चीनमध्ये सर्वांत कठोर आणि सुरक्षित प्रवेश परीक्षा कशी घेतली जाते? चीनमध्ये नियम केवळ कागदावर नसून त्यांची काटेकोर अंमलबजावणीही केली जाते...
भारतातही परीक्षा सुरक्षेसाठी अनेक नियम आहेत, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होते का? २०२४मधील नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, आंदोलन झाले; परंतु दोषींवर नेमकी आणि तातडीची जबाबदारी निश्चित झाल्याचे चित्र अनेकदा दिसत नाही. प्रश्न असा आहे की, या वेळी तरी जबाबदारी निश्चित होईल का? की पुन्हा एकदा ‘येरे माझ्या मागल्या’सारखेच घडेल?.......