आपण लोकांना शुभेच्छा देतो, पण त्यांनी शुभ जीवन जगावे म्हणून काय करतो? याचा शोध घेता लक्षात आले की, काहीच करत नाही! मग त्यांना पोकळ शुभेच्छा देण्यात आपण कोणती नीती बाळगतो?
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 24 October 2023
  • पडघम सांस्कृतिक दसरा Dasara विजयादशमी Vijayadashami शुभेच्छा Wishes आशीर्वाद Blessings

दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छांचा भयंकर मारा झाला. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या बाळबोध सार्वजनिक गुळगुळीत सुविचारापासून अनंत प्रकारच्या नवचित्रकलेने सजलेल्या, नवकाव्यांनी शब्द-संकल्पनांची उधळण करणाऱ्या शुभेच्छांचा एकच हैदोस धिंगाणा झाला. काही जणांनी शुभेच्छांना गाणी-बजावणीचा साजही चढवला. आपले व्यक्तिगत व सार्वजनिक शुभ करण्याच्या जणू काही जागतिक स्पर्धांना उधाण आले. दसऱ्याची महती गाणाऱ्या लेखांचा विविध वृत्तपत्रांमध्ये तर मुसळधार पाऊसच पडला! हे अर्थात कोणत्याही सणाच्या, वाढदिवस, बढती, यश इत्यादिनिमित्त घडते, शुभेच्छांचा वर्षाव होतो. त्याचा आता ‘धंदा’च बनला आहे.

पण ‘शुभेच्छा’ म्हणजे काय? What is Good Will, असा प्रश्न उपस्थित केला, तर काय उत्तर मिळेल?               

कोणतीही इच्छा कधी फळाला येते?

आपण त्या इच्छा पूर्ण करण्याच्या, पूर्ण होण्याच्या दिशेने काही ‘ठोस कृती’ करू शकलो, तरच ती इच्छा फळाला येते, अन्यथा नाही.

नुसत्या इच्छा व्यक्त करून काय होते? काहीच नाही. कारण त्यातून इच्छा व्यक्त करणारी व्यक्ती त्या इच्छेनुसार घडणाऱ्या कृतीतून पलायन करते किंवा ती उपस्थित नसतेच किंवा शुभ कृती करण्यास समर्थ नसते. अर्थात हे सारे हेतूतः घडते असे नाही; पण दुदैवाने तसे घडते खरे.

उदाहरणार्थ ‘पसायदान’ या अतिभावूक काव्यात अशी इच्छा व्यक्त होताना दिसते. ज्ञानेश्वरमाऊली ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ची इच्छा करतात. सर्वांना शुभेच्छा देतात, पण ‘जो जे वांछिल’चा अर्थ काय? प्रत्येकाला काय हवे, प्रत्येकाची इच्छा काय-कोणती-तिच्या पूर्तीचे मार्ग कोणते?    

येथे ‘वांछा’चा अर्थ भौतिक की, अधिभौतिक? वांछा म्हणजे काय? भौतिक अर्थ घेतला, तर निदान अन्न, वस्त्र व निवारा या भौतिक गरजा पूर्ण होणे अपेक्षित आहे. अधिभौतिक म्हणजे प्रेम, करुणा, मानवता, बंधुत्व इत्यादी मानता येईल. अधिभौतिकचा अंतिम अर्थ होतो ‘मोक्ष’. त्याखेरीज अंतिम इच्छा कोणती? खरे तर ‘संपूर्ण इच्छा मुक्ति म्हणजे मोक्ष’. सर्व इच्छांच्या पल्याड... मग ‘भोगून मुक्त व्हा’ (त्येन तक्तेन भुन्जीथा) म्हणजे काय? इंद्रियांना भोगायला काही विषय पाहिजे की नको? त्या कशा पूर्ण करणार? अशी कोणती राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था आहे की, जी प्रत्येक व्यक्तीला ‘भोगून मुक्त व्हा’चा जीवनाचा अवकाश देईल?    

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बरे, मोक्ष तरी हवाय का प्रत्येकाला!? मोक्ष मिळावा असे वागतो का आपण? अनंत इच्छांनी लडबडलेले, बरबटलेले रोजचे जगणे असते. खरेच इच्छा मुक्त आहोत का आपण? ‘अमर आत्म्यावर विश्वास आहे का? सॉक्रेटीस म्हणतो- “आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवणारे लोक कोर्टात का जातात, हेच मला कळत नाही!”

ज्ञानदेवाप्रमाणेच प्लेटोलाही एक सुंदर जगाची इच्छा होती, मार्क्सलाही. पण ज्ञानदेव आणि प्लेटो-मार्क्स यांच्यात फरक एवढाच की, प्लेटो-मार्क्स या दोघांनी त्यांना अपेक्षित जगाची रचना दिली. ती दोषास्पद होती, हे कालप्रवाहात लक्षात आले, पण त्यांनी निदान ती दिली तरी…

ज्ञानेश्वरमाऊली चांगल्या विश्वाचे ‘प्रसाद दान’ मागतात खरे. ती भावनाही वैश्विक आहे, पण ‘प्लॅनिंग’चे काय? ‘ज्ञानेश्वरांची समाजाची संकल्पना : भौतिक आणि आध्यात्मिक’ असा काही अभ्यास कुणी केला का? अर्थात् त्यांची ‘भागवतधर्मा’ची रचना ही एक थोर गोष्ट आहे. पण पसायदान केवळ आध्यात्मिक नको आहे, व्यावहारीकही हवे (अर्थात बाराव्या शतकातल्या या घटनेला एकविसाव्या शतकात तुम्ही प्रश्न करताच कसा, असाही आक्षेप येऊ शकतो, यात शंका नाही. पण तुम्ही तात्त्विक ‘सत्संकल्प’ करता, तेव्हा त्यात स्थलकालनिरपेक्षता असते, ती कधीही कुठेही केव्हाही लागू करता येणे शक्य असले पाहिजे, हे विसरता कामा नये.)

आपण लोकांना शुभेच्छा देतो, पण त्यांनी शुभ जीवन जगावे म्हणून काय करतो? याचा शोध घेता लक्षात आले की, काहीच करत नाही! मग त्यांना पोकळ शुभेच्छा देण्यात आपण कोणती नीती बाळगतो? हा बडेजाव आहे की हतबलता? मी ज्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यांना कोणती मदत कशाच्या रूपात देऊ केली आहे काय? निदान देऊ शकतो काय? तशी शक्यता असेल, तर मी ती करतो आहे काय? की सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकाने आपापले प्रश्न स्वतःच सोडवावयाचे असतात, त्यात इतर जन काय करणार, असे म्हणून आपण केवळ शुभेच्छा देऊन स्वतःचीच फसवणूक तर करत नाही आहोत ना?

आजच्या काळात गोची अशी झाली आहे की, विद्यमान नवभांडवलशाहीने किंवा साटेलोटे (क्रोनी) भांडवलशाहीने आपल्याला एक चमत्कारिक श्रीमंती दिली आहे. तिचे स्वरूप जणू वेदान्तामधल्या मायेसारखे आहे. मानले तर तुम्ही वेतनभोगी उच्चमध्यमर्गीय किंवा श्रीमंत असता, पण त्याच वेळेस तुम्ही कर्जबाजारीही असता. तुमचे जीवन अनेक प्रकारच्या ‘हप्त्यां’मध्ये विभागलेले असते. ते ‘हप्ताग्रस्त’ जीवन तुम्ही अपरिहार्यपणे ओढत असता (फार तर तुम्ही ‘सरकारी नोकरशाहीचे भाग असाल, पोलीस, तहसीलदार, उपनिबंधक  इत्यादी असाल, तर तुम्हाला हप्ते मिळत राहतात, एवढेच. पण त्यांनाही ‘हप्ता’ द्यावा लागणारेही आपल्यासारखे अस्तित्वात असतातच).

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

उद्योजक असाल, तर राजकीय पक्षांना हप्ते देता. परिणामी तुमच्याकडे पैसा उरतच नाही. म्हणजे तुम्ही खरे तर गरीब किंवा दरिद्रीच असता, पण तसे कबूल करता येत नाही. कारण तुमच्याकडे श्रीमंतीच्या सगळ्या खुणा असतात की, ज्याची कबुली तुम्ही तुमच्या कर्जाच्या अर्जात दिलेली असते. चारचाकी, फ्रीज, सोने, जमीन, उत्पन्नाचे सर्व मार्ग आणि तुमची आर्थिक गरज, फेडण्याची क्षमता व तयारी.

मग ओढाताण अशी की, तुम्ही कमी पडणारा पैसा मिळवण्यासाठी जास्त काम करता, जास्त जण जास्त काम करत राहतात आणि सगळ्या श्रमाचा सूड म्हणून खर्च करत राहतात. जास्त पैसा खर्च करून करून क्वचित तुम्हाला श्मशानवैराग्यही येते. त्यातून जीवनाची नश्वरता उमगून आणखी जास्त खर्च करता. यातून घडते असे की, तुमच्याकडे ना पैसा उरतो, ना वेळ उरतो.

म्हणजेच भांडवलशाही तुमव्याकडे आभासमय पैसाही देते आणि तुमचा स्वतःचा वेळही हिरावून घेते, कळत-नकळतपणे दरोडा घालते.

जर्मन कथालेखक हाईनरीश ब्योईलच्या कथेतल्यासारखे घडते. एका खेड्यात शहरातला एक उद्योगधंदा करून पैसा मिळवणारा माणूस येतो. तेथे तो उद्यमशीलता कशी माणसाला समृद्धी देते, त्यामुळे आपण कसे सुखवस्तू जीवन जगू शकतो, यावर व्याख्यान देतो. नंतर खेडूत त्याला विचारतात की, एवढा बक्कळ पैसा हवा कशाला? तर तो उत्तर देतो- ‘शांतपणे जगण्यासाठी!’ मग ते खेडूत म्हणतात- ‘आम्ही शांतपणेच जगतो आहोत की! काम करायचेच कशाला?’

कृतीशून्यता मानसिक शांतता देते का? ‘चांगले रहा’ म्हणून ‘चांगले राहता येते का?’ म्हणूनच या अशा शुभेच्छांना काही नैतिक दर्जा उरत नाही. तो आशीर्वादाच्या बेजबाबदार पातळीवर जातो.

शुभेच्छांना नैतिक दर्जा कसा व कधी मिळेल?

याचे उत्तर इमान्युएल काण्ट (१७२२-१८०४) हा जर्मन तत्त्वज्ञ देतो. तो म्हणतो की, केवळ इच्छा करून उपयोग नाही, तर त्या इच्छेला कृतीची जोड दिली, तरच ती इच्छा सफल होते. त्याच्या मते इच्छा (Wish), कृती (Action), संकल्प (Good Will) यांच्यात फरक केला पाहिजे. इच्छा करा, पण तिला ‘सदिच्छे’ (Good Will)ची जोड द्या.... ‘इच्छा’ तेव्हाच ‘सत्’ (good or true or real) होईल, अन्यथा नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

काण्टची इच्छा ‘जगत्कल्याणाची इच्छा’ आहे. जी कृती अखिल जगाच्या कल्याणाची असेल आणि आधी केवळ भाषेच्या पातळीवर असलेली ‘साधी इच्छा’ तुम्ही स्वतः त्या इच्छेच्या पूर्ण होण्यासही काही ‘कृती’ करणार असाल, तरच नंतर तीच ‘सत् इच्छा’ (Good Will) बनते.

किंबहुना शुभ इच्छेच्या दिशेने झालेली कृती, ही इच्छेच्या चांगूलपणाची अटच असते. तरच शुभेच्छा ‘शुभ’ ठरते. कृतीनेच ‘शुभेच्छा’ ही ‘सत्संकल्प’ बनते, अन्यथा ती नुसतीच ‘बेजाबाबदार विधान’ (non obligatory statement) बनते. तिला फार तर ‘वेदवाक्या’चा दर्जा प्राप्त होतो. म्हणजे तो अपौरुषेय ठरतो. कोणत्याच ‘पुरुषा’वर माणसावर त्याची जबाबदारी येत नाही.

ज्या मित्राला, व्यक्तीला, समाजाला ‘शुभेच्छा’ द्यायच्या आहेत, त्याचे शुभ होण्यासाठी शुभ जीवन जगता यावे, म्हणून प्रथमपुरुषी एकवचनी ‘मी’ स्वतः काही केलेच नाही, किंवा द्वितीय पुरुषी अनेकवचनी ‘तुम्ही’ अथवा ‘सर्वपुरुषी आपण’ काही ठोस कृतीच केली नाही; तर अशी मैत्री, ते समाजहित, ते आशीर्वाद वांझोटेच ठरणार ना?  

.................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......