रामलल्लाची पुनर्स्थापना झाली, मशीद होतेय… आता एक पाऊल पुढे जात अयोध्येत देशात अस्तित्वात असलेल्या इतर धर्मांच्या उपासना पद्धतीचीही प्रतीकं उभारावीत…

रामलल्लाची पुनर्स्थापना ही व्यापक सौहार्दाचा शेवट नसून, सुरुवात ठरावी. अयोध्या सर्व उपासनापद्धतीचं केंद्र बनवता येईल. निव्वळ मंदिर, मशिदीवर न थांबता एक वैदिक मठ, एक चर्च, एक स्तूप, एक सिनेगॉग, एक अग्यारी, गुरुद्वारा, एक जैन तीर्थस्थळ निर्माण करता येईल. या सर्व इमारती भव्य, निर्मळ आणि सुंदर होऊ द्या. सर्व उपासक आपापल्या केंद्रात जातील आणि नंतर निरपेक्ष भावनेनं इतरांच्या श्रद्धास्थानांनाही भेट देतील.......

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

राजकीय सत्ता ही नेहमीच मोजक्या काही हातांमध्ये एकवटणार असेल, सरकारी नोकरीच्या संधी आणखी काही मोजक्याच हातांना उपलब्ध होणार असतील, तर अन्य मराठ्यांनी आपले लक्ष इतर क्षेत्रांवर केंद्रित करायला हवे. आरक्षणासाठी आतुर झालेले मराठा त्यामुळे येणाऱ्या संभाव्य डोकेदुखीचा विचार करत नाहीत. आधुनिक महाराष्ट्रासाठी आवश्यक निम्म्या चांगल्या गोष्टी मराठ्यांमुळे होऊ शकत नाहीत अन निम्म्या मराठ्यांशिवाय होऊ शकत नाहीत.......