वर्णाश्रमांच्या चौकटीत शक्य होती ती स्वधर्मसाधना वर्ण-आश्रम-जात-रहित झालेल्या वर्तमान सामाजिक परिस्थितीतही व सदासर्वदा शक्य आहे

मी अमुक, मी तमुक, हे माझे अन्‌ हे मला हवे आहे, अशा प्रकारच्या भूमिका जगणारा मानव यथासांग स्वधर्मसाधना करून संत श्रीज्ञानेश्वर म्हणतात, त्याप्रमाणे ‘विश्वव्यापी मानव’ झाल्याचे अनुभवतो. या अर्थाने त्याचा तो सानुभव स्वधर्म हा विश्वव्यापी मानवधर्म होतो. आपल्या ‘स्व’रूपाचे सदासर्वदा स्मरण राखत व कोणत्याही भूमिकेचा दुराग्रह न धरता इष्ट कर्तव्याचरण निष्काम भावनेने करत राहणे म्हणजे सर्वोत्तम स्वधर्माचे पालन.......