पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लॉर्ड थॉमस बॅबिंग्टन मेकॉलेवर आरोप अर्थात आपल्या परिवाराचा ‘प्रोपगंडा’ आपणच चघळणे!
पडघम - देशकारण
रवि आमले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Sun , 23 November 2025
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi मेकॉले Macaulay

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मोदी म्हणाले की, ‘मेकॉलेने भारतीयांची मने ब्रिटिश केली. त्याने प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था पूर्णपणे नष्ट केली. ब्रिटिश भाषा आणि विचार भारतात रूढ केले. त्याचा परिणाम असा झाला की, हजारो वर्षांचे भारतीय ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, परंपरा, जीवनशैलीही नष्ट होत गेली.’ याचा अर्थ असा होतो की, ब्रिटिश शिक्षणपद्धत येण्यापूर्वी येथील शिक्षणव्यवस्था उत्तम होती. इतिहास मात्र याचे पूर्णतः समर्थन करत नाही. प्राचीन काळी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती. हजारो निवासी विद्यार्थी आणि शेकडो प्राध्यापक असलेले नालंदा विद्यापीठ तर आपलेच. ते जगातील पहिले विद्यापीठ. बौद्ध आचार्य नागार्जुन याचा शिष्य आर्यदेव याने ते पाचव्या शतकात स्थापन केले. नालंदाप्रमाणेच बिहारमध्ये विक्रमशिला हे विद्यापीठ होते. तत्पूर्वी इ.स. पूर्व आठव्या शतकात प्राचीन गांधार देशात तक्षशिला विद्यापीठ उभे राहिले होते. या विद्यापीठांचे वैशिष्ट्य असे की, ती सांप्रदायिक नव्हती.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

साप आपल्याच पिल्लांना खातो, असे म्हणतात. प्रोपगंडाचेही तसेच असते. अनेकदा होते असे की, जे लोक प्रोपगंडा करतात, तेच त्यास बळी पडतात. आपलीच असत्ये, अर्धसत्ये, अपप्रचार, अपमाहिती ही त्यांना खरी वाटू लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काहीसे असे झाले असावे. यास संदर्भ आहे अलीकडेच त्यांनी लॉर्ड थॉमस बॅबिंग्टन मेकॉले यांच्यावर केलेल्या आरोपवजा टीकेचा. मेकॉले यांनी रुजवलेल्या शिक्षणपद्धतीने भारतीयांमध्ये ‘ब्रिटिश वसाहतवादी गुलामगिरीची मानसिकता’ निर्माण झाली आणि ती आजवर कायम आहे, असे मोदी यांचे म्हणणे.

असे म्हणणारे मोदी पहिलेच नाहीत. किंबहुना येथील उजव्यांनी वर्षानुवर्षे चालवलेल्या प्रोपगंडाचा तो भाग आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात त्यावर केलेल्या सविस्तर भाष्यातून ते त्यांच्याच परिवाराच्या प्रोपगंडाचे बळी ठरल्याचे दिसते.

ते कसे हे पाहण्यापूर्वी मोदींनी केलेले भाष्य जाणून घेणे गरजेचे. या विषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मोदी म्हणाले की, ‘मेकॉलेने भारतीयांची मने ब्रिटिश केली. त्याने प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था पूर्णपणे नष्ट केली. ब्रिटिश भाषा आणि विचार भारतात रूढ केले. त्याचा परिणाम असा झाला की, हजारो वर्षांचे भारतीय ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, परंपरा, जीवनशैलीही नष्ट होत गेली.’

याचा अर्थ असा होतो की, ब्रिटिश शिक्षणपद्धत येण्यापूर्वी येथील शिक्षणव्यवस्था उत्तम होती. इतिहास मात्र याचे पूर्णतः समर्थन करत नाही. प्राचीन काळी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती. हजारो निवासी विद्यार्थी आणि शेकडो प्राध्यापक असलेले नालंदा विद्यापीठ तर आपलेच. ते जगातील पहिले विद्यापीठ. बौद्ध आचार्य नागार्जुन याचा शिष्य आर्यदेव याने ते पाचव्या शतकात स्थापन केले. नालंदाप्रमाणेच बिहारमध्ये विक्रमशिला हे विद्यापीठ होते. तत्पूर्वी इ.स. पूर्व आठव्या शतकात प्राचीन गांधार देशात तक्षशिला विद्यापीठ उभे राहिले होते.

या विद्यापीठांचे वैशिष्ट्य असे की, ती सांप्रदायिक नव्हती. नालंदाबद्दलची ‘विश्वकोशी’य नोंद सांगते की, तेथे ‘बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राह्मणी धर्म व इतर धर्म त्याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या (वैद्यकीय शिक्षण), गणित, ज्योतिष, चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इ. विषय शिकवण्याची व्यवस्था होती.’

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

हा आपला अभिमानाने मिरवावा असा वारसा. ही विद्यापीठे मुस्लीम आणि हूण आक्रमकांनी जाळून-पाडून टाकली, हे खरे. पण त्या पुढील काळात येथील शिक्षणव्यवस्थेचे काय झाले? आणि कोणामुळे झाले?

इतिहासकार अनंत सदाशिव आळतेकर यांचा भारतातील प्राचीन शिक्षणपद्धतीवरचा ‘एज्युकेशन इन एन्शन्ट इंडिया’ हा महत्त्वाचा ग्रंथ. तो सांगतो की, जगभरातील प्राचीन शिक्षणसंस्थांप्रमाणेच आपल्या शिक्षणसंस्थांतील बहुसंख्य शिक्षक हे धर्मगुरू असत. त्यांची ती मर्यादा होती. त्यामुळे प्राचीन हिंदू समाजाने राखलेले धर्म-मोक्ष आणि अर्थ-काम यांतील संतुलन या शिक्षणसंस्थांत बिघडले आणि धर्म आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींना त्या शिक्षणपद्धतीत प्राधान्य मिळू लागले. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, खगोलशास्त्र हे विषय कमी महत्त्वाचे ठरले.

याचा परिणाम असा झाला की, सुमारे दीड हजार वर्षांत येथे व्यापार, उद्योग, कला आणि उपयोजित कला यांत फारशी लक्षणीय प्रगती होऊ शकली नाही. आळतेकरांचे आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण आहे. ते सांगतात की, इसवीसनानंतरच्या काही शतकांत या शिक्षणपद्धतीतील धर्मप्रभावामुळे विवेकाला रजा मिळाली. संस्कृतवर भर देण्यात आल्यामुळे शिक्षण बहुसंख्य समाजापासून दूर गेले. हे काही मेकॉलेमुळे घडले नव्हते.

पुढचा मध्ययुगीन काळ तर अंधकारमय. त्यानंतर, युरोपात औद्योगिक क्रांती सुरू झाली, त्या म्हणजे आपल्याकडे पेशवाई होती त्या काळात, येथील शिक्षणाची अवस्था काय होती? याचे उत्तर वा. कृ. भावे यांच्या ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात मिळते. त्यातील तत्कालीन शिक्षणपद्धतीवरील प्रकरणात ते सांगतात, ‘त्या काळी प्रजेच्या शिक्षणाची गणना सरकारच्या कर्तव्यात होत नव्हती. ज्याने-त्याने आपल्या मुलांच्या शिक्षणाची तजवीज आपल्या इच्छेप्रमाणे व शक्तीप्रमाणे करावी अशी स्थिती असल्यामुळे सर्वांना सारखी लागू पडणारी शिक्षणपद्धती तेव्हा नव्हती.’ तेव्हा ती इंग्रजांनी नष्ट करण्याचा प्रश्नच नव्हता. त्या काळात मुलांना लष्करी, व्यावहारिक आणि धार्मिक असे तीन प्रकारचे शिक्षण दिले जाई.

इतिहासाचार्य राजवाडेंना उद्‌धृत करून भावे सांगतात की, ‘व्यवहारशिक्षणात अक्षर, उजळणी, हिशेब यावर मुख्य भर दिला जाई. त्याकरता व इतर ज्ञानाकरीता कित्ते, संसारचोपडी, गणित, मराठ्यांच्या व मुसलमानांच्या बखरी, तवारिखा, (महा)भारत, भागवत, रामायण यातील आख्यानांच्या मराठी बखरी, रामरक्षादी स्तोत्रे, जमाखर्चाची पद्धती, भूमापन, पत्रे लिहिण्याचे मायने, लिखिते, मराठी कविता इत्यादिकांचा अभ्यासात समावेश होत असे.’

पुढे ते म्हणतात, ‘खेड्यापाड्यातून राहणाऱ्या ब्राह्मणांना मराठी लिहिता वाचता आले व हिशेबठिशेबाचे ज्ञान झाले म्हणजे डोक्यावरून पाणी गेले.’ ही ब्राह्मणांची तऱ्हा. तेथे अन्यांचे काय? ‘ब्राह्मणवर्गात सरदार होते, तसे मराठे जातीतही होते. परंतु ते ब्राह्मणांइतके शिकलेले नव्हते. त्यापैकी बहुतेकांचा शिक्षण सही करण्यापुरते किंवा फार तर आलेले पत्र वाचण्यापुरते असावे.’

हे सारे सांगून झाल्यानंतर भावे एक निरिक्षण नोंदवतात की, ‘शिक्षण देण्याचे फुटकळ प्रयत्न कितीही झाले, तरी त्यास स्वतंत्र विद्यापीठाप्रमाणे अनेक विद्या, कला व शास्त्रे यांचे एकीकरण करून राष्ट्रीय ज्ञानाची प्रगती घडवून आणणे साधणे शक्य नव्हते.’

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

मेकॉले खरेच असे म्हणाले असतील, तर त्यांची रवानगी भारतशत्रूंच्या यादीतच करावयास हवी. पण हा उतारा नीट वाचला, तरी लक्षात येईल की, कोणताही शहाणा माणूस तत्कालीन भारताविषयी असे म्हणणार नाही. १८३५ पूर्वी उभा-आडवा भारत पायाखाली घालणाऱ्या माणसाला येथे एकही भिकारी आणि एकही चोर दिसला नसेल, तर तो माणूस ठार आंधळाच समजावा. मुळात मेकॉले असे कुठेही, कधीही म्हणालेले नाहीत. त्यांचा म्हणून जो उतारा सादर केला जातो, तो बनावट आहे. हा उतारा १८३५चा, पार्लमेन्टमधल्या भाषणातला, असे सांगण्यात येते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणाऱ्या भाषणांच्या संग्रहाला हॅन्सार्ड असे म्हणतात. त्याच्या कोणत्याही प्रतीतील कोणत्याही तारखेत हा उतारा नाही. कसा असणार?

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरस्थावर होत असतानाची ही अवस्था. बहुजनांपासून शिक्षण दूर होते आणि ज्यास शिक्षण म्हणावे ते दैनंदिन व्यवहारापुरते ठीक. त्यापरते त्यास मोल नव्हते. ही शिक्षणपद्धती मेकॉलेने मोडली असेल, तर ते योग्यच झाले म्हणायचे. वस्तुतः त्याने येथील शिक्षणपद्धती मोडली नाही, तर दीडेक हजार वर्षांच्या पोकळीनंतर त्याने येथे नवी शिक्षणपद्धती आणली.

त्यावर उजव्यांचे म्हणणे असे असते की, त्यामागे मेकॉलेचे कुटील हेतू होते. त्याला येथे गुलाम मानसिकतेची कारकुनांची फौज तयार करायची होती. काळे इंग्रज निर्माण करायचे होते. आत्मसन्मान गमावलेले गुलाम राष्ट्र उभारायचे होते. अनेक वर्षांपासून हा आरोप केला जात आहे. त्याला पुरावा म्हणून मेकॉले याने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केलेल्या भाषणातील एक उतारा सादर केला जातो.

तो असा की – ‘‘मी भारतात खूप फिरलो. उभा-आडवा भारत पालथा घातला. मला तेथे एकही भिकारी, एकही चोर पाहायला मिळाला नाही. हा देश इतका समृद्ध आहे आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की, आपण हा देश कधी जिंकू शकू असे मला वाटत नाही. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल. भारतीय लोक जर असे मानू लागले की परदेशी आणि विशेषत: इंग्रजी ते सारे चांगले, त्यांच्या संस्कृतीपेक्षा उच्च, थोर आहे, तरच ते त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतील आणि मग ते आपल्याला हवे आहेत तसे बनतील-  एक गुलाम राष्ट्र.’’

मेकॉले खरेच असे म्हणाले असतील, तर त्यांची रवानगी भारतशत्रूंच्या यादीतच करावयास हवी. पण हा उतारा नीट वाचला, तरी लक्षात येईल की, कोणताही शहाणा माणूस तत्कालीन भारताविषयी असे म्हणणार नाही. १८३५ पूर्वी उभा-आडवा भारत पायाखाली घालणाऱ्या माणसाला येथे एकही भिकारी आणि एकही चोर दिसला नसेल, तर तो माणूस ठार आंधळाच समजावा.

मुळात मेकॉले असे कुठेही, कधीही म्हणालेले नाहीत. त्यांचा म्हणून जो उतारा सादर केला जातो, तो बनावट आहे. हा उतारा १८३५चा, पार्लमेन्टमधल्या भाषणातला, असे सांगण्यात येते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणाऱ्या भाषणांच्या संग्रहाला हॅन्सार्ड असे म्हणतात. त्याच्या कोणत्याही प्रतीतील कोणत्याही तारखेत हा उतारा नाही. कसा असणार?

कोईनराड एल्स्ट् हे बेल्जिअन संशोधक-लेखक सांगतात, १८३५ला मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते भारतात होते. शिवाय या मूळ इंग्रजी उताऱ्यातील विचार तर सोडाच, भाषाही त्यांची व तेव्हाची नाही. ती फारच अलीकडची आहे. मग ही फेकूगिरी केली कोणी? एल्स्ट यांच्या म्हणण्यानुसार हा उतारा पहिल्यांदा अमेरिकेतील ग्नॉस्टिक सेंटर या धार्मिक वाङ्मय प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेच्या ‘द अवेकिनग रे’ या मासिकात (खंड ४, क्र. ५) प्रसिद्ध झाला. तेथून तो हिंदुत्ववादी नियतकालिकांनी उचलला. हे सांगणारे एल्स्ट् हे प्रखर हिंदुराष्ट्रवादाची भलामण करणारे लेखक आहेत, हे लक्षात ठेवलेले बरे. जाता जाता या कोईनराड एल्स्ट यांनीही मेकॉले यांचे इंग्रजी शिक्षण देण्यामागचे हेतू शुद्ध होते, असेही प्रमाणपत्र दिले आहे.

मेकॉले यांना इंग्रजाळलेले भारतीय तयार करायचे होते, हा उजव्यांच्या टीकेचा आणखी एक मुद्दा. मोदींनीही त्यांच्या भाषणात या आशयाचे विधान केले आहे. मेकॉलेंवर ही टीका केली जाते, ती त्यांनी फेब्रुवारी १८३५मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक यांना सादर केलेल्या ‘मिनिट ऑन एज्युकेशन’ या टिपणावरून. भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीची मुहूर्तमेढ रोवणारे हे टिपण. त्यातील ‘‘मर्यादित साधनसंपत्तीमुळे सर्व जनतेला इंग्रजी भाषेतून आधुनिक शिक्षण आपण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपला प्रयत्न असा एक गट निर्माण करण्याचा असावा, की जो गट आपण आणि आपली लक्षावधी जनता यामध्ये मध्यस्थाचे काम करील… असा गट की ज्यातील व्यक्तीचा रंग व रक्त हिंदी असेल पण अभिरुची, विचार, नैतिकता व बुद्धिमत्ता याबाबत तो इंग्रजी असेल.’’

या विधानांवरून मेकॉलेंवर दुगाण्या झाडण्यात येतात. हल्ली समाजमाध्यमांत संदर्भहीन विधाने देऊन, चित्रफिती अर्धवट दाखवून शिवीगाळ करण्याची पद्धत लोकप्रिय आहे. त्याच पद्धतीचा हा जुना नमुना. येथे मेकॉले यांचे अर्धेच म्हणणे पुढे करण्यात येते.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

मेकॉलेने जी शिक्षणपद्धती आणली, त्यामुळे येथे आंग्लविद्याविभूषित लोकांचा मोठा गट निर्माण झाला हे खरे. पण त्याचा परिणाम काय झाला? निःसत्व, गुलामगिरीची मानसिकता असणारे काळे इंग्रज तयार झाले? विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या शब्दांत इंग्रजी म्हणजे वाघिणीचे दूध. दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा अनेकांनी त्याचे प्राशन केले. पण त्यातून ते इंग्रज नाही झाले. उलट तेच इंग्रजी सत्तेच्या विरोधात उभे ठाकले. पुढे महात्मा गांधी असोत की सरदार भगतसिंह, नेहरू, पटेल असोत की नेताजी सुभाषचंद्र. सारेच इंग्रजी शिक्षणपद्धतीतून घडले होते. तेव्हाची शिक्षणपद्धती, इंग्रजी भाषेचे हे उपकार की, तिच्यामुळे भारतात प्रबोधनपर्वास सुरूवात झाली. अनेक नव्या विचारांची, संकल्पनांची ओळख तिने भारतीयांना करून दिली. त्या कुठून आल्या याला महत्त्व नसते. ज्ञान हे ज्ञान असते.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

मुळात याला जोडूनच ते म्हणाले होते की, ‘त्या गटावर (म्हणजे अभिरुची, विचार, नैतिकता व बुद्धिमत्ता याबाबत इंग्रजी असेल अशा व्यक्तींवर) देशातील प्रादेशिक भाषा अभिजात करण्याची जबाबदारी आपण सोपवू. त्या प्रादेशिक भाषा पाश्चात्य पारिभाषिक शब्द घेऊन विज्ञानामध्ये संपन्न करण्याचे व अंशाअंशाने त्यांना ज्ञानसंक्रमण करणारे वाहक बनवण्याचे कार्य त्या गटाने करावे.’

यात मेकॉलेंचा कोणताही कुहेतू दिसत नाही. डॉ. जनार्दन वाटवे (विंग कमांडर, निवृत्त) आणि डॉ. विजय आजगावकर यांनी त्यांच्या ‘मेकॉले : काल आणि आज’ या संशोधन-पुस्तकातून मेकॉले यांच्यावरील अशा सर्व आरोपांचा व्यवस्थित समाचार घेतला आहे. मेकॉलेविरोधातील प्रोपगंडाचे पितळ उघडे पाडले आहे. ही माहिती अर्थातच मोदी यांची भाषणे लिहिणाऱ्यांपर्यंत गेली नसणार.

आणि मोदींचे काय? आपणच पसरवलेला प्रोपगंडा ते आता चघळत आहेत. आता प्रश्न असा की, मेकॉलेविरोधात सातत्याने असा अपप्रचार का केला जात आहे? त्याच्या नावावर बनावट उतारे का फिरवले जात आहेत?

मेकॉलेने जी शिक्षणपद्धती आणली, त्यामुळे येथे आंग्लविद्याविभूषित लोकांचा मोठा गट निर्माण झाला हे खरे. पण त्याचा परिणाम काय झाला? निःसत्व, गुलामगिरीची मानसिकता असणारे काळे इंग्रज तयार झाले? विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या शब्दांत इंग्रजी म्हणजे वाघिणीचे दूध. दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा अनेकांनी त्याचे प्राशन केले.

पण त्यातून ते इंग्रज नाही झाले. उलट तेच इंग्रजी सत्तेच्या विरोधात उभे ठाकले. पुढे महात्मा गांधी असोत की सरदार भगतसिंह, नेहरू, पटेल असोत की नेताजी सुभाषचंद्र. सारेच इंग्रजी शिक्षणपद्धतीतून घडले होते. तेव्हाची शिक्षणपद्धती, इंग्रजी भाषेचे हे उपकार की, तिच्यामुळे भारतात प्रबोधनपर्वास सुरूवात झाली. अनेक नव्या विचारांची, संकल्पनांची ओळख तिने भारतीयांना करून दिली. त्या कुठून आल्या याला महत्त्व नसते. ज्ञान हे ज्ञान असते. त्यात आपले-परके असे काही नसते. ते ज्यास लाभते त्याचे होते. हीच बाब संकल्पनांची. ती दुसऱ्यांची आहे म्हणून नाकारायची, असे आपल्या पूर्वजांनी केले नाही. आजही आपण तसे करीत नाही. तसे केल्यास येथे साधी मोबाईल फोनची बांधणीही करता येणार नाही आपल्याला.

मोदी हे विचारवंत वा शिक्षणतज्ज्ञ आहेत की काय हे माहीत नाही, पण त्यांना बहुधा ज्ञानाच्या क्षेत्रातही स्वदेशीची संकल्पना आणायची असावी. मेकॉलेप्रणीत शिक्षणव्यवस्थेमुळे ‘भारतीय लोक ब्रिटिश सांगतील तसे जगायला लागले. आयात विचार, आयात वस्तू, आयात सुविधा आणि आयात प्रारूपांवर जगू लागलो. दुसऱ्यांच्या संकल्पना आपल्याला श्रेष्ठ वाटू लागल्या. स्वदेशीला नाकारण्याची ही वृत्ती स्वातंत्र्यानंतरही कायम राहिली,’ हे त्यांचे विचार भलतेच मननीय आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या तथाकथित आयात संकल्पनांची, ज्ञानाची भीती वाटते. याचे कारण त्यांतून लोक प्रश्न विचारायला शिकतात. इंग्रजी शिक्षणपद्धती आल्यानंतर येथे तेच घडले. लोक जुन्या रूढी, परंपरा यांना प्रश्न विचारू लागले. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, गोपाळ गणेश आगरकर यांसारखे सुधारक वैदिक धर्माच्या आर्थिक-सामाजिक व सांस्कृतिक सत्तेला आव्हान देऊ लागले. त्या सत्तेत, त्या व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले होते, असे लोक त्यावर गप्प राहणे शक्यच नव्हते. त्या प्रतिगामी सनातन्यांनी सुधारकी, प्रागतिक, आधुनिक विचारांवर हल्ले करण्यास सुरूवात केली. हे विचार कोठून येतात, तर आंग्ल शिक्षणातून. तेव्हा त्यावर शेणगोटे फेकण्यास त्यांनी सुरुवात केली.

मुळात त्यांचा राग इंग्रजी भाषेवर वा आंग्ल शिक्षणावरही नाही. सनातन्यांनी त्या शिक्षणावर बहिष्कार टाकला आहे, असे कधीही झालेले नाही. आजही हे सरकार येथे विदेशी शिक्षण संस्थांना पायघड्या घालताना दिसते आहे. त्यांना राग आहे तो लोकांनी प्रबोधित होणे, सुधारणावादी होणे आणि त्यातून वैदिक-ब्राह्मणी धर्माच्या धोतरास हात घालण्याचे धाडस करणे याचा.

आगरकरादी मंडळी आंग्लविद्या शिकलेले व म्हणून ‘गुलामगिरीची मानसिकता’ असलेले म्हणून त्यांना सनातन्यांचा विरोध होता असे म्हणावे, तर वेदविद्यापारंगत स्वामी दयानंद सरस्वती यांनाही त्यांचा विरोध होताच. ते तर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते. पुण्यात दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीस तेव्हाच्या सनातन्यांनी तीव्र विरोध केला होता. त्या मिरवणुकीला उत्तर म्हणून एका गाढवास ‘गर्दभानंद’ असे नाव देऊन त्याची मिरवणूक काढली होती त्यांनी. गुरुकुल पद्धतीने ज्यांचे शिक्षण झालेले आहे, त्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार तरी येथील सनातन्यांना कुठे मान्य आहेत?

म्हणजे धर्मसत्तेला जो जो विचार आव्हान देईल, मग तो संस्कृतमधून आलेला असो की इंग्रजीतून, तो भारतीय शिक्षण पद्धतीतून आलेला असो, की इंग्रजी पद्धतीतून, त्याला यांचा विरोध आहे. त्यांच्या मेकॉलेविरोधातील प्रोपगंडामागे हा विरोध उभा आहे.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘परकीय हात’ आणि ‘प्रोपगंडा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......