सर्व भारतीय उपखंडात एकच राम असावा, एकच ‘रामायण’ असावे आणि एकच रावण असावा, हा संघपरिवार व भाजपचा हेतू आढळतो. पण त्यांचा रावण नेमका कोणता?
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • चित्रसौजन्य - https://www.thehansindia.com
  • Tue , 12 April 2022
  • पडघंम सांस्कृतिक रामायण Ramayana वाल्मिकी Valmiki महाभारत Mahabharata महर्षि व्यास Maharshi Vyas राम Ram रामराज्य Ramrajya राममंदिर Ram Mandir गांधी Gandhi संघपरिवार RSS भाजप BJP काँग्रेस Congress

‘मेरा भारत महान!’ या वाक्यात ज्या कोणत्या गोष्टीचा ‘महान’ असा दावा केला जातो, त्या गोष्टी ‘भारताचे प्राचीन साहित्य आणि त्या साहित्यातून व्यक्त होणारे तात्त्विक चिंतन’ हेच असते. येथे ‘तात्त्विक चिंतन’ म्हणजे ‘भारतीय तत्त्वज्ञान’; म्हणजेच ‘भारतीय दर्शने’. या दर्शनांची चिंतनाची परंपरा आजही वेगवेगळ्या ठिकाणी आणि विविध तज्ज्ञांकडून अखंड गतिमान आहे. पण या महान गोष्टी हा आपला भूतकाळ आहे; विद्यमान काळ नाही. अर्थात प्रस्तुत ‘महानता’ ही भारताची राजकीय आणि सामाजिक स्थिती नाही.   

‘ ‘मेरा भारत महान!’ ही भारताची राजकीय आणि सामाजिक स्थिती नाही’, हे विधान समजून व उमजून घेण्यासाठी ‘महान’तेचे रहस्य समजून व उमजून घेणे अनिवार्य आहे. 

भारत : हजारो धर्मांची प्रयोगशाळा  

भारतात हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख हे मूळ भारतीय धर्म आहेत. त्यांचा उगम येथेच झालेला आहे. त्याखेरीज ज्यू (Judaism), ख्रिश्चन, इस्लाम आणि बहाई श्रद्धा (the Baha'i Faith) हे जागतिक सेमेटिक धर्मही येथे सुस्थापित झालेले आहेत. सूफीधर्म (Sufism), पर्शियन झरतुष्ट्री धर्मही (Zoroastrian) भारतात शांततेने नांदत आहेत.

बौद्ध धर्माला ‘जागतिक धर्म’ असे स्थान, दर्जा व मान्यता लाभलेली आहे. जैन व शीख धर्म बंदिस्त बनल्याने त्यांचा जगातच काय पण भारतात, देशातल्या देशातही प्रसार होऊ शकत नाही. हिंदू धर्म जगात वेगवेगळ्या चांगल्या-वाईट कारणांसाठी प्रसिद्ध आहे. वर्ण-जातीच्या ताठर विषमतामय बंदिस्तपणामुळे हिंदू धर्म ‘निखळ चांगला’ या पदाला पात्र होऊ शकत नाही, म्हणूनच तो ‘जागतिक धर्म’ होण्यात अडथळा निर्माण होतो.

पुराणकथा

महाभारत, रामायण या हिंदू पुराणकथा आहेत. त्यांचा  प्रभाव येथील जनमानसावर अधिक असल्याचे दिसून येते. या पुराणकथांनी हिंदू मानस घडवले आहे. जैनांचे वेगळे महाभारत, रामायण व ‘आगम’ नावाचे ग्रंथ आणि इतर पुराणे आहेत. जैन धर्मानुसार त्यांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव उर्फ आदिनाथ हे मानवी संस्कृतीचे निर्माते होते. त्यांनी मानवाला शेती, शस्त्रविद्या, लेखनकला आणि उपजीविकेचे उद्योग यांचे ज्ञान दिले. जैन साहित्य आणि पुराण साहित्यानुसार ऋषभदेव हे सर्व क्षत्रियांचे पूर्वज मानले जातात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

बौद्ध ग्रंथांमध्ये पुराणांचा उल्लेख नाही, पण तिबेट आणि नेपाळ येथील बौद्ध नऊ पुराणे मानतात, त्यांना ते ‘नवधर्म’ समजतात. ‘त्रिपिटक’ हे पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ फार प्राचीन आहेत. ‘महाभारता’पेक्षा त्रिपिटक मोठे असून त्याची ग्रंथसंख्या सरासरी तीन लाख आहे. बौद्ध साहित्य इतके विशाल आहे की, कोणतीही एक व्यक्ती आयुष्यभरही संपूर्ण बौद्ध साहित्य वाचू शकत नाही. हिंदू, बौद्ध, जैन हे प्राचीन धर्म आहेत, तर शीख धर्म अर्वाचीन म्हणजे फक्त ३०० वर्षांपूर्वीचा आहे.

मूळ भारतीय आदिवासी-वनवासी धर्म 

तथापि अति-अतिप्रसिद्ध हिंदू, बौद्ध, जैन आणि शिख या चार धर्मांच्याही आधीपासूनच भारतात अतिदूर जंगलात इतरही शेकडो-हजारो टोळीधर्म व धर्मपंथ अस्तित्वात आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांची ढोबळ यादी अशी :  

१) ‘किरात’ धर्म’ (Kiratism) - ‘किरात’ हा सर्वांत प्राचीन धर्म आहे. तो वेदपूर्व काळातील (अंदाजे इ. स. पूर्व १५०० ते ५००) धर्म आहे. हिंदू अथवा बौद्ध इत्यादी धर्मांचा उदय होण्याआधी कित्येक शतके हा धर्म जागता आहे. तो ‘Kirat Mundum’ या नावानेही प्रसिद्ध आहे. सिक्कीम, दार्जीलिंग,  नेपाळ येथील लोकांचा हा धर्म असून ‘किरात वेद’ हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. भारवी या सहाव्या/सातव्या शतकातील अतिशय विद्वान महाकवीने संस्कृत मध्ये ‘किरातार्जुनीयम्’ (किरात आणि अर्जुन यांची कथा) हे काव्य रचले. महाभारतात वर्णन केलेला ‘किरातवेशधारी’ शिव आणि अर्जुन यांची खरोखरीची युद्धकथा आणि वाग्युद्ध कथा हा काव्याचा विषय आहे. त्यात किरातधर्मातील राजनीती, धर्मनीती, कूटनीती, समाजनीती, युद्धनीती आणि मुख्यतः जनजीवन इत्यादींचे मनोरम वर्णन आहे.

२) बाथौवादी धर्म (Bathouism किंवा Bathou) - Ba म्हणजे पाच आणि thou म्हणजे सूक्ष्म तत्त्व. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही ‘पंचतत्वे’ अंतिम सत्य मानणारा हा धर्म आहे. तो मुख्यतः आसाममधील बोरो आदिवासींचा धर्म आहे. Bathoubwrai (bwarai : ‘प्राचीन देवता’.) या देवाने ही तत्त्वे निर्माण केली, अशी यांची श्रद्धा आहे. या देवाची मुलगी ही ‘भातशेतीची रक्षणकर्ती’ मानली जाते.       

३) दोन्यी-पोलो धर्म (Donyi-Polo किंवा Donyi-Poloism) - या धर्माला ‘सूर्यचंद्र धर्म’ म्हणता येईल. हा धर्म अरुणाचल प्रदेश आणि आसाम येथील प्राचीन धर्म आहेच, पण तो तिबेटन व बर्मालोकांचाही मूळ धर्म आहे. ‘आपण सारी सत्याची लेकरे आहोत’ हा या धर्माचा मूलमंत्र आहे. (‘आपण सारी प्रभूची लेकरे आहोत’ हे ख्रिस्ती धर्माचेही मूलतत्त्व आहे. तथापि ख्रिस्ती धर्माचा उदय होण्यापूर्वी आणि तो धर्म भारतात येण्यापूर्वीच भारतीय आदिवासी दोन्वी-पोलो धर्म ‘आपण सारी सत्याची लेकरे आहोत’ हे समांतर सूत्र मांडतो. किंबहुना आदिवासी दोन्वी-पोलो धर्माचे हे तत्त्व ख्रिस्ती धर्मात समांतर रीतीने मांडले गेले असे म्हणणे उचित होईल. १९७० नंतर हा धर्म संस्थात्मक धर्मात रूपांतरीत करण्यात येऊ लागला आणि त्याला हिंदू धर्माचा हिस्सा बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले.)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

दोन्यी-पोलो धर्म हेम्पू-मुक्रंग धर्म आणि न्येझी-नो धर्म या दोन प्राचीन धर्मांशी संबंधित आहे.

४) हेम्पू-मुक्रंग धर्म (Hemphu-Mukrang religion) - हा आसामी वनवासीजनांचा धर्म आहे. या वनवासींना ‘काब्रीस’ किंवा ‘मिकीर’ (The Karbis / the Mikir) नावाने ओळखले जाते.  

५) न्येझी-नो धर्म (Nyezi-No religion) - हा अरुणाचल वनवासीजनांचा धर्म आहे. या वनवासींना ‘आका’ किंवा ‘हृसो’ (The Aka/Hrusso) नावानी ओळखले जाते.  

६) सनमाही धर्म (Sanamahism) - मणिपूर राज्याचा धर्म. ‘सनमाही’ (Sanamahi)चा अर्थ सलिल, प्रवाही, पसरणारा. ‘द्रवरूप सोने जसे पसरते तसे’ हा त्याचा अक्षरशः अर्थ आहे. सनमाही धर्म मेईतेई धर्म (Meitei religion), मणिपुरी धर्म (Manipuri religion किंवा कांग्लेई धर्म (or Kanglei religion) या नावानेही ओळखला जातो. हा निसर्गपूजक धर्म आहे.  या धर्माचा पहिला उल्लेख इ. स. पू. ३३-१५४ दरम्यानच्या नोंगडा लेरेण पाखान्ग्बा (Nongda Lairen Pakhangba) राजाच्या कारकि‍र्दीत आढळतो. या धर्मातील वनवासींना १६०६ आणि १७२४ दरम्यान तत्कालिन हिंदू राजांनी आणि मुस्लीम सम्राटांनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. काही जण धर्म स्वीकारते झाले, पण त्यांनी नवा धर्म न स्वीकारता मूळ सनमाही धर्माचाच अबलंब केला. आजही अनेक जण हाच धर्म ते पाळतात. तथापि गेल्या काही दशकात त्यांना धर्मांतरीत धर्मात म्हणजे हिंदू व इस्लाम धर्म पाळण्यास प्रवृत्त केले जात आहे.    

७) सर्नांई धर्म (Sarnaism) - झारखंड, ओदिशा, छत्तीसगड, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल येथील आदिवासी धर्म. मुंडा, भूमजी, खैरा, हो, कुरुख आणि संथाळ या जमातींचा हा प्राचीन धर्म आहे. ‘सरना’ (Sarna) म्हणजे जंगल किंवा वन, उपवन. खरे तर ‘साल वृक्षाचे वन’ असा अर्थ होतो. संथाली पुराणकथांनुसार ‘सरना’ म्हणजे ‘हा बाण आहे’. Sar = बाण आणि Na = हा आहे. पुराणकथा सांगते की, Sarna मध्ये, म्हणजे ‘वनात’ किंवा; बाणात’ त्यांची ‘ग्रामदेवता’ वास करते. तिला ‘गावखुंट, ग्राम देवती, धर्मी, सिंग्बोंगा अशा अनेक स्थानिक वस्त्यांनुसारची नावे आहेत. या धर्माची मुख्य देवता ‘धरती आयो’ (पृथ्वी माता) किंवा त्यांच्या अन्य बोली भाषेत ‘चालपच्चो देवी’ आहे.       

या खेरीज लोकव्यवहारातील हिंदूवादी लोकधर्मपंथ (Folk Hinduism) आणि स्थानिक जातीजामातींचा स्थानिक धर्म मिळून हजारो धर्म आहेत. त्यांची संख्या अंदाजे ३५०० असावी. हे सर्व धर्म प्राचीन काळापासून एकत्र आणि सुखाने नांदत आहेत. 

हे मुख्य आदिवासी धर्म आणि जातीजमातीचे धर्म अस्तित्वात आहेत, हेच मूलतः माहीत नसल्याने त्यांची दखल घेतली जात नाही. यातील काही धर्मांना संविधानाने ‘धर्म’ हा दर्जा दिला आहे. तथापि गेल्या काही वर्षांत हे धोरण रद्द करण्यात आले आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

भारतीय तत्त्वज्ञान : परिवर्तनीय संकल्पना

‘मेरा भारत महान!’ या वाक्यातील महानता भारतात निर्माण झालेल्या ‘तात्त्विक चिंतन’ साठ्यात शोधली जाते. तो साठा म्हणजे ‘भारतीय तत्त्वज्ञान’. त्याचा अर्थ ‘भारतीय दर्शने’. येथे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या संकल्पनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे, तर ‘राम’ हे व्यक्तिमत्त्व आणि ‘रामायण’ हे महाकाव्य तात्त्विक अर्थाने समजून घेता येईल.

भारतीय तत्त्वज्ञान’ आणि हिंदू तत्त्वज्ञान 

‘भारतीय तत्त्वज्ञान’ या संकल्पनेबाबत प्रचंड गैरसमज आहेत. त्या गैरसमजांचे स्वरूप पाहणे प्रस्तुत लेखाचे प्रयोजन नाही. मुख्य गैरसमज पाहू. तो असा की, ‘भारतीय तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘हिंदू धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान’ असे समजले जाते. सकृतदर्शनी भारतीय तत्त्वज्ञान आणि हिंदू तत्त्वज्ञान यात फरक नाही, असे वाटू शकते. पण त्यांच्यात सूक्ष्म फरक करावा लागतो. तथापि ‘भारतीय तत्त्वज्ञान’ आणि ‘हिंदू तत्त्वज्ञान’ (Indian Philosophy and Hindu Philosophy) यांत फरक करणे आवश्यक आहे.

भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे - प्राचीन अथवा अर्वाचीन – हिंदू किंवा अहिंदू,  तसेच ईश्वरवादी अथवा निरीश्वरवादी अशा सर्व भारतीय विचारवंताचे तात्त्विक चिंतन. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या सर्व धर्मांनी मिळून मांडलेल्या तात्त्विक दर्शनांना ‘भारतीय तत्त्वज्ञान’ म्हटले जाते. त्यात ‘चार्वाक दर्शन’ या तत्त्वज्ञानाचाही समावेश होतो.   

हिंदुत्ववाद आणि हिंदू तत्त्वज्ञान

‘भारतीय तत्त्वज्ञान’ या शब्दाला ‘हिंदू तत्त्वज्ञान’ हा शब्द समानार्थाने वापरला जातो. तथापि ‘हिंदू’ म्हणजे ‘भारतीय’ हा अर्थ केवळ भौगोलिकदृष्ट्या घेतला गेला, तरच हे म्हणणे खरे ठरते. ‘हिंदुत्ववाद’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारसरणीस अनुसरणारे ते ‘हिंदू’, असे मानले तर तो ‘धार्मिक’ अर्थ होईल, ‘तत्त्वज्ञानात्मक’ अर्थ होणार नाही. 

हिंदू तत्त्वज्ञानात (Hindu Philosophy) चार वर्ण, चार आश्रम, चार पुरुषार्थ या तत्त्वज्ञानात्मक संकल्पनांचा समावेश होतो. मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ मानला आहे. त्यानंतर आत्मा-जीवात्मा, जन्म-पुनर्जन्म, कर्म, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक आणि कर्मफलविपाक सिद्धांत यांचा कर्मकांड म्हणून समावेश होतो. हे सारे हिंदू माणसाला (म्हणजे पुरुषाला) प्राप्त करावयाचे असल्याने हजारो जाती आणि लिंगभेद यांची व्यवस्था केली आहे.

‘हिंदुत्ववाद’ चार वर्ण, जातीव्यवस्था आणि लिंगभेद मानतो. त्यानुसार बिगर-हिंदू हे हिंदुत्ववादाचे शत्रू ठरतात. इस्लाम, ख्रिस्ती किंवा वर आधी स्पष्ट केलेले हजारो वनवासी व आदिवासी धर्म हिंदूविरोधक ठरतात. हिंदु धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू धर्मात अन्य धर्मातून प्रवेश मिळवता येत नाही, म्हणजे हिंदू धर्मांतर शक्य नसते. पण हिंदू धर्मातून अन्य धर्मात जाता येते आणि परतही येता येते; त्या वेळी मूळ जात शोधून त्याच जातीत समावेश केला जातो. तो मोठा धार्मिक व कर्मकांडात्मक आणि अर्थात खर्चिक विधी असतो. या प्रक्रियेला ‘आधुनिक भाषे’त ‘घरवापसी’ म्हटले जाते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हिंदुत्ववाद ही राजकीय प्रणाली आहे, तर हिंदू तत्त्वज्ञान ही तात्त्विक प्रणाली आहे. दोन्हीत फरक करणे अवघड आहे, पण अशक्य नाही. (पण त्यासाठी खूप वेळ लागेल). हिंदुत्ववाद ही वस्तुतः अतिशय प्राचीन व सनातन विचारधारा आहे. ती प्राचीन काळी फार प्रभावी नव्हती, पण ती होतीच. ती बौद्ध, जैन व चार्वाक यांच्यापुरती मर्यादित होती. पण विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून, विशेषतः ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या स्थापनेपासून (१९२५) इस्लाम, ख्रिस्ती व इतरधर्मींना लागू करण्यासाठी व्यापक करण्यात आली.

थोडक्यात, बौद्ध, जैन व चार्वाक हे ‘हिंदुत्ववादा’चे प्राचीन शत्रू आहेत, तर इस्लाम, ख्रिस्ती व इतर धर्म अर्वाचीन शत्रू आहेत.       

सुरेंद्र बारलिंगे यांचे मत

‘भारतीय तत्त्वज्ञान’ ही संकल्पना अशी संशयास्पद झाल्याने तिचे आधुनिकीकरण करण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. या संदर्भात तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर आणि तत्त्ववेत्ते सुरेंद्र बारलिंगे यांचे मत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, “जेव्हा आपण भारतीय वा पाश्चात्य तत्त्वज्ञानाबद्दल बोलतो, तेव्हा तत्त्वज्ञानाच्या तार्किक रचनाबंधाचा विचार करीत नसतो, तर सांस्कृतिक रचनाबंधाचा विचार करीत असतो. म्हणजे ‘तत्त्वज्ञान’ (Philosophy) असे आपण ज्याला म्हणतो, ते केवळ सांस्कृतिक रचनाबंधाचे प्रगटीकरण असते किंवा अमूर्तीकरण असते. ही एक अगदी कप्पेबंद व्यवस्था असते. तरीही एका रचनाबंधाच्या तत्त्वज्ञानाचा दुसऱ्या रचनाबंधाच्या तत्त्वज्ञानाशी कसलाही संबंध येत नाही, असे नाही, तो संबंध येतच असतो.”

बारलिंगे यांच्या म्हणणे सोपे करायचे तर असे की, उदाहरणार्थ, ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान हे दोन भिन्न सांस्कृतिक रचनाबंध आहेत. ते कप्पेबंद आहेत, तरीही त्यांचा संबंधच येत नाही, असे नाही; तो आलाच, किंबहुना तो संबंध प्रस्थापित झाला म्हणूनच भारतात प्रबोधन युग सुरू झाले.

पुढे प्रो.बारलिंगे म्हणतात, “अगदी एकाच सांस्कृतिक रचनाबंधामधील तत्त्वज्ञानांत वैविध्य आढळू शकते आणि विविध सांस्कृतिक रचनाबंधामधील तत्त्वज्ञानांत साम्ये आढळू शकतात. कारण एकाच सांस्कृतिक रचनाबंधामधील दोन माणसे एकसारखा विचार करतील, असे नाही. पण त्याच वेळी भिन्न सांस्कृतिक रचनाबंधामधील दोन व्यक्तींच्या विचारात सारखेपणा असू शकेल आणि त्यांच्या सहानुभूतीचे विषय सामाईक असतील व त्यांचे आकलनही समानधर्मा असू शकेल.”

याचा अर्थ उदाहरणार्थ ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या एकाच सांस्कृतिक रचनाबंधात वैदिक व अवैदिक असे वैविध्य आहे; त्यातही ‘चार्वाक दर्शन’ आणखी वेगळे आहे. शिवाय अवैदिक-वैदिक ही एकमेव वर्गवारी नाही. अनेक दृष्टीकोनातून ती बदलते. अशी वैविध्यता असूनही त्यांच्यातील ‘साम्य’ आहे, ते त्यांचे ‘दर्शन’ असण्यात.’ प्रो. बारलिंगे यांचे मत मला मान्य करण्यात अडचण दिसत नाही.  

तत्त्वज्ञानाची ही विविधता व साम्यता लक्षात घेऊन प्रो. बारलिंगे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ (Indian Philosophy) या संकल्पनेविषयी अतिशय व्यापक व मुक्त दृष्टीकोन समोर मांडतात. त्यांच्या मते, ‘भारतीय तत्त्वज्ञान’ असा शब्दप्रयोग केला जातो, तेव्हा ‘भारतात मांडलेले तत्त्वज्ञान’ असा न घेता, ‘भारतीय तत्त्ववेत्त्यांनी  तपशीलवार मांडलेले तत्त्वज्ञान’ असा अर्थ घेतला पाहिजे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रो.बारलिंगे यांच्या मते, ‘भारतीय’ हे विशेषण तत्त्वज्ञानाचे नाही, तर लेखकांचे असले पाहिजे, तत्त्वज्ञानाचे विशेषण नाही. ‘भारतीय’ हे विशेषण लेखक-तत्त्ववेत्ते यांना उद्देशून केलेले ‘परिवर्तीत गुणवाचक विशेषणाचे उदाहरण’ (epithet) मानले पाहिजे, त्यांच्या ‘विचारांना’ उद्देशून उपयोजनात (Applied) आणलेले विशेषण’ नव्हे, असे प्रो. बारलिंगे यांचे आहे.  

थोडक्यात, ‘विचार’ भारतीय नसतात, तर लेखक-विचारवंत व तत्त्ववेत्ते ‘भारतीय’ असतात. एखादी अ-भारतीय किंवा न-भारतीय व्यक्तिदेखील भारतीय विचारकर्त्यांनी मांडलेल्या विचारांबद्दल तिचे विचार मांडू शकतो. त्या व्यक्तीची गणना ‘बिन-भारतीय’ अशी झाली, तरी तिच्या विचारांनी ‘भारतीय विचारविश्व’ समृद्ध होईल.        

प्रोफेसर सुरेंद्र बारलिंगे यांचे ‘तत्वज्ञान’ (Philosophy), पर्यायाने ‘भारतीय तत्त्वज्ञान’ (Indian Philosophy) या संकल्पनेविषयीचे विवेचन अत्याधुनिक आहे. या विवेचनामुळे ‘तत्त्वज्ञान’ या शब्दाशी निगडीत झालेले ‘भारतीयत्वा’ चे अथवा ‘वैदिकत्वा’चे दडपण नाहीसे होते, दबाव संपतो. आणि ‘तत्त्वज्ञान’ (Philosophy) ही संकल्पना ‘वैदिकत्वा’च्या बंदिस्त चौकटीतून मुक्त होते, ती अधिक व्यापक विचारांना उद्देशून वापरता येते. ती खुली संकल्पना होते.

गतिमान परिवर्तनशीलता  

याचा अर्थ असा की भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ हिंदू तत्त्वज्ञान अथवा बौद्ध अथवा जैन अथवा चार्वाक अथवा अन्य तत्त्वज्ञान नाही. तर भारतीय विचारविश्वाबाबत जगतील कोणत्याही माणसाचे केलेला विचार म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असे म्हणता येते. ही भारतीय तत्त्वज्ञान संकल्पनेबाबतची परिवर्तनशीलता म्हणता येते.

याचा अर्थ असा की ‘भारतीय मुस्लिमांचे तत्त्वज्ञान’, भारतीय ख्रिस्तींचे तत्त्वज्ञान’ अशाही नव्या तत्त्वज्ञानाची रचना करता येते आणि त्यांना ‘भारतीय तत्त्वज्ञान’ म्हणता येते. त्यामुळे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ ही संकल्पना अतिशय समृद्ध होते. उघडच ही संकल्पना ‘हिंदू तत्त्वज्ञाना’ ला पूरक ठरणार नाही आणि ‘हिंदुत्ववादा’लाही अनुकूल ठरणार नाही. त्यामुळे ही ‘परिवर्तनशील आधुनिक व समृद्ध भारतीय तत्त्वज्ञान’ ही संकल्पना त्यांची शत्रू संकल्पना होते. याचा अर्थ संकल्पनेच्या पातळीवर ‘हिंदूत्ववादी तत्त्वज्ञान विरुद्ध आधुनिक भारतीय तत्त्वज्ञान’ असे युद्ध निर्माण होते. (या मुद्द्याचा सविस्तर विस्तार नंतर कधीतरी करेन.) थोडक्यात, भारतातील हजारो धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, हिंदू तत्त्वज्ञान आणि हिंदुत्ववाद आणि ‘परिवर्तनशील आधुनिक व समृद्ध भारतीय तत्त्वज्ञान’ या संकल्पना लक्षात घेता ‘रामायण व महाभारत’ या महाकाव्यातील नायकांचे तत्त्वज्ञानात्मक आकलन कसे होईल, ते पाहू.   

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘रामायण’ आणि ‘महाभारत’

महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांची मूळ रचना एकाच कालखंडात झाली असावी, असे मानले जाते. महाभारताची रचना इ. स. पू. ४०० ते इ. स. नंतर ४०० अशा किमान ८०० वर्षांच्या कालखंडापर्यंत होत होती. त्यातील गीतेची रचना इ. स. पू. २०० ते इ. स. नंतर २०० अशा किमान ४०० वर्षांच्या काळात झाली, असे अभ्यासकांचे मत आहे. प्राथमिक स्वरूपातील वाल्मिकी ऋषीची पहिली छोटी रामकथा इ. स. पू. चौथ्या शतकात रचली गेली आणि आता जे रामायण उपलब्ध आहे, ते पूर्ण रामायण इ. स. नंतर दुसऱ्या शतकाच्या शेवटी पूर्ण करण्यात आले. ऐतिहासिकदृष्ट्या महाभारत हे सर्वांत जुने काव्य समजले जाते. महाभारतात पुराणे, कथा, उपकथा, कपोलकल्पित गोष्टी यांची भर पडत गेली; पण रामायणात केवळ रामकथेवर भर देण्यात आला आहे.

रामायण

रामायणात रामकथा काव्यरूपात स्पष्ट केली गेली. ती गायिली गेली, तिचे गायनात्मक काव्यरूप आहे. रामायण हे पहिले भारतीय निखळ काव्य समजले जाते, म्हणूनच रामायणाला ‘आदि-काव्य’ म्हणतात आणि रामायणाचा कर्ता वाल्मिकी ऋषींना ‘आदि-कवी’ म्हणतात.

रचनाकाल

रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ समजतात व मानतात. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. ५०२२ ते इ.स.पू ५०४० यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. परंपरेने या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसऱ्या युगात – त्रेतायुगात (सत्ययुगात) घडली, असे म्हटले जाते. रचयिते वाल्मिकी हेसुद्धा या महाकाव्यातील एक सक्रिय पात्र होते.

रामायणाची भाषा जुनी संस्कृत भाषा आहे. महाभारत व रामायण यांच्या संस्कृतमध्ये  फरक आहेत. रामायणाच्या मूळ कृतीची रचना इसवी सनपूर्व पाचव्या शतकात सुरू झाली व अनेक शतके चालली. मूळ स्वरूपात अनेक फेरफार होऊन रामायणाचे सध्याचे स्वरूप तयार झाले.

रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा ‘अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध’ अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.

रामायणाचा तात्त्विक मुख्य प्रश्न

तत्त्वज्ञानात्मक दृष्टीने पाहता रामायणात ज्ञान विश्वाची निर्मिती, अंतिम सत्य असलेले ब्रह्म, माया इत्यादी आध्यात्मिक विचार आढळत नाहीत. म्हणजे ज्ञानशास्त्र, सत्ताशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादीची चर्चा रामायणात नाही. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने रामायणात नीतिशास्त्र व लोकप्रशासन यांची मुख्य चर्चा आहे. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक व राजकीय नैतिकता आणि नीतीमत्तेचे स्वरूप आणि महत्व यावर रामायणात भर दिला गेला आहे. “जगात आज धर्मज्ञ, सत्यवचनी, दृढनिश्चयी, चारित्र्यसंपन्न, कृतज्ञ, सर्वभूतहितदक्ष, अनसूयक (असूया नसणारा), क्रोध जिंकलेला असा माणूस कोण आहे?” असा प्रश्न रामायणात अगदी प्रारंभी विचारला गेला आहे, तोच रामायणाचा मुख्य प्रश्न आहे. त्याचे उत्तर म्हणून वाल्मीकीने ‘रामचरित्र’ लिहिले. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

रामचरित्राचे अध्ययन-मनन-चिंतन करता कोणता आदर्श व शिकवण रामायण सामान्य माणसापुढे आणि लोकनेते व लोकप्रतिनिधी यांच्यापुढे ठेवते? याचे उत्तर आहे चार आदर्श!     

आदर्श व शिकवण

१) व्यक्तिगत जीवनात दिलेला शब्द पाळणे म्हणजे सत्यवचन व सत्यपालन (राजा हरिश्चंद्र- तारामती).

२) कौटुंबिक जीवनात बंधुप्रेम (जसे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे प्रेम आहे तसे)

३) अव्यभिचारी एकपतिपत्नीप्रेम (सीता-राम) आणि योग्य स्वामिनिष्ठा (हनुमान-राम).

४) सामाजिक व राजकीय नीतिमत्ता म्हणजे राजधर्म किंवा राजाने प्रजेविषयी पाळावयाचे आपले कर्तव्य

हे आदर्श हिंदूधर्माचे भाग आहेत. ‘धर्मो हि परमो लोके धर्मे सर्व प्रतिष्ठितम्’ (रामायण अयोध्याकांड २१.४१) ही रामायणाची शिकवण आहे. हे आदर्श लोकांनी घ्यावेत असे रामायण सांगते. वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे, याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगुर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे, यातच मानवाचे कल्याण आहे, असा रामायणाचा अभिप्राय आहे. 

नारदमुनी आदर्श सोळा गुण -

नारदमुनी हे ‘संक्षेप रामायण’ या वाल्मिकी रामायणातील सर्गात आदर्श मनुष्याच्या एकूण सोळा गुणांचे वर्णन करतात -

१. गुणवान - नीतीवंत

२. वीर्यवान- शूर

३. धर्मज्ञ - धर्माचा जाणकार

४. कृतज्ञ 

५. सत्यवाक्य – सत्यवचनी

६. दृढवृत्त – आत्मविश्वासी

७. चरित्र्यवान – चारित्र्य चांगले असणारा,

८. सर्वभूतहित – सर्व जीवांचे हित बघणारा

९. विद्वान

१०. समर्थ

११. सदैक प्रियदर्शन – ज्याचे दर्शन सदा सुखकर आहे असा

१२. आत्मवंत – धैर्यस्थ

१३. जितक्रोध –क्रोध जिंकलेला

१४. द्युतिमान् – कांती सुंदर असलेला

१५. अनसूयक – असूया नसलेला

१६. कस्य बिभ्यति देवाश्च जातरोशस्य संयुगे' - ज्याच्या कोपास देवताही घाबरतात असा.

रामायणातील राम स्वतःस मनुष्यच म्हणवतो. (आत्मानं मानुषं मन्ये) पुढील काळात रामाचे दैवतीकरण होऊन तो विष्णूचा अवतार गणला जाऊ लागला.

रामराज्य

रामराज्य म्हणजे नि:स्वार्थ बुद्धी, निर्मल मनोधारणा असणारे सत्यमार्गी शासक, निष्पक्ष न्यायव्यवस्था, गरीब-श्रीमंत समता, कैवारी आणि चोर, लुटारू, दुष्ट आणि धूर्त लोकांना दंड आणि केवळ सदैव लोकसेवा करणारे राज्य म्हणजे रामराज्य, अशी पुराणकाळापासून रामराज्याची कल्पना आहे

रामराज्याची संकल्पना श्रीरामांच्या कार्यशैलीला पाहून साकार झाली. न्यायप्रिय श्रीरामांचे संपूर्ण चरित्र इतके स्वच्छ आहे, म्हणूनच त्यांना इतिहासात पुरुषोत्तम श्रीराम म्हणून संबोधन करण्यात येते. रामाच्या राज्यात शेतकर्‍यांकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत असे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (तुकाराम गाथा, अभंग क्र.३६५१) वर्णन करतात -

झाले रामराज्य काय ऊणे आम्हासी।। धरणी धरी पिक गायी वोळील्या म्हैसी  ।।१।।

राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये।। दळीता कांडीता जेविता गे बाईये  ।।धृ।।

स्वप्नीही दु:ख कोणी न देखे डोळा।। नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा  ।।३।।

तुका म्हणे रामे सुख दिलें आपुलें।। तया गर्भवासी येणे जाणे खुंटले  ।।४।। 

रामराज्यात सर्वच सुखी असतात, हे खरे असले तरी ‘सर्व’मध्ये शोषक, समाजकंटक, गुन्हेगार लबाड लोकही सुखी असतात, असा नाही. पिळवणूक करणार्‍या प्रत्येकाला दंड भोगावा लागतो. सरकार दरबारी अथवा सरकारच्या अखत्यारित काम करणार्‍या सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या ऐतखाऊपणाला येथे थारा नसतो. उत्पादनाला प्रथम स्थान असते आणि श्रमजीवींच्या श्रमाचा सन्मान होत असतो. अगदी हाच अनुभव शिवाजी महाराजांच्या काळात येतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

रामराज्य – शिवराज्य

रामानंतर हजारो वर्षांच्या कालखंडात राजा भोज, राजा विक्रमादित्य, पृथ्वीराज चव्हाण, सम्राट चंद्रगुप्त इत्यादींनी रामराज्याचे अनुकरण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ते प्रत्यक्षात आणले. गरिबांची लूट करणारे, त्यांच्यावर अन्याय करणारे जमीनदार, सरंजामदार, छोटे, मोठे संस्थानिक अशा दुष्ट प्रवृत्तींना कठोर शासन आणि शेतकऱ्यांचे-रयतेचे राज्य त्यांनी आणले. 

महात्मा गांधींना अभिप्रेत रामराज्यरूपी लोकशाही

महात्मा गांधींना अभिप्रेत लोकशाही ही रामराज्याच्या कल्पनेतीलच आहे. रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या नेत्यांपासून तर स्वातंत्र्योत्तर काळात निवडणुका लढवणार्‍या नेत्यांपर्यंत प्रत्येकाने राजकारण केले. म. गांधींच्या मते, “रामायण हे खर्‍या लोकशाहीचे उदाहरण आहे. स्वातंत्र्य म्हणजे दुसर्‍या कुण्या पुढारलेल्या शासन व्यवस्थेचे अनुकरण करावे, असा नाही. आपल्याला आपले वाटणारे राज्य हवे आणि मी त्याला ‘रामराज्य’ म्हणतो. रामराज्य म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य. धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य म्हणजेच रामराज्य.” ही गांधींची रामराज्याविषयीची व्याख्या होती. देशाच्या विकासाला खेड्यापासून सुरुवात झाली पाहिजे. तळगाळातील जनतेला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगू द्यायचे असेल, तर आधी त्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा व्हायला पाहिजे आणि तेच खरे रामराज्य, असे गांधीजींचे मत होते.

रामायणाचा प्रभाव

संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम,  सीता,  लक्ष्मण,  भरत,  हनुमान  व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा केवळ छंद रचनाशैलीवर प्रभाव दिसतो असे नव्हे तर प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवरही सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये कालिदास, भवभूती यांचे काव्य ते  मराठी  संत  एकनाथ,  हिंदी भाषा कवी तुलसीदास, तेराव्या शतकातील तामिळ कवी कंब, शतकातील  मराठी  कवी  गजानन दिगंबर माडगूळकर यांचे ‘गीतरामायण’, तसेच गेल्या काही वर्षांत इतर कवी, लेखकांनी लिहिलेले रामायणविषयक अनेक ग्रंथ म्हणजे रामायणाचा प्रभाव आहे.

रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय  आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो)  थायलंड,  कंबोडिया,  मलेशिया,  व्हिएतनाम लाओस आदी देशांच्या  साहित्य, शिल्पकला, नाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो. रामायणातील व्यक्तिगत व सामाजिक नीतीचा भारतीय जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. रामायणातील आदर्श व शिकवण हा भारतीय संस्कृतीचा गाभा समजला जातो. रामायण हा अतिशय स्फूर्तीदायक ग्रंथ आहे.  

आता, काही प्रश्न

रामाने केलेला प्रवास, त्याने रावण युद्धासाठी जमवलेली अनेक ठिकाणची माणसे, भारतातील हजारो वर्षापासून नांदत असलेले हजारो स्थानिक विविध धर्म, संस्कृती यांच्याशी जोडलेले नाते पाहता विद्यमान काळातील या एकविसाव्या शतकातील रामायणाचे तत्त्वज्ञानात्मक योगदानाचे स्वरूप कोणते आहे? असा प्रश्न उपस्थित करता येईल.

उदाहरणार्थ, काँग्रेस व तत्सम पक्ष हे रामायणाचा आदर्श घेणारे नव्हते, नाहीत, हे अगदी खरे मानले तरी त्यांनी राममंदिर आणि हिंदुत्ववाद हा राजकीय अग्रक्रम बनवला नव्हता, तसे करणे हे त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान नाही. पण संघपरिवार व भाजप हे दोन प्रभावी राजकीय घटकांनी मात्र राममंदिर आणि हिंदुत्ववाद अग्रक्रम बनवला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

राम मंदिर पूर्ण झाले असून ते सुवर्ण तेजाने झळकते आहे.

रामाने युद्धासाठी विविध धर्म व संस्कृती यांच्याशी नाते जोडले. संघपरिवार व भाजपही वनवासी कल्याण, आदिवासी कल्याण, एकलव्य इत्यादी कार्यक्रम करते. त्यांना कोणताही समाज घटक वर्ज्य नाही. म्हणजे कोणत्याही जातीचा माणूस वर्ज्य नाही. प्रसंगी काही इस्लामधर्मीय लोक व लोकेनेतेही संघपरिवार व भाजपमध्ये दिसून येतात. एवढेच नव्हे, तर सर्ववर्णजातीच्या स्त्रियाही त्यांना वर्ज्य नाहीत. उलट त्या सत्तास्थानी आहेत. (हा अर्थात नाईलाजाने स्वीकारल्या गेलेल्या लोकशाहीचा महिमा आहे, हे उघड सत्य आहे.)

ही सर्वसमावेशकता रामाच्या सर्वसमावेशकतेशी नाते जोडते, पण केवळ कृतीच्या बाबतीत. आदर्शाच्या बाबतीत हे नाते जोडले जात आहे, याचे पुरावे कोणते आहेत? म्हणजे रामाच्या १६ गुणांपैकी १६ गुण कोणत्याही नेत्यात अपेक्षित नसले तरी काहीएक गुण असले पाहिजेत ना? म्हणजे रामाची व आधुनिक हिंदू रामभक्ताची पत्रिका जुळण्यासाठी किती गुण जुळले पाहिजेत?

रामाने रावणाचीही निंदा केलेली नाही, उलट रावणाच्या अंत्यसमयी रामाने त्याच्याकडून राज्यकर्त्याची कर्तव्ये, राजकीय नीतीशास्त्र, लोककल्याणाची तंत्रे इत्यादीचे ज्ञान संपादन केले. तेही अतिशय नम्रतेने त्याच्याजवळ बसून. रामाची ही ज्ञानसंपादनाची कृती अगदी ‘उपनिषद परंपरे’ला साजेशी होती. हाही रामाचा एक अत्त्युच्च आदर्श मानला पाहिजे. नंतर रामाने रावणाची उत्तरक्रियाही त्याला साजेशी केली.              

संघपरिवार व भाजपचे वनवासी कल्याण, आदिवासी कल्याण, एकलव्य इत्यादी कार्यक्रम त्या साऱ्यांचा स्वतंत्र धर्म नाहीसा करून त्यांचा हिंदू धर्मात विलय करून त्यांचे हिंदुकरण करणे हा मुख्य कार्यक्रम आहे. एक कारण असे की, या साऱ्या आदिवासी-वनवासी जमातींचा राम आणि रामायण हिंदू धर्मातील रामायणाशी जुळणारा नाही. प्रत्येक जातीजमातींचा राम व रामायण वेगवेगळे आहेत. दक्षिण भारतात काही ठिकाणी रावण हा नायक आहे, तर राम खलनायक आहे. उदाहरणार्थ, तामिळी संस्कृतीतील राम व रामायण हिंदू रामायणाशी जुळत नाही.

म्हणूनच सर्व भारतीय उपखंडात एकच राम असावा, एकच रामायण असावे आणि एकच रावण असावा, हा हेतू आढळतो.

म. गांधींचा राम

राम कितीही आदर्श राजा असला तरी तो वर्णजातभेद व लिंगभेदाचा पुरस्कर्ता होता. याचे अनेक पुरावे दिले गेले आहेत. रामाच्या व्यक्तिमत्वातील ही वैगुण्यता वगळून म. गांधींनी ‘नवा आधुनिक अहिंसक मुक्तिदाता राम’ घडवला. ‘रामायण हा अतिशय स्फूर्तीदायक ग्रंथ आहे’ हे मी वर लिहिलेले विधान निखालसपणे ज्या कोणाला लागू होते, ते केवळ गांधीच आहेत. राम जोपर्यंत गांधींच्या ताब्यात होता, तोपर्यंत रामाचे स्वरूप ‘सर्वसमावेश, प्रेममय’ होते. म्हणूनच त्यांच्या तोंडी अखेरीस ‘हे राम!’ प्रगट झाले! 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘मोक्ष ही कमालीची व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे. तिला समाजनिष्ठ करण्याचे काम भागवतधर्माने केले, परंतु टिळकांच्या मते भागवतधर्मसुद्धा पुढे निवृत्तीमार्गी म्हणजे व्यक्तीनिष्ठ झाला. राष्ट्रनिर्मितीसाठी सर्व समाज ज्याप्रमाणे एकरूप झाला पाहिजे, त्याप्रमाणे तो कर्मप्रवण झाला पाहिजे, अशी टिळकांची भूमिका आहे. गीतेतला मूळ भागवतधर्म हाच तो कर्मयोग, असे टिळकांचे म्हणणे होते. भागवतपुराणाचा भागवतधर्मही गीतेहून निराळा आहे. तो निवृत्तिमार्गी आहे. आपण जी भक्ती चळवळ म्हणतो त्या भक्त चळवळीने तो भागवतपुराणातील निवृत्तिमार्गी भागवतधर्माचा प्रसार केला. त्यामुळे फक्त पारलौकिक बाबींमध्ये समानता आली. राजकीय क्षेत्रात समाज एकरूप होऊ शकला नाही. यासाठी जे राष्ट्र पारतंत्र्यात आहे त्याच्या अभ्युदयासाठी म्हणून मूळ भारतीय असलेले एक नीतिशास्त्र, आधुनिक विज्ञानावर आधारलेले, गीतेतल्या मूळ भागवत धर्मावर आधारलेलं विश्लेषण टिळकांना सादर करायचे होते. ते गीतारहस्याच्यारूपाने आपल्यासमोर आहे,’ असे विश्लेषण देता येते.

पण भारतीय जनतेला, सामान्य माणसाला अस्सल कर्मप्रवण करण्याचे कार्य गांधींनी केले, हा टिळकांचा उत्तरार्ध होता. ‘आत्मकथा’च्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘ज्याच्यासाठी तीस वर्षे माझी धडपड चालली आहे, ते आहे आत्मदर्शन, ईश्वराचा साक्षात्कार, मोक्ष. माझी सर्व हालचाल याच दृष्टीने चालते. माझे सर्व लिखाण याच दृष्टीने चालते आणि राजकीय चळवळीतही मनोभावे पडतो ते याचसाठी.”

कशासाठी तर मोक्षासाठी! गांधीजी गीतेकडे याच कर्तव्यभावनेने पाहतात. त्यांचे म्हणणे असे की, “माझ्या प्रयोगांमध्ये तरी आध्यात्मिक म्हणजे नैतिक, धर्म म्हणजे नीती, सत्य म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे सत्य”. येथे गांधीजींचा ईश्वर, त्यांचे सत्य म्हणजे त्यांनी कल्पिलेला ‘पुरुषोत्तम राम’ आहे. नारदाने वर्णन केलेला ‘पुरुषोत्तम राम’च गांधीजींचे नैतिक तत्त्वज्ञानात्मक  सत्य आहे. 

टिळकांची गीता नुकतीच समोर आली होती, पण तिचा अद्यापि प्रसार झालेला नव्हता आणि ती जडजंबाळ होती. त्यामुळे ती सामान्यांच्या आवाक्याबाहेर होती. त्यामुळे गांधींना ती सोपी करणे, लोकांपर्यंत पोहोचविणे आणि पुन्हा नव्याने अर्थ सांगणे आवश्यक होती. ते कार्य त्यांनी केले, ते रामाच्या आणि रामायणाच्या आधारे. त्या आधारेच ते ‘रामराज्य’ मांडतात. तेच त्यांचे मूलभूत तत्त्वज्ञान होते.   

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, गांधीजींचा हा राम संघपरिवार व भाजपलाच काय, पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी इत्यादी कोणत्याच पक्षालाच नको आहे. अगदी काँग्रेसच्या स्थापनेपासून राम काँग्रेसचा कधीही नव्हता, म्हणजेच रामाचे कोणतेही गुण काँग्रेसला फारसे मान्य नव्हते. पण जेव्हा राम उघडपणे संघपरिवार व भाजप इत्यादी हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात गेला, तेव्हा त्यांचे अहिंसक व प्रेमळ स्वरूप बदलले. ‘रामायण हा अतिशय स्फूर्तीदायक ग्रंथ आहे’ या विधानाचा उलटा अर्थ येथे घेतला गेला. कोणती स्फूर्ती घेतली संघपरिवार व भाजपने? त्याचे यथेच्छ पुरावे आहेत.   

काँग्रेसला तर मूळ रामच मान्य नसल्याने नव्या हिंदुत्ववादी रामालाही मान्यता देण्याचे कारण त्यांच्याकडे नाही. 

राम व रामायणापुरतेच बोलायचे तर सर्व भारतीय उपखंडात एकच राम असावा, एकच रामायण असावे आणि एकच रावण असावा, हा संघपरिवार व भाजपचा हेतू आढळतो. पण मग आता, संघपरिवाराचा रावण कोणता? 

मुसलमान, ख्रिस्ती आहेत किंवा परंपरेनुसार बौद्ध, जैन व चार्वाक हे संघपरिवाराचे रावण आहेत म्हणावे तर ते खोटे ठरते. कारण समग्र हिंदुत्ववाद्यांकडे मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, जैन सारेच आहेत की!! (आणि हे सारे काँग्रेसकडेही आधीपासूनच आहेत.) वनवासी-आदिवासी तर हिंदू धर्माचा भाग बनत असल्याने, तेही रावण नाहीत. ख्रिस्ती- मुसलमानही नाहीत.   

मग संघपरिवाराचा खरा रावण कोणता?

उत्तर शोधणे कठीण आहे, पण अशक्य नाही. ते लपलेले आहे एवढेच, पण ते मुदलात अस्तित्वात नाही, असे नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हिंदू तत्त्वज्ञानाचे अध्वर्यू आदि शंकराचार्य म्हणतात, “सत्य आणि असत्य यांची बेमालूम सरमिसळ म्हणजे जग!” (सत्यानृते मिथुनीकृत्य अहमिदम् ममेदम् इति नैसर्गिकोऽयं लोकव्यवहारः)

एका विशिष्ट अर्थाने जग अस्तित्वातच नाही, असे तत्त्वज्ञान मांडणारे शंकराचार्य वर्णजातीव्यवस्था आणि लिंगभेद व्यवस्था मात्र सत्य आहे, असेही म्हणतात. किंवा हेही शक्य आहे की, सर्व वर्णजातीलिंगभेदाला भेदून त्यांना नाकारून खरीखुरी आध्यात्मिक व तत्त्वज्ञानात्मक समता प्रदान करणाऱ्या शं‍कराचार्यांच्या अद्वैत सिद्धीलाही मायेच्या जोखडात अडकवून शं‍कराचार्यांना तत्कालिन आरेसेस व भाजपवादी हिंदुत्ववाद्यांनी आपल्या जाळ्यात ओढले गेले नसेल कशावरून? हे अर्थात शं‍कराचार्यांच्या निर्गमनानंतरच घडले असणार!

याच हिंदुत्ववाद्यांनी चार्वाकांना जाळून मारले, आर्यभट्टाला-ब्रह्मगुप्ताला-वराहमिहिरला छळून मारले, शं‍कराचार्यांना वाळीत टाकले, ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, तुकोबाच्या वह्या बुडविल्या-त्यांचा खून केला, चोखोबाला चिणून मारले, जोतिबा फुल्यांना छळले-सावित्रीबाईंना शेणगोळे मारले, आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली, दाभोळकर-गौरी-लंकेश.... ही दीर्घकालीन खुनी परंपरा आहे...

हरेक काळात ही परंपरा ‘नवा रावण’ शोधते, युद्धात मरण्यासाठी रानावनातली, गल्लीबोळातली, अडाणी-बिनडोक सामान्य माणसे जमवते-त्यांना चेतवते, ते मारतात-मरून जातात  आणि या ‘पवित्र परंपरा’ स्वतः मात्र सुरक्षित गडकिल्ल्यात आरामात सारी हिंसा ‘एन्जॉय’ करते!         

संघपरिवार सनातन प्रवृत्ती आहे.

या सनातन प्रवृत्तीचे आणि मूळ प्रभू रामचंद्राचे नाते असलेच तर कोणते आहे?                 

.................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

shriniwas.sh@gmail.com  

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......