अलौकिक प्रतिभेचे धनी असलेले उस्ताद राशिद खान त्यांच्या बेहतरीन तानांमुळे, त्यातल्या खर्जामुळे ‘असाधारण’ समजले जात, जातील, जात राहतील…
कला-संस्कृती - सतार ते रॉक
अंजली अंबेकर
  • उस्ताद राशिद खान (जन्म - १ जुलै १९६८, मृत्यू - ९ जानेवारी २०२४)
  • Fri , 12 January 2024
  • कला-लंस्कृती सतार ते रॉक उस्ताद राशिद खान Ustad Rashid Khan

उस्ताद राशिद खान रामपूर-सहसवान या संगीत घराण्याचा वारसा सांगणारे. ते रामपूर-सहसवान घराण्याचे संस्थापक आणि गायक उस्ताद इनायत हुसैन खान यांचे पणतू. त्यांचं घराणंच संगीतकाराचं, थेट मियाँ तानसेनशी नातं सांगणारं. साधारणतः संगीत विद्या सुरू करताना विद्यार्थ्यांना ‘सा रे ग म’चा सराव सुरुवातीचे एक-दोन वर्षं संपूर्ण रागात, राग यमन (संध्याकाळचा राग) आणि भैरव (सकाळचा राग) करायला सांगायचे, परंतु उस्ताद इनायत हुसेन खानसाहेब हाच सराव गौड सारंग (दुपारचा राग)सारख्या संकीर्ण रागात करायला सांगायचे.

‘संकीर्ण’चा अर्थ अरुंद. त्याच्या हालचाली प्रतिंबधित असायच्या, संपूर्ण रागासारख्या मोकळ्या नाही. गौड सारंग हा सुरुवातीलाच सरावासाठी देणं अत्यंत क्लिष्ट असा राग आहे आणि त्याची निवड सामान्यपणे कुणी करत नाही. न एक सूर साधो तो सब सूर साधे, अशी धारणा त्या स्टाईलमध्ये उस्ताद इनायत हुसेन खानसाहेबांची होती.

तेच पुढे त्या घराण्याचं वैशिष्ट्य ही राहिलं आहे. इनायत हुसेनसाहेबांकडे असंख्य बंदिशी आणि तरान्यांचा संग्रह होता. तो वारसा पुढे त्या घराण्यांच्या गायकांनाही मिळाला. मुश्ताक हुसेन खान, निस्सार  हुसेन खान, गुलाम मुस्तफा खान, गुलाम सादिक खान आणि राशिद खान हे रामपूर-सहसावन घराण्याचे महत्त्वाचे गायक आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

उस्ताद राशिद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बदायू गावात १ जुलै १९६८ रोजी झाला. ते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे आणि उस्ताद निस्सार हुसैन खान यांचे भाचे. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी राशिदजीमधली संगीताची चुणूक ओळखली आणि त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी ते मुंबईला घेऊन आले. सुरुवातीचं राशिदजींचं शिक्षण उस्ताद निस्सार हुसेन खानसाहेबांकडे झालं. उस्ताद निस्सार हुसेन खानसाहेब उत्तरायुष्यात पंधरा वर्षं कोलकात्याच्या आयटीसी संगीत विद्यालयाशी संबंधित होते.  ते राशिदजींनाही सोबत घेऊन गेले.

उस्ताद निस्सार हुसेन खान अत्यंत कडक शिस्तीचे होते. त्यांनी राशिदजींचं गाणं, त्यातल्या ताना खूप घोटवून घेतल्या. त्यांना तास न तास रियाज करायला लावला. या परिश्रमांमुळे राशिदजी पुढे रामपूर-सहसावन घराण्याचे अग्रगण्य गायक म्हणून गणले गेले. निस्सार हुसेन साहेब जिथे संगीत शिकवायचे, त्या ITC Sangeet Research Academyला संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उज्ज्वल परंपरा आहे. सत्यजित रे, पंडित ज्ञानप्रकाशजी घोष, गिरीजा देवी, पंडित अजोय चक्रवर्ती, उस्ताद राशिद खान, पंडित उल्हास कशाळकर, पंडित बुद्धदेव दासगुप्ता, उदय भवाळकर ते कौशिकी चक्रवर्ती असे संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज त्याच्याशी जोडले गेले आहेत.

अगदी लहान वयात राशिदजींचा ‘child prodigy’ (अलौकिक प्रतिभेचे धनी)मध्ये समावेश केला गेला. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी (आयटीसी संगीत संमेलन, नवी दिल्लीच्या कार्यक्रमापासून) मैफलीत गायला सुरुवात केली. लहान वयातच त्यांना पंडित भीमसेन जोशींसारख्या दिग्गज गायकाची शाबासकी मिळाली होती. त्यांचं गाणं ऐकून पंडितजींनी ‘राशिद खान हे भारतीय शास्त्रीय संगीताचं उज्ज्वल भविष्य आहे’ असं विधान केलं होतं. ते राशिदजींनी सार्थ ठरवलं.

इस्माईल दरबार या संगीतकाराच्या ‘कृष्णा द वॉरिअर’ या २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटापासून राशिदजींनी चित्रपटात गायला सुरुवात केली होती, परंतु संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘आओगे जब तुम वो साजना…’ या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील गाण्याने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते शांतनू मोईत्रा, स्नेहा खानविलकर, बिक्रम घोष, शंकर-एहसान -लॉय यांसारख्या अनेक संगीतकारांसोबत गायले… त्यांची जवळपास सगळी गाणी लोकप्रिय झाली. त्यात हिंदीसोबत बंगाली आणि मराठी गाण्यांचाही समावेश आहे. म्युझिक टुडे ते सारेगामा अशा अनेक संगीत कंपन्यांनी राशिदजींच्या खाजगी मैफली आणि अल्बम्स प्रकाशित केले आहेत.

राशीदजींवर, त्यांच्या गायकीवर पंडित भीमसेन जोशी आणि उस्ताद आमिर खाँसाहेबांचा मोठा प्रभाव होता. राशिदजी त्यांच्या संगीत करिअरच्या सुरुवातीला एकदा भीमसेनजींच्या घरी गायला गेले होते. तेव्हा पंडितजींनी त्यांना दहा हजार रुपये बिदागी देऊन त्यांचा सन्मान केला होता. पहिल्यांदा जेव्हा राशिदजी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात गायला आले, तेव्हा पंडितजींनीच त्यांचे तानपुरे जुळवून दिले होते. असं दोघांचं जिव्हाळ्याचं नातं होतं.

राशिदजी आणि पंडितजी यांची राग ‘मिया की तोडी’मधील जुगलबंदी या परस्पर सौहार्दाला पुष्टी देणारी आहे. ही जुगलबंदी आयोजित करण्याचं श्रेय उस्ताद विलायत खान (प्रसिद्ध सतार वादक)साहेबांना जातं. त्यांनी म्हटलंय, “इन दोनो में जो मुहब्बत हैं, इज्जत हैं और यह एक दुसरे को सराह कर गा रहे थे, इसलिये यह जुगलबंदी कामयाब हुई हैं.”

राशिदजींनी रामपूर-सहसावन घराण्याच्या संगीत शैलीसोबतच अनेक संगीताच्या शैली आत्मसात केल्या, अनेक घराण्यांचा अभ्यास करून स्वतःचं गाणं, गायकी ‘इव्हॉल्व’ केली. त्यांचा सूर, स्वरप्रयोग यातून त्यांचा आवाज अधिक खुलला. राशिदजी त्यांच्या बेहतरीन तानांमुळे, त्यातल्या खर्जामुळे ‘असाधारण’ समजले जात. त्यांना किराणा घराण्याच्या शैलीत विलंबितचा विस्तार करायला आवडायचा.

राशिदजींकडे कंठ संगीतातील सर्वांत मोठी जमेची बाजू होती, ती म्हणजे त्यांचा जबरदस्त ‘थ्रो’. त्यामुळे त्यांचं गाणं भारदस्त, घरंदाज वाटायचं. त्यांच्या आवाजात राग देश, राग मारवा अधिक खुलून यायचे. तराना तर त्यांची खासीयतच होती. राशीदजींचे डोळे मोठे होते. त्यामुळे गाताना त्यांचं गाणं डोळ्यातून दिसायचं. त्यांची गाण्यातील तन्मयता चेहऱ्यावरून अभिव्यक्त व्हायची.

अगदी लहान वयात राशिदजींचा ‘child prodigy’ (अलौकिक प्रतिभेचे धनी)मध्ये समावेश केला गेला. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी (आयटीसी संगीत संमेलन, नवी दिल्लीच्या कार्यक्रमापासून) मैफलीत गायला सुरुवात केली. लहान वयातच त्यांना पंडित भीमसेन जोशींसारख्या दिग्गज गायकाची शाबासकी मिळाली होती. त्यांचं गाणं ऐकून पंडितजींनी ‘राशिद खान हे भारतीय शास्त्रीय संगीताचं उज्ज्वल भविष्य आहे’ असं विधान केलं होतं. ते राशिदजींनी सार्थ ठरवलं.

कसूर-पतियाला घराण्याचे उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांनी स्वरबद्ध करून अजरामर केलेली ‘याद पिया की आए’ ही ठुमरी अनेकांनी गायली आहे. उस्तादजींनी त्यांच्या प्रिय पत्नीच्या निधनानंतर ती संगीतबद्ध केली होती. त्या ठुमरीतील आर्तता, तळमळ राशीदजींनी त्यांच्या आवाजातून सार्थपणे व्यक्त केली. पुढे राशिदजींनी ‘yearning’ (तळमळ) नावाचा स्वतंत्र अल्बम संगीतबद्ध केला. त्यात त्यांच्या आवडत्या मारवा रागाची अनेक रूपं खुलवली आहेत.

राशिदजींना राग किरवानीही खूप आवडायचा. वाद्य संगीतात प्रामुख्याने वाजवला जाणारा हा राग कर्नाटक संगीतातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आलेला आहे. उस्तादजी अनेकदा या रागातील बंदिश ‘तोरे बिना चैन नहीं’ ही कृष्णाला उद्देशून रचलेली बंदिश गायचे. रामपूर-सहसावन घराण्यांच्या पारंपरिक बंदिशींसोबतच राशिदजींनी संगीतातील अनेक प्रयोगही केले.

राशिदजींचा जन्म उत्तर प्रदेशचा असला, तरी आयटीसी संगीत विद्यालयाच्या काळापासून ते कोलकात्यातच स्थायिक झाले होते. साहजिकच त्यांना रवींद्र संगीताबद्दल विलक्षण प्रेम होतं आणि त्या संदभाने संगीत निर्मिती करण्याचं त्यांच्या अनेक वर्षांपासून मनात होतं. रवींद्र संगीतावर आधारित ‘बैठकी रबी’ या स्वतंत्र अल्बमची निर्मिती केली आणि नचिकेत चक्रवर्ती या संगीतकारांसोबत ‘a journey of Rabindra Sangeet and Hindusthani classical Bandish’ अशा यात्रा अल्बमची निर्मिती केली.

इस्माईल दरबार या संगीतकाराच्या ‘कृष्णा द वॉरिअर’ या २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटापासून राशिदजींनी चित्रपटात गायला सुरुवात केली होती, परंतु संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘आओगे जब तुम वो साजना…’ या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील गाण्याने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते शांतनू मोईत्रा, स्नेहा खानविलकर, बिक्रम घोष, शंकर-एहसान -लॉय यांसारख्या अनेक संगीतकारांसोबत गायले… त्यांची जवळपास सगळी गाणी लोकप्रिय झाली. त्यात हिंदीसोबत बंगाली आणि मराठी गाण्यांचाही समावेश आहे. म्युझिक टुडे ते सारेगामा अशा अनेक संगीत कंपन्यांनी राशिदजींच्या खाजगी मैफली आणि अल्बम्स प्रकाशित केले आहेत.

राशिदजींकडे कंठ संगीतातील सर्वांत मोठी जमेची बाजू होती, ती म्हणजे त्यांचा जबरदस्त ‘थ्रो’. त्यामुळे त्यांचं गाणं भारदस्त, घरंदाज वाटायचं. त्यांच्या आवाजात राग देश, राग मारवा अधिक खुलून यायचे. तराना तर त्यांची खासीयतच होती. राशीदजींचे डोळे मोठे होते. त्यामुळे गाताना त्यांचं गाणं डोळ्यातून दिसायचं. त्यांची गाण्यातील तन्मयता चेहऱ्यावरून अभिव्यक्त व्हायची.

शास्त्रीय संगीताच्या माझ्या मुशाफिरीत राशिदजी अगदी सुरुवातीलाच भेटले आणि नंतर सातत्याने भेटत गेले. कधी कॅसेट, सीडी, एमपी थ्रीमधून, तर कधी प्रत्यक्ष सवाई, गुणिदास, हृदयेश, एनसीपीए, नेहरू सेंटरमधील मैफलींतून.

एकदा ‘लोकसत्ता गप्पां’मध्ये संगीतकार राहुल रानडेंनी त्यांची मुलाखत घेतली होती. राशिदजींच्या ओढीने त्या कार्यक्रमाला गेले, पण निराशा झाली. ते गाण्यात जसे खुलतात, तसे बोलण्यात खुलले नाहीत. त्यांची अभिव्यक्ती गाण्याशीच एकरूप व्हायची आणि कदाचित तेच त्यांचं माध्यम होतं.

त्याच दरम्यान अरुण शेवते सरांच्या ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकासाठी पतियाला घराण्याच्या ख्यातनाम गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची मुलाखत घेण्याचा योग आला. याही कोलकात्याच्याच आणि राशिदजीही. शिवाय दोन्ही कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध. कौशिकी राशिदजींना ‘काकू’ म्हणत. बंगाली लोक ‘काका’ला ‘काकू’ संबोधतात.

राशिदकाकूंची गायनाची शैली कौशिकींना प्रचंड आवडते. म्हणून एकदा त्यांनी त्यांची राग देशमधील एक बंदिश एका मैफलीत त्यांच्यासारखीच गायचा प्रयत्न केला, परंतु अंतऱ्यातील शेवटची लाईन त्यांना तितकीशी जमली नाही. ते त्यांनी दुसऱ्या दिवशी राशिदकाकूंना फोन करून सांगितलं आणि कबूलही केलं की, ती बंदिश चोरून गायचा प्रयत्न केला खरा, पण ती तितकीशी जमली नाही. मग राशिदकाकूंनी हसून ती कशी तंत्रशुद्ध पद्धतीनं गायची, याचं प्रात्यक्षिक त्यांना फोनवर गाऊन दाखवलं आणि ती पूर्ण बंदिश फोनवरच शिकवली.

राशिदजी आणि कौशिकी यांनी अनेक मैफली एकत्र केल्या. त्यांनी एकत्रित गायलेली ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया’ ही ठुमरी विशेष लोकप्रिय झाली. राशिदजींना गाण्यासारखाच खिलवण्याचाही शौक होता. ते स्वतः उत्तम स्वयंपाक करायचे. बिर्याणी किंवा शामी-कबाब बनवून मित्रमंडळींना खिलवायचे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

पंडित भवानीशंकर : ‘जगद्विख्यात तालवादक’ या ख्यातीची झूल अंगावर न वागवणारा पखवाजाचा ताल…

मालिनीताई राजूरकर : गाणं सात्त्विक, सत्शील आणि घरंदाज; आणि व्यक्तिमत्त्वही!

पं. कुमार गंधर्व : संगीताचे आपले सगळे अनुबंध कुमारजींजवळ येऊन थांबतात. हा प्रवास थकवणारा नाही, तर दिवसेंदिवस चैतन्याचा झरा बनून वाहणारा आहे!

अन्नपूर्णा देवी स्वतःच स्वतःच्या कैदेत राहिल्या. त्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. या एकांतानं त्यांचं संगीताशी असलेलं नातं मात्र अधिकच दृढ केलं

..................................................................................................................................................................

अलीकडच्या काळात स्वतःचं फेसबुक, इन्स्टाग्राम पेज त्यांनी सुरू केलं आणि त्यातून विविधरंगी राशिदजी दिसायचे. कोविड काळात त्यांच्या कोलकात्याला सुरू केलेल्या ‘द फिफ्थ नोट’ या अकादमीच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगीत शिकवायला सुरुवात केली होती. संगीताच्या बाबतीतही संगीतातील परंपरा जपतच, नवनवीन कल्पना त्यांनी आत्मसात करून, त्या पद्धतीने स्वतःला कायम काळाच्या वेगात ठेवलं. त्यात ते रसिकांपासून हरवले किंवा दुरावले नाहीत. त्यांचं महत्त्वाचं श्रेय हे आहे की, त्यांनी तीन पिढ्यांना स्वतःच्या संगीतात बांधून ठेवलं.

राशिदजींना पदमभूषण, पदमश्री, संगीत नाटक अकादमी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. आणि त्यांचं गाणं तर लाखो-करोडो लोकांच्या कानांत-मनांत सतत वाजत असतं.

त्यांच्याशी संबंधित दोन अधोरेखित करण्यासारख्या आठवणी आहेत. पहिली, संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात उस्ताद सुलतान खान यांनी गायलेलं ‘अलबेला सजन आयो रे’ ऐकलं आणि एका गाण्याची जुनी याद वर आली. ते माझ्याकडे ऑडिओ कॅसेटवर होतं. ते मी औरंगाबादमधल्या औरंगपुऱ्यातल्या एका अवलियाच्या म्युझिक स्टोअरमधून कॅसेटवरून सीडीवर ट्रान्सफर करून घेतलं होतं. पण ते गाणं पूर्वी कुणी गायलंय, हेच नेमकं आठवत नव्हतं. तेव्हा आटापिटा करून, सीडी शोधून, कॅसेटवरचं कव्हर शोधून ते गाणं लावलं, ते होतं उस्ताद राशिद खान यांनी गायलेलं...

राशिदजींनी गायलेली ही राग अहिर भैरवमधली सुंदर बंदिश आहे. राशिदजींचा हा अलबेला ऐकताना एकाच बंदिशीमध्ये अनेक स्वरांचा उत्सव अनुभवल्यासारखं वाटतं. त्यांचा त्यातला आर्जवी सूर आपल्याला चिंब भिजवतो आणि ते भिजणं मूळातून अनुभवण्यासाठी मी पुन्हा पुन्हा ‘अलबेला’कडे वळते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

दुसरी आठवण. राशिदजींचा राग यमनमधील तराणा पाँडिचेरीच्या रस्त्यांवर भटकत असताना अचानक आठवला आणि तो पूर्ण ऐकण्याची इच्छा झाली. तेव्हा आतासारखे ‘स्पॅार्टीफाय’, ‘गाना’, ‘यूट्यूब’, ‘ॲमेझॅान’ हाताशी आणि फोनच्या टच-स्क्रीनसरशी नव्हते. ही सगळी स्वर-अस्वस्थता मनाशी असताना, अगदी समोरच एक म्युझिक स्टोअर दिसलं. सहजच आत डोकावले आणि बघितलं, तर ‘म्युझिक टुडे’ची ‘सेलिब्रेटिंग द लिजंड’ ही सीडी समोरच्या काचेच्या कपाटात लावलेली… त्यात राशिद खान यांचा राग यमनमधील तराणा होता.

मग काय, ‘वक्त का तकाजा’ आणि ‘सूरों की पुकार’ म्हणून ती सीडी विकत घेतली. बॅगेतला पॅनासॅानिकचा डिस्कमन काढून लगेच त्यात सीडी टाकली आणि तो तराणा ऐकत किती वेळ भटकत राहिले...

मन रितं रितं असताना, संध्याकाळी घरी कुणी नसताना सगळे प्रखर दिवे बंद करून, कोपऱ्यातील मंद दिव्याच्या प्रकाशात सोफ्यावर बसल्यावर, ‘स्पोर्टिफाय’वरच्या ‘माय फेवरीट प्लेलिस्ट’मधला राशिदजींचा राग देशमधील ‘करम कर दि जे…’ हा तराणा लावते. तो ऐकताना माझ्या दाही दिशा उजाळून निघतात…

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Pradnya Wele

Fri , 12 January 2024

अप्रतिम लिखाण आज तुमच्या मुळे रशीद सर याच्या बद्दल अधिक माहिती मिळू शकली.

Pradnya Wele

Fri , 12 January 2024

अप्रतिम लिखाण आज तुमच्या मुळे रशीद सर याच्या बद्दल अधिक माहिती मिळू शकली.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......