शरद पवारांनी ‘न सांगावे वर्म। जनी असो द्यावा भ्रम’ हे तुकारामाचे शब्द आयुष्यभर खरे केलेत, पण आता हे अती झालं...
पडघम - राज्यकारण
विनय हर्डीकर
  • पवारांच्या राजीनामानाट्यानंतरचं एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 18 May 2023
  • पडघम राज्यकारण शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP उद्धव ठाकरे Uddhav Thackeray देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis शिवसेना Shivsena भाजप BJP

खरं म्हणजे भाकरी फिरवायची नव्हतीच. बेत होता तो भाकरी, तिच्याखालचा तवा, चूल आणि तिच्यातला जाळ या चारही गोष्टी आपल्या ताब्यात ठेवण्याचा. गेल्या बुधवारी बातमी आली की, शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा निश्चय पक्षकार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. तेव्हा मी म्हटलं होतं की, आठ दिवसांत हा निर्णय फिरेल. त्यांनी तो तिसऱ्या दिवशीच फिरवला. आता एक गोष्ट स्पष्ट आहे... भाषा अशी केली आहे की, येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवारच अध्यक्ष राहतील. त्या निवडणुकीनंतर तीन-चार महिन्यांत महाराष्ट्राची विधानसभा आहेच. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हाताला काही लागलं, तर देशपातळीवरही पवारांचा ‘क्लेम’ वाढू शकतो. आणि त्यामुळे राज्यामध्ये त्यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या उद्योगांना आतापेक्षा जास्त महत्त्व येऊ शकतं.

समजा, लोकसभा निवडणुकीत काही जमलं नाही, तर निदान राज्य हातचं जाऊ नये, म्हणून मग महाराष्ट्रावर लक्ष ठेवून राहावंच लागेल; तसंही शरद पवार केंद्रीय मंत्री असतानाही महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे हजर असायचेच. तर महाराष्ट्र हातचा जाऊ नये म्हणून महाराष्ट्रामध्ये थांबावंच लागेल. म्हणजे आता ही भाकरी, हा तवा आणि ही चूल डिसेंबर २०२४पर्यंत आहे अशीच राहणार.

भाकरी फिरवायची होती पुतण्याची. ती नुसती फिरली नाही, तर करपून गेली. काका, पुतणे आणि चुलतभाऊ यांच्या संघर्षावर संपूर्ण महाभारत उभं आहे. महाभारतात एक कथा अशी आहे; धृतराष्ट्राने युधिष्ठिराला आलिंगन द्यायची इच्छा व्यक्त केली. म्हातारा आंधळा असला तरी बळकट होता. या इच्छेमागे कपट आहे, हे ओळखायला कृष्णासारखं दुसरं कोण मिळणार? त्याने ते लगेच ओळखलं. आणि युधिष्ठिराऐवजी लोखंडाचा पुतळा पुढे केला. धृतराष्ट्राने त्याला मिठी मारल्यानंतर त्या पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले. इथे तर डोळस धृतराष्ट्र आहे. आणि त्याच्या अंगात भरपूर ताकद आहे. गेल्या महिनाभरातच पुतण्याची - अजित पवारांची - दोन वक्तव्यं प्रसिद्ध झाली. एक म्हणजे, ‘मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल.’ याच्यावर काय डावपेच झाले माहीत नाही. पाठोपाठ दुसरं वक्तव्य असं आलं की, ‘मी शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे.’ ‘आमच्याबद्दल कंड्या पिकवल्या जातात’ असं काका-पुतणे या दोघांनीही म्हटलं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

म्हणजे एकीकडे काकांनी ‘मी पक्ष सोडणार नाही,’ असं पुतण्याकडून वदवून घेतलं. आणि त्याची महत्त्वाकांक्षा अजून पुरेशी पातळ झालेली नाही, याचीही खात्री करून घेतली. पवारांच्या राजीनामा नाटकात कदाचित पुतण्याने थोडा उतावळेपणाच केला. त्याने चुलत बहिणीला सांगितलं की, ‘तू बोलू नको. राजीनामा मागे घ्या वगैरे तू साहेबांना सांगू नको. आपण घरातली माणसं आहोत.’ साहेब आपल्याला नंतर रागावतील, असं त्याला म्हणायचं होतं. या सगळ्या बनावामध्ये आणखी एक गमतीदार भाग आहे. पवारांनी नंतर सांगितलं की, ‘घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मी ही घोषणा केली आहे.’ आणि ते कोणी नाकारलेलं नाही.

प्रश्न असा की, मी अशी घोषणा केल्यानंतर एकदम कलकलाट करत बाकीचे लोक उठतील आणि ‘कशी या त्यजू पदाला’ म्हणून माझ्या पायाशी धरणं धरून बसतील, अशी व्यवस्थासुद्धा मी केलेली आहे, हेही घरच्यांना सांगितलं होतं का? बहुधा ते सांगितलं नसावं. त्यामुळे २०२४च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये काय व्हायचं असेल ते होईल, पण राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, ही अजूनही केवळ शक्यताच आहे.

या शिमग्यानंतर जे काव्य वाचायला मिळालं, त्यामुळे मला मराठी पत्रकार आणि संपादकांच्या ऱ्हस्व दृष्टीची कीव येते. मीही पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. पवारांचं भाषण म्हणजे ‘एक्सलंट’ कॉपी! ते कुठेही बोलतात तेव्हा मार्मिक बोलतात. ज्यातून तीन-चार अर्थ सहज निघतील आणि तरी त्यांच्या मनातला अर्थ वेगळाच असेल असं बोलतात. त्यांच्यावर कितीही कठोर टीका केली तरीही ते टीकाकाराला कोपरखळ्या मारतात किंवा अनुल्लेखाने मारतात. त्यामुळे पवारांकडे वक्तृत्व नसलं तरी त्यांच्या बोलण्याला बातमीमूल्य असतं. पण बातमीमूल्य असणं आणि राजकीय मूल्य असणं यांतला फरक गोविंद तळवलकरांनंतरच्या पिढीतल्या पत्रकारांना कळतो का, असा प्रश्न पडतो. तसा तो कळणारे कुमार केतकर आहेत, पण ते आता कुठे संपादक नाहीत. आताचे निरनिराळ्या वर्तमानपत्रांचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार ही आम्ही शिकवलेलीच मुलं आहेत. त्यामुळे इतक्या ऱ्हस्व दृष्टीचे विद्यार्थी आपल्या हाताखालून गेले, याबद्दल मला वाईटही वाटतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

दोनच उदाहरणं देतो. एका अग्रलेखामध्ये असं म्हटलं आहे की, ‘पवार आता पक्षापेक्षा मोठे झाले’. आता ते संपादक कोणाला तोंड दाखवत असतील असं विचारलं तर? मुळात राष्ट्रवादी हा पक्ष केवढा आहे? देवेंद्र फडणविसांनी कुत्सितपणाने म्हटलं की, हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. साडेतीन जिल्हे ही अतिशयोक्ती झाली. इतका तो लहान नाही. पण ज्या पक्षाला स्वबळावर महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळवता येत नाही, त्या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर का, कोण व किती महत्त्व देत असेल?

नुकतीच निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची ‘राष्ट्रीय पक्ष’ ही मान्यता रद्दबातल केली आहेच. या पक्षातले निम्मे लोक (दोन नंबर सकट!) कायम पक्षाबाहेर पडायच्या तयारीत सामानसुमान आवरून बसलेले असतात. अजूनपर्यंत निदान सुप्रिया सुळे पक्ष सोडून जाणार आहेत, एवढीच बातमी उठलेली नाही. एरवी या पक्षात एकही जण असा नाही की, ज्याच्याबद्दल अशा बातम्या आल्या नाहीत किंवा जो बाहेर जाऊन परत आला नाही.

हे मी सगळ्या पक्षांमध्ये आणि संघटनांमध्ये पाहिलं आहे की, अपराधी माणसाला त्याचे अपराध पोटात घालून जर परत घेतलं, तरतो आयुष्यभर इमानदार राहतो. नेता चुका पोटात घालतो, पण प्रत्यक्षात तो त्या लक्षात ठेवून असतो. आणि जो खाली मान घालून परत आलेला असतो, त्यालाही हे माहीत असतं की, ‘आता मी जर पुन्हा काही उद्योग केले, तर नेता आधीची सगळी जखम उकरून काढेल.’ छगन भुजबळ यांनाही हे माहीतच असणार. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की, आम्हांला अजित पवार नकोत. ही सगळी मौज काकासाहेब पुतण्याच्या विरुद्ध वापरत आहेत. असा हा पक्ष!

पुण्यामध्ये भाजपला महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळालं, कारण एक तृतीयांश सदस्य निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेले. (निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षांतरबंदी केली पाहिजे, तरच हे खेळ थांबतील.) इतकं सगळं राजकारण करूनही ज्या पक्षाला राज्यामध्ये एक चतुर्थांशाहून जास्त जागा मिळत नाहीत, तो पक्ष केवढा आणि त्या पक्षापेक्षा मोठं व्हायचं म्हणजे काय? गणिताच्या भाषेत बोलायचं, तर अपूर्णांकाला अपूर्णांकाने गुणलं की, अजून छोटा अपूर्णांक तयार होतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आणि दुसऱ्या एका लेखात म्हटलं आहे की, ‘शरदरावांनी आता भाजपला अंगावर घ्यायची तयारी सुरू केली आहे.’ तुम्ही एखाद्याला लोकसभेचं तिकीट नाकारलं, तर तो भाजपमध्ये जाणार नाही, असं काही प्रतिज्ञापत्र तुम्ही कोणाकडून लिहून घेतलं आहे का? सध्या अब्रू वाचलेली आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भोसले भाजपमध्ये सामील झाले. पण सुदैवाने पूर्वीच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातून का होईना, श्रीनिवास पाटलांसारखा ग्रामीण पार्श्वभूमी असलेला आणि शहरी मध्यम वर्गाला चालणारा उमेदवार मिळाला आणि उदयनराजे पराभूत झाले. सगळे गद्दार पराभूतच झाले पाहिजेत असं माझं मत आहे. पण तरीसुद्धा याच्या पलीकडे या पक्षाची काही मजल नाही, महाराष्ट्राबाहेर कोणी यांना विचारत नाही. पूर्वी निदान पी.ए. संगमा, तारिक अन्वर ही नावं दाखवण्यापुरती तरी होती. दक्षिण भारतामध्ये फिरायचं तर सफाईदार इंग्लिश बोलणारं कोणीतरी पक्षामध्ये हवं आणि उत्तर भारतामध्ये फिरायचं तर सफाईदार हिंदी बोलणारा माणूस पाहिजे. तसं राष्ट्रवादीकडे कोण आहे?

‘हा माणूस महाराष्ट्रातला असला तरी आपला आहे’ असं अपील देशभरातल्या लोकांना वाटणं राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व उभं राहण्यासाठी आवश्यक असतं. उदाहरणार्थ, मुंबईमध्ये गुजरात्यांचा कट्टर रागराग करणाऱ्या मराठी लोकांनाही वाटतं की, बाकी गुजराती कसेही असले, तरी मोदी आपले आहेत! तसा चेहरा, तशी ताकद राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे भाजपला हे अंगावर घेणार म्हणजे नेमकं काय हा पहिला प्रश्न.

दुसरा मुद्दा असा मांडला जातो की, भाजपविरोधी आघाडीमध्ये एखादं महत्त्वाचं पद शरद पवारांना मिळेल आणि तिथे भाजप विरोधातलं काम ते एकजुटीने करू शकतील. अलीकडचं शरद पवारांचं एक विधान शहाणपणाचं होतं की, ‘तुमचं भांडण मोदींशी आहे की सावरकरांशी?’ त्या वेळेला मी पवारांना दाद दिली होती. धिस इज प्रॅक्टिकल पॉलिटिक्स. तुमचा आताचा शत्रू कोण आहे ते बघा. इतिहासाचं गोडाउन उघडायला जाऊ नका. कारण त्याच्यामध्ये प्रत्येकाच्याच विरोधात काहीतरी सापडेल. या दृष्टीने त्यांचं ते वक्तव्य शहाणपणाचं होतं.

दोन वर्षांपूर्वीची एक आठवण. कर्नाटकमध्ये कुमार स्वामी यांचं मंत्रीमंडळ यायच्या आधी भाजप विरोधकांच्या सभा होत होत्या. तेव्हा एक छायाचित्र आलं होतं. सगळ्यांनी एकमेकांचे हात हातात धरून उंच केलेले होते. नेमके सोनिया गांधींच्या उजवीकडे शरद पवार होते. आणि सोनिया गांधींनी डाव्या बाजूच्या मायावतीचा हात हातात घेतलेला होता (अर्थात तेही त्यांना खूप अवघड गेलं असेल), पण उजवा हात शरद पवारांशी न मिळवता हाताची घडी करून कमरेपाशी बांधून ठेवला होता. सोनिया गांधी शरद पवारांशी जुळवून घेणार नाहीत. त्यांच्या नेतृत्वाला विरोध करूनच राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली आहे. (एखाद्या पक्षाला ‘राष्ट्रवादी’ म्हणून घ्यावं लागतं, हाही मोठा विनोद आहे.) ‘परराष्ट्रामध्ये जन्माला आलेली व्यक्ती आम्हांला पंतप्रधान म्हणून चालणार नाही,’ हा त्या राष्ट्रवादीचा अर्थ स्पष्ट होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

महाराष्ट्रामध्ये कशीतरी सोनिया गांधींनी शिवसेनेच्या बाबतीत तडजोड केली. शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता, म्हणून त्यांच्याशी आघाडी केली. हे सगळं आहेच, पण वयाचा विचार करता आता कोण पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये शरद पवारांची गणना करील? मोदी आणि त्याच्यामध्येही एका पिढीचं अंतर आहे. पंतप्रधानपदासाठी भाजपमधूनसुद्धा मोदींच्या शिवाय दुसरा कोणी दिसत नाही. विरोधकांच्या आघाडीमध्ये जे कोणी आहेत, ते एक तर मोदींच्या वयाचे आहेत किंवा त्यांच्यापेक्षाही तरुण आहेत.

त्यांच्यामध्येसुद्धा अरविंद केजरीवाल, मायावती, ममतादीदी (या दोघींच्या पक्षांची राष्ट्रीय पक्ष मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे.) यांच्याकडे कुणी भावी पंतप्रधान म्हणून पाहत असेल असं मला वाटत नाही. देशातील लोकशाही आणि दृक् माध्यमांचं प्राबल्य, यामुळे तुम्ही पंतप्रधान असणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच तुम्ही पंतप्रधान दिसणंही महत्त्वाचं असतं. दुर्दैवाने शरीर-प्रकृतीमुळे पवारांना ते ‘अपील’ आता राहिलेलं नाही. शिवाय पक्ष महाराष्ट्रापुरता आहे आणि त्याची ताकद मर्यादित आहे.

पवारांनी असंही म्हटलं आहे की, ‘भाजप सोडून इतर पक्षांच्या नेत्यांशी मी बोललो. आणि राजीनामा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.’ पण हे कुठले पक्ष आणि कोण नेते, हे त्यांनी नेहमीप्रमाणे सांगितलेलं नाही. साधा प्रश्न असा आहे की, ‘तुम्ही तुमच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलात ही चांगली गोष्ट केलीत’ असं म्हणणारा कुणी पक्षनेता आपल्या देशामध्ये असेल का? ज्या पक्षांना राष्ट्रीय मान्यता आहे - उदाहरणार्थ, काँग्रेस, भाजप- त्यांचे अध्यक्ष कळसूत्री बाहुल्यांसारखे असतात. त्यांना श्रेष्ठींच्या इशाऱ्यावर नाचावं लागतं. आणि इतर छोट्या पक्षांचे अध्यक्ष हे त्या पक्षांचे संस्थापक किंवा संस्थापकाचे नातेवाईक असतात. अशा परिस्थितीत सगळे पवारांना ‘अध्यक्षपदावर राहा’ म्हणणार हे उघडच आहे. त्याला राष्ट्रीय मान्यता म्हणणं कठीण आहे.

महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांचा पवारांना नेहमीच पाठिंबा असतो. ‘सामना’सारखा अपवाद सोडून द्या. पण महाराष्ट्रातल्या माध्यमांचा महाराष्ट्राबाहेर काही प्रभाव आहे असंही दिसत नाही. मग पवारांना देशाचा नेता म्हणून कोण स्वीकारेल? अशी मान्यता मिळण्यासाठी व्यापार, उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्राचे सूत्रधार या अर्थव्यवस्थेतल्या मुख्य तीन घटकांचा पाठिंबा आवश्यक आहे. पण तिथे तर मोदी आधीच जाऊन बसलेले आहेत. मोदी आणि त्यांचे सरकार हे गरिबांच्यासाठी ज्या योजना राबवतात, त्याचा मुख्य आधार आर्थिक क्षेत्रामधल्या नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं हा आहे. अदानी प्रकरण हे त्यातूनच आलेलं आहे. हे मोदींचंच काय काँग्रेसचंसुद्धा धोरण राहिलेलं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भाजपला अंगावर घ्यायचं म्हणजे नुसती मतदानाची लढाई असणार नाही. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे. आपल्याला आवडो वा न आवडो; पण भाजप, मोदी, शहा, आदित्यनाथ हे सगळे असा समज पसरवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत की, ‘भाजप सोडून इतर सगळे पक्ष हिंदूविरोधी आहेत. त्यांना हिंदूंची पर्वा नाही, त्यांना या देशाच्या चालीरीती, धर्म, संस्कृती यांची पर्वा नाही.’ हा समज दुरुस्त केल्याशिवाय किंवा निदान त्याला आव्हान दिल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही. आता जे आव्हान दिलं जातं आहे ते केवळ एका बुद्धिजीवी वर्गापुरतं आहे. पण मोठ्या जनसमुदायाला आपण हे पटवून देऊ शकलो पाहिजे की, ‘हे भाजपचे उपद्व्याप म्हणजे हिंदुत्व नव्हे.’ धार्मिक सण-समारंभ पूर्वीही साजरे होत होते. पण गेल्या दहा वर्षांत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उन्माद दिसतो. तो हिंदू ‘बॅकलॅश’ आहे, जो कोणी हिशोबातच घेत नाही. खरी लढाई तिथे आहे.

रामजन्मभूमीचा प्रश्न न्यायालयाने मोदी आणि भाजपच्या बाजूने निर्णय देत सोडवला. त्यावर कुरबुर झाली, पण राष्ट्रीय स्वरूपाची प्रतिक्रिया किंवा आंदोलन झालं नाही. तीन तलाकच्या प्रश्नावरती झालेला निकाल हा तर पुरोगामी मुस्लिमांना मान्यच आहे; त्याचं श्रेय भाजपला मिळायला नको होतं, असं त्यांना मनातून वाटत असलं तरी! पण तो प्रश्न त्यांनी सोडवल्यामुळे मुसलमानातले जे काही दहा-पंधरा टक्के पुरोगामी असतील त्यांची ‘ओपिनिअन मेकर’ म्हणून जी भूमिका असेल ती भाजपच्या बाजूनेच झुकलेली असेल. काश्मीरचा विशेष दर्जा त्यांनी काढून घेतला, या तीन गोष्टींमुळे व्यापक प्रमाणामध्ये हिंदू जनमत त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे. तिथे तुम्ही काय करणार? ज्या वेळेला असं व्यापक जनमत तयार होतं, त्या वेळी कोणाला किती टक्के मतं मिळाली, ही कागदावरची गणितं बाजूला राहतात.

विरोधी पक्षांचे ऐक्य आणि त्याचे नेतृत्व कोणाकडे राहील? १३-१४ पक्षांची आघाडी सांभाळण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं आयुष्य निदान पाच वर्षांनी तरी कमी झालं असेल. कारण अशा आघाडीमध्ये सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचं असतं. आताच्या विरोधकांमध्ये एकमताने नेता कदाचित नितीश कुमार असू शकत होते. पण म्हणजे पवार नाहीत हे तिथे स्पष्ट होतं. पण आता नितीश कुमार यांनी खुनाच्या खटल्याखाली शिक्षा भोगलेल्या माणसाला यादव मतांचा अनुनय करण्यासाठी जेलमधून सोडलं आणि त्याच्या सोबत छायाचित्रही काढून घेततलं. (ही आपली जुनी सवय आहे. १८५७पासून हे चालू आहे. ज्या ज्या वेळी ब्रिटिशांचं एखादं ठाणं बंडखोर ताब्यात घ्यायचे; तेव्हा ते पहिलं काम हे करायचे की, तुरुंगातले सगळे कैदी सोडून द्यायचे. त्यातले काही कैदी राजकीय असतील किंवा लढवय्ये असतील, तर ते सैनिकी पेशामध्ये यायचे. जे खरेच चोर, दरोडेखोर, लुटारू होते, ते जाऊन आपला धंदा पुन्हा करायला लागायचे.) भाजपविरोधी आघाडीमध्ये त्यातल्या त्यात एकमताचा उमेदवार नितीश कुमार असू शकले असते. आणि व्यक्तिगत तुलना केली तर मोदींपेक्षा नितीश कुमार यांची योग्यता पंतप्रधानपदासाठी निश्चितच जास्त आहे. पण नितीश कुमारसुद्धा आता पुन्हा सोयीचं राजकारण करायला लागले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

नुकतेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बोलले की, ‘आपद्धर्म म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात.’ वस्तुत: अंतिम संकट उभं राहतं त्या वेळी आपद्धर्म स्वीकारायचा असतो (विश्वामित्राने जशी कुत्र्याची तंगडी खाल्ली होती.) तुम्ही सत्तेवर राहता की नाही हा देशाच्या दृष्टीने आपद्धर्माचा विषय नाही. पण हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाला माहीत नसणार, त्यामुळे महाराष्ट्राच्या अध्यक्षाला माहीत असण्याची कल्पना मी करू शकत नाही. हिंदू समाजाला हे सांगावं लागेल की, भाजपवाले पसरवत आहेत ते ते द्वेषमूलक हिंदुत्व आपण स्वीकारता कामा नये. मात्र हे दीर्घ पल्ल्याचं काम आहे. ते शांतपणे करत राहावं लागेल.

येनकेनप्रकारेण महाराष्ट्रातल्या माध्यमांमध्ये, पत्रकारितेमध्ये आपण अग्रस्थानी राहिलं पाहिजे, हे पवारांचं धोरण आहे. ‘पवार’ आणि ‘वापर’ ही एका शब्दाची दोन रूपं आहेत. मला नाही वाटतं की, पवार ‘वापरू’ शकले नाहीत आणि पवारांना ‘वापरून’ काही मिळवलं नाही, असे ‘माई के लाल’ महाराष्ट्रामध्ये फार असतील. हे वापराचं त्यांचं कौशल्य आहेच. उद्धव ठाकरेंचं उदाहरण घेऊ या. पवारांनी त्या वेळी प्रथम देवेंद्र आणि अजित यांचा अवेळी शपथविधी घडवून आणला, म्हणजे दोघांचा वापर करून काँग्रेस आणि शिवसेनेला इशारा दिला. मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून देवेंद्र आणि अजित यांचा मुखभंग केला.

करोनाकाळात मुख्यमंत्री घरी बसून काम करायला लागले आणि त्यांनी बंधनांचा अतिरेक केला, अशी ओरड पवारांनी राष्ट्रवादीच्या लोकांच्या मार्फतच सुरू केली. परंतु देवेंद्र आणि एकनाथ यांनी महाराष्ट्रात प्रथमच पवारांना पत्ता लागू न देता सत्ताबदल घडवला. ही पवारांची मोठी नाचक्की होती. आपल्या भागातला मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद वाटतो अशी सारवासारव त्यांनी केली, पण स्वर कडवट होता. या नाचक्कीचं खापर आता ते उद्धव ठाकरे यांच्यावर फोडत आहेत.

उद्धव ठाकरे राजकीय परिपक्वतेत कमी पडले, असं पवारांनी म्हटलं आहे. आता हे कळण्यासाठी ठाकरेंना मुख्यमंत्री करायची गरज होती का? ते आधीही कळायला हवं होतं. किंबहुना शिवसेनेमध्ये पहिल्या पिढीपासूनच कोणत्याही प्रकारची परिपक्वता नव्हती, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. असा हा पवारकृत वापर. याची हवी तेवढी उदाहरणं मिळतील.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मुख्य मुद्दा असा की, हे तुमच्या घरातलं भांडण आहे. ते चव्हाट्यावर आणू नका. राज्याला त्यात ओढू नका. तुम्हांला नसेल तुमच्या पुतण्याला मुख्यमंत्री होऊ द्यायचं, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी तुमची इच्छा असेल, तर पुतण्याला तुम्ही सरळ सांगून टाका. एक पेंडी दाखवून किती गाई हंबरत ठेवायच्या आहेत तुम्हांला?

यांचा मुख्य उद्देश हा आहे की, मी सत्तेत असलो किंवा नसलो तरी चर्चेमध्ये असणार! त्यामुळे ही घरची भाकरी लष्करच्या भाकरीसारखी भाजायला घेतली. त्या भाकरीचं काय व्हायचं ते झालं. अवघड नवसासाठी देवी प्रसन्न व्हावी व्हावी म्हणून (संत) एकनाथांच्या भारूडातली सून सव्वामण कणकेचा राडगा तिला वाहण्याचा नवस बोलते. ‘एका जनार्दनी सगळेच जाऊ देत, एकटीच राहू दे मला’ असा तिचा नवस असतो. तसाच ‘एकनाथासकट सगळेच जाऊ देत प्रसिद्धी मिळू देत मला’ हा नवस आहे. हे त्यांचं राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नाही.

मला वाटतं आता महाराष्ट्राने त्यांना सांगावं की, ‘साहेब, एक तर महाराष्ट्राच्या निर्मितीशी तुमचा काही संबंध नव्हता. स्पष्ट सांगायचं तर ज्या पक्षातून तुम्ही राजकारण केलं, तो पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होता. तुमचे राजकीय गॉडफादर यशवंतरावांनी शिताफीने महाराष्ट्राचा मंगल कलश स्वहस्ते मिळवला. त्याच शिताफीचा वारसा तुमच्याकडे आला. दुसऱ्यांच्या बलिदानावर महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि यशवंतराव त्याचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा लॉबी दृढमूल झाली. या सगळ्याचा फायदा तुम्ही घेतला.’

पवारांचा राजकीय अनुभव पाहून वाजपेयींनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या आयोगाचं राष्ट्रीय अध्यक्ष केलं. तेव्हा मी म्हटलं होतं, ‘पवार केवळ नैसर्गिक आपत्तीचंच नाही; राजकीय आपत्तीचंही दोन्ही बाजूंनी व्यवस्थापन करू शकतात.’ हे त्यांचं कौशल्य आम्ही मान्य करतो. स्वतःची आपत्ती दुसऱ्याच्या आपत्तीमध्ये कशी बदलायची, याचं त्यांनी विद्यापीठ काढावं, पण ते राजकारणाच्या बाहेर. ‘न सांगावे वर्म। जनी असो द्यावा भ्रम’ हे तुकारामाचे शब्द त्यांनी आयुष्यभर खरे केलेत. तुकारामाने लोकांना दूर ठेवण्यासाठी तसं म्हटलं होतं; हे मात्र ‘लोक माझे सांगाती’ करण्यासाठी तसं वागतात, आता हे अती झालं!

आमचं नका ऐकू तुम्ही. पण शिवाजी महाराजांचं ऐकाल का? महाराज शेवटच्या क्षणी म्हणाले होते, ‘‘आमचे आयुष्याची अवधी झाली. आता आपण सगळे बाहेर बैसा.’’ याच्यामध्ये थोडा फरक करून पवारांना सांगायची वेळ आली आहे, ‘‘आपले राजकीय आयुष्याची अवधी झाली. आता आपण थोडे आत बैसा.’’

सेवेसी श्रुत व्हावे ही विज्ञापना!

‘साधना’ साप्ताहिकाच्या २० मे २०२३च्या अंकातून साभार

..................................................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......