना यांनी.

Harry Bolafonte या गायकाचं ‘Day O’ हे गाणं १९५६ साली प्रचंड गाजलं होतं. त्यावर आधारीत ‘दिल अपना और प्रित पराई’ या चित्रपटातल्या ‘इतनी बडी मेहफिल’ या गाण्याचा मुखडा शंकर-जयकिशन यांनी बनवला आहे. ‘Day O’ या गाण्याच्या सुरुवातीला हॅरी एक तान घेतो, त्याची थोडी झलक आपल्याला ऐकायला मिळते, ती ‘पडोसन’मधल्या ‘भाई बत्तूर’ या गाण्यात.

१८९८ साली झालेल्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात ‘When Johney comes Marching Home’ हे ‘वॉर साँग’ म्हटल गेलं. राजेश रोशन यांनी ‘बातो बातों में’ या चित्रपटातल्या ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहा’ हे गाणं त्यावर आधारीत आहे. एखाद्या गाण्याची चाल १२५ वर्षांपूर्वी झालेल्या युद्धापर्यंत मागे जाते, हे धक्कादायकच. ‘When johney’वर असंच आणखी एक बनवलेलं गाणं म्हणजे ‘Riders in the Sky’.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

हेहीपाहावाचा : गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

'चुरा लिया हैं’ हे ‘यादों की बारात’मधलं अतिशय गाजलेलं गाणं. आरडींनी या गाण्याचा मुखडा घेतला आहे Walter Scharf यांच्या ‘If its Tuesday’ या गाण्यावरून. ‘तेरा मुझसे हैं पहेलेका नाता’ हे आरडीचं आणखी एक गाजलेलं गाणं. याचा मुखडा घेतला आहे, ‘Yellow Rose of Texas’ या गाण्यावरून. या मूळ गाण्याच्या अनेक आवृत्त्या पाश्चिमात्य देशात बनवल्या गेल्या आहेत, प्रसिद्ध गायक Elvis Preselyने गायलेलं गाणं तर प्रचंड गाजलं.

‘The Good The Bad The Ugly’ या चित्रपटातली गाजलेली धून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ या चित्रपटातल्या ‘तारो में सजके’ या मुकेशच्या आवाजातल्या गाण्यात वापरली आहे. या धूनेवर संध्या यांनी केलेल्या नाचावर लिहिण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 

आफ्रिकन गुलाम अमेरिकेत आणले गेले. त्यांनी आपलं एक वेगळं संगीत निर्माण केलं आणि पाश्चात्य संगीतात एक वेगळा प्रवाह निर्माण झाला. हिंदी चित्रपटातली गाजलेली आणि आपल्याला नाचायला लावतील अशी अनेक गाणी या आफ्रिकन गायकांच्या संगीतावरून घेतली आहेत. ‘कर्ज’मध्ये गिटारवर वाजणारी एक धून आहे. संपूर्ण चित्रपटभर ती वाजत राहते. ती घेतली आहे George Benson या गायकाच्या ‘We as Love’वरून. यावरच आधारित गाणं आहे- ‘एक हसिना थी’. ‘कर्ज’मधलं आणखी एक अतिशय गाजलेलं गाणं म्हणजे ‘ओम शांती ओम’. या संपूर्ण गाण्याची चाल लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी Lord Shorty या गायकाच्या ‘Om Shanti Om’वरून घेतली आहे.

७०च्या दशकात त्रिनिदाद टोबॅकोमध्ये Soca संगीताची सुरुवात झाली. भारतीय आणि तेथील स्थानिक संगीताची ही सरमिसळ. Lordच्या १९७८ साली आलेल्या ‘Soca Explosion’ या अल्बममधलं ’ओम शांती ओम’ ऐकायला फारच भन्नाट. ‘शोले’मधलं ‘मेहबुबा मेहबुबा’ हे गाणं ‘Say you love me’ यावरून, तर ‘लैला ओ लैला’ हे हे गाणं Chicano यांच्या ‘Black Blood’ यांच्या गाण्यावरून घेतलं आहे. हे सगळे आफ्रिकन गायक आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

फक्त पाश्चात्य संगीतावरूनच हिंदी चित्रपटातली गाणी बनली असं नाही, काही संगीतकारांनी आपल्याच चाली पुन्हा पुन्हा वापरल्या आहेत. वर ‘थंडी हवाए’चं उदाहरण आलंच आहे. ‘सुजाता’ चित्रपटाचं ‘टायटल साँग’ जरूर ऐका. सचिनदांनी बनवलेलं या ‘टायटल साँग’ची चाल आरडींनी ‘आपके कमरे में कोई रहता हैं’ या गाण्यासाठी वापरली आहे. आरडीची एक मुलाखत आहे. त्यात आरडी ‘बाप का माल’ असं सचिनदांच्या संगीताबद्दल म्हणतात.

‘कस्मे वादे’मधल्या एका गाण्यात मध्येच ‘होठो पे ऐसी बात’च्या ठेक्यावर वाजणारं संगीत येतं. खुद्द सचिनदांनी ‘अभिमान’ या चित्रपटात त्यांनीच गायलेलं ‘सुन मेरे बंधु रे’ हे गाणं ऐकायला येतं. ‘एक मुसाफिर एक हसिना’मधल्या ‘मुझे देखकर’ या गाण्यावरून अनू मलिक (यांनी बनवलेल्या गाण्यांपैकी ९० टक्के गाणी ही कुठल्या तरी पाश्चात्य गाण्यांवर आधारलेली आहेत. त्याबद्दल न लिहिलेलंच बरं!) यांनी ‘मुझे रात दिन’ हे गाणं बनवलं.

मला या संगीतकारांविषयी अतिशय आदर आहे. आजकाल युट्यूबवर आपल्याला कुठल्याही काळातलं कुठल्याही प्रदेशात बनलेलं संगीत क्षणार्धात ऐकता येतं. या संगीतकारांनी हे पाश्चात्य संगीत कुठून मिळवलं असेल आणि ते ऐकून त्यावर आधारीत हिंदी गाण्यांच्या चाली बांधल्या असतील, हे सगळं अचंबित करणारं आहे. त्यांनी या पाश्चात्य संगीताचा आधार घेतला आणि अस्सल भारतीय गाणी बनवली. त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी राहायला हवं.

.................................................................................................................................................................

लेखक कौस्तुभ मुद्गल यांना हिंदी चित्रपटसंगीत या विषयात विशेष रस असून त्यांच्या ‘धांडोळा’ या ब्लॉगवर ते नियमितपणे विविध विषयांवर लेखन करतात.

creating.awareness06@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”.......