श्रीदेवीकृत ‘स्व’रूपदर्शन
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • श्रीदेवी
  • Thu , 11 October 2018
  • पडघम सांस्कृतिक श्रीदेवी Shridevi नवरात्र विजय बाणकर Vijay Bankar

देवी : त्वरित प्रसन्न होणारी एक देवता

कलियुगामध्ये देवी व गणपती या दोन देवता त्वरित प्रसन्न होतात, या अर्थाचे “कलौ चंडीविनायकौ” हे संस्कृत वचन समर्थ श्रीरामदासस्वामी यांनी आपल्या ‘दासबोध’नामक ग्रंथारंभी उद्धृत केले आहे. ग्रंथारंभी त्यांनी या दोन्ही देवतांना नमनही केले आहे.

अनेक ‘गीता’ आहेत  

भारतीय धार्मिक व अध्यात्मपर वाङ्मयात अनेक ‘गीता’ असल्याचे आढळून येते. श्रीरामदासस्वामींनी ‘दासबोधारंभी’ काही ‘गीतांचा’ नामोल्लेख केला आहे, तर लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य’ या ग्रंथारंभी ज्ञात ‘गीतांची’ एक विस्तृत यादीच दिली आहे.

सर्व गीतांचा विषय व उपदेश एकच

‘गीता’ शंभराहून अधिक असल्या तरी त्यांचा अंतिम प्रतिपाद्य विषय मात्र एकच आहे. परमेश्वराची अनेक रूपे व अवतार असले तरी परमेश्वर म्हणून जे काही तत्त्व आहे ते एकमेवाद्वितीय आहे. अर्थात श्रीकृष्ण, श्रीगणपती, श्रीशंकर किंवा श्रीदेवी ही भिन्नभिन्न नावे आणि रूपे असली तरी ‘त्यांची प्रकृती’ किंवा ‘तत्त्व’ (म्हणजे अंतिम वा मूळ रूप) एकच आहे. म्हणून सर्व गीतांचा उपदेशही एकाच साच्याचा आहे. तसेच सर्व गीतांचे ध्येयही एकच आहे. ते म्हणजे, संसारचक्रात सापडलेल्या मनुष्याला स्वधर्मरत वा आत्मदेवाभिमुख करणे, हे होय.

जशा ‘गीता’ अनेक आहेत, तशाच ‘देवीगीता’ही अनेक आहेत. उदा. सरस्वती गीता, विद्यागीता, देवी आदिमाया-गीता, श्रीशक्तिगीता, भगवती गीता, सावित्री गीता. प्रस्तुत ‘श्रीदेवीकृत ‘स्व’रूपदर्शन’ या लेखातील निरुपण प्रामुख्याने भागवत पुराणातील ‘देवीगीता’ या ग्रंथाधारे केले आहे.

देवीने केलेला ज्ञानोपदेश म्हणजे ‘देवीगीता’

तारकासुराने उपद्रव दिल्यामुळे सर्व देव देवी भगवतीची आराधना करतात. तारकासुरापासून संरक्षण करावे म्हणून ते तिची प्रार्थना करतात. देवी त्यांना अभय देते. हिमालयाचे घरी मी त्याची कन्या म्हणून जन्म घेईन, पुढे शंकराला वरीन, त्यानंतर माझे पोटी स्कंद जन्माला येईल व तो तुमचे रक्षण करील, असे त्यांना सांगते. स्वत:स धन्य व भाग्यवान समजून हिमालय देवीला म्हणतो, “हे परमेश्वरी, जशी कृपेने तू जगन्माता माझी कन्या होत आहेस, तसेच सर्व वेदान्तसिद्ध असे तुझे रूप व ज्याच्या योगाने मी त्वद्रूप होईन म्हणजे तुझे व माझे रूप एकच असल्याचे मला अनुभवास येईल, तो ज्ञान व भक्ती यांनी युक्त असलेला कर्मयोगही तू मला सांग.” त्यानंतर भक्तांच्या कामना पूर्ण करणारी अंबा आपल्या गूढगम्य स्वरूपाबाबतचे रहस्य त्याला सांगते. देवी जगदंबेने हिमालयास केलेला तो रहस्यमय ज्ञानोपदेश म्हणजे दशाध्यायी छोटीशी ‘देवीगीता’ होय.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

देवी‘स्व’रूपाचे ज्ञान होणे हा मुक्त होण्याचा उपाय

आपल्या अलौकिक रूपाचे दर्शन घडवताना देवी म्हणते, “सृष्टीच्या पूर्वी सर्वभेदशून्य अशी मीच होते, साकार-निराकार असे काहीच नव्हते. त्या माझ्या रूपालाच आत्मरूप, चित्, संवित्, परब्रह्म अशी नावे आहेत. त्याला अव्यक्त, सर्व कारणांचे कारण, सर्व तत्त्वांचे उत्पत्तीस्थान अशाही संज्ञा आहेत. त्यापासूनच हे जगत व त्याचीच जणू एक छोटीशी प्रतिकृती म्हणजे देह निर्माण होतो. ‘देवी अथर्वशीर्षात’ देवी म्हणते त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपिणी अशा तिच्यापासूनच प्रकृती आणि पुरुष यांनी युक्त असे व्यक्ताव्यक्त जग निर्माण होते. पण, ‘देह म्हणजेच मी’ असा अभिमान धरल्यामुळे तो परमात्मा (पुरुष) जीवभावास प्राप्त होतो आणि धर्म व अधर्म यांना कारण होणाऱ्या विविध क्रिया करू लागतो. त्यामुळे तो जन्ममरणपरंपरेत अडकून पडतो व सुखदु:खे भोगत राहतो. अर्थात जन्ममरणपरंपरेस स्वत:च्या अविनाशी रूपाचे अज्ञान हे कारण होय. या अज्ञानाचा नाश करणे हेच जन्माचे साफल्य होय. अर्थात, आपल्या ‘स्व’रूपाचे ज्ञान हा संसारचक्रातून मुक्त होण्याचा उपाय आहे.”

श्रीसद्गुरुकृपेने देवीच्या ‘त्या’ रूपाचे ज्ञान होते

आपल्या ‘स्व’रूपाचे दर्शन होण्याचा उपायदेखील देवीने सांगितला आहे. तो असा - “स्वरूपाचे ज्ञान व निष्काम कर्म यांच्या योगाने अज्ञानाचा नाश होतो. निष्काम कर्म हे ज्ञानप्राप्तीस सहाय्यकारी होते. कारण त्यामुळे चित्तशुद्धी होते. म्हणजे तम व रज या गुणांमुळे जे कर्मफलाभिलाषी व आळशी होत असते, ते चित्त त्या गुणांचा प्रभाव कमी होत जाऊन सत्त्वगुणयुक्त होते व अंत:करण स्वाधीन होऊ लागते. चित्त स्वाधीन होत असलेल्या मुमुक्षु पुरुषाने श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ अशा (म्हणजे खऱ्या) गुरुंचा निष्कपट भक्तीने आश्रय करावयाचा असतो. ब्रह्मनिष्ठ गुरू म्हणजे सद्गुरू होय. श्रीसद्गुरू आपल्या शिष्यास आत्मरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून ‘तत्त्वमसि’ (=‘ते तू आहेस’) वगैरे वेदांमधील महावाक्यांच्या अर्थाचा उपदेश करतात. त्यांच्या कृपेने जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचे अनुभवयुक्त ज्ञान होते, तो साधक निर्भय होतो व माझ्या रूपालाच येऊन पोचतो.”

आपण व देवी मुळात एकरूपच आहोत

‘तत् त्वम् असि’ या महावाक्याच्या अर्थाचे अनुभवयुक्त ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून देवीने त्याचा वाच्यार्थही स्पष्ट केला आहे. अर्थात त्याद्वारे तिने आपल्या स्वरूपाची सुस्पष्ट कल्पनाही देऊन ठेवली आहे. देवी म्हणते, “तत् या पदाचा वाच्यार्थ मी आहे आणि त्यामुळे त्वं या पदाचा वाच्यार्थ जीव होय आणि तत् व त्वं या दोन्हींचे ऐक्य ‘असि’ या पदाने सांगितले आहे.” देवी व जीव हे दोन्ही चिन्मात्रस्वरूप (म्हणजे सजातीय) असल्यामुळेच त्यांचे ऐक्य संभवते. हा देवीनेच अधोरेखित केलेला विचार समजून घेणे आवश्यक होय. म्हणूनच, आपण व देवी स्वरूपत: म्हणजे मुळात एकरूपच आहोत, असे आपल्याला अनुभवास यावे, अशी हिमालयाने प्रार्थना केली होती, असे पूर्वी नमूद केले आहे.

देहत्रयातीत आत्मा वा सर्वाधार ब्रह्म हेच देवीचे स्वरूप

या अनुभवाद्वारा स्थूल, सूक्ष्म व कारण या देहांहून व्यतिरिक्त (त्यांहून वेगळा, अतीत (= देहत्रयातीत) झालेला पुरुष ब्रह्मच होतो, आपण स्वरूपत: देवीशी एकरूप आहोत अर्थात देवीदेखील ब्रह्मस्वरूप आहे, आत्मरूपा आहे, अशी त्याची निश्चिती होते. साडेतीन हातांचा स्थूल देह हा पंचीकृत महाभूतांपासून झालेला आहे, तो सुखदु:खादि भोगांचे आश्रयस्थान आहे, तो वार्धक्य, विविध व्याधी व सर्व कर्मे यांनी युक्त आहे. तो विनाशी व क्षणिक आहे, असे त्यास स्पष्ट दिसते. अर्थात स्थूल देह हा आत्मरूप चित्शक्तीची स्थूल उपाधी आहे (म्हणजे स्थूल देह हे आपले व देवीचेही मूळ रूप नाही, असे अनुभवयुक्त ज्ञान होते.) ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व प्राणपंचक व मन, बुद्धी यांनी युक्त असलेला सूक्ष्म देह हा अपंचीकृत भूतांपासून उत्पन्न झालेला आहे. सुखदु:खादिंना जाणणारा सूक्ष्म वा लिंग देह हा आत्म्याची दुसरी उपाधी होय (म्हणजे हा देहही देवीचे व आपले स्वरूप नाही), असे अनुभवयुक्त ज्ञान साधकास होते. अनादि व अनिर्वाच्य असे जे अज्ञान तोच आत्म्याचा कारणरूप तिसरा देह होय. स्थूल, सूक्ष्म व कारण या तिन्ही देहरूपी उपाधींचा नाश झाला की, केवळ आत्माच अवशिष्ट (शेष) राहतो. या तीन देहांमध्ये सर्वदा अंत:स्थ म्हणजे आत गुप्त होऊन राहिलेले अन्नमयादि पाच कोश आहेत. “या पाचही कोशांचा परित्याग केला असता, देवी म्हणते, “वेद ‘नेति नेति’ या वाक्यांनी ज्याचे वर्णन करतात, ते सर्वांचा आधार असलेले ब्रह्म हेच माझे स्वरूप आहे.”.

त्रिकालाबाधित आत्मा हे देवीचे परम पद होय

आपल्या ब्रह्मरूपाचे वा आत्मरूपाचे माहात्म्य सांगताना देवी म्हणते, “हे माझे स्वरूप कधी उत्पन्न होत नाही व नष्टही होत नाही. कारण हा आत्मा अज म्हणजे न जन्मणारा व त्यामुळे नित्यनिर्विकार, शाश्वत म्हणजे त्रिकालाबाधित व शरीर नष्ट झाले तरी कधीही नष्ट होत नाही. (संत श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे) हा आत्मा सूक्ष्माहूनही सूक्ष्म व मोठ्याहूनही मोठा आहे व तो (भगवद्गीतेत अनेकदा म्हटल्याप्रमाणे) सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये आत्मरूपाने स्थित आहे. (उपनिषदांत म्हटल्याप्रमाणे) हा आत्मा रथी असून शरीर हाच रथ होय, बुद्धी हा सारथी, मन हाच लगाम, इंद्रिय हेच घोडे व विषय हेच मार्ग आहेत, असे जाणावे. जो विवेकी असतो त्याचे मन स्वाधीन असते. त्यालाच हे आत्मारूपी माझे स्थान प्राप्त होते, त्यापासून तो कधीही भ्रष्ट होत नाही व पुन्हा जन्माला येत नाही. ज्याची विवेकबुद्धी सारथी आहे व मन हा लगाम आहे तोच संसाररूपी मार्गाच्या पार जातो की जेथे माझे परम पद आहे.”

तुर्यावस्थेत ‘स्व’रूप देवीचे दर्शन घडते

साधकाने आपल्या शरीरातच ‘हृीं’ या मायाबीजमंत्राच्या तीन अक्षरांची भावना कशी करावयाची त्याबाबतही म्हणजे अंतर्निष्ठ भक्तीबाबतही देवीने मार्गदर्शन केले आहे. ते असे - “या मंत्रातील ‘ह’कार हा स्थूल देह, ‘र’कार हा सूक्ष्म देह व ‘ई’कार हाच कारणदेह असून मीच हृीं’काररूपाने तुरीयपदवाच्य आहे, असे समजावे.” (श्रीगणपती व श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे) देवीचे स्वरूप तुरीय आहे. अर्थात जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील तुर्यानामक चतुर्थ अवस्थेतच साधकाला आपला जीवात्मा देवी आहे, असे अनुभवास येते. “प्रत्येकाच्या शरीरात असलेली कुंडलिनी ही मद्रूपच आहे, माझ्याहून भिन्न नाही,” असे सुस्पष्ट विधानही देवीने केले आहे.

आत्मरूप देवीला जाणणाराचे ठिकाणी देवीचे दर्शन घडते

योगिराज संत श्रीज्ञानेश्वर यांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या सहाव्या अध्यायात कुंडलिनीयोगाचे साद्यंत वर्णन केले आहे; तर, देवीने ‘देवीगीते’त त्याचे संक्षिप्त वर्णन केले आहे. योगसाधकाने करावयाची अष्टांगयोगसाधनाही देवीने उल्लेखिली आहे. त्यानुसार देहांतर्गत षड्चक्रे ओलांडीत गेलेला जीवरूपी साधक म्हणजे कुंडलिनी जगदंबा वा शक्ती शेवटी ब्रह्मांडात वा मेंदूच्या पोकळीत असलेल्या सहस्रदलकमलात परमात्मारूपी शिवाशी ऐक्य पावते व तो संसारबंधनातून मुक्त होतो. “त्या श्रेष्ठ साधक पुरुषाच्या ठिकाणी देवी जगन्मातेचे म्हणजे माझे सर्वच्या सर्व गुण येतात,” असेही मोठे प्रेरक विधान देवीने केले आहे. “जीव व ब्रह्म यांचे पूर्ण ऐक्य आहे अशी भावना केल्याने म्हणजे अनुभव घेतल्याने साधक मद्रूप होतो,” म्हणून अशा प्रकारे “मला जाणणारा ज्या ठिकाणी असेल तेथेच माझे दर्शन होईल. मी तीर्थांच्या ठिकाणी किंवा कैलास पर्वतावर किंवा वैकुंठलोकीं कधीच राहत नसून माझा ज्याला साक्षात्कार झाला आहे अशा ज्ञा(नवा)नाच्या हृदयकमलामध्ये मी वास करते. माझे ज्याला ज्ञान झाले आहे, अशा पुरुषांचे एकदा पूजन करणे हे माझ्या पूजेपेक्षा कोटीपट फल देणारे आहे. अशा त्या पूजकाचे कूल पवित्र होते व माता कृतकृत्य होते. ज्याच्या अंत:करणाचा लय चैतन्यामध्ये झालेला असतो, त्याच्या योगाने पृथ्वी पुण्यवती होते. हे पर्वतोत्तमा, जे तू ब्रह्मज्ञान विचारिलेस ते मी तुला सर्व सांगितले आहे. याहून अधिक काही सांगण्यासारखे राहिले नाही,” असा निर्वाळाही देवीने देऊन ठेवला आहे.

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 12 October 2018

नमस्कार विजय बाणकर, सुंदर लेख आहे. पृथ्वी पुण्यावती होणे हेच मानवाच्या सुखाचे मूळ निधान आहे. पृथ्वीस पापांचा भार सहन करावा लागू नये म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. जगदंबादेवीस सादर प्रणाम! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......