‘तत्त्वभान’ हे आधी वाचनाचे ‘निमंत्रण’ आणि मग चर्चेचे ‘निमंत्रण’ आहे, ‘आमंत्रण’ नाही. सर्व प्रकारच्या वाचकांसाठी हे ‘निमंत्रण’ आहे

या ग्रंथाचे वाचन ही तत्त्वचिंतनाची पूर्वतयारी आहे. ती पूर्वतयारी करणे म्हणजे तत्त्वज्ञानाच्या चिंतन पद्धतीचा अवलंब करणे, वाचकाला मदतकारक ठरेल, अन्यथा त्याचे चिंतन केवळ ‘स्वैरकल्पनाधारीत तत्त्वचिंतन’ होण्याचा धोका नाकारता येत नाही. तत्त्वज्ञानाच्या चिंतनपद्धतीचा अंगीकार करणे याचाच अर्थ तत्त्वचिंतनाच्या परिभाषेत विचार करणे. या ग्रंथाचे वाचन, मनन व चिंतन आणि मग चर्चा हे ‘तात्त्विक चिंतनाचे प्रशिक्षण’ आहे.......

आपण लोकांना शुभेच्छा देतो, पण त्यांनी शुभ जीवन जगावे म्हणून काय करतो? याचा शोध घेता लक्षात आले की, काहीच करत नाही! मग त्यांना पोकळ शुभेच्छा देण्यात आपण कोणती नीती बाळगतो?

मी ज्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यांना कोणती मदत कशाच्या रूपात देऊ केली आहे काय? निदान देऊ शकतो काय? तशी शक्यता असेल, तर मी ती करतो आहे काय? की सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकाने आपापले प्रश्न स्वतःच सोडवावयाचे असतात, त्यात इतर जन काय करणार, असे म्हणून आपण केवळ शुभेच्छा देऊन स्वतःचीच फसवणूक तर करत नाही आहोत ना? ‘चांगले रहा’ म्हणून ‘चांगले राहता येते का?’ म्हणूनच या अशा शुभेच्छांना काही नैतिक दर्जा उरत नाही.......

सर्व भारतीय उपखंडात एकच राम असावा, एकच ‘रामायण’ असावे आणि एकच रावण असावा, हा संघपरिवार व भाजपचा हेतू आढळतो. पण त्यांचा रावण नेमका कोणता?

गांधीजींचा राम संघपरिवार व भाजपलाच काय, पण काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी कोणत्याच पक्षालाच नको आहे. अगदी स्थापनेपासून राम काँग्रेसचा कधीही नव्हता, म्हणजेच रामाचे कोणतेही गुण काँग्रेसला फारसे मान्य नव्हते. पण जेव्हा राम उघडपणे संघपरिवार व भाजप इत्यादी हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात गेला, तेव्हा त्यांचे अहिंसक व प्रेमळ स्वरूप बदलले. ‘रामायण हा अतिशय स्फूर्तीदायक ग्रंथ आहे’ या विधानाचा उलटा अर्थ घेतला गेला.......

सुशिक्षित, उच्च-सुशिक्षित स्त्रियांची भूमिका आता निश्चित होणे, हाच त्यांच्या मुक्तीचा मार्ग ठरणार आहे. सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त झाल्याशिवाय अस्सल अर्थाने स्त्री-मुक्ती साध्य होणार नाही!

निर्घृण पुरुषी सत्तेविरुद्ध दीर्घकाल युद्ध करून अतिशय कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा स्त्रिया खरेच आत्मविकासासाठी आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी उपयोजन करतात का? वर्ण-जात संघर्षाचे युद्ध ते पुढे नेत आहेत का? त्यांचे पुन्हा नव्या स्वरूपात ‘वस्तूकरण’ तर होत नाही ना? हे आणि असे काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. स्त्री-स्वातंत्र्य युद्ध अनेक शतके ‘समांतर रीती’ने जगातील बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये विकसित झाले.......