टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • टपलीचित्र - श्रीनिवास आगवणे
  • Wed , 31 May 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya एक रुपयाची नोट One rupee note देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis तेजप्रताप यादव Tej Pratap Yadav साक्षी महाराज Sakshi Maharaj माधव भंडारी Madhav Bhandari

१. शेतकऱ्यांनी पुकारलेला संप हा शेतकऱ्यांचा नुकसान करणारा आहे. पाऊस पडल्यावर पेरण्या करण्यासाठी १० दिवस असतात. याच काळात जर शेतकरी संपावर गेले, तर शेतकऱ्यांचेच नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांना संपावर जाण्यास प्रवृत्त करणे म्हणजे ‘लाल दहशतवाद’ आहे, असे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे व्यक्त केले.

अरेच्चा, भंडारी यांच्या पक्षाने लाल रंगही पादाक्रांत केला की काय? शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारे कोण आहेत, अशी त्यांची समजूत आहे? शेतकऱ्यांना विचारलं तर संपावर जायला या सरकारची शेतकरीविरोधी धोरणं कारणीभूत आहेत, असं ते सांगतील. आमचा भगवा आणि आमचाच लालही?

……………………………………………………………………………………………

२. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रुपये मूल्याची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. या नोटेची छपाई पूर्ण झाली असून ती चलनात आल्यानंतरही सध्याची एक रुपयाची नोट वैधच राहणार आहे. नवी नोट दोन्ही बाजूंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. नोटेच्या दोन्ही भागांवर केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रुपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे. नोटेच्या अन्य भागावर महाराष्ट्रातील ‘सागर सम्राट’ या तेल उत्खनन केंद्राची प्रतिमा आहे. याशिवाय, नोटेवर ‘L’ हे अक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे.  तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘1’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.

ते सगळं ठीक आहे, पण ती गुप्त चिप कुठे बसवली आहे ते सांगा. नोटेमधला कॅमेरा काळा पैसा धारण करणाऱ्यांचे फोटो घेऊन पाच प्रतींमध्ये मोदी, शाह, पटेल यांच्याबरोबर सीबीआय आणि रॉ यांना धाडणार आहे, ते सांगा. नोटेतला तो रेडिओअॅक्टिव्ह सूक्ष्मकण उपग्रहांच्या मार्फतही टिपला जाईल आणि दहापेक्षा जास्त नोटा खिशात बाळगणाऱ्यावर पतंजलीच्या संरक्षण प्रयोगशाळेत तयार झालेल्या स्वदेशी गोकिरणांचा मारा केला जाणार आहे, ते सांगा. ते सांगितलं नाहीत, तर नवी नोट आली, यावर कुणाचा विश्वास तरी बसेल का?

……………………………………………………………………………………………

३. बाबर हा परदेशी होता आणि त्याला भारताशी काहीही देणेघेणे नव्हते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेचा उल्लेख बाबरी मशीद असा न करता रामजन्मभूमी असा करण्याचे आवाहन भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले.

कोण कुठून आला, याचीच उठाठेव करायची, तर बाबर त्या मानाने जवळून आला होता. शेजारीच म्हणायला हवा. रामाचे पूर्वज तर भलत्याच खंडातून मजल-दरमजल करत इथे आले होते, म्हणतात. अशा परकीयांच्या कुळातल्या मुलाच्या जन्माचा तरी इथे कशाला उल्लेख करायला हवा, असा युक्तिवाद त्या जन्माआधीपासूनच्या भूमिपुत्रांनी केला, तर चालेल का साक्षी महाराजांना?

……………………………………………………………………………………………

४. बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी एका ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यामुळे पाटणा येथील सरकारी निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराची दिशा बदलली आहे. त्यामुळे या निवासस्थानामागे गेल्या ५० वर्षांपासून राहत असलेल्या झोपडपट्टीवासियांच्या संकटात वाढ झाली आहे.

दरवाजाची दिशा बदलल्याने आपल्या याच जन्मातल्या पूर्वसुकृतातून जी काही कायदेशीर लचांडं मागे लागणार असतात, त्यांची आणि आपल्या घराची दशा बदलत नाही, हे कोणताही ज्योतिषी यांना कसा सांगत नाही? वेळीच दिल्लीत जाऊन काही ग्रहांची शांती केली असती, तर मग थोडाफार दिलासा मिळाला असता.

……………………………………………………………………………………………

५. गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षांत काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली असती, अशी तोफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डागली.

मुख्यमंत्री शेतकरी या विषयावर आजही बोलतात, हे मोठ्या धारिष्ट्याचं काम आहे. आपण शेतकऱ्यांसाठी काय काय केलं, हेही सांगायची त्यांची तयारी आहे, म्हणजे तर जबरदस्तच. अर्थात, योजनांची नावं आणि सरकारी आकडेवाऱ्या यांची फेकाफेकच करायची म्हटली तर ते अनेक तास बोलत राहू शकतात. शिवाय, कळीच्या प्रश्नांवर ‘ते त्याच गाळात अडकलंय, तोच आम्ही काढतो आहोत आईभवानीच्या आशीर्वादाने’ हे पेटंट उत्तर देता येईलच.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......