भीती घालणे आणि भीती दाखवणे, हे बदमाश आणि अशिक्षित नेत्यांचे ‘लाडके खेळ’ असतात. आपल्या समर्थकांच्या टोळ्या तयार करून समाजात भीती पसरवायची, हा या लोकांचा दुसरा लाडका खेळ असतो!
पडघम - विज्ञाननामा
श्रीनिवास जोशी
  • मॅकिआव्हेली, डॅनियल कान्हेमन, हिटलर, मुसोलिनी आणि माओ
  • Sat , 28 June 2025
  • पडघम विज्ञाननामा निकोलो मॅकिआव्हेली Niccolò Machiavelli डॅनियल कान्हेमन Daniel Kahneman हिटलर Hitlar मुसोलिनी Mussolini माओ Mao

हा लेख तुम्ही या व्हिडिओ लिंकवर पाहू-ऐकू शकता

बदमाश आणि अशिक्षित नेते जनतेला फसवून अनेक वर्षे कसे राज्य करतात, हे आपण मागच्या लेखामध्ये पाहिले. मॅकिआव्हेली या ‘इटालियन चाणक्या’ने हे बदमाश नेते जनतेला कोणकोणत्या मार्गांनी फसवतात, याची यादीच दिली आहे. वेगवेगळे ‘जुमले’ पसरवणे, प्रजेमध्ये भीतीचे वातावरण तयार करणे, आपल्याशिवाय देश चालवायला दुसरा कोणीही लायक नाही असा प्रचार करणे, आपल्या समर्थकांच्या टोळ्या तयार करणे, देशातल्या एखाद्या जमातीविषयी द्वेषभाव आणि क्रोध पसरवत राहणे, असे अनेक मार्ग जनतेला फसवण्यासाठी वापरले जातात, असे मॅकिआव्हेलीने नमूद केले आहे.

मॅकिआव्हेलीचे विरोधक म्हणतात की, एवढी जनता मूर्ख कशी असेल? शेवटी एक ‘कलेक्टिव्ह’ शहाणपण समाजात असतेच की! यावर जगामधील विचारवंतांमध्ये खूप चर्चा झाली आहे. विसाव्या शतकात जगाने हिटलर, मुसोलिनी आणि माओ यांची उदाहरणे बघितली. हे तिघेही एक नंबरचे बदमाश आणि क्रूरकर्मे होते. तिघेही जवळपास अशिक्षित होते. तरीही त्यांनी अनेक वर्षे राज्य केले. सगळा समाज भीती आणि क्रोधाच्या खाईमध्ये लोटला. तरीही जनतेला अनेक वर्षे हे नेते मूर्ख आहेत, हे कळले नाही. ‘हा नाही, तर मग आपला तारणहार कोण?’, असे विचारत जनता अनेक वर्षे या नेत्यांची अंधभक्ती करत राहिली. या नेत्यांच्या मागे आंधळेपणाने जात स्वतःला पराकोटीच्या हिंसक वातावरणात लोटत राहिली.

ही उदाहरणे बघितल्यावर मॅकिआव्हेली म्हणतो त्याला काही अर्थ आहे, असे विसाव्या आणि एकविसाव्या शतकामधील अनेक मानसशास्त्रज्ञांना वाटू लागले. माणसाच्या वर्तनाचा आणि मेंदूचा अभ्यास करून जनतेच्या या मूर्खपणाचा काही अर्थ लावता येईल का, असा विचार सुरू झाला. गेले एक शतक अंधभक्त का तयार होतात, हा विचार जगभरच्या मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.

...........................................................................................................................................

मॅकिआव्हेली कान्हेमनसारखा मानसशास्त्रज्ञ नव्हता, पण भीती माणसाची विचारशक्ती पूर्णपणे बंद करते आणि मानवाचे मन भीती आणि क्रोधापुढे हतबल होते, हे त्याने हेरले होते. डॅनियल कान्हेमन आणि इतर शास्त्रज्ञांनी माणूस भीतीपुढे आणि क्रोधापुढे हतबल कसा होतो, हे मानसशास्त्राच्या आणि शरीराच्या पातळीवर सप्रमाण उलगडून दाखवले. हिटलरसारखे नेते मानवाच्या मनाच्या या दुर्बलतेचा अत्यंत क्रूरपणे फायदा उठवतात.

...........................................................................................................................................

भीती घालणे आणि भीती दाखवणे, हे बदमाश आणि अशिक्षित नेत्यांचे ‘लाडके खेळ’ असतात. समाजातील एखादा समूह आपल्या देशाला कॅन्सरसारखा पोखरतो आहे, अशी भीती हे लोक घालतात. उदाहरणार्थ, हिटलरने ज्यू समाजाची भीती जर्मनीतल्या ख्रिश्चन जनतेला घातली होती. ज्यू समाजाची भीती का, तर तो अल्पसंख्य होता म्हणून. तो जर बहुसंख्य असता, तर हिटलरने ख्रिश्चन समाजाची भीती बहुसंख्य समाजाला घातली असती.

दुसरे म्हणजे आपल्या समर्थकांच्या टोळ्या तयार करून समाजात भीती पसरवायची, हा या लोकांचा दुसरा लाडका खेळ असतो! जे कोणी विरोध करतील, त्यांच्याविरुद्ध शाब्दिक आणि शारीरिक हिंसा करायची, ही त्यांची नीती असते. म्हणजे एका बाजूला आपल्या भक्तांना भीती घालायची आणि मग या भक्तांचा उपयोग करून आपल्या विरोधकांना भीती घालायची, अशी ही दुहेरी नीती असते. भीतीचा उपयोग आणि अंधभक्तांच्या टोळ्यांचा उपयोग, हे या बदमाश नेत्यांच्या सत्ताकारणाचे दोन आधारस्तंभ असतात. यातल्या भीती आणि अंधभक्तीचा विचार आपण आज करणार आहोत. पुढच्या लेखामध्ये ‘झुंडीचे मानसशास्त्र’ आणि ‘अंधभक्ती’ याचा विचार करू.

डॅनियल कान्हेमन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणूस भीतीच्या इतका आहारी का जातो, याचा अभ्यास केला. माणसाच्या निर्णय प्रक्रियेवर भीती कसा प्रभाव पाडते, हे त्याने जगाला दाखवून दिले. त्यासाठी त्याला २००२ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.

कान्हेमनने दाखवून दिले की, काहीतरी गमावण्याची भीती मानवामध्ये अतिशय प्रखर असते. उदाहरणार्थ, १०० रुपये गेल्याचे दुःख १०० रुपये मिळाल्याच्या आनंदापेक्षा जास्त तीव्र असते. या स्वभावामुळे आपला समाज धोक्यात आला आहे असे सांगितले की, बहुतांश लोकांचा त्यावर विश्वास बसतो.

दुसरे कान्हेमनने असे दाखवून दिले की, माणूस दोन प्रकारे विचार करतो. पहिला, पटकन भावनिकदृष्ट्या विचार करून निर्णय घेणे आणि दुसरा, शांतपणे सारासार विचार करून निर्णय घेणे. भीती वाटली असता माणूस पहिल्या मार्गाचा अवलंब करतो. तो दुसऱ्या शांत मार्गाने विचार करू शकत नाही.

इथे मानवाच्या मेंदूमधील ‘अमिग्डाला’ नावाचा भाग फार महत्त्वाची भूमिका निभावतो. हा मेंदूचा फार महत्त्वाचा भाग आहे. तो भावनिक निर्णय घेणे, भावनांच्या स्मृती साठवून ठेवणे, ही कामे करतो. भीतीचे ‘ट्रिगर्स’ ओळखण्याचे कामसुद्धा अमिग्डाला करतो. सामाजिक व्यवहारात माणसाला सतर्क ठेवण्याची जबादारीही अमिग्डावर सोपवलेली असते. माणसाच्या ‘सर्व्हायव्हल’च्या संदर्भात या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माणूस जेव्हा शांतपणे सारासार विचार करून निर्णय घेतो, तेव्हा बाहेरच्या जगाकडून येणारी संवेदना पहिल्यांदा मेंदूच्या विचार करणाऱ्या भागाकडे जाते. तिथे त्यावर विचार केला जातो आणि मग तिथून ती संवेदना अमिग्डालाकडे पाठवली जाते. परंतु माणसाला जेव्हा भीतीची संवेदना प्राप्त होते, तेव्हा ती पहिल्यांदा अमिग्डालाकडे जाते. ती संवेदना प्राप्त झाल्या झाल्या अमिग्डालाला जी काही प्रतिक्रिया द्यायची आहे, ती देऊन तो मोकळा होतो.

नंतर ती संवेदना मेंदूच्या विचार करणाऱ्या भागाकडे पाठवली जाते. आधी प्रतिक्रिया आणि नंतर विचार, अशी ही व्यवस्था असते. उदाहरणार्थ, अंधुक प्रकाशात रस्त्यावर चालताना दोरी जरी दिसली, तरी अमिग्डाला पटकन उडी मारून दूर जाण्याची कृती माणसाकडून करून घेतो आणि मग मेंदूकडे ते चित्र पाठवले जाते. मेंदू त्यानंतर नीट विचार करून ठरवतो की, ती दोरी आहे की साप आहे.

भीती दाखवली की, माणसे विचार न करता भीतीच्या आहारी जातात, माणसाची ही वृत्ती हुशार आणि बदमाश नेत्यांनी हेरलेली असते. एखाद्या माणसाला एखाद्या समूहाविषयी सतत भीती दाखवत राहिलो की, त्या समूहाचा विषय आला रे आला की, अमिग्डाला अॅक्टिव्ह होतो. मनामध्ये भीतीची सणक उठते. सतत भीती दाखवली की, समाजातील निदान तीस टक्के तरी लोक तिच्या आहारी जातात, आणि ‘माझ्याशिवाय दुसरा कोण’ या प्रचाराला बळी पडतात. परिणामी या ‘भयानक’ समूहापासून आपल्याला ‘वाचवू’ शकणाऱ्या नेत्यावर हे लोक अवलंबून राहू लागतात.

कान्हेमन म्हणतो त्याप्रमाणे हे लोक या संदर्भात भावनिक निर्णय शॉर्टकटने घेऊ लागतात. ज्यू समाजाची भीती दाखवलेले जर्मन लोक हिटलरवर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहू लागले. हिटलर मूर्ख आहे, आक्रस्ताळा आहे, क्रूर आहे, हे त्याच्या भाषणांमधून सतत दिसत होते, परंतु त्याच्या भजनी लागलेल्या जर्मन भक्तांना त्याविषयी काहीच वाटेनासे झाले होते. काहीही असले तरी हा माणूस देशासाठी आवश्यक आहे, असा भावनिक विचार ते करत राहिले. खरे तर ज्यू लोक त्या वेळी जर्मनीमध्ये एक टक्कासुद्धा नव्हते, पण जर्मन जनतेला त्यांच्याविषयी इतकी भीती घातली गेली होती की, बहुतांश जर्मन जनता सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेली होती.

...........................................................................................................................................

भीतीमधून क्रोध तयार होतो आणि भीतीची पुढची पायरी राग असते. भीती वाटली की, अमिग्डाला ‘फाइट ऑर फ्लाइट’ प्रतिक्रिया देतो. भीती वाटली की, त्या धोक्याबरोबर एकतर लढायचे असते किंवा त्याच्यापासून पळून तरी जायचे असते. लढण्यासाठी राग आवश्यक असतो आणि पळून जावे लागले तरीही राग येतो. भीती वाटली की, अमिग्डाला अॅड्रिनॅलिन आणि कॉर्टिझॉल ही हार्मोन्स शरीरात सोडली जातील असे बघतो. ही हार्मोन्स ताण तयार करतात. त्यातून राग तयार होतो. तो भीतीचा भाऊ असतो. बदमाश नेत्यांनी हे हेरलेले असते.

...........................................................................................................................................

भीतीमधून क्रोध तयार होतो आणि भीतीची पुढची पायरी राग असते. भीती वाटली की, अमिग्डाला ‘फाइट ऑर फ्लाइट’ प्रतिक्रिया देतो. भीती वाटली की, त्या धोक्याबरोबर एकतर लढायचे असते किंवा त्याच्यापासून पळून तरी जायचे असते. लढण्यासाठी राग आवश्यक असतो आणि पळून जावे लागले तरीही राग येतो. भीती वाटली की, अमिग्डाला अॅड्रिनॅलिन आणि कॉर्टिझॉल ही हार्मोन्स शरीरात सोडली जातील असे बघतो. ही हार्मोन्स ताण तयार करतात. त्यातून राग तयार होतो. तो भीतीचा भाऊ असतो. बदमाश नेत्यांनी हे हेरलेले असते.

हिटलर ज्यू लोकांविरुद्ध क्रोध आणि द्वेष भडकावत राहिला. हे लोक तुमची संपत्ती लुटून नेतील, जर्मन राष्ट्र ताब्यात घेतील. माझ्याशिवाय सगळे विरोधी नेते ज्यू लोकांना विकले गेलेले आहेत, अशा बाता हिटलर मारत राहिला. हिटलरने जे जर्मनीमध्ये केले, तेच मुसोलिनीने इटलीमध्ये केले. गंमत म्हणजे या दोघांनीही मॅकिआव्हेली अगदी मन लावून वाचला होता. कुठल्याही राजकीय नेत्याने मॅकिआव्हेली वाचलाच पाहिजे, असे हिटलर म्हणत असे. मुसोलिनीनेसुद्धा मॅकिआव्हेली खूप खोलात जाऊन वाचला होता. सत्ता मिळवायची असेल आणि टिकवायची असेल, तर मॅकिआव्हेली वाचावाच लागतो, असे मुसोलिनीचे म्हणणे होते. या दोघांनंतर आलेल्या सगळ्या हुकूमशाहांनी मॅकिआव्हेलीचा अभ्यास केलेला असतो. नसेल तर हिटलर आणि मुसोलिनी यांचा तरी अभ्यास नक्कीच केलेला असतो.

भीती आणि आदर्शवाद यांचे मिश्रण करावे लागते, हे मॅकिआव्हेलीने सांगितले आहे. फक्त भीती दाखवायची नसते, भीतीबरोबर आदर्शवाद असावा लागतो, हेही सांगितले. नुसतीच भीती आणि भीती वाटत राहिली, तर माणूस त्या भीतीविरुद्ध बंड करून उठतो. कारण सततची भीती माणसाला सहन होत नाही. भीतीपासून सुटकेची आशा वाटत राहायला लागते. त्यामुळेच जनतेला आपल्या नेत्याविषयी भीती आणि प्रेम असे दोन्ही वाटले पाहिजे, असे मॅकिआव्हेली म्हणतो. ‘थोडा आदर्शवाद’ आणि ‘जास्त भीती’, हे या दृष्टीने अगदी योग्य मिश्रण असते. हिटलर आणि मुसोलिनी यांनी त्याचीच री ओढली.

ज्यू हे आपल्या समाजाचा कॅन्सर आहेत, हे सांगण्याबरोबरच आपला वंश जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण जगाचे नेतृत्व करण्यासाठी, जगाचे गुरू बनण्यासाठी या वंशात जन्माला आलो आहोत, हे हिटलर पुन्हा पुन्हा सांगत राहिला. भीती आणि आदर्शवाद यांचे बेमालूम मिश्रण हिटलरने तयार केले. त्यामुळे जर्मन जनतेची विचारक्षमता पूर्णपणे बंद झाली.

भीती आणि आदर्शवादाचा हा फॉर्म्युला सर्वत्र काम करताना दिसतो. ज्यू समाजाची भीती वाटलेला सामान्य जर्मन माणूस हिटलरच्या नादी लागला. कम्युनिझम आणि सोशालिझमची भीती वाटलेला इटालियन माणूस मुसोलिनीच्या मागे गेला आणि भांडवलदार लोकांची भीती वाटलेला चीनी सामान्य माणूस माओच्या.

...........................................................................................................................................

कान्हेमनने दाखवून दिले की, काहीतरी गमावण्याची भीती मानवामध्ये अतिशय प्रखर असते. उदाहरणार्थ, १०० रुपये गेल्याचे दुःख १०० रुपये मिळाल्याच्या आनंदापेक्षा जास्त तीव्र असते. या स्वभावामुळे आपला समाज धोक्यात आला आहे असे सांगितले की, बहुतांश लोकांचा त्यावर विश्वास बसतो. दुसरे कान्हेमनने असे दाखवून दिले की, माणूस दोन प्रकारे विचार करतो. पहिला, पटकन भावनिकदृष्ट्या विचार करून निर्णय घेणे आणि दुसरा, शांतपणे सारासार विचार करून निर्णय घेणे. भीती वाटली असता माणूस पहिल्या मार्गाचा अवलंब करतो. तो दुसऱ्या शांत मार्गाने विचार करू शकत नाही.

...........................................................................................................................................

काय गंमत आहे बघा, कम्युनिझमची भीती वाटून इटालियन लोक मुसोलिनीच्या म्हणजे कॅपिटॅलिझम आणि सोशालिझमच्या मागे गेले आणि कॅपिटॅलिझमची भीती वाटून चिनी लोक माओच्या म्हणजे कम्युनिझमच्या मागे गेले. प्रजा कसलाच सारासार विचार करत नाही, हे मॅकिआव्हेलीचे म्हणणे अशा वेळी काही क्षण का होईना पटू लागते.

या सगळ्याचा फायदा हे बदमाश नेते घेतात. ‘मी नाही तर कोण’, असा प्रचार करून आधीच डोके बंद झालेल्या सामान्य जनतेच्या मनावर आपली अपरिहार्यता पुन्हा पुन्हा बिंबवत राहतात. जनताही पोपटासारखी या नेत्याच्या विरोधकांना ‘सांग ना, सांग ना आपला हा नेता नसेल, तर आपल्या देशाचे कसे होईल? तुला दुसरा कोणी लायक माणूस दिसतो तरी आहे का?’ असे प्रश्न विचारत राहतात. जणू काही या नेत्याच्या आधी देश चाललाच नव्हता आणि या नेत्यानंतर देश चालणारच नाही!

डोके बंद झालेले लोक आपल्या बुद्धीपेक्षा आपल्या बदमाश नेत्याशी जास्त प्रामाणिक राहायला लागतात. त्यातच खरी सुरक्षितता आहे, अशी भावना या भक्तांची होऊन बसलेली संपूर्ण जगभर आपल्याला दिसून येते. इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा हीच गोष्ट घडताना दिसते.

भीती वाटलेल्या मनाची अजून एक गोची होऊन बसलेली असते. या मनाला परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण हवे असते. भीतीचे कारण नष्ट झालेले त्याला हवे असते आणि त्याचबरोबर या मनाने सारासार विचार करण्याची क्षमतासुद्धा गमावलेली असते. या दोन गोष्टींचा परिणाम म्हणून या भक्त बनलेल्या मनाला सोपी आणि थेट ‘उपाय’ आवडू लागतात. बदमाश नेते नेमके हेच ‘उपाय’ प्रजेसमोर ठेवतात.

ज्यू समाजाला लवकरात लवकर जर्मनीबाहेर हाकलून दिले पाहिजे, या समाजाचा वंशच्छेद केला पाहिजे, अशा चर्चा हिटलरकालीन जर्मनीमधील हिटलर-भक्त करत असत. इतके कमी लोक जर्मनीला कसे लुटू शकतील, हा साधा विचार ते करू शकत नसत. आजसुद्धा या जर्मन-भक्तांचे ‘आधुनिक भाऊबंद’ आपल्याला आधुनिक जगामधल्या सगळ्या देशांमध्ये दिसून येतात. या भक्तमंडळींचे बांधव इटली आणि चीनमध्ये कसे होते, हे आपण आधीच्या लेखामध्ये पाहिले आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

कुठल्या तरी एका समाजाच्या काल्पनिक भीतीने गारठून गेलेले, क्रोधाच्या आणि हिंसक विचारांच्या आहारी गेलेले भक्त! यांच्या मनात इतिहासाची भडक चित्रे घोळत  असतात. त्यातून जन्मणाऱ्या सूडाच्या भावनेने हे लोक चवताळून उठलेले असतात. सध्याच्या सोशल मीडियावरच्या भडकावू प्रचारांनी हे लोक सतत अस्वस्थ मन:स्थितीमध्ये असतात. लवकरच या भक्तांच्या टोळ्या होतात आणि ‘झुंडीचे मानसशास्त्र’ जन्म घेते.

मॅकिआव्हेली कान्हेमनसारखा मानसशास्त्रज्ञ नव्हता, पण भीती माणसाची विचारशक्ती पूर्णपणे बंद करते आणि मानवाचे मन भीती आणि क्रोधापुढे हतबल होते, हे त्याने हेरले होते. डॅनियल कान्हेमन आणि इतर शास्त्रज्ञांनी माणूस भीतीपुढे आणि क्रोधापुढे हतबल कसा होतो, हे मानसशास्त्राच्या आणि शरीराच्या पातळीवर सप्रमाण उलगडून दाखवले. हिटलरसारखे नेते मानवाच्या मनाच्या या दुर्बलतेचा अत्यंत क्रूरपणे फायदा उठवतात.

या भ्यालेल्या भक्तांच्या टोळ्या कशा होतात आणि या टोळ्या कुठल्या मानसशास्त्रीय कायद्यांवर चालतात, हे आपण पुढच्या लेखात पाहू.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......