जीएसटी समजावून घ्या; साध्या, सोप्या भाषेत (माध्यम - व्हिडिओ, भाषा - हिंदी व इंग्रजी)
पडघम - अर्थकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 03 July 2017
  • पडघम अर्थकारण जीएसटी GST

२५ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या वतीने खास पत्रकारांसाठी ‘जीएसटी कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आली होती. त्यात केंद्र सरकारचे रेव्हेन्यू सेक्रेटरी हसमुख अधिया यांनी जीएसटी विविध तपशीलवार माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तरे उत्तरे दिली. हा जवळपास दोन तास, तीन मिनिटांचा व्हिडिओ आहे. त्याची भाषा हिंदी आहे. सुरुवातीला अधिया जीएसटी म्हणजे नेमकं काय हे सविस्तर समजावून सांगतात आणि त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐकलात तर जीएसटीबद्दल तुम्हाला सर्व काही जाणून घेता येईल. हिंदी सिनेमाच्या कृपेने हिंदी भाषा आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे अवगत आहे. किमान चांगल्या प्रकारे समजू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ समजावून घ्यायला फारशी अडचण येत नाही. अधिया यांनी या कार्यक्रमाला ‘कार्यशाळा’ म्हटलं आहे. ही जीएसटीविषयीची कार्यशाळा पत्रकारांसाठी आयोजित केलेली असली तरी ती सर्वसामान्यांसाठीही तितकीच उपयुक्त आहे.

‘I am CA Student या नावाने फेसबुक पेज चालवणाऱ्या एका तरुणाने बनवलेला हा इंग्रजी भाषेतला व्हिडिओ. यातून जीएसटी म्हणजे नेमकं काय हे साध्या, सोप्या पद्धतीने सांगितले आहे. हा व्हिडिअो सात मिनिटांचा आहे. या व्हिडिओची भाषा इंग्रजी असली तरी ती थोडीशी लक्षपूर्वक ऐकली तर सहज समजू शकते. हा ग्राफिक, चित्रं यांच्या माध्यमातून जीएसटी समजावून सांगणारा अतिशय चांगला व्हिडिओ आहे. जरूर पहा. तुमचा गोंधळ त्यामुळे नक्की कमी होऊ शकेल.

हसमुख अधिया आणि सीए स्टुडण्ट यांच्याकडून अनुक्रमे हिंदी व इंग्रजी भाषेमधून जीएसटीविषयी जाणून घेतल्यानंतर तुम्ही लगेच हा व्हिडिओ पाहिला नाही तरी चालेल. थोडीशी विश्रांती घेऊन तासा दोन तासाने हा व्हिडिओ पहा. मात्र जरूर पहा. जवळपास २६ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अर्थतज्ज्ञ अरविंद दातार यांचं जीएसटीविषयीचं भाषण आहे. या करामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या परस्परसंबंधांमध्ये कशा प्रकारे वाद निर्माण होऊ शकतात, करविभाग आणि करदाते यांच्यातील समज-गैरसमज, कर चांगल्या मार्गाने चुकवण्याचा प्रयत्न करणं ही माणसाची कशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, अशा विविध गोष्टी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने दातार यांनी समजावून दिल्या आहेत. जीएसटीमुळे कायदेशीर व घटनात्मक स्वरूपाचे कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात, याचीही मांडणी दातार यांनी उत्तम प्रकारे केली आहे. त्यामुळे जीएसटी समजावून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितक्याच महत्त्वाच्या आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......