विकीपीडिया विरुद्ध ग्रोकीपीडिया व्हाया एलोन मस्क : अज्ञानापेक्षा ज्ञानाचा आभास जास्त धोकादायक
पडघम - तंत्रनामा
नचिकेत पंढरपुरे
  • विकीपीडियाचे बोधचिन्ह, एलोन मस्क आणि ग्रोकीपीडियाचे बोधचिन्ह
  • Mon , 17 November 2025
  • पडघम तंत्रनामा विकीपीडिया Wikipedia ग्रोकीपीडिया Grokipedia एलोन मस्क Elon Musk चॅट जीपीटी ChatGPT चॅटबॉट Chatbot कृत्रिम बुद्धिमत्ता AI

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

लोन मस्क एकेकाळी विकीपीडियाचे प्रशंसक होते, परंतु मस्क यांना सक्रिय राजकारणाचे वेध लागले आणि चित्र बदलले. उजव्या विचारांच्या डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी उघड पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली. अशाच एका प्रचार सभेत ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी उजव्या समर्थकांना खूष करण्यासाठी त्यांनी हिटलरचा नाझी सॅल्यूट केल्याच्या त्यांच्यावर आरोप झाला. मस्क यांनी त्याचे खंडन केले तरी मस्क यांच्या विकीपीडियावरील ‘बायोग्राफी’मध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला. मस्क यांनी हा मजकूर हटवण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. ग्रोकीपीडियावर मात्र या गोष्टीचा काडीमात्र उल्लेख नाही! कदाचित ग्रोकीपीडिया बनवण्यामागचे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण असावे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

“विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥

निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।

वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

१९व्या शतकाच्या शेवटी महात्मा फुल्यांनी दिलेला हा संदेश जातीव्यवस्थेसंदर्भात असला, तरी सध्याच्या माहितीच्या युगात ते ‘ब्रह्मवचन’ आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. माणसाला विद्येचे किंवा ज्ञानाचे महत्त्व फार पूर्वी समजून आले. त्यामुळे माणसाने हे ज्ञान साठवून ठेवण्यासाठी ऐतिहासिक कालापासून आपल्या परीने अनेक प्रयत्न केले. स्थळकाळाच्या बंधनातून ज्ञानाला मुक्त करण्यासाठी मानवाने साहित्य, संगीत, कला याची सुरुवात केली. तंत्रज्ञानातील प्रगतीच्या जोरावर पुस्तके छापण्यास सुरुवात केली. जग जवळ येऊ लागले. ज्ञानाची देवाणघेवाण सोपी झाली. यातून अनुत्तरित प्रश्नाची उत्तरे मिळू लागली. मग भरपूर पुस्तके झाल्यावर सर्व ज्ञानशाखांतील पुस्तके एकाच ठिकाणी जमवण्याची कल्पना मानवाला आली. यातून नालंदा, अलेक्सान्ड्रिया इ. सारखी विद्यापीठे, ग्रंथालये उभी राहू लागली. मानवाला ज्ञानाची चटक लागली.

त्यानंतर १८व्या शतकात फ्रान्समधील डेनिस डिडरॉट आणि अ‍ॅलनबर्ट यांनी ‘Encyclopédie’ प्रकाशित केली. आधुनिक विश्वकोशाची ही सुरुवात मानली जाते. मराठी विश्वकोश किंवा ‘Encyclopaedia Britannica’चे जाडजूड खंड आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वापरले असतील. पण जग आता वाचण्यासाठी कागद नाही, तर स्क्रीन वापरते. एकेकाळी अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयात जे ज्ञान साठवलं जात होतं, ते आज विकीपीडियासारख्या डिजिटल विश्वकोशांत सहज मिळतं. लाखो स्वयंसेवकांनी तयार केलेलं हे ज्ञानभांडार माहितीच्या लोकशाहीचं प्रतीक मानलं जातं. ज्ञानाला आता कुठलेही बंधन नाही आणि ते खऱ्या अर्थाने मुक्त झाले आहे, असे वाटत असले तरी मुक्ततेच्या या जगातही पूर्वग्रह, राजकारण आणि चुकीची माहिती यांची छाया दिसते.

जेव्हा डिजिटल विश्वकोशाची गोष्ट निघते, तेव्हा पहिले नाव डोक्यात येते ते म्हणजे विकीपीडिया. विकीपीडिया न वापरलेला माणूस शोधूनसुद्धा सापडणे अशक्य आहे. विकीपीडिया ही जगातील सर्वांत मोठी आणि मुक्त ऑनलाइन ज्ञानकोशसंपदा आहे. तिची स्थापना १५ जानेवारी २००१ रोजी जिमी वेल्स आणि लॅरी सॅंगर यांनी केली. ‘Wiki’ म्हणजे सर्वांसाठी खुलं आणि बदलता येणारं, तर ‘pedia’ म्हणजे ज्ञानकोश.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

आज विकीपीडियावर ३००पेक्षा अधिक भाषांमध्ये लाखो लेख आहेत. सर्वांत वापरल्या जाणाऱ्या वेबसाइटमध्ये विकीपीडियाने गेली अनेक वर्षे पहिल्या पाचातील स्थान पटकावले आहे. लाखो स्वयंसेवकांनी तयार केलेलं हे ज्ञानभांडार माहितीच्या लोकशाहीचं प्रतीक मानलं जातं. परंतु लोकशाहीच्या प्रतीकांसाठी सध्याचा काळ चांगला नाही, हे आपण अनुभवत आहोत आणि विकीपीडियासुद्धा त्याला अपवाद नाही. एक व्यक्ती सामूहिक ज्ञानाच्या या अनोख्या प्रयोगाच्या मागे हात धुवून लागला आहे... एलोन मस्क!

मस्कचा परिचय करून देण्याची गरज नाही. जगातील सर्वांत श्रीमंत माणूस, तंत्रज्ञानसम्राट, महाउद्योजक अशी अनेक विशेषणे एलोन मस्क यांना लावता येऊ शकतात. तरी त्यांची खरी ओळख ही ‘आपले विचार, तंत्रज्ञान आणि पैसा या जोरावर जग बदलायला निघालेला माणूस’ आहे. चंद्र, मंगळावर मानवी वसाहत हवी आहे त्यासाठी ‘स्पेस-एक्स’ (Space-X), इंधनाच्या प्रदूषणापासून जगाला वाचवण्यासाठी ‘टेस्ला’ (Tesla), मानवी मेंदूच्या जोडीला तंत्रज्ञानाची जोड देऊन मानवी मेंदूला अजून प्रगत करण्याच्या इराद्याने ‘नेउरलींक’ (Neuralink), वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आधुनिक बोगदे तयार करणारी ‘द बोरिंग कंपनी’ (The Boring Company), अशा कंपन्या मानवजातीसमोरील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने उभ्या केल्यावर तर लोकांना त्यांचा जीवनप्रवास एखाद्या ‘सुपरहिरो’सारखाच वाटू लागला. अगदी ‘आयर्नमॅन’सारखा! (एलोन यांनी आयर्नमॅनच्या एका भागामध्ये गेस्ट अपिअरन्स दिला आहे).

हे सर्व करत असताना एलोन मस्क यांनी राजकीय किंवा सामाजिक प्रश्नांवर मत मांडणे चालू ठेवले. आणि हे त्यांच्या दूरगामी उद्दिष्टांच्या दृष्टीने गरजेचेदेखील होते. कारण मानवजातीसमोरील किचकट प्रश्न मुळापासून सोडवायचे तर अवघड पारंपरिक राजकीय/सामाजिक मतांमध्ये बदल येणे गरजेचे आहे. एलोन मस्कने आपली मते मांडण्यासाठी ट्विटर (आत्ताचे ‘X’)चा वापर करतात. परंतु ही मते मांडताना एलोन मस्क यांची शैली उपरोधिक आणि आक्रमक असते. यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस ट्विटरच्या आक्षेपार्ह्य पोस्टबद्दलच्या नियमांचा सामना करावा लागला. ट्विटरशी वाद जरी होत असला तरी मस्क हे सध्याच्या माहितीच्या युगात ट्विटरचे महत्त्व जाणून होते. त्यांच्या मते ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे आणि ट्विटर हे असे व्यासपीठ आहे जिथे मानवजातीच्या भविष्यासंबंधी महत्त्वाचे विषय चर्चिले जातात’.

भांडवलशाहीचे उघड पुरस्कर्ते असलेले मस्क हे अर्थातच डाव्या विचारसरणीचे विरोधक आहेत. त्यांच्या मते ट्विटरचे व्यवस्थापन हे डाव्या विचारसरणीचे आणि त्यांच्या व्यासपीठावर उजव्या विचारसरणीच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करणारे होते. आणि म्हणूनच २०२२मध्ये त्यांनी साधारण ४४ अब्ज डॉलर्सना ट्विटर विकत घेतलं आणि २०२३ मध्ये त्याचं ‘X’ असं पुनरब्रँडिंग केलं.

हे सर्व करत असताना ‘‘मी ट्विटर पैसे कमावण्यासाठी विकत घेतले नाही. माझा उद्देश मानवजातीला मदत करण्याचा आहे. ट्विटर हे आता सर्व आवाजांसाठी खुले व्यासपीठ राहील. कदाचित हा इतिहासातील सर्वांत घाट्याचा सौदासुद्धा ठरू शकतो. परंतु मी हे नाही केले तर कदाचित मानवजातीचा विनाश अटळ आहे.” असा दावासुद्धा त्यांनी केला. ट्विटरच्या जोरावर आपली राजकीय मते उघडपणे मांडत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार केला. त्याचे बक्षीस म्हणून ट्रम्प यांनी एलोन मस्क यांना आपल्या सरकारमध्ये मंत्रीदेखील बनवले. परंतु काही कारणांमुळे त्यांच्यातील संबंध बिघडले आणि मस्क यांना मंत्रिपद सोडावे लागले. अजूनपर्यंत तरी ट्विटर जोरात चालू आहे, सोशल मीडियावर सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्लॅटफॉर्म आहे.

हे सर्व करत असताना त्यांची चाणाक्ष नजर AIसुद्धा होती. २०१५मध्येच त्यांनी सॅम अल्टमन यांच्याबरोबर OpenAI ही एक AI क्षेत्रात संशोधन करणारी संस्था स्थापन केली. परंतु सॅम अल्टमन आणि OpenAIच्या व्यवस्थापनाबरोबर झालेल्या वादांमुळे त्यांनी २०१८मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. मस्क यांच्या मते “OpenAI सुरू करताना मानवजातीतच्या विकासासाठी ही एक नॉन प्रॉफिट संस्था आणि Open Source म्हणजेच अशी सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामिंग प्रणाली, जिचा Source Code सर्वांसाठी खुला असतो अशी संस्था राहील असे ठरले होते. पण अल्टमन यांनी नफेखोरी आणि गुप्ततेच्या मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.” याबरोबरच ‘डाव्या विचासरीचा प्रोपोगांडा चालवणारे व्यासपीठ’ हा जुना मुद्दा आलाच. अल्टमन यांनीसुद्धा मस्क यांच्यावर दादागिरीला आरोप केला आणि आपले काम चालू ठेवले. बऱ्याच घडामोडीनंतर OpenAIच्या प्रयत्नांना २०२२मध्ये ChatGPTच्या रूपाने फळ मिळाले!

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

Grokipedia म्हणजे एआयवर आधारित डिजिटल विश्वकोश. तो Xशी जोडलेला असल्याने त्याच्याकडे रिअल-टाइम डेटा असतो. मशीन प्रत्येक लेख तपासते, स्रोत पडताळते, आणि माहिती अद्ययावत ठेवते. समर्थकांच्या मते, ही विकीपीडियानंतरची पुढची पायरी आहे. मानवी ज्ञानाला कृत्रिम बुद्धिमतेची जोड देऊन पूर्वग्रहदूषित माहिती पोचवण्याचा प्रयत्न. पण टीकाकार म्हणतात की, हीच ‘नवी सेन्सॉरशिप’ आहे, जिथे ‘सत्य’ ठरवण्याचा अधिकार माणसाकडून मशीनकडे गेला आहे. शिवाय अभिव्यक्तीस्वातंत्र्यच्या नावाखाली चुकीची किंवा संवेदनशील माहिती पसरवली जाण्याचासुद्धा धोका आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

ChatGPTच्या यशानंतर OpenAI ही सध्या तरी AI क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी मानली जाते. Googleचे Gemini, Microsoftचे Copilot, चीनचे DeepSeek यासारखे शेकडो chatbot आता उपलब्ध असले, तरी ChatGPTला बाजारात सर्वांत प्रथम येण्याचा फायदा मिळाला आहे. AI तंत्रज्ञाचा विस्तार आणि लोकप्रियता बघून २०२४मध्ये मस्क यांनी Xच्या जोडीने ‘Grok’ हा आपला chatbot जगासमोर आणला. Xशी संलग्न असल्याने Grok लगेचच लोकप्रिय झाले आणि ChaptGPT, Geminiच्या पंक्तीत जाऊन बसले.

मस्क यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आग्रहामुळे विवादास्पद प्रश्नांच्या बाबतीत बाकीचे chatbot हे उत्तर देण्याचे टाळत असल्याचे दिसत असले, तरी Grokअशी उत्तरे देण्याचे टाळत नाही. शिवाय ‘Grok’ हे जगातील सर्वांत मोठ्या समाजमाध्यमाशी म्हणजेच Xशी संलग्न असल्याने त्याचा माहितीच्या सत्यतेसाठी (फॅक्ट चेक) प्रचंड वापर केला जातो.

कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर ‘फॅक्ट चेकिंग’साठी करता येऊ शकतो, हे लक्षात आल्यावर मस्क यांनी आपली नजर पुन्हा ‘विकीपीडिया’वर पडली. मस्क हे आता विकीपीडियाचे कट्टर विरोधक असले, तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवासात त्याचे महत्त्व जाणून होते. कृत्रिम बुद्धिमत्ता कुठल्याही माहितीच्या सत्यतेसाठी त्या माहितीच्या स्त्रोताच्या दर्जाला प्राधान्य देते. विकीपीडिया हा सध्यातरी जगातील सर्वांत जास्त वापरला जाणारा विश्वकोश असल्याने साहजिकच कृत्रिम तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकीपीडिया हा वरच्या दर्जाचा स्रोत मानला जातो.

परंतु मस्क यांचे मत अगदी विरुद्ध आहे. त्यांच्या मते कोणत्याही गोष्टीविषयी गूगलसारख्या सर्च इंजिनवर सर्च केले असता सर्वांत प्रथम विकीपीडियाची लिंक येते. त्यावर सध्याचे AI मॉडेल ट्रेन होत आहेत. माहितीच्या आणि त्या निमित्ताने मानवाच्या प्रवासासाठी हे धोकादायक आहे. मस्क यांनी हा धोका टाळण्यासाठी AIची मदत घेण्याचे ठरवले आणि जन्म झाला ‘ग्रोकीपीडिया’चा.

ग्रोकीपीडिया म्हणजे एआयवर आधारित डिजिटल विश्वकोश. तो Xशी जोडलेला असल्याने त्याच्याकडे रिअल-टाइम डेटा असतो. मशीन प्रत्येक लेख तपासते, स्रोत पडताळते, आणि माहिती अद्ययावत ठेवते. समर्थकांच्या मते, ही विकीपीडियानंतरची पुढची पायरी आहे. मानवी ज्ञानाला कृत्रिम बुद्धिमतेची जोड देऊन पूर्वग्रहदूषित माहिती पोचवण्याचा प्रयत्न. पण टीकाकार म्हणतात की, हीच ‘नवी सेन्सॉरशिप’ आहे, जिथे ‘सत्य’ ठरवण्याचा अधिकार माणसाकडून मशीनकडे गेला आहे. शिवाय अभिव्यक्तीस्वातंत्र्यच्या नावाखाली चुकीची किंवा संवेदनशील माहिती पसरवली जाण्याचासुद्धा धोका आहे. Grokने मध्यंतरी एका उत्तरात हिटलरचे कौतुक करत ज्यू लोकांवर खालच्या पातळीची टीका केल्याचे समोर आले. ग्रोकीपीडिया हे Grokशी संलग्न असल्याने या चुका इथे पण होऊ शकतात.

ग्रोकीपीडिया हे २८ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्या प्राथमिक स्वरूपात जगासमोर आले. सध्या त्यावर ९ लाखाच्या आसपास लेख आहेत. सर्वांसाठी वाचायला खुले असले तरी सध्या फक्त Xचे खातेधारक लेखांमध्ये दुरुस्ती सुचवू शकतात. सुचवलेली दुरुस्ती AIच्या मदतीने तपासली जाते आणि लगेच बदल केला जातो. लेखात झालेल्या सर्व दुरुस्त्या आणि त्यांचे स्रोत आपण बघू शकतो. कोणताही विवाद उद्भवला तर त्यावर Xवर पोल घेतला जाईल आणि लोकानुमते वाद सोडवला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्वांनुमताचा हा प्रयोग आश्वासक वाटत असला, तरी अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे.

विकीपीडिया आणि ग्रोकीपीडियामध्ये ‘माहितीचा स्रोत’ हा खरा वादाचा मुद्दा आहे. हा मुद्दा सापेक्ष आहे. एखाद्याला अतिशय विश्वसनीय वाटणारे सूत्र हे दुसऱ्याला अतिशय बेभरवशी वाटू शकते. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारसरणीच्या लोकांनी आपापली माहिती प्रसारण केंद्रे बनवली आहेत. त्यामुळे विकीपीडियावर एका विचारसरणीच्या स्रोतांना प्राधान्य मिळत असल्याने ग्रोकीपीडियावर मुद्दाम त्याविरुद्ध विचारांना प्राध्यान देण्याची काहीशी खुनशी वृत्ती आपण नाकारू शकत नाही. शिवाय वादाचे मुद्दे हे Xच्या माध्यमातून सोडवण्याचा विचार म्हणजे एखादे भांडण चव्हाट्यावर आणल्यासारखे होईल. त्यात एखादा विषय संवेदनशील असेल, तर लोकांच्या भावना दुखावल्याचे निमित्त होऊन सामाजिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. विकीपीडियामध्ये पण या त्रुटी आहेत, पण ग्रोकीपेडिया हे Xशी संलग्न असल्याने एखादी छोटी कुजबुजसुद्धा मोठी बातमी बनू शकते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

विकीपीडियाला पर्याय म्हणून ग्रोकीपीडिया तयार करण्यात आले असले, तरी त्यावरील बहुतांशी लेख हे जसेच्या तसे घेण्यात आले आहेत. माहितीक्षेत्रातलील काही आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे असे करता येते. विकीपीडियावरील लेखांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा तडका देऊन एक नवीन पदार्थ देण्याचा हा प्रयत्न वाटतो. त्यात गूगलवर सध्यातरी विकीपीडियाला प्राधान्य देण्यात आल्याने ग्रोकीपीडियाला लगेच लोकप्रियता मिळणे कठीण वाटते.

एलोन मस्क एकेकाळी विकीपीडियाचे प्रशंसक होते, परंतु मस्क यांना सक्रिय राजकारणाचे वेध लागले आणि चित्र बदलले. उजव्या विचारांच्या डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी उघड पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली. अशाच एका प्रचार सभेत ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी उजव्या समर्थकांना खूष करण्यासाठी त्यांनी हिटलरचा नाझी सॅल्यूट केल्याच्या त्यांच्यावर आरोप झाला. मस्क यांनी त्याचे खंडन केले तरी मस्क यांच्या विकीपीडियावरील ‘बायोग्राफी’मध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला. मस्क यांनी हा मजकूर हटवण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. ग्रोकीपीडियावर मात्र या गोष्टीचा काडीमात्र उल्लेख नाही! कदाचित ग्रोकीपीडिया बनवण्यामागचे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण असावे.

अर्थात या सर्व शंका आहेत. मानवाचा पुढचा प्रवास हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर होईल, हे आता निश्चित झाले आहे. ग्रोकीपीडिया यशस्वी नाही ठरले, तरी हा पुढच्या वाटचालीतील महत्त्वाचा प्रयोग आहे. आज माहितीवर नियंत्रण म्हणजे सत्तेचं साधन बनलं आहे. प्राचीन काळात धर्मसत्ता माहितीवर अधिकार ठेवत होती; नंतर राजसत्ता; आता तंत्रज्ञान कंपन्या. विकीपीडियाने ज्ञान लोकशाहीकडे आणायचा प्रयत्न केला, पण आता याची सूत्रे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जात आहेत.

अज्ञानापेक्षा ज्ञानाचा आभास हा जास्त धोकादायक असतो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमतेच्या हाती आपल्या भविष्याची सूत्रे देण्याआधी ते तंत्रज्ञान योग्य आणि खऱ्या माहितीवर उभे आहे, याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य बनते. अविद्यने होणारे भविष्यतील अनर्थ टाळण्यासाठी कृत्रिम तंत्रज्ञान तावून सुलाखून घेणे ही आपली जबाबदारी आहे. सर्वसामान्य माणसाला शक्य नसले, तरी सतत नवीन जाणून घेण्याची आवड असलेल्या लोकांनी ग्रोकीपीडियाच्या या प्रयोगात भाग घेण्याची गरज आहे.

.................................................................................................................................................................

लेखक नचिकेत पंढरपुरे फुटबॉल आणि माहिती तंत्रज्ञान यांचे अभ्यासक आहेत.

nachiketpandharpure@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

Post Comment

Ramdas Yenkar

Tue , 18 November 2025

Well done!!


Ketki Yenkar

Tue , 18 November 2025

Excellent


Anita Yenkar

Tue , 18 November 2025

Nice


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......